सदस्य:संभाजीराजे

  विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  गेले काही दिवस मी मराठी विकिपीडियावर भारतीय राजकारण या विषयावर माझे योगदान द्यायचा जाणीवपूर्वक आणि प्रामाणिक प्रयत्न करत होतो.गेले काही दिवस सकाळी उठल्यानंतर पहिले काम विकि बघणे असे.

  पण गेल्या काही तासांत घडलेल्या घडामोडींमुळे माझा मराठी विकिवरील विश्वास उडाला आहे. मी लिहिलेले लेख परिपूर्ण नक्कीच नाहीत. पण त्यात बदल काय करावा याविषयी कोणताही रचनात्मक सल्ला न देता केवळ "या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी." असा शेरा मारला आहे. संबंधीची चर्चा चर्चापानावर असणे तर सोडाच तर चर्चापान तयारच नाही.

  मराठी वेबदुनियेत इतर अनेक दर्जेदार संकेतस्थळे आहेत. मला वाटते मी माझे योगदान त्या संकेतस्थळांवर देऊ शकेन. माहितीचा स्त्रोत म्हणून कोणीही मराठी विकिपीडिया बघायला जात नाही. कारण महाराष्ट्र आणि मराठी संस्कृतीविषयी मराठी विकिपीडियापेक्षा अधिक माहिती इंग्रजी विकिपीडियावर उपलब्ध आहे.तेव्हा मराठी विकिपीडियापेक्षा मला इतर मराठी संकेतस्थळांवर लेखन करायला आवडेल.

  सबब माझे मराठी विकिपीडियावरील खाते बंद करण्यात यावे ही विनंती. खाते बंद करता येत नसेल तरीही ’संभाजीराजे’ या नावाने मराठी विकिवर यापुढे एकही लेख दिसणार नाही.

  संभाजीराजे ०२:०९, १२ डिसेंबर २००९ (UTC)

  नमस्कार संभाजीराजे,
  गेल्या काही तासांत नक्की काय घडले हे मला नेमके माहिती नाही. अलीकडील बदल पाहून मला अंदाज बांधता येईल पण त्याने फक्त बदल कळतील, तुमच्या मनातील गोम कळणार नाही असे वाटते, तरी अंदाज बांधून त्यावरून काहीतरी action घेण्यापेक्षा तुम्हाला मी प्रामाणिकपणे विचारू इच्छितो की नेमके काय घडले ज्याने तुमचा इतका विरस झाला? या प्रश्नात बिलकूल खोचकपणा नाही, तर तुमची अडचण समजून घेउन ती दूर करण्याचा हेतू आहे. जर तुम्ही याबद्दल मला कळवलेत तर मी अधिक सांगू शकेन.
  मराठी विकिपीडियावर संपादकांची वानवाच आहे आणि त्याचमुळे मराठीपेक्षा इंग्लिश विकिपीडियावर मराठी संस्कृती, इ. बद्दल जास्त माहिती आहे. जर आपण असेच एकमेकांशी भांडलो तर ही स्थिती बदलणार तर नाहीच नाही. आपल्या लेखांवर बदल, इ. साचे लावण्यात आले ही जर का मुख्य तक्रार असली तर त्या त्या लेखांच्या चर्चा पानावर किंवा हे साचे लावणार्‍याशी संवाद साधल्यास ही तक्रार खचितच दूर होईल. जर तुम्हाला वाटत असेल की एखादा सदस्य मुद्दामहून खोडसाळपणे तुम्हाला निशान बनवित आहे तर त्याच्याशी बोलून प्रश्न/गैरसमज मिटवावा ही विनंती. जर असे करुनही तुमची तक्रार कायम असली तर जरुर माझ्या लक्षात आणून द्या, प्रचालक/प्रबंधक या नात्याने मी मध्यस्थी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.
  असे वैतागून जाउन विकिपीडियावर योगदान करणे सोडून दिल्याने आपल्या सगळ्यांचेच नुकसान आहे यात शंका नाही. तरी आपण कोणताही निर्णय असा तडकाफडकी घेउ नये ही विनंती.
  क.लो.अ.
  अभय नातू ०६:०४, १२ डिसेंबर २००९ (UTC)
  तुम्हा दोघांची चर्चा कोणत्या विशीष्ट लेखाच्या संदर्भाने चालू असल्यास कल्पना नाही, परंतु साचांमध्ये सुधारणांची आवश्यकता आहे याबाबत सहमत आहे.
  अजून सुधारणा विषयक सूचना लावलेल्या बहूसंख्य साचांचा उद्देश त्या लेखाचे संबधीत लेखाचे सुधारणा घडवून आणणार्‍या विशीष्ट प्रक्ल्पा संबधीत वर्गीकरणाचा असतो. या सुधारणा काळाच्या ओघात होणे अपेक्षीत असते आणि हे सहसा सार्वत्रिक सहयोगाचे अवाहन असते. पण बर्‍याचदा खासकरून नवीन सदस्य या सूचना साचे व्यक्तिगत टिपण्णी वाटत असावेत असे मला आढळून आले आहे. असा गैरसमज होऊ नये याकरिता काही तरी करावयास हवे पण नेमके काय करता येईल ते ठरवता येत नाही आहेत. काही सूचना असतील तर त्या कळवाव्यात.
  विस्तार साचात काहितरी तांत्रीक अडचण आहे कि ज्यामुळे तो बर्‍याचदा तुटल्या सारखा दिसतो.
  लेखांवर साचे लावण्याचे कारण बर्‍याचदा त्याचे आपोआप ज्या प्रकारची सुधारणाहवी आहे त्या वर्गात आणि प्रक्ल्पात वर्गीकरण होते.लेख पानावंर साचांची गर्दी होऊ नये म्हणून लेख प्रकल्पान्वये चर्चा पान साचे असावयास हवेत. पण हे सर्व करण्यास पुरेसे संपादन (सक्रीय सदस्य) बळ हवे या मुद्द्यावर गाडी येऊन अडते खरी.
  व्यक्तिगत प्रोत्साहनात्मक मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/मार्गदर्शक प्रकल्पाची योजना आखली आहे पाहू कसा काय रिस्पॉन्स मिळतो ते.
  शुद्धलेखन विषयक बर्‍याच साचांची मी रचना केली आहे ते संबधीत प्रकल्पात पाहून सुधारता येतील पण खास करून विकिपीडिया:शुद्धलेखनाचे नियम/आमाआका साचात योगदान आणि त्याचा वापर सदस्यांकडून चर्चा पानावर वाढवून हवा आहे . तो कसा वाढवता येईल याबद्दलही प्रतिसादाची अपेक्षा आहे.माहितगार ०७:२८, १२ डिसेंबर २००९ (UTC)