Jump to content

सदस्य चर्चा:प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ )

[संपादन]
चांदणे शिंपित जा ...!
मराठी विकिपीडिया गौरव समितीची
मराठी विकिपीडियावर अनेक मंडळी अहोरात्र काम करत आहेत. काही नवीन आहेत तर काही जुनी झाली, काम करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कामाची कदर करण्यासाठी गौरवासारखे दुसरे साधन नाही. कामाच्या वाढत्या व्यापाबरोबरच त्याची योग्य रीतीने कदर पण करण्याच्या उद्देशाने एक आधारभूत संरचना मराठी विकिपीडियावर असावी ह्या उद्देशाने "मराठी विकिपीडिया गौरव समिती" ची स्थापना करण्यात येत आहे.

सदर समिती तर्फे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपादन योगदानाचे गौरव जसे - १००० संपादने, २००० , ५००० संपादने आणि काही इतर गौरव (सदस्यांचे काम तपासून) प्रदान करण्यात येतील तसेच इतरांनी शिफारस केलेले अथवा समितीस योग्य वाटलेले/सुचलेले विशेष गौरवही प्रदान करण्यात येतील. अर्थात व्यक्तिगत बार्नस्टार देण्याच्या जुन्या पद्धतीला पूरक म्हणून ही समिती कार्य करेल.

"मराठी विकिपीडिया गौरव समितीची " सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो की भविष्यात सदर समिती ही मराठी विकिपीडियाच्या उज्ज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.


जानेवारी २०१२ मधील सक्रिय सदस्यांचा आलेख
२०१२ जानेवारी महिन्यात जवळ जवळ एक हजार नवीन सदस्य नोंदणीकृत झाले त्याचा आलेख
जानेवारी २०१२ मध्ये मराठी विकिपीडियाने एक लाख पानांचा टप्पा गाठला त्याचा आलेख
पाने सांख्यिकी
लेख ३४,५४४
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

१,०९,५३४
चढवलेल्या संचिका ३,१९२
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,६८,६९३
प्रतिपान संपादने ८.८४
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २२,०८४
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्वीकृती अधिकारी
१८:३८ १ फेब्रुवारी २०१२ ची आकडेवारी


कार्यक्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यक्रम
  • टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई येथे ६ ते ८ जानेवारी दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. 'टेक फेस्ट २०१२' ला एक लाखाहून जास्त लोकांनी भेट दिली.
  • १५ जानेवारी २०१२ ला W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई आय. आय. टी बॉम्बे येथे आयोजित करण्यात आली होती.
टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई
टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई

त्या दरम्यान मराठी विकिपीडिया मोबाइल तसेच टॅबलेट वरून वापरण्यासाठी 'अँड्रॉईड अ‍ॅप' निर्माण करण्यात आल्या.

  • * ८ जानेवारी २०१२ - मराठी विकिपीडिया (एडिट ट्रेनिंग/ प्रशिक्षण/ मार्गदर्शन) शिबिर टेक मराठी महामेळावा, पुणे. १०० प्रशिक्षणार्थीनी ह्यात भाग घेतला.
  • * १५ जानेवारी २०१२ - W11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे आयोजित करण्यात आली.
  • * १३ जानेवारी २०१२ - आबासाहेब अत्रे शाळा, रास्ता पेठ, पुणे येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विकी शिकवणी आयोजित करण्यात आली होती. ५० शाळकरी विद्यार्थ्यांनी ह्यात हिरीरीने भाग घेतला.
  • * २९ जानेवारी २०१२ - शाहीर अमर शेख सभागृह, चर्चगेट मुंबई, मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळाव्यात "मराठी विकिपीडिया आणि मराठी भाषेकरिता उपलब्ध होत असलेल्या तंत्रज्ञानाचा परिचय" यावर व्याख्यान तसेच विकिपीडियावर संपादन कसे केले जाते याचे सोदाहरण प्रात्यक्षिक दिले गेले. कार्यक्रमास १२५ मराठीप्रेमींची उपस्थिती होती.

२०१२ फेब्रुवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ३ फेब्रुवारी - "माहिती तंत्रज्ञान, विकिपीडिया आणि मराठी भाषा" चर्चासत्र, मराठी विभाग पुणे विद्दापीठ.
  • १० फेब्रुवारी २०१२ - विकी शिकवणी, L&T इनस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी, साकीनाका मुंबई.
  • १० ते १२ फेब्रुवारी - हॅक्याथॉन, (Gnunify) SICSR पुणे आणि मराठी विकिपीडिया - परिचय,
  • १७ फेब्रुवारी - मराठी विकिपीडिया - परिचय, COE, Pune
  • १८ फेब्रुवारी - विकी कार्यशाळा, आय आय टी मुंबई.
  • २० ते २७ फेब्रुवारी - फोटोथॉन, मुंबई.
  • २५ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस कार्यक्रम, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.
.
ठळक घडामोडी आणि आढावा
  • मराठी विकिस्रोतला प्रशासकीय मान्यता

मराठी विकिस्रोत हा बंधू प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव विकी मीडियाकडे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. विकी संमेलन २०११, मुंबईच्या जाहीरनाम्यात ह्या प्रकल्पास सुरुउ करण्याच्या घोषणेनंतर प्रस्तावाचा पाठपुरावा आणि इतर अनिवार्य गोष्टींची पूर्तता मराठी विकिपीडिया समाजाने केल्याने,. लॅंग्वेज कमिटीने मराठी विकिस्रोत ह्या बंधू प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल.

विकिस्रोत म्हणजे विकी समुदायाने उभारलेले व देखभाल केले जाणारे, प्रताधिकारमुक्त दस्तऐवजांचे इंटरनेटवरील खुले ग्रंथालय आहे. ऐतिहासिक काळापासूनचे ललितेतर व ललित साहित्य, चित्रे/कलाकॄती यांच्या अस्सल प्रकाशनाबरहुकूम विश्वासार्ह विकिआवॄत्त्या सर्वांसाठी गोळा करून देणे हे विकिस्रोताचे उद्दिष्ट आहे. नवीन पिढीस जुने प्रताधिकारमुक्त मराठी ग्रंथ वाचण्यास इंटरनेटवर युनिकोड फॉर्ममध्ये सहज उपलब्ध करून देणे तसेच संदर्भ देणे आणि पडताळणे सोपे करण्यासाठी सदर प्रकल्प उपयोगात येईल.

मराठी विकिस्रोत' हे एक आंतरजालावर असलेले मुक्त पुस्तकालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण आहे. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आपण आणू शकता. मराठी विकिपेडियावर त्या लेखांची चर्चा होऊ शकते.

परंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवले जातात. उदा० ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. तसेच ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने येथे संग्रहित करता येतील.


  • नवीन नियुक्ती
माहितगार - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मराठी विकिपीडिया वरील दैनंदिन कामे, नवीन प्रस्ताव, तांत्रिक जबाबदाऱ्या, सुरक्षा, ध्येय धोरणे, प्रगती आदी अनेक आघाड्या अभय नातू हे एकटेच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत होते. वाढत्या व्यापाबरोबरच खांदे वाढवावे जेणे करून कामाचा वैयक्तिक दबाव कमी होईल आणि सेवाही सुरळीत मिळतील या उद्देशाने प्रशासक (ज्याला आता स्वीकृती अधिकारी असे संबोधण्यात येते) या पदासाठी मराठी विकिपीडिया समाजाने एकमताने 'माहितगार' यांना ही जबाबदारी दिली आहे.

माहितगार हे कुशल संघटक आहेत, मराठी विकिपीडियावर ‎प्रचालक म्हणून ७ जून २००६ पासून ते कार्यरत आहेत. तांत्रिक तसेच धोरणात्मक विषयांवर त्यांनी नेहमीच त्याच्या व्यक्तिमत्त्वातील परिपक्वतेचा परिचय दिलेला आहे. प्रेमळ व्यक्तिमत्त्व, प्रत्यक्ष क्षेत्रातील त्यांचे काम आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क हे वाखाणण्याजोगे आहे. तेंव्हा माहितगारांना 'स्वीकृती अधिकारी' (प्रशासक) पदाची जबाबदारी दिल्याने प्रशासकीय पातळीला अधिक बळकटी येईल.

'माहितगार' यांच्या पुढील कार्यास 'विकीपत्रिका' वाचकांतर्फे हार्दिक शुभेच्छा ...!!!

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

वाचकांच्या प्रतिक्रिया

  • राहुल जी, सादर नमस्कार, मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचा आपल्या उत्कृष्ट संपादनाकरीता आपणांस व संपादक टीमचे हार्दिक अभिनंदन. या पत्रिकेमुळे मराठी विकिपीडिया विकास कार्याकरीता अनेक स्वयंसेवक जोडता येतील.--विजय नगरकर
  • नमस्कार राहुल, विकीचा अंक मस्त झाला आहे. आवडला. त्यात सांख्यिकी देण्याची कल्पना फार आवडली. हा अंक इतर संकेतस्थळांवर सादर केला तर चालेल का? निनाद
  • Superb effort ... Is there any away I can read in English -- Naveenpf
  • मला विकिपत्रिका नको आहे, त्यासंबंधीच्या लिंक किंवा मजकूर माझ्या सदस्य किंवा चर्चापानावर कृपया टाकू नये. धन्यवाद. मनोज
  • नमस्कार राहुल ! विकिपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे, आणि अधिककरून तुमचे, अभिनंदन ! अंक नेटका आणि देखणा (याबद्दल विशेष शाबासकी :) ) झाला आहे. संकल्प द्रविड
विकिपत्रिका प्रकाशक...
मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकिपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !



मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ )

[संपादन]
२०१२ नववर्ष अभिष्टचिंतन ...!
सर्व मराठी विकिपिडीयंसना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आम्ही आपल्यासाठी नवीन वर्षाची आगळी वेगळी भेट घेऊन आलो आहोत. हो विकीपात्रिका ...! मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने हा नवीन उपक्रम सुरु करीत आहोत. जेणेकरून, सदस्यांना आपल्या आवडीच्या कामात भाग घेऊन योगदान करता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान पण समोर आणता येईल. सांख्यिकी, लक्ष, ध्येय आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार आणि नेटवर्क ह्यात सुसंवाद साधण्यात ह्याचा उपयोग होईल.

नववर्षाच्या मुहूर्तावर विकीपात्रिका ह्या मासिकाच्या प्रकाशनाची सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो कि भविष्यात सदर मासिक हे मराठी विकिपीडियाच्या उज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.

विकिपत्रिका मराठी विकिपीडिया
२०११ मधील गुगल वरील मराठी विकिपीडियाबाबतचा लोकांनी घेतलेल्या शोधाचा लेखाजोखा (ट्रेंड)
पाने सांख्यिकी
लेख ३४,७९७
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

९६,२४०
चढवलेल्या संचिका ३,१६८
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,३२,७५०
प्रतिपान संपादने ९.६९
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २१,१५१
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्विकृती अधिकारी


प्रत्यक्ष क्षेत्रातील कार्यक्रम
  • विकिपीडिया व त्याचे बंधू-प्रकल्प- विकिस्रोत, विक्शनरी इत्यादी यात वापरल्या जाणार्‍या मिडियाविकी सॉफ्टवेअरच्या मिडियाविकी आणि मिडियाविकि विस्ताराच्या संदेशांचे स्थानिकीकरण, अनुवाद, अनुवादांचे प्रमाणिकरण
    CMDA IT expo. १५ ते १८ डिसेंबर २०११, पुणे. मराठी विकिपीडिया स्टॉल.

व सर्वसामान्य मराठी माणसास समजण्यास सुलभ भाषेचा उपयोग करण्याच्या उद्देशाने 'ट्रान्सलेशन स्प्रिंट (अनुवाद दौड/भाषांतर कार्यशाळा)' 'शनिवार,दिनांक २६ नोव्हेंबर २०११ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. ह्या उपक्रमाद्वारे ३२० संदेशांचे स्थानिकीकरण (लोकलायझेशन) पूर्ण करण्यात आले.

  • "CMDA IT Expo 2011, पुणे येथे १५ ते १८ डिसेंबर दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्टॉलला सुमारे ३००० लोकांनी भेट दिली तर २५० पेक्षा जास्त लोकांनी सक्रीय सहभागासाठी नावे नोंदविली.
  • शनिवार दिनांक २४ डिसेंबरला 'मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पुणे' येथे विद्यार्थांसाठी विकी शिकवणीचे आयोजन करण्यात आहे होते. शिकवणीत ५० विद्यार्थांनी भाग घेतला ज्यात ४०% विद्यार्थिनी होत्या.

२०१२ जानेवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ६ ते ८ जानेवारी - टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई
  • ७ - ८ जानेवारी - विकी शिकवणी टेक मराठी मेळावा, पुणे
  • १५ जानेवारी - W -11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, पुणे
  • १५ जानेवारी - W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई
  • २९ जानेवारी - विद्यार्थी मेळावा विकीशिकवणी , मराठी अभ्यास केंद्र, दादर मुंबई
विकिसंमेलन भारत २०११, मुंबई आढावा
मराठी ट्रॅक - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मुंबईमध्ये भरलेल्या विकीसंमेलन २०११ च्या निमित्याने अनेक मराठी भाषाप्रेमी मंडळीना चर्चा करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. उपस्थितांमध्ये मराठी विकिपीडिया संपादक, मराठी साहित्यिक, राज्य मराठी विकास संथेचे अधिकारी, उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाचे माहिती अधिकारी, आय आय टी मुंबईचे संशोधक, पत्रकार, आणि मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी-माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या परिषदेत, इंग्रजी भाषेचे ‘विकिपीडिया’तील वाढते महत्त्व जितके अभ्यासू वृत्तीने मांडण्यात आले तितकेच मराठी भाषा या नव्या ज्ञानकोशात कशा पद्धतीने समाविष्ट होऊ शकते याचाही तज्ज्ञांनी चांगलाच ऊहापोह केला. मराठी माणसाचा तंत्रज्ञानाविषयीचा न्यूनगंड, त्याच्यामध्ये माहिती आणि आत्मविश्वासाचा असलेला आभाव, मराठी युनिकोडची माहिती नसणे किंवा टायपिंग न येणे, मजकूर संपादनाचे कौशल्य नसणे, इंटरनेटच्या सोयींचा आभाव, अगदी मराठी विकिपीडिया अस्तित्वात आहे याची माहिती नसणे, अशा अनेक अडचणींमुळे मराठी समाजाने या तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवली आहे, असे प्रमुख तज्ज्ञांचे मत होते. मराठी भाषेला ज्ञानभाषेच्या पातळीवर आणून ठेवायचे असेल तर हाताशी असलेल्या तंत्रज्ञानाचा जोरकस वापर करण्याची गरज आली आहे, असेही काहींचे मत होते. सध्याच्या जमान्यात सोशल नेटवर्किंग साइटचा प्रभाव वाढत असताना लोकांमध्ये संवाद वाढत आहे. पण यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण कितपत होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या दृष्टीने सोशल नेटवर्किंग साइटवर जास्त वेळ बसणाऱ्या मंडळींनी आपला १० टक्के वेळ वाचवून ‘विकिपीडिया’त योगदान दिले तर त्याने भाषाव्यवहारात भर पडेल, शिवाय ज्ञानशाखेची ओळखही अनेकांना होईल असा विचार मांडण्यात आला, तर काही उपस्थितांनी भाषाशास्त्र, भाषासंवर्धन, मराठीतील नव्या शब्दांचा उपयोग, जुन्या शब्दांना पुनर्जन्म, इंग्रजी शब्दांसाठी नेमका प्रतिशब्द, भाषांतर, मजकुराचे उत्तमरीत्या संपादन अशा विविध पैलूंनाही स्पर्श केला. मराठी फाँट हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. त्यावर अनेक पर्याय सुचवण्यात आले. संमेलनादरम्यान आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी 'ह्याक्याथॉन' ह्या तांत्रिक मार्गीकेतून 'नारायम' या फाँटचे मराठीकरण आणि सुलभीकरण पूर्ण केले.

या समस्यांच्या खोलाशी जाताना महाराष्ट्रातील प्रमुख ७ शहरांतील निवडक शाळांमध्ये मराठी ‘विकिअकादमी’ स्थापन करण्याचीही घोषणा मराठी विकिपीडियाने केली आहे. जेणेकरून, शिक्षक आणि विद्यार्थी या चळवळीशी जोडून घेतला तर दोघांच्याही ज्ञानकक्षा अधिक रुंदावत जातील. ‘विकिस्रोत’ ह्या बंधुप्रकल्पाची घोषणा, संस्कृत विकिपीडियाशी सहयोग, इतर माहिती आणि संपर्क माध्यमांचा वापर इत्यादी गोष्टींद्वारे मराठी विकिपीडिया चळवळ अधिक व्यापक करण्याचा उदेश जाहीर करण्यात आला. प्रसिद्धी माध्यमांनी मराठी विकिपीडियास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्याचे संमेलनादरम्यान जाणवले.

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

मराठी विकिपीडिया विकिसंमेलन भारत २०११ जाहीरनामा

  • महाराष्ट्रातील ७ प्रमुख शहरामधील निवडक शाळांमध्ये मराठी विकी अकादमीची आखणी करणे आणि तेथील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पर्यंत मराठी विकिपीडियाचे रीतसर प्रशिक्षण पोहोचवणे आणि मराठी विकिपीडियामध्ये भर घालणे.
  • संस्कृत विकिपीडियाशी सहयोग करून त्यांना प्रशिक्षण/ विकी शिकवणी आणि तांत्रिक गोष्टी या मध्ये मदत करणे.
  • मराठी विकिपिडीयावर "विकी स्रोत" ह्या बंधू प्रकल्पास सुरवात करणे.
  • मराठी विकिपीडिया इतर संपर्क माध्यमांद्वारे उपलब्ध करणे जसे मोबाईल, टॅब, सी डी आदी.
  • मराठी विकिपीडिया समविचारी मंडळींनी एकत्र येऊन माहितीचे आदान प्रदान करणे.
विकिपत्रिका प्रकाशक...
मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकीपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !
   स्वागत प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,४९३ लेख आहे व १४० सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

जसेदृश्य संपादक तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

[संपादन]

नमस्कार,

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांची नावे संयुक्त महाराष्ट्र चळवळ या लेखात समाविष्ट केली आहे. केवळ हुतात्म्यांची नावे देण्याकरता नवे स्वतंत्र पान तयार करण्याची गरज नाही. ही माहिती मूळ लेखाचाच भाग असावी. कृपया ही नावे पुन्हा एकदा तपासून पहा.

धन्यवाद,

संकेत अंधारीकर २१:३०, २६ जून २००८ (UTC)

वेदांची माहिती उत्तम होते आहे. मी ऋग्वेदा विषयी लिहितो आहे. कसे वाटते ते कळवा... (शु.ले. बाकी आहे!)

नाव बदल - सावता माळी

[संपादन]

नमस्कार, मी शुद्धलेखनाचे नियम या पानावरील अनुच्चारित अनुस्वाराच्या नियमानुसार (नियम १.५) सावंता माळी हे सावता माळी असे पुनर्निर्देशित केले. येथे अपवाद असल्यास कृपया तो बदल परतवावा. क्षितिज पाडळकर १८:५२, १५ जुलै २००९ (UTC)

अभिनंदन

[संपादन]

नमस्कार प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,

मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांपकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.

उपयोगी पाने
मराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.
आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
विकिपीडिया मदतचमू
~~~~

मुक्तेश्वर

[संपादन]

मुक्तेश्वर म्हणजे चिंतामणीसुत मुदगल म्हणजे मुक्तेश्वर चिंतामणी मुदगल असे नाव बरोबर होईल काय? तसे बरोबर असेल तर मुक्तेश्वर चिंतामणी मुदगल असा लेख बनवून #पुर्ननिर्देशन[[मुक्तेश्वर]] मुक्तेश्वर लेखाकडे पुर्ननिर्देशीत करता येईल.

टिपः

  1. एखाद्या लेखात अनुक्रमणिका किंवा विभाग नको असेल तर तसेही करता येते.शक्यतोवर विशेष दालन मुखपृष्ठ बनवताना टाळले जाते. एरवी विभाग आणि अनुक्रमणिका वाचक आणि संपादक या दोघांनाही सोयीची ठरते.
  2. एरवी चूका होतील याची खूप काळजी टाळावी.गरज भासेल त्याप्रमाणे विकिकरण सूचना लेखात लावत असतो.

धन्यवाद

Mahitgar ०६:४२, १८ जुलै २००९ (UTC)

संदर्भ कसा द्यावा

[संपादन]

लेख वाक्य मध्ये संदर्भ जोडून दिला आहे, तो मी आपल्याला हवा तसा आहे का ते बघावे. मी केलेले बदल अभ्यासवायचे असतील तर मी केलेला पहीला बदल आणि मी केलेला दुसरा बदल पहावा.

"सुगम मराठी व्याकरण लेखन: लेखक कै. मो.रा. वाळंबे, पृ.क्र. १२२ वर" या संदर्भास <ref name=morawa> हे नाव दिले हाच संदर्भ लेखात इतरत्र पुन्हा द्यावयाचा झाल्यास <ref name=morawa/> लिहीलेत तर पुरेल. समजा दुसरा संदर्भ पृष्ट २३० चा द्यावयाचा असेल तर <ref name=morawa2>सुगम मराठी व्याकरण लेखन: लेखक कै. मो.रा. वाळंबे, पृ.क्र. २३० वर</ref> असे देता येईल.


इतर सदस्यांनाही फायदा व्हावा या दृष्टीने विस्स्तृत स्वरूपात उत्तर देत आहे. उत्तर लांब वाटले तरी प्रत्यक्षात प्रक्रीया खूपच सोपी आहे.हा प्रॉब्लेम तुम्हालाच नाही तर सर्वच नवीन लोकांना जाणवतो मलाही संदर्भ कसे द्यायचे ते तब्बल ३ वर्षे कल्पना नव्हती

असो

  • पहिली सुचना

==संदर्भ== हे विभाग शीर्षक आपल्या सोयी साठी हवे

  • 'ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास 'केवल' किंवा 'शुद्ध' वाक्य म्हणतात <ref>सुगम मराठी व्याकरण लेखन: लेखक कै.मो.रा.वाळंबे </ref> तुमचा हा बदल बरोबर होता आणि बरोबर असेल.
  • एकच संदर्भ दोनदा समजा वरील संदर्भ पुन्हा पुन्हा द्यावा लागत असेल तर विवक्षीत(specific) संदर्भास विशेष नाव देऊन तोच मजकुरात पुन्हा पुन्हा कॉपी पेस्ट करून वापरता येतो.

या साठी नेहमीप्रमाणे संदर्भ द्यावा व ref टॅगमध्ये नाव घालावे, उदाहरण असे - <ref name=SuMaVyaLeMoRaWa>[http://www.बाह्यदुवा असेलतर.com सुगम मराठी व्याकरण लेखन बाह्यदुवा असेलतर]. सुगम मराठी व्याकरण लेखन: लेखक कै.मो.रा.वाळंबे </ref> त्यानंतर हाच संदर्भ त्याच पानात इतर मजकुरात पुन्हा द्यायचा झाल्यास नुसते नाव उद्धृत केलेले पुरते, असे - <ref name=SuMaVyaLeMoRaWa/>. अर्थात हे नाव इंग्रजी (रोमन स्क्रिप्ट मध्ये असावे लागते.

नाव पहिल्याच संदर्भस्थळी देणे आवश्यक नाही पण सहसा पहिल्यांदा संदर्भ देताना त्याला नाव द्यावे.

असे उदाहरण भारतीय रेल्वे किंवा गजानन महाराज लेखातून पहावयास मिळू शकेल.

  • ==संदर्भ== संदर्भ किंवा त्यांचे क्रमांक लिहू नये या विभागात केवळ <references/> हा टॅग लिहावा.वर दिल्या प्रमाणे संबधीत मजकूरासमोर लिहिलेले संदर्भ सॉफ्टवेअर जादुने ==संदर्भ== विभागात आपोआप खाली दिसतात.
  • मुख्यत्वे <references/> हा टॅग लिहून जाण्याचे राहील्यामुळे गोंधळ उडतो. तसा तो इतरांचा गोंधळ होऊ नये म्हणून सहाय्य्य पाने अपडेट करत आहे(आपल्याला सहे सहाय्य सोपे वाटल्यास कळवलेत तर सहाय्य पाने अपडेट करने अधिक सोईस्कर ठरेल).
  • त्या शिवाय सॉफ्टवेअर मध्ये त्याचे मराठीकरण करावे अशी विनंती मी मिडियाविकि सॉफ्टवेअर बग 19115 localize word "references" येथे नोंदवली, त्यात काही तांत्रीक अडचणी दिसतात त्या सुटल्यानंतर कालौघात नवीन सदस्यांना फायद्याचे ठरेल अशी अपेक्षा आहे.
  • मराठी विकिपीडियास्तरावरही त्यात अधिक सुलभता यावी म्हणून प्रचालक अभय नातू यांच्या चर्चा पानावर विनंती नोंदवली आहे.
Mahitgar ०६:०३, २० जुलै २००९ (UTC)

संदर्भ नाव मराठीत कसे द्यावे माझ्या ज्ञानातील वृद्धी

[संपादन]

<ref name=morawa>[http://www.बाह्यदुवा असेलतर.com सुगम मराठी व्याकरण लेखन बाह्यदुवा असेलतर]. सुगम मराठी व्याकरण लेखन: लेखक कै.मो.रा.वाळंबे </ref>

ऐवजी

<ref name="मोरावा">[http://www.बाह्यदुवा असेलतर.com सुगम मराठी व्याकरण लेखन बाह्यदुवा असेलतर]. सुगम मराठी व्याकरण लेखन: लेखक कै.मो.रा.वाळंबे </ref>

आणि <ref name=MoRaWa/>. ऐवजी <ref name="मोरावा"/>.

असे लिहावे मराठी नाव स्वकारले जाण्याकरिता मराठी नाव इन्व्हर्टेड कॉमात हवे अशी माहिती मिळाली आणि त्या प्रमाणे आपल्या वाक्य लेखात बदल करून पाहिला काम झाले आणि छान वाटले.आपल्य मुळे मीही काही नवीन शिकलो.

धन्यवाद

Mahitgar ०७:५३, २६ जुलै २००९ (UTC)

साचा:

[संपादन]

{{साचा:विद्यापीठ प्राध्यापक}} हा साचा आपल्या सदस्य पानावर लावावा हि विनंती तो खालील प्रमाणे दिसेल

' हे सदस्य एका विद्यापीठातील किंवा उच्च शिक्षण संस्थेतील प्राध्यापक आहेत.


माहितगार ११:४४, १९ ऑक्टोबर २००९ (UTC)

होय साचा बरोबर दिसत आहे , तुम्ही ऑनलाईन असाल याची कल्पना नव्हती , तुम्हाला सुद्धा दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा ! माहितगार १२:०२, १९ ऑक्टोबर २००९ (UTC)

*हि चर्चा विकिपीडिया:धूळपाटी१७ येथे तात्पूरती हलवली आहे संपूर्ण उत्तर तयार झाल्या नंतर आपल्या पानावर माडेनच पण विकिपीडिया:धूळपाटी१७ सुद्धा आपण त्पासून सुधारणा सुचवू शकला तर स्वागतच आहे.

नमस्कार, 'जैन धर्म' या विषयावर लेखन करायचे आहेत. यात मला जैन धर्मातील तत्वे काय आहेत ते लिहायचे आहे. पण ज्या विकि. पानावर 'जैन धर्म' असे होते त्याखालीच मी जैन धर्मातील तत्वे लिहिली होती. पण मुळ पान गायब झाल्यासारखे वाटत आहे. आणि मला त्याच पानावर उदा. अहिंसा म्हणजे काय हे त्यासमोर लिहायचे आहे. (लिहावे की न लिहावे) माझ्याकडून जरा गडबड होत आहे. तेव्हा मदत करावी ही नम्र विनंती.

प्रा.डॊ.दिलीप बिरुटे १७:४६, २० ऑक्टोबर २००९ (UTC)

मी त्या पानावर लिहिण्यापूर्वी जे पान होते. त्या पानाबद्दल म्हणायचे होते. ते पान मला हवे होते. दुर्दैवाने मला ते सापडत नाही. अडल्यानडल्यावर तुम्हाला त्रास देईनच. असो,मदतीबद्दल धन्यवाद. प्रा.डॊ.दिलीप बिरुटे ०९:३२, २१ ऑक्टोबर २००९ (UTC)

शक्यता १

[संपादन]

नमस्कार,

एकतर जैन धर्म लेखात तुम्ही लिहिले म्हणता ते मला दिसते आहे.मी लेखाचा इतिहास तपासला, तुमच्या सदस्य:प्रा.डॊ.दिलीप बिरुटे या सदस्य खात्यावरून दोनदा बदल जतन केले गेले आहेत आणि तुम्ही लिहिले त्यात कोणतीही बदल/ढवळा ढवळ झालेली नाही हे निश्चित.

प्रत्य्क्षात बदल होऊनही जुनेच पान दिसत रहाणे एका तांत्रिक कारणावरून होते. त्यामुळे प्रत्य्क्ष संपादन किंवा झलक व्यवस्थित दिसण्यात कोणताही अडथळा येत नाही. मी सविस्तर उत्तर लिहिणे सुरू करणार आहे. मध्ये ब्रेक पण घेणार आहे. पण थोडक्यात उपाय हा कि तुमच्या न्याहाळक (ब्राऊजर) ची Tools-Options येथे जाऊन स्मृतीशेष (cookies) Delet करून संगणकाचा सय (Cache) रिकामी करणे , सहसा कोणतीही संगणक विषयक माहिती नसलेले व्यक्ति हे स्व्त:च्या संगणकावर स्वत: सहज करू शकते.

चला ब्रेक घेऊन नंतर येऊन अधिक सविस्तर कारण मिमांसा करेन पण मी म्हणालेलेला , Tools-Options येथे जाऊन स्मृतीशेष (cookies -बरीच मराठी मंडळी याला मोदक असा मराठी शब्द योजतात-) Delet करून संगणकाचा सय (Cache) रिकामी करणे हा उपाय करून कळ्वल्यास मी लिहिलेली माहिती कितपत उपयूक्त ठरत आहे याचा मला अंदाजा येण्यास मदत होईल.

माहितगार ०६:००, २१ ऑक्टोबर २००९ (UTC)

तुम्ही विचारलेला प्रश्न एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे त्या बद्दल सविस्तर सहाय्य पान अजून उपलब्ध नाही आणि उत्तर देताना च्या चर्चेच्या निमित्ताने विविध शक्यतांचा विचार केला जाईल . कदाचित तुम्हाला हवे ते पान मी उपलब्धही करू शकेन कानाही माहीत नाही पण एक सविस्तर सहाय्य पान बनवण्यात मला मदत होईल एवढेच मी इथे विस्तार करत राहीन प्रत्येकवेळी वाचले नाहीत तरी चालेल.

शक्यता २

[संपादन]

साचा:जैनसिद्धांत

[संपादन]

साचा:जैनसिद्धांत (इंग्रजी विकिपीडियातून घेऊन जैन धर्म लेखात लावला) हा आपल्या सवडी आणि सोयी नुसार भाषांतरीत करण्याबद्दल विचार करावा. पण तत्पूर्वी वर्ग:जैन धर्म वर्ग:स्थानकवासी जैन धर्मगुरू वर्ग:जैन धर्मातील तीर्थंकर वर्ग:जैन धर्मगुरू वर्ग:जैन धर्मातील सण आणि उत्सव वर्गीकरणातील लेखांची नावे तसेच शोध खिडकीतून जैन श्ब्दावर शोध घेऊन काही अवर्गीकृत लेख असल्यास त्यांची नावे पाहून घेऊन त्याचे सुयोग्य नाव दुवे साचा:जैनसिद्धांत भाषांतरीत करताना अंतर्भूत केलेत तर तुमचा थोडाफार वेळ वाचू शकेल. माहितगार ०५:४४, २२ ऑक्टोबर २००९ (UTC)

आपल्याला कल्पना यावी म्हणून साचात उदाहरणा दाखल मी काही बदल मराठीत केले आहेत. बदल करून पहावेत नाही जमले तर आम्ही आहोतच ना. नाही जमलेतरी केवळ झलक पाहून सोडून नये पान चूकांसहीत जतन केलेत तर अधीक बरे राहील त्याने नेमकी चूकणारी जागा अनुभवी सदस्यांना शोधून मदत पोहोचवता येते.माहितगार ०५:४९, २४ ऑक्टोबर २००९ (UTC)

चित्र डावे उजवे

[संपादन]

सध्या [[Image:काळाराम.JPG‎ |100px|center]] आहे चित्र अग्दी हवे तेथेच येते असे होत नाही ते अविचल स्थितीत स्वतःची जागा सहसा स्वतः शोधते.[[Image:काळाराम.JPG‎ |100px|डावे]] किंवा [[Image:काळाराम.JPG‎ |100px|उजवे]] खालील प्रमाणे दिसेल. यात प्रगत पद्धती पण आहेत अर्थात प्रगत पद्धतीत मी सुद्धा लक्ष घातले नाही आहे. नॉर्मली मी center ,डावे किंवा उजवे करून देतो बाकी लेख सुद्धारणार्‍या मंडळींच्या भरवशावर सोडून देतो आलो आहे. माहितगार ०७:३७, २८ नोव्हेंबर २००९ (UTC)



जालावरील फोटो आहे

[संपादन]
जालावरील चित्र्/छायाचित्रे प्रताधिकारीत असण्याची शक्यता असते,प्रताधिकारीत नासल्याची खात्री नसल्यास विकिपीडियावर घेणे टाळावे. प्रताधिकार नसलेले छायाचित्र उपलब्ध नसल्यास कॉमन्स वर शोधघ्यावा. तीथेपण उपलब्ध न झाल्यास बाह्यदुवा देणे अधीक चांगले.

अधीक माहितीकरिता विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प तसेच विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे पहावा. माहितगार ०७:२१, २१ डिसेंबर २००९ (UTC)

Sarasvati.png
इंग्रजी विकिपीडियातील en:Saraswati River या लेखात [[चित्र:Sarasvati.png|इवलेसे|डावे|Sarasvati.png]] हे चित्र वापरले आहे.commons:Category:Maps of rivers of India नद्यांच्या पात्राबाबतीत नासाची जालावरची चित्र् वापरता येतील सहसा ती प्रताधिकारमुक्त असतात. काही वेळा अशी तत्सम प्रताधिकारमुक्त् छायाचित्रे घेऊन पेंटब्रश मध्ये हवे तसे बदल करूनही चढवली जातात.
गेल्या वर्षाभरात मी अहमादमध्ये visit वर असताना times of India त एक स्टोरी वाचल्याची आठवते बहूधा ईस्रोच्या संशोधकाने उपग्रह छायाचित्रांच्या आधारे मांडलेले तर्क मला तर्कनिष्ठ वाटल्याचे स्मरते.


ऊपक्रम पाहिले आहे. पण विकितून बाहेरपडून तीकडे पुरेसा वेळ देणे होत नाही माहितगार १३:३८, २१ डिसेंबर २००९ (UTC)

लेखात लेखन योगदान हवे

[संपादन]
आपल्या सवडीने अभिव्यक्त होणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या आणि संबधीत लेखात लेखन/संपादन/भाषांतर योगदान हवे आहे.माहितगार ०८:४५, २० मे २०१० (UTC)
होय आपण थोडे लक्ष घालू शकल्यास खूप छान होईल.धन्यवाद.

माहितगार १२:४५, २१ डिसेंबर २००९ (UTC)

भाषाभ्यास

[संपादन]

Category:भाषाभ्यास सुरूवातीस न लिहता शेवटी लिहून व निबंधासारखी ४ बोटे जागा न सोडल्यास हे झाले असते.

धन्यवाद,
भारत ध्वजवि. आदित्य (/यो) १४:१३, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)

याचा अर्थ: अशी जागा सोडल्यास कसे दिसते आहे? त्याप्रमाणे जागा सोडू नये.

समासा करिता : चिन्ह वाक्याच्या सुरवातीस वापरावे

समासा करिता : चिन्ह वाक्याच्या सुरवातीस वापरावे ते असे दिसेल माहितगार १५:१३, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)

धन्यवाद

[संपादन]

नमस्कार, मराठी भाषादिनानिमित्त आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो हि शुभेच्छा, आपण भाषाशास्त्र विषयक महत्वपूर्ण लेखांना हात घातलात खरेच खूप आनंद झाला.आंतरजालावर प्रगतपातळीचे मराठी व्याकरण ,आणि भाषा शास्त्र या माहितीची खुपच वानवा आहे आणि तांत्रीक क्षेत्रातील लोंकाना ते सहज उपलब्ध झाले तर भाषेच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा अधीक फायदा उठवता येउ शकेल. ते उपलब्ध असणे गरजेचे आहे.मराठी विकिपीडियास आपल्या सारख्या व्यक्तींचे सहाय्य मिळते आहे मनापासून अभिमान आणि आनंद वाटला.

माहितगार १५:२१, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)

आपल्या सर्वांच्या प्रेरणेचा स्रोत, जोडणारा धागा मातृभाषेवरच मराठीवरच प्रेम आहे.भाषाशास्त्राची मांडणी [चौकट] मी इंग्रजी विकिपीडियातन उसनी घेतली आहे.सर्व उपविषय एक करून एकच लेख तयार करण्यास हरकत नाही.भारतीय/महाराष्ट्रातील संशोधक आणि संशोधन या संदर्भानेही वेगळे लेख जोडता येतील.आपण स्वतःच विषय तज्ञ असल्यामुळे चौकट कशी असावी ते ठरवावे. इंग्रजी विकिपीडियात या विषयावर बरेच लेखन दिसते.ते कुणास प्रेरणामिळून मराठीत भाषांतरीत होऊन आल्यास परदेशातील संशोधन/दृष्टीकोणाबद्दल अद्दयावत माहिती उपलब्ध होईल.

मी मागे इंग्रजी विकिपीडियातून आयात केलेला परार्थ altruism या विषयावरचा एक लेख संपादनेथॉनमध्ये भाग घेत असलेल्या तेजस गोखलेंनी पहाता पहाता हातावेगळा केला.तशीच भाषाशास्त्र विषयक लेखांबद्दल आज ना उद्दा काही भाषांतरेकरून मिळतील काहीशी आशा बाळगून आहे.

सोबतच अजून एका विषयाबद्दल आपल्या कडून माहिती हवी, आपला विद्दार्थ्यांशी संपर्क असतो महाविद्दालयीन विद्दार्थ्यांचे मराठी विकिपीडियावर योगदान नेमके कसे वाढू शकेल तसेच औरंगाबादेत विकिभेट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आपल्या महाविद्दालया जागा वगैरे वापरण्या बाबत काही सहाय्य मिळण्याची शक्यता आहे काय किंवा कसे ?

माहितगार १६:१२, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)

विकिभेट आणि विकि-अकॅडमी

[संपादन]
सर्वसाधारणपणे विकिपीडियन्सच्या कोणत्याही पुर्वनियोजीत मीटंग विकिभेट (Wiki-Meetup) म्हणून संबोधले जाते संबधीत महाविद्दालये अथवा शहर-परिसरातील सर्वांकरिता खुल्या विकिभेटी असू शकतात.यांचे स्वरूप साधारणतः चर्चा अथवा भाषणे अशा दोन्ही पद्धतीने होऊ शकते.
विकिभेटीतही संपादने कशी करावी वगैरे माहिती दिली जाते परंतु प्रत्यक्ष बसून सोबत संपादने करणे किंवा त्याचे शि़कवणे यास विकि-अकॅडमी म्हणण्याची प्रथा आहे.
विकिभेटींचा मला जाणवलेला महत्वाचा फायदा तांत्रीक कौशल्य असलेल्या आणि ज्ञान असलेल्या व्यक्ती बर्‍याचदा वगवेगळ्या प्रतलावर दिसतात त्यांचे आपापसात शंका निरसन होणे सोपे जाते.तांत्रीक कौशल्य असलेल्या व्यक्तींना आव्हाने हवी असतात त्यामुळे खासकरून ओपन सोर्स या क्षेत्रात कार्यरत मंडळी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवताना आढळतात.दुसरा फायदा असाकी नवागत विद्दार्थीवर्गाची बरीच संपादने विश्वकोशीय परिघात बसत नसल्यामुळे वगळली जातात ,आंतरजालावरील मराठी टंकलेखन, विश्वकोशीय लेखनाचे निकष यांचा परिचय त्यांना आधीच असेल तर विद्दार्थ्यांचा उत्साह वाढू शकेल असे वाटते.
साधारणतः सप्टे/आक्टोबर २०१० पासून विकिभेटींची भारतात संख्या वाढल्याचे दिसून येते.अशात काहीना काही कारणाने विकिमीडिया फाऊंडेशनचे संस्थापक,ट्रस्टी तांत्रीक तज्ञ इत्यादींनीही या भेटीतून बर्‍याच ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवली.
किमान पहिल्या काही भेटी होईपर्यंत आंतरजालावरून आणि व्यक्तिगत पातळीवरील संपर्काकरीता बराच वेळ द्दावा लागतो.खरेतर मराठवाडा विभागातून बाहेर स्थलांतरीत झालेली बरीच मंडळी मराठी विकिपीडियावर लेखन करताना आढळतात.अशांपैकी कुणी किमान पहिल्या भेटीत हजेरी लावू शकल्यास पहाता येईल.


माहितगार १८:०६, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)

येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी

[संपादन]

नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:२१, १ जानेवारी २०१२ (UTC)

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)

[संपादन]
Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा

[संपादन]

आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्‍याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते. त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०७:०६, ११ जून २०१२ (IST)[reply]


अभिनंदन.

[संपादन]

>>'स्विकृती अधिकारी' या पदावरील नियुक्तीबद्दल अभिनंदन...!!!

गेले काही दिवस एकटे वाटत आहे,विकिपीडियाच्या मुलभूत मुल्यांच्या जतनाच्या अंगाने चिंतीत आहे.निष्पक्षता म्हणजे तारेवरची कसरत असते.शिवाय विकिपीडिया ज्यांच्याकरता आहे ती मंडळी जशी आणि जेवढी विकिपीडिया जवळ पोहोचावयास हवीत तसे अद्दाप झाले नाही. बऱ्याच दिवसांनी आपली भेट झाली, मनमोकळे लिहिता आले चांगले वाटले.
जे कामच स्विकारण्याचे आहे , त्यात आपण अभिनंदन केलेत तेव्हा ते नम्रतेने स्विकारतो . पण खरेतर हे अधिकार आपल्या सारख्या शिक्षणक्षेत्रातील व्यासंगी लोकांचे आहेत. माझ्याकडे असलेल्या तात्पुरत्या निमीत्तमात्र जबादाऱ्या घेण्यारी जबाबदार मंडळी मिळोत अशी आपली शुभेच्छा मिळावी हि विनंती.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:००, ६ जुलै २०१२ (IST)[reply]

नावात बदल

[संपादन]

आपल्या या विनंतीस अनुसरून आपल्या विनंती नुसार आपले सदस्य खाते नावात बदल केला गेला.

आपल्या सवडी आणि आवडी नुसार ज्ञानकोशीय वाचन लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:५६, ८ सप्टेंबर २०१४ (IST)[reply]

संचिका परवाने अद्ययावत करा

[संपादन]

नमस्कार प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन

[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत

[संपादन]

नमस्कार प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण

[संपादन]

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया कार्यशाळेची सदस्य नोंदणी

[संपादन]

नमस्कार दिलीपजी,
कार्यशाळा तपशील व नोंदणीसाठी औरंगाबाद साठी सांगली व कोल्हापूर प्रमाणे पान तयार केले आहे. हा नमुना वापरून तुम्हीही सदस्य नोंदणी online करून घ्यावी.कोल्हापूर कार्यशाळेचे पान या लिंकवर पहा - https://mr.wikipedia.org/s/2zbi
नंतर फोटो टाकले कि अहवाल तयार होऊन जातो. काही अडचण असल्यास संपर्क करावा.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २१:०३, १९ जानेवारी २०१७ (IST)[reply]

विकी लव्हज् वुमन २०२१

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन दक्षिण आशिया ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड, बार्नस्टार, तसेच $१२ USD ते $२५० USD पर्यंतचे बक्षीस आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे किंवा Rockpeterson यांना संपर्क करावा.

धन्यवाद. --MediaWiki message delivery (चर्चा) ११:००, १६ सप्टेंबर २०२१ (IST)[reply]

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोर ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल, पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत कोणत्याही मदतीसाठी, ज्युरी सदस्यांच्या संतोष गोरे किंवा Sandesh9822 यांच्या चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

Files need a license

[संपादन]

Hi! You have uploaded some files without a valid license. You can see them at this link (search for your name or scroll down to 10 files). If you reply please ping me because I'm not active on this wiki. --MGA73 (चर्चा) २१:५१, १ जानेवारी २०२४ (IST)[reply]