Jump to content

सदस्य चर्चा:Czeror

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुख्य पान   चर्चा     बार्नस्टार   उपपाने   संपादने  
चर्चा


मजकूर मराठीत ठेवावा

नमस्कार!

आपण गेल्या काही संपादनांमध्ये सॉफ्टवेअरांशी संबंधित काही लेखांमध्ये भर घातल्याचे पाहिले. छान वाटले. मात्र आपल्या काही संपादनांमध्ये इंग्लिश भाषा किंवा रोमन लिपी वापरली गेल्याचे पाहिले, तसे करणे मात्र टाळावे. मराठी विकिपीडियावरील लेखांमध्ये परभाषक नावे/लेखने कारणाशिवाय ठेवू नयेत. विशेषकरून लेखांमधील दृश्य नोंद मराठीत ठेवावी. लेखाच्या प्रारंभी मुख्य विषयाचे मूळ भाषेतील (उदा.: सॉफ्टवेअरांचे इंग्लिश किंवा अन्य मूळ भाषेतील लेखन) लेखन नोंदवावे. मात्र तिथून पुढे मजकुराची भाषा मराठीच असू द्यावी.

अजून एक उपमुद्दा : तसेच मराठीतर भाषेतील संकेतस्थळाचा दुवा नोंदवताना त्या-त्या भाषेच्या मजकुराबद्दल वाचकांना पूर्वकल्पना देण्यासाठी त्या भाषेचे नाव कंसात नोंदवावे. या संकेतामागचे प्रयोजन असे की, मराठी विकिपीडियावर गृहित भाषा मराठी व गृहित लिपी देवनागरी असल्याने, अन्य भाषक मजकुराबद्दल त्या-त्या ठिकाणी स्पष्ट नोंद ठेवावी. उदाहरणादाखल आइंडहोवन लेखातील बाह्य दुव्यांवरील ताजे संपादन तपासावे.

आपल्याकडून अधिकाधिक दर्जेदार संपादने पाहायला मिळतील, अशी आशा बाळगतो.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०८:३४, ११ सप्टेंबर २०१० (UTC)


transliterate from APS to wikipedia request

नमस्कार, सदस्य:Madshri यांनी सदस्य चर्चा:Madshri#transliterate from APS to wikipedia request येथे काही तांत्रिक शंका विचारली आहे.मला या विषयावर अद्याप अधीक माहिती प्राप्त न झाल्याने आपणास या विषयाबद्दल काही कल्पना असल्यास सहाय्य देता आलेतर पहावे हि नम्र विनंती
माहितगार ०५:१२, १६ सप्टेंबर २०१० (UTC)


सहाय्य हवे

नमस्कार , मी आपणाशी परिचय झाला नसतानाही सहाय्य मागत चाललो आहे या बद्दल क्षमस्व.पण विनंती करताना सहसा विषय आपल्या लेखन आवडीचे आहेत हे पहात आहे. गूगल ट्रांसलेशन टूलकिट लेख पूर्ण करण्यात आपल्या सवडीने, आपणास सहज जमेल तसे सहाय्य हवे आहे.
माहितगार ०७:१८, २४ सप्टेंबर २०१० (UTC)


बरहा बरह

क्षमा करापुन्हा एकदा वेगळ्या कारणाने तसदी देत आहे . बरहा नावाचा एक एक आधीच मराठी विकिपिडीयावर उपलब्ध आहे. बरह किंवा बरहा जे लेखन अधीक सयुक्तिक असेल त्या कडे पुनर्निर्देशन करावे, आपला बाकी वेळ् वाचेल म्हणून कल्पना दिली धन्यवाद.
माहितगार १२:५६, २४ सप्टेंबर २०१० (UTC)


रुपया
  • कृपया हे पाहा.
  • दुसरे असे की आपण फारसी या लेखात नुक्तेवाला फ वापरला आहे. त्यात ph वापरून तयार झालेला 'फ' वापरावा अन्यथा हा लेख मराठी विकिवर असूनही सापडत नाही.या शीर्षकात योग्य ते बदल करावेत ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) १४:५४, २६ सप्टेंबर २०१० (UTC)


पानांची सुरक्षितता
  • विकीपीडियावर पाने सुरक्षित कशी करायची?

--> विकिच्या नीतीप्रमाणे ही सुविधा सध्या फक्त प्रबंधक व प्रशासकांनाच उपलब्ध आहे.एखाद्या लेखाची सुरक्षा पातळी बदलण्याबाबत आपण त्यापैकी कोणासही विनंती करु शकता.एखाद्या लेखाची सुरक्षा पातळी, तो लेख उत्पात करणार्‍यांचे लक्ष्य असल्यास,वा खूप महत्वाचा असल्यास, (त्या लेखास अनेक पाने जोडलेली असल्यामुळे,लेखातील बदलाने अनेक पानांवर खूप बदल होउ शकत असल्यामुळे) बदलता येऊ शकते.महत्वाचे साचेपण सुरक्षित करता येउ शकतात.यात दोन प्रकार आहेत- अर्ध-सुरक्षित व पूर्ण सुरक्षित.अर्ध सुरक्षित लेखात फक्त सदस्यच बदल करु शकतात.पूर्ण सुरक्षित लेखांचे संपादन फक्त प्रबंधक/प्रशासकच करु शकतात वा त्याची पातळी सदस्यांच्या विनंतीवरुन तात्पुरती बदलु शकतात. याबाबत अधिक माहिती हवी असल्यास en:Wikipedia:Protection policy हा लेख कृपया बघावा.

वि. नरसीकर (चर्चा) ०२:२९, ८ ऑक्टोबर २०१० (UTC)

>>>चांगला प्रश्न विचारलात इतरही सदस्यांना भविष्यात मार्गदर्शन व्हावे म्हणून विकिपीडिया:मदतकेंद्र#protecting pages येथे माझ्या परीने सविस्तर प्रतिसाद देण्याचा प्रयत्नही केला आहे त्याचे आवलोकन करून सहाय्य कसे वाटले आणि सहाय्य देण्यात काही सुधारणा करता आल्या किंवा सुचना करता आल्या तर त्यांचे स्वागत आहे., तेथील विवेचनाचा अर्थ आपली एखादे/अनेक लेख/पान सुरक्षीत करण्याची अपेक्षा/विनंती चुकीचीच असेल असा आमचा कोणताही पुर्वग्रह नाही.वर नरसिकरजींनी उत्तर दिले आहेच, मराठी विकिपीडियाची स्थानिक नितीसंकेत विस्ताराने अजून चर्चेली जाणे बाकी आहे, ते कलौघात घडेल हेही खरे, आणि प्रत्येक भाषिक विकिप्रकल्प गाभा कायम ठेऊन स्वतःची वेगळी निती/संकेत ठेऊ शकतो तो पर्यंत इंग्रजी विकिवरील सहाय्य पानांचा आधार घेण्यास हरकत नाही. विकिपीडिया:मदतकेंद्र#protecting pages माहितगार ०५:५२, ८ ऑक्टोबर २०१० (UTC)


आभार

माझ्या सदस्यपानावरील शुद्धलेखनाच्या चुका सुधारल्याबद्दल धन्यवादाचा कृपया स्वीकार करावा ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) १३:१९, १६ ऑक्टोबर २०१० (UTC)


गूगल क्रोम

कृपया चर्चा:गूगल क्रोम बघा.

वि. नरसीकर (चर्चा) १५:५६, २६ ऑक्टोबर २०१० (UTC)


शुद्धलेखन व व्याकरण
नमस्कार आदित्य! तुमची काळजी रास्त आहे. परंतु विकिपीडिया सार्वजनिक सहयोग-प्रकल्प असल्याने मराठी नेटिझन समाजातील लोकांच्या भाषाविषयक सरासरी दर्जाचे प्रतिबिंब इथेही दिसणार; त्याला तत्त्वतः इलाज नाही. मात्र तुमच्यासारखे अन्य मराठी विकिपीडियनांचे शुद्धलेखन दुरुस्त्यांचे प्रयत्न आपापल्या परीने अखंड चालू असतात. तुम्हीदेखील इथल्या लेखांतील मजकुरांत दुरुस्त्या करून, तसेच अन्य सदस्यांना शुद्धलेखन/व्याकरण यांसदर्भांत मदत करून/ योग्य व साधार सूचना देऊन शुद्धिकरणात सहभाग देऊ शकता.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:२४, २७ ऑक्टोबर २०१० (UTC)


साचा:माहितीचौकट सॉफ्टवेअर

नमस्कार!

साचा:माहितीचौकट सॉफ्टवेअर साच्यात काही सुधारणा करून तो मायक्रोसॉफ्ट ऑफिस येथे वापरला आहे. त्याचा वापर बघितल्यास, आपल्याला साचा कसा वापरायचा, याची कल्पना येईल.

बाकी, ज्ञात असलेल्या सर्वात मोठ्या तार्‍यांची यादी या लेखाचे मी काल 'ज्ञात असलेल्या सर्वांत मोठ्या तार्‍यांची यादी' या शीर्षकाकडे स्थानांतर केले होते, ते आपण मागे फिरवल्याचे पाहिले. मी तसे स्थानांतर करण्याचे कारण असे, की, 'सर्व' हा शब्द मराठीत अनेकवचनात वापरला जातो. त्यामुळे त्याचे लेखन 'सर्वांत' ('र्वा'वर अनुस्वार) असे करणे व्याकरणोचित ठरते.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:३५, ५ नोव्हेंबर २०१० (UTC)


नव्या एक्स्टेन्शनांच्या स्थापनांसाठी कौल

मराठी विकिपीडियाच्या प्रगतीसाठी आणि विस्तार-सिद्धतेसाठी काही नव्या मीडियाविकी एक्स्टेन्शनांची स्थापना (इन्स्टॉलेशन) करण्याचा प्रस्ताव मी विकिपीडिया:कौल#नव्या एक्स्टेन्शनांची स्थापना येथे मांडला आहे. आपण आपला प्रस्तावागणिक कौल त्याच पानावर द्यावा, अशी सादर विनंती!

धन्यवाद.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १०:३६, ६ नोव्हेंबर २०१० (UTC)


लेखांचे वर्गीकरणही महत्त्वाचे

नमस्कार!

आपण सेलेस्टिया हा लेख बनवल्याचे व त्यानंतर अभिजित साठ्यांनी त्याचे वर्ग:सॉफ्टवेअर या वर्गात वर्गीकरण केल्याचे पाहिले. आपण बनवलेल्या लेखांचे योग्य त्या वर्गांमध्ये वर्गीकरण करणे माहितीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने उपयुक्त व महत्त्वाचे आहे. आपणही नवीन लेख बनवताना खालील मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरण करावे, अशी विनंती.

  • लेखाच्या मुख्य विषयाला अनुसरून चपखल वर्गीकरण करावे. उदा.: क्लोद मोने या लेखाचे वर्गीकरण नुसतेच 'वर्ग:व्यक्ती' असे न करता 'वर्ग:फ्रेंच चित्रकार' असे करणे चपखल ठरते.
  • लेखासाठी चपखल वर्ग अगोदरच उपलब्ध आहे का, याचा शोध घ्यावा. यासाठी लेखाच्या मुख्य विषयाच्या जातकुळीतले अन्य लेख संदर्भासाठी हुडकून त्यांचे वर्गीकरण कसे केले आहे, ते जाणून घ्यावे. अधिक माहितीसाठी वर्ग:मूळ येथून शाखा-उपशाखांमध्ये विस्तारलेला वर्गवृक्ष सवड मिळेल तसा चाळत जावा.


धन्यवाद.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०३, ८ नोव्हेंबर २०१० (UTC)

वर्गीकरणासोबत आंतरविकि दुवे वापरणे देखील मह्त्त्वाचे आहे. धन्यवाद...
अभिजीत साठे १५:२३, ८ नोव्हेंबर २०१० (UTC)

नव्या लेखांचे वर्गीकरण

नमस्कार! गुरुजी.कॉम लेखाचे वर्गीकरण केलेले दिसले नाही. वर्ग:कंपन्या किंवा त्यातील एखाद्या उपवर्गात हा लेख वर्ग करता येईल, असे वाटते. कृपया योग्य त्या वर्गात या लेखाचे (व अन्य अश्या नव्या लेखांचे) वर्गीकरण करावे. ज्या लेखांसाठी योग्य ते वर्ग सापडत नसतील, किंवा शोधून बघितल्यावर असे वर्ग अजून बनवले नसल्याचे आढळेल, त्या लेखांमध्ये साचा:वर्ग हा साचा डकवावा. त्यामुळे सदर लेख अवर्गीकृत असणार्‍या लेखांच्या विशेष वर्गात जमा होईल व कालांतराने त्याचे योग्य त्या वर्गात वर्गीकरण होईल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:०७, २६ जानेवारी २०११ (UTC)


एक-हजारी बार्नस्टार
एक-हजारी बार्नस्टार
वि. आदित्य/Czeror, तुम्ही मराठी विकिपीडियावर १,०००पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.

विकिपीडियावरील तुमच्या अथक परिश्रमांची दखल घेऊन मराठी विकिपीडियाच्या वतीने हा एक-हजारी बार्नस्टार गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे.


आपण विकिवर एक हजार संपादने पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन.आपल्या प्रगतीचा आलेख असाच उंचावत राहो ही सदिच्छा.

वि. नरसीकर (चर्चा) ११:१८, १३ नोव्हेंबर २०१० (UTC)


अलीकडील बदलांसाठीचा बार्नस्टार

नमस्कार!

अलीकडील बदलांवर गस्त ठेवून ताजी संपादने सुधारण्याबद्दल मराठी विकिपीडियाच्या वतीने आपल्याला हा बार्नस्टार देण्यात येत आहे (हा बार्नस्टार आपण आपल्या सदस्य पानावर लावू शकता). मराठी विकिपीडियावर तुमच्याकडून अशीच दमदार कामगिरी चालू राहील, असा विश्वास आहे.

अलीकडील बदल बार्नस्टार
Czeror, मराठी विकिपीडियावरील अलीकडील बदलांवर लक्ष ठेवून ताज्या संपादनांमध्ये साफ-सफाई, सुधारणा करण्याविषयीच्या तुमच्या कामगिरीची कदर म्हणून मराठी विकिपीडियाच्या वतीने हा गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे.


--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०९:३७, ३ डिसेंबर २०१० (UTC)


मदत

नमस्कार...! भाषाभ्यास इथे मला खालीले लेखन टाकायचे होते पण काहीतरी तांत्रिक गडबड किंवा मला न समजलेली गोष्ट त्यामुळे सदरील लेखनाची भर पडत नाही :(


[[Category:भाषाभ्यास]] भाषा ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या मनातील विचार भावना अनुभव व्यक्त करण्यासाठी भाषा हे एक समर्थ माध्यम आहे. भाषेद्वारेच आपण भाषिक व्यवहार पूर्ण करु शकतो. भाषेमुळेच मानवाच्या विचारंची देवाणघेवाण चालू असते. अशा विचारांच्या अभ्यासाच्या अनेक शाखा आहेत त्यापैकी भाषाविचार हाही एक विचार आहे. मानवी जीवनाप्रमाणे भाषेचे स्वरुपही गुंतागुंतीचे आणि अनाकलनीय आहे. भाषा आणि समाजाचा एक अनन्यसाधारण संबंध असतो. संस्कृतीच्या परंपरा, श्रद्धा,रुढी,धार्मिक आचार-विचार इत्यादी बाबींचे दर्शन भाषेतून होत असते म्हणून व्यक्तीसमूह समजून घेण्यासाठी भाषाभ्यासाची गरज असते. भाषेचा अभ्यासामुळे मानवाचा मनोव्यापार मानवी संस्कृती आणि समाज यांचा अभ्यास करण्यास मदत होते. म्हणूनच भाषावैज्ञानिकांनी समाजविज्ञान मनोविज्ञान आणि मानववंशविज्ञान यांचा अभ्यास सुरु केला त्यातूनच सामाजिक भाषाविज्ञान, मानववंश भाषाविज्ञान, आणि मनोभाषाविज्ञान अशा भाषाभ्यासाच्या नव्या शाखा सुरु झाल्या.

आभार

>>>> निबंधासारखी ४ बोटे जागा न सोडल्यास हे झाले असते.

हे काही समजले नाही. पण आपण काही बदल केला असल्यास आम्ही आपले आभारी आहोत.


शुभेच्छा

नमस्कार,

आपण सहाय्य विषयक लेखांमध्ये अधून मधून योगदान करताना दिसता असे सोबतीस कुणी असेल तर बरे वाटते.

मराठी भाषादिनी संपादने करून उत्साहाने सहभाग नोंदवलात,आपल्याबरोबरीने धावणारे संपादनपटु भेटोत, आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो हि शुभेच्छा.
माहितगार १९:५३, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)


खालील प्रस्तावावर तुमचे मत हवे
====

mw:Extension:TitleBlacklist हे एक्सटंशन मराठी विकिपीडियावर अलरेडी आहेच त्याच्या अनुषंगाने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Blocking of article titles in roman script by anon and new users हा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावावर तुमचे मत हवे आहे. धन्यवाद माहितगार ०६:१५, २१ ऑगस्ट २०११ (UTC)


नमस्कार

आपल्या संपादनांचा धडाका परत सुरू झालेला दिसतो. माझ्या हार्दिक शुभेच्छा.

  • आपल्या संपादनांमध्ये कृपया इंग्रजी विकिचा दुवा देणे व वर्गिकरण जरूर करावे ही विनंती.ते आपण करालच अशी खात्री आहे.मी उगाच स्मरण करून देत आहे.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ११:१२, ३० सप्टेंबर २०११ (UTC)


वर्गीकरण, इ.

या विषयावरील सागर मार्कळांच्या (सदस्य:sagarmarkal) चर्चापानावरील मजकूर पहावा. त्यात नुसती खोकी का नको, काय करावे हे विषद केलेले आहे.

अभय नातू १४:२८, ३० सप्टेंबर २०११ (UTC)

वर्गीकरण, इ.
नमस्कार नव्याने बनवलेल्या कोर्‍या लेखांबद्दल अभय नातूंनी वर लिहिलेच आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये यासंबंधाने निरनिराळ्या ठिकाणी चर्चा घडलेली आहे. त्यापैकी चर्चा:पल्सार येथील चर्चा जरूर वाचावी - त्यात असे कोरे खोक्यांसारखे लेख बनवणे का टाळावे, यामागचे अनुभवजन्य विचार मांडले आहेत.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:२२, १ ऑक्टोबर २०११ (UTC)


येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी

नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०९, १ जानेवारी २०१२ (UTC)


चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल

नमस्कार, विकिपीडिया:कौल#चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल प्रस्ताव मांडला आहे त्यात आपले मत द्यावे. आपल्या अभिप्राय आणि समर्थनाचा प्रार्थी आहे. -रायबा


वर्ग:पुणे निवासी

पुणे निवासी असा वर्ग आसणे मला आयोग्य वाटते. आपले मत हावे.-- . Shlok talk . १०:०९, २५ मार्च २०१२ (IST)[reply]



Image licensing

Hello Czeror, I saw you are uploading pictures to the Marathi Wikipedia, like this one or this one without a clear source and license given. Please notice that on Wikimedia projects (if not stated otherwise, which is not the case for this wiki) only Free Content Licensed images are allowed. If images aren't under a free license (I'm pretty sure the ones listed above aren't) and/ or you aren't able to state the source, please mark them for deletion, so that they can be removed. Please enter up all missing sources and license tags for the images you uploaded and get the ones you can't do that for deleted, thanks. Further information - Hoo man (चर्चा) ०१:५०, २१ मे २०१२ (IST)[reply]

वर नमुद केलेली चित्रे तात्पुरती तरी वगळणे आवश्यक आहे तसे करतो आहे. तसदी बद्दल क्षमस्व माहितगार (चर्चा) ०८:१७, २७ मे २०१२ (IST)[reply]


एक विनंती

नमस्कार, अमराठी लोकांपर्यंत मराठी विकिपीडियाच्या अत्यावश्यक धोरणांबद्दल मार्गदर्शन / माहिती पोहोचवणे गरजेचे भासते आहे. त्या दृष्टीने संपादन गाळक प्रभावी करण्याचे काम चालू आहे.याचाच भाग म्हणून , बॉट फ्लॅग न घेतलेल्या बॉट्सचे वर्गीकरण आणि Babel द्वारे मराठी न येणाऱ्या लोकांचे वर्गीकरण अशी दोन कामे आहेत. आपल्याकडे सवड असल्यास एक विनंती आहे. अमराठी लोक सहसा {{Babel|de|ru-4|en-2|fr-1|mr-0}} साचा त्यांच्या सदस्य पानात लावताना mr-0 म्हणजे मराठी येत नाही असे नोंदवत असतात. त्याचे User mr-0 असे वर्गीकरण व्हावयास हवे तसे ते होत नाही आहे . तसे वर्गीकरण केल्यास हि सर्व मंडळी एकाच वर्गिकरणात सापडतील घाई नाही सवडीनुसार जमेल तसे सहाय्य करावे हि नम्र विंनंती.माहितगार (चर्चा) ०८:१०, २७ मे २०१२ (IST)[reply]


अभिनंदन

आपले सदस्य व चर्चा पान उत्तम रित्या सजवण्यात आले आहे. तसेच आपल्या योगदानाबद्दल अभिनंदन! अशीच प्रेरणा देत रहा :) AbhiSuryawanshi (चर्चा) १३:५३, १ जून २०१२ (IST)[reply]


पोर्शे

पोर्शे चा उच्चार् पोर्शं अस आहे. कृपया हे एकदा बघावे (http://www.youtube.com/watch?v=6RLg0xw_4bo&feature=plcp). पोर्शंच्या ईंग्रजी पानावर देखील हाच उच्चार दिला आहे.

Pakshya


विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा

आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्‍याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते. त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०६:५७, ११ जून २०१२ (IST)[reply]


इंटरनेट प्रोटोकॉल संस्करण ६

नमस्कार, इतर चर्चांमध्ये गुंतल्यामुळे इंटरनेट प्रोटोकॉल संस्करण ६ या आवश्य्क विषयाला न्याय देणे होत नाही आहे. आपल्या सवडी प्रमाणॅ लेख विकसीत करण्यास योगदान देण्याचे स्वागत असेल. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:४०, १५ जून २०१२ (IST)[reply]


इंटरनेट 'निनावी' सांगकाम्याची संपादने

नमस्कार Czeror,
आपण गेल्या काही दिवसांत प्लांट्स व्हर्सेस झोम्बीज या लेखात सदस्य:निनावी या सांगकाम्याने केलेली संपादने परतवत आहात. उदा. येथे पहा
यामागे काही विशेष कारण?
माझ्या मते निनावी सांगकाम्या करत असलेले शुद्धलेखनाचे बदल योग्य आहेत.
यामागे योग्य कारण असल्यास प्रचालकांना सांगून निनावी सांगकाम्यात बदल करावे. अन्यथा हा शिवाशिवीचा खेळ अनंत काळ चालू राहील. :)
क्षितिज पाडळकर (चर्चा) २३:२४, ९ जुलै २०१२ (IST)[reply]

माझ्या मते शुद्धलेखनाच्या नियमानुसार
चूक बरोबर
rya rrya
निनावी हेच बदल करत आहे.
आपण कोणते न्याहाळक वापरत आहात? कदाचित त्यामूळे हा गोंधळ होत असेल.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ०१:४७, १३ जुलै २०१२ (IST)[reply]


नेपोलियनिक युद्धे

नमस्कार,

तुम्ही नेपोलियनिक युद्धे व त्यासंबंधित लेख निर्माण करुन ते वाढवीत असल्याचे पाहून आनंद झाला. मी या लेखांमध्ये माझ्यापरीने बदल/भर/सुधार करीत आहेच पण काही विशिष्ट मदत लागल्यास जरूर कळवावे.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २१:१५, ५ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]


नमस्कार ,

  • विकिपीडिया:कौल/प्रचालक#सदस्य:Czeror येथे प्रचालकपदा करीता आपले नामांकन केले आहे.
  • मराठी आणि महाराष्ट्राच्या पार्श्बभूमीवर socio - polictially sensetive issues मध्ये प्रचालकेतर सदस्यांची आपापसात पुरेशी चर्चा झाल्या शिवाय प्रचालकाने त्यात हस्तक्षेप करू नये. कोणताही हस्तक्षेप घाई न करता आणि निष्पक्ष असावा.
  • मराठी विकिपीडियास विवीध गोष्टीत स्वत:च्या स्वतंत्र निती उल्लेखनीयता, बॅनींग पॉलीसी इत्यादी अस्तीत्वात असू शकतात. सर्वच सहमती झालेल्या होत असलेल्या सर्वच नितींबद्दल सहाय्य पाने पूर्ण झाली असतील असे नाही तरीही त्या निती/सहमती लक्षात घेणे जरूरी असते त्यामुळे प्रदीर्घ काळा नंतर वापस यावे लागल्यास मागच्या चर्चा जरा चाचपून घेणे सोईचे पडू शकते.
  • अधिक माहिती करिता विकिपीडिया:प्रचालक येथे माहिती अभ्यासावी.
  • कॉपीराईट विषया बाबत अधीक सजग असावे

प्रचालक पद स्विकारण्यास आपण स्विकृती दिल्यास आणि इतर सदस्यांची सहमती असल्यास त्यांची प्रचालक पदी नेमणूक केली जाईल.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:५८, २३ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]


नमस्कार ,

रसायनांविषयी लेख लिहिण्याबद्दल धन्यवाद!

अभय नातू (चर्चा) २१:५०, ११ फेब्रुवारी २०१५ (IST)[reply]
You're welcome!
मुख्य पान चर्चा दिनांक व वेळ : २२:०१, ११ फेब्रुवारी २०१५ (IST)[reply]


मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा

नमस्कार,

मला आपणास कळविण्यात आनंद होतो की, CIS-A2K नी मराठी विकीपीडियासाठी २०१५-१६ वर्षाच्या कामकाजाचा आराखडा मेटावर काही दिवसांपूर्वी सादर केला आला आहे. मी आपणास विनंती करतो की, कृपया मराठी विकिपीडियाच्या आराखाड्या बद्दल आपले विचार, शंका किंवा अभिप्राय मनमोकळेपणे चर्चा पानावर सादर करून मराठी विकिपिडियाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात मदत करावी.

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा.

धन्यवाद. --Abhinavgarule (चर्चा) २०:०९, ९ एप्रिल २०१५ (IST)[reply]


कॉपीराईट इश्यूज

येत्या काळात मराठी विकिपीडियावर उचित उपयोग सदरा खाली कोणत्या छायाचित्रा परवानगी असावी या संबंधाने स्थानिक निती विषयक चर्चा आयोजीत करावयाची आहे.

परंतु तत्पुर्वी आपण चढवलेली मायक्रोसॉफ्ट संबंधीत चित्रांसंबंधी केवळ परवाने/टॅग्स इंग्रजी विकिपीडियातून आयात करून (शक्यतो मराठी करणासहीत) वापरण्याशिवाय इतर समस्या नाही पण ते मायक्रोसॉफ्टच्या परवान्यांचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे. प्रताधिकार विषयक इतर चर्चा सुरु केली जाण्या पुर्वी आपल्याकडून हे मायक्रोसॉफ्ट वाले काम पूर्ण करून दिले गेल्यास इतरांना त्याकडे उदाहरण म्हणून पहाणे शक्य व्हावे असे वाटते.

आपल्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. धन्यवाद आणि शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:२८, १४ एप्रिल २०१५ (IST)[reply]


Translating the interface in your language, we need your help
Hello Czeror, thanks for working on this wiki in your language. We updated the list of priority translations and I write you to let you know. The language used by this wiki (or by you in your preferences) needs about 100 translations or less in the priority list. You're almost done!
सर्व विकिंवर अनुवाद जोडण्याकरता किंवा बदलण्याकरता, कृपया ट्रांसलेटविकि.नेटचा वापर करा,जो मिडियाविकिचा स्थानिकीकरण प्रकल्प आहे.

Please register on translatewiki.net if you didn't yet and then help complete priority translations (make sure to select your language in the language selector). With a couple hours' work or less, you can make sure that nearly all visitors see the wiki interface fully translated. Nemo १९:३६, २६ एप्रिल २०१५ (IST)[reply]


धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.


संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.


हॅपी बिर्थडे मराठी विकिपीडिया

१ मे २०१७--टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:५७, १ मे २०१७ (IST)[reply]


मार्च २०१७ बाबत शुभेच्छा
नमस्कार Czeror,

विकिपीडियाने मार्च २०१७ च्या आकडे प्रकाशन केले आहे. त्यातील सर्वाधिक सक्रिय विकिपीडिया मराठी विकिपीडियामध्ये जगभरातील १७ व्या क्रमांकावर आहे.

या आकडेवारीत आपण मराठी विकिपीडियाचे आठवे सर्वात सक्रिय विकिपीडियाचे सदस्य आहात.पूर्ण यादी इथे पहा

आम्ही मराठी विकिपीडियावर केलेल्या आपल्या प्रयत्नांचे अभिनंदन करतो आणि भविष्यात आणखी पुढे चालू ठेवण्यासाठी उत्सुकता दाखवतो.


आपल्या योगदानाबद्दल धान्यवाद.


आपला शुभचिंतक,

टायवीन

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:४९, ३ मे २०१७ (IST)[reply]


मराठी विकिपीडिया व्हॉट्सॲप ग्रुप

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:५९, ५ जून २०१७ (IST)[reply]


मौर्य साम्राज्य

माझी संपादने तुम्ही उडवलीत, कृपया स्वतःच नवा इतिहास घडवू नका. सम्राट अशोक नंतर मौर्य साम्राज्याचा धर्म बौद्ध धर्म बनला काय? मौर्य साम्राज्यावर सर्वाधिक प्रभाव बौद्ध धर्माचा राहिलेला असून या साम्राज्यात बौद्ध धर्मच सर्वाधिक काळ प्रमुख धर्म (राज्य धर्मही) बनून राहिलेला आहे. म्हणून तुम्ही या साम्राज्याचा प्रमुख धर्म बौद्ध धर्म ठेवा व नंतर हिंदू धर्म. --संदेश हिवाळेचर्चा ०३:१३, १४ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]

भारतीय भाषा विकिपीडिया सहकार्य प्रकल्प

[संपादन]

नमस्कार,
सदर प्रकल्पाचे निवेदन पूर्वी विकिपीडिया:चावडी/प्रगती वर इथे प्रकाशित केले आहे. भारतीय भाषांमधील विकिपीडियामध्ये उत्तम ज्ञाननिर्मिती होण्यासाठी विकिमिडिया प्रतिष्ठान व गुगल यांनी CIS-A2K, Wikimedia India Chapter आणि विकिपीडिया सदस्य गट यांच्या सहकार्याने हा पथदर्शी प्रकल्प आखला आहे. यामध्ये सक्रीय संपादकांना संगणक,इंटरनेट इ. साहित्य सुविधा पुरविणे तसेच लेखन स्पर्धा आयोजित करणे अशा उपक्रमांचा समावेश आहे. सध्या असणाऱ्या अडचणी व गरजा यांची माहिती संकलित करण्यासाठी सर्वेक्षण प्रश्नावली तयार केली आहे. आपण पुढील दुव्यावर क्लिक करून ही प्रश्नावली अवश्य भरावी व इतरांना प्रवृत्त करावे ही विनंती.

विनीत, सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:०४, २० डिसेंबर २०१७ (IST)[reply]