Jump to content

"मधुवंती दांडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ५७: ओळ ५७:
==मधुवंती दांडेकर यांनी गायलेली प्रसिद्ध गीते आणि त्यांच्या नाटकांतील भूमिका==
==मधुवंती दांडेकर यांनी गायलेली प्रसिद्ध गीते आणि त्यांच्या नाटकांतील भूमिका==


* अंगणी पारिजात फुलला
* अंगणी पारिजात फुलला (संगीत कान्होपात्रा)(या गाण्याची ध्वनिमुदिका जयमाला शिलेदार यांच्या आवाजात आहे).
* अगा वैकुंठीच्या राणा (संगीत कान्होपात्रा)
* अगा वैकुंठीच्या राणा (संगीत कान्होपात्रा)
* अवघाचि संसार सुखाचा करीन (संत कान्होपात्रा)
* अवघाचि संसार सुखाचा करीन (संत कान्होपात्रा)
ओळ ६७: ओळ ६७:
* ये मौसम है रंगीन (संगीत मदनाची मंजिरी)
* ये मौसम है रंगीन (संगीत मदनाची मंजिरी)



'''हेही पहा''' : [http://www.aathavanitli-gani.com/Swar/Madhuvanti_Dandekar मधुवंती दांडेकर यांची आठवणीतील गाणी]
{{विस्तार}}
{{विस्तार}}



१४:५२, २५ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

मधुवंती दांडेकर या मराठी संगीत नाट्यसृष्टीतल्या एक अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म २३ मार्च १९४८ रोजी झाला.

कारकीर्द

मराठी संगीत नाटकांमध्ये काम करीत असताना मधुवंती दांडेकर यांना एका उर्दू नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यासाठी त्या खास उर्दू शिकल्या. ती भूमिका त्यांनी इतकी छान वठवली की, अनेक उर्दू भाषिकांना त्यांची मातृभाषा उर्दूच वाटली. भूमिकेत स्वत:ला झोकून देण्यासाठी वाटेल ते श्रम घेण्याची तयारी व त्यासाठीचा अट्टाहास येथे दिसतो. विद्याधर गोखले यांच्या 'गझलांचा गुलशन' या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग त्यांनी केले. त्यासाठी तर त्या प्रसिद्ध गझल-गायक श्री. विजय चौहान यांच्याकडे गझलही शिकल्या.

मधुवंती दांडेकर यांना एकदा गुजराथी नाटकात भूमिकेसाठी विनंती करण्यात आली होती. ते नाटक म्हणजे मराठी सुवर्णतुलाचे गुजराथी रूपांतर होते. नाटकाच्या निर्मात्याला रुक्मिणीसाठी सुयोग्य गुजराथी अभिनेत्री मिळत नव्हती. मधुवंती दांडेकरांनी सर्व संवाद मराठी देवनागरीत लिहून घेतले, पाठ केले आणि गुजराथीचा गंधही नसताना रुक्मिणीची ती भूमिका चांगल्या रीतीने वठवली.

बालगंधर्व हे मधुवंती दांडेकरांचे संगीतातले आदर्श. तसा त्यांना अध्यात्मातही रस आहे. त्यासाठी विमला ठकार यांना त्या गुरू मानतात. विमला ठकारांच्या अनेक पुस्तकांना मधुवंती दांडेकरांनी हिंदी-मराठी प्रस्तावना लिहून दिल्या आहेत. त्यांच्या काही हिंदी पुस्तकांचे मराठी भाषांतरही केले आहे.

पुरस्कार

  • इ.स.२००४चा मधुकर महाजन पुरस्कार
  • इ.स.२००५चा अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार
  • इ.स.२००७चा बालगंधर्व पुरस्कार

मधुवंती दांडेकर यांनी गायलेली प्रसिद्ध गीते आणि त्यांच्या नाटकांतील भूमिका

  • अंगणी पारिजात फुलला (संगीत कान्होपात्रा)(या गाण्याची ध्वनिमुदिका जयमाला शिलेदार यांच्या आवाजात आहे).
  • अगा वैकुंठीच्या राणा (संगीत कान्होपात्रा)
  • अवघाचि संसार सुखाचा करीन (संत कान्होपात्रा)
  • ऋतुराज आज वनी आला (संगीत मदनाची मंजिरी)
  • तारिणी नववसनधारिणी (संगीत पट-वर्धन)
  • दीन पतित (संगीत कान्होपात्रा)
  • पतित तू पावना (संगीत कान्होपात्रा)
  • प्रथम करा हा विचार (संगीत संशयकल्लोळ)
  • ये मौसम है रंगीन (संगीत मदनाची मंजिरी)


हेही पहा : मधुवंती दांडेकर यांची आठवणीतील गाणी

नाटक भूमिका
एकच प्याला शरद, सिंधू
कृष्णार्जुनयुद्ध सुभद्रा
झाला महार पंढरीनाथ सावित्री
देव दीनाघरी धावला रुक्मिणी, सत्यभामा
ध्रुवाचा तारा सुरुची
पती गेले गं काठेवाडी मोहना
भाव तोचि देव एकनाथांची पत्‍नी
मदनाची मंजिरी मंजिरी, लीलावती
मंदारमाला रत्नमाला
मानापमान आक्कासाहेब, भामिनी
मृच्छकटिक वसंतसेना
विद्याहरण देवयानी
संशयकल्लोळ रेवती
सुवर्णतुला राधा, रुक्मिणी, सत्यभामा
सुवर्णतुला (गुजराथी) रुक्मिणी
सौभद्र रुक्मिणी,सुभद्रा
स्वयंवर रुक्मिणी