"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५४३: ओळ ५४३:
* सखाराम बाईंडर (लेखक विजय तेंडुलकर). नाटकात साडी बदलण्याचे एक दृश्य होते. न्यायाधीशांनी ते पाहून नाटकावर बंदी घालण्याची मागणी फेटाळली.
* सखाराम बाईंडर (लेखक विजय तेंडुलकर). नाटकात साडी बदलण्याचे एक दृश्य होते. न्यायाधीशांनी ते पाहून नाटकावर बंदी घालण्याची मागणी फेटाळली.
* स्वदेशी नाटक -१९०६ (लेखक गणेश बल्लाळ फणसाळकर) (सरकारी बंदी) (प्रयोगावर बंदी आल्यानंतर नाटकाच्या प्रती नाममात्र किमतीला विकल्या गेल्या.)
* स्वदेशी नाटक -१९०६ (लेखक गणेश बल्लाळ फणसाळकर) (सरकारी बंदी) (प्रयोगावर बंदी आल्यानंतर नाटकाच्या प्रती नाममात्र किमतीला विकल्या गेल्या.)

==परिनिरीक्षण मंडळ==
कोणत्याही नाटकाचा प्रयोग करावयाचा असेल तर त्या नाटकाच्या संहितेच्या दोन प्रती. महाराष्ट्र राज्य परिनिरीक्षण मंडळाला सादर कराव्या लागतात. या सेन्सॉर बोर्डाचे दोन प्रतिनिधी ही संहिता वाचून त्याविषयीचा अभिप्राय बनवतात. मंडळाच्या अध्यक्षांची सही झाल्यावर एक प्रमाणपत्र आणि डीआर‍एम क्रमांक दिला जातो. हे प्रमाणपत्र किंवा हा क्रमांक नसेल तर नाटकाचा प्रयोग रंगभूमीवर करता येत नाही.

मात्र, महाराष्ट्र नाट्य-परिनिरीक्षण मंडळाची स्थापना १९९०मध्ये झाली असल्याने,. जर नाटक इ.स. १९९० पूर्वीचे असेल तर त्याचे परिनिरीक्षण करण्याचा अधिकार सेन्सॉर बोर्डाला नाही. ते नाटक डीआर‍एम क्रमांकाशिवाय सादर करता येते.


==मराठीतली काही बोल्ड नाटके==
==मराठीतली काही बोल्ड नाटके==

१५:११, ७ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यमय कलाकृती. नाटकामध्ये शब्दसंहिता, कथानक, संवाद, पदे, वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्ये, संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य, वेश-रंगभूषा, प्रकाशयोजना, अभिनय आणि कथानक असू शकते. पण यांतली एकही गोष्ट नाटकासाठी अपरिहार्य वा अनिवार्य नाही. सॅम्युअल बेकेट यांचे 'ब्रेथ' हे नाटक शब्दसंहिताविरहित आणि अभिनयविरहित आहे. नाटकाचा प्रयोगकाल काही सेकंदांपासून (उदा. ब्रेथ) बारा तासांपर्यंत(उदा. पीटर ब्रुक यांचे महाभारत) असू शकतो. ‘वाडा चिरेबंदी’सारखे नाटक सलग सादर न करता दोन दिवसही सादर होऊ शकते. नभोवाणीवरील श्रुतिका एकाहून अधिक दिवस चालू शकतात, तर दूरचित्रवाणीवर मालिका महिनोन्‌महिने चालतात.

इतिहास

भारतीय रंगभूमीचा इतिहास प्राचीन आहे. भास हा एक प्राचीन भारतीय नाटककार होता. तसेच कालिदास हा कवी नाटककार होता. ही नाटके बहुधा संस्कृत भाषेत असली तरी त्यांतली काही पात्रे प्राकृत भाषेत बोलत.

नाट्यकोश

मुख्यत्वे मराठी भाषेतील नाट्यसृष्‍टीची साद्यंत माहिती देणारा ’मराठी नाट्यकोश’, मराठी लेखक डॉ. वि.भा. देशपांडे यांनी संपादित केला आहे. १२००हून अधिक पृष्ठांच्या या ग्रंथाचा हिंदी अनुवाद अमेय इन्स्पायरिंग बुक्सतर्फे प्रकाशित करण्यात आला आहे.

नाटकांचे प्रकार

मराठी नाटके

मराठी नाटकांना संगीत नाटकांची परंपरा आहे. संगीत मानपमान, संशयकल्लोळ, शारदा आदी नाटके प्रचंड गाजली आहेत. त्यातील पदे अनेकदा गायली जातात.

मराठी नाटकांच्या परंपरेत प्रायोगिक रंगभूमीचे फार मोठे महत्त्व आहे.

रंगभूमीचे प्रकार आणि शाखा

नाट्यशास्त्र अध्यापन संस्था

  • चतुरंग प्रतिष्ठान, पुणे
  • नाट्यसंस्कार कला अकादमी
  • भरत नाट्यसंशोधन मंदिर, पुणे
  • मराठवाडा विद्यापीठ(नाट्यशास्त्र विभाग), औरंगाबाद
  • मॉडर्न महाविद्यालय, पुणे
  • ललितकला केंद्र, पुणे विद्यापीठ, पुणे
  • शिक्षकांसाठी अभ्यासनाट्य शिबीर : ही शिबिरे हे अनेक संस्था भरवतात. असे एक शिबीर, पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळीने संस्थेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त भरवले होते.

नाट्य महोत्सव

महाराष्ट्रात वेळोवेळी अनेक नाट्य महोत्सव होतात. महोत्सवांत उत्तमोत्तम नाटके रंगमंचावर सादर होतात. काही नाट्य महोत्सव --

  • विनोद दोशी (स्मृती) नाट्य महोत्सव (इ.स. २००९पासून), पुणे
  • पिंपरी-चिंचवड येथील प्रयोग या संस्थेचा प्रायोगिक व बालनाट्य महोत्सव

नाट्यस्पर्धा

  • फिरोदिया करंडक एकांकिका स्पर्धा
  • चंद्र सूर्य रंगभूमी या नृत्य-नाट्य-संगीत संस्थेच्या आंतरशालीय एकांकिका स्पर्धा
  • पुरुषोत्तम करंडक नाट्यस्पर्धा
  • दैनिक सकाळ सोशल फाउंडेशनच्या ’आंतशालेय सकाळ नाट्यवाचन स्पर्धा’ आणि शिक्षकांसाठी ’सकाळ नाट्यलेखन स्पर्धा’
  • पुणे जिल्हा परिषद मुख्याध्यापक संघ घेत असलेली आंतरशालेय(यशवंतराव चव्हाण) बालनाट्य स्पर्धा (इ.स. १९६०पासून)
  • महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वार्षिक राज्य नाट्य स्पर्धा (इ.स. १९६१पासून)
  • शाहू मोडक स्मृती करंडक स्पर्धा, अहमदनगर
  • कांकरिया करंडक बालनाट्य स्पर्धा, अहमदनगर
  • श्रीरामपूरला महाराष्ट्र शुगर फॅक्टरीतर्फे चालणाऱ्या नाट्यस्पर्धा (आता बंद झाल्या असाव्यात).

रंगभूषाकार

नाटक रंगभूमीवर सादर करण्यासाठी त्यातील कलाकारांना सुयोग्य वेश चढवणे आणि त्यांच्या चेहऱ्याची रंगरंगोटी करणे हे रंगभूषाकारांचे काम असते. मराठी नाटय सृष्टीतले असे काही रंगभूषाकार --

  • पंढरीनाथ जूकर
  • कृष्णा बोरकर (जन्म : इ.स. १९३३)

नाट्यगृहे

नाटके आणि अन्य करमणुकीचे किंवा राजकीय व सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक नाट्यगृहे आहेत.यांतील बरीच त्या त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी बांधलेली आहेत, आणि या सभागृहांचे व्यवस्थापन त्या संस्था पाहतात.

बृहन्महाराष्ट्रातील प्रमुख नाट्यगृहे :

  • अण्णा भाऊ साठे नाट्यगृह, बिबवेवाडी, पुणे (आसनसंख्या ८५०)
  • अण्णा भाऊ साठे खुले नाट्यगृह, राणीचा बाग प्रांगण, भायखळा, मुंबई
  • अनंतफंदी खुले नाट्यगृह, संगमनेर (अहमदनगर जिल्हा)
  • अमर ग्यान ग्रोव्हर, (हाजीअली), मुंबई;(आसनसंख्या६५८)
  • अल्फोन्सो, मुंब‍ई
  • आचार्य अत्रे नाट्य रंगमंदिर, कल्याण
  • अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी(पिंपरी-चिंचवड)
  • अंधेरी स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स, मुंबई
  • डॉ.अ.ना. भालेराव (साहित्य संघ), गिरगाव, मुंबई
  • आनंद विधान,अहमदनगर
  • आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का, पुणे (आसनसंख्या ४००)
  • आंबेडकर शताब्दी भवन, मुंबई
  • इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे नाट्यगृह, चिपळूण
  • इंद्रधनुष्य हॉल, म्हात्रे पूल, दत्तवाडी चौक (पुणे)
  • इस्कॉन सभागृह, जुहू, मुंबई; (आसनसंख्या ४००)
  • उद्यान प्रसाद, पुणे
  • एकनाथ नाट्यगृह (संत एकनाथ रंगमंदिर), औरंगाबाद. स्थापना सप्टेंबर १९८९.
  • एन.सी.पी.ए. चे टाटा थिएटर, नरीमन पॉइन्ट, मुंबई
    • एन.सी. पी.ए. चे गोदरेज सभागृह
    • एन.सी.पी.ए.चे टाटा नाट्यगृह
    • एन.सी.पी.ए. चा टाटा प्रायोगिक नाट्य रंगमंच
    • एन.सी.पी.ए. चा जमशेदजी भाभा हॉल
  • एस.एन.डी.टी. कॉलेज सभागृह, पुणे
  • एस.एम. जोशी हॉल, पुणे
  • औंधकर नाट्यगृह, बार्शी
  • कर्नाटक संघ (झवेरभाई पटेल सभागृह, पंडित विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम, मुंबई;(आसनसंख्या ७७४)
  • कला ॲकॅडमी, पणजी, गोवा
  • कॉकटेल थिएटर, मुंबई
  • कामगार क्रीडा केंद्र, परळ, मुंबई
  • कामा हॉल, काळा घोडा, मुंबई
  • कालिदास, नाशिक
  • कालिदास, मुलुंड, मुंबई; (आसनसंख्या १५८०)
  • कावसजी जहांगीर हॉल, फ्लोरा फाउंटन, मुंबई
  • कावसजी पटेल हॉल, धोबी तलाव, मुंबई
  • काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
  • काळे सभागृह, पुणे
  • कीर्तन केंद्र, संघवी शाळेसमोर, जुहू, मुंबई
  • कुंदनलाल सैगल खुले नाट्यगृह, मालाड पूर्व, मुंबई
  • केशवराव भोसले नाट्यगृह (पॅलेस थिएटर), खासबाग(कोल्हापूर)
  • खासबाग कुस्त्यांचे मैदान वजा खुले नाट्यगृह, कोल्हापूर
  • गडकरी रंगायतन, ठाणे;(आसनसंख्या ८००)
  • गणेश कला केंद्र, पुणे (आसनक्षमता २५००)
  • गणेश नाट्यगृह, इचलकरंजी
  • गरवारे महाविद्यालय सभागृह, पुणे
  • गर्दे वाचनालयाचे सभागृह, बुलढाणा
  • गोखले सभागृह, पुणे
  • ग्रोव्हर ऑडिटोरियम, हाजी अली(मुंबई)
  • घाटे नाट्यगृह, सातारा
  • चंद्रशेखर ऑडिटोरियम, पुणे विद्यापीठ परिसर(पुणे)
  • चव्हाण नाट्यगृह , अंबरनाथ (ठाणे जिल्हा)
  • यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अहमदनगर
  • यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड(पुणे) (आसनसंख्या ८९३)
  • यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड
  • यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बॉम्बे रेक्लमेशन, मुंबई (आसनसंख्या ९२८)
  • चिंदोडी लीला रंगमंदिर, बेळगाव (आता पाडून टाकले.)
  • छबिलदास रंगमंच, दादर, मुंबई; (आसनसंख्या ७००)
  • जयहिंद कॉलेज सभागृह, मरीन लाइन्स, मुंबई; (आसनसंख्या ५५०)
  • जुहू जागृती, मिठीबाई कॉलेजजवळ, विलेपार्ले, मुंबई; (आसनसंख्‍या २५०)
  • जैन संघ, कोथरूड (पुणे)
  • जोशी लोखंडे प्रकाशन सभागृह, पुणे
  • ज्योत्स्ना भोळे रंगमंच, हिराबागेजवळ, पुणे (प्रायोगिक नाटकांसाठी छोटे नाट्यगृह)
  • झवेरबेन सभागृह, घाटकोपर(मुंबई)
  • झवेरभाई पटेल सभागृह ,(कर्नाटक संघ, विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम(मुंबई)
  • टाटा थिएटर (एन्.सी.पी.ए.), नरीमन पॉइन्ट, मुंबई
  • टिंबर भवन , यवतमाळ
  • टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड(पुणे) (आसनसंख्या ९००)
  • तमिळ संघम्(षण्मुखानंद),माटुंगा
  • तापडिया नाट्यमंदिर, औरंगाबाद
  • तुकाराम नाट्यमंदिर (प्रचलित नाव सिडको नाट्यगृह), औरंगाबाद
  • तेजपाल ऑडिटोरियम, गोवालिया टँक, मुंबई
  • तेंडुलकर रेस्टॉरन्ट्‍स हॉल, मुंबई
  • मास्टर दत्ताराम नाट्यगृह, फोंडा, गोवे.
  • दर्शन हॉल , चिंचवड
  • दादासाहेब गायकवाड, नाशिक
  • दामोदर हॉल (दामोदर ठाकरसी नाट्यगृह), परळ, मुंबई;(आसनसंख्या८०३)
  • दीनानाथ मंगेशकर, विले पार्ल पूर्व, मुंबई;(आसनसंख्या१०१०)
  • दीनानाथ नाट्यगृह, सांगली. (हे नाट्यगृह पाडून तेथे नवीन नाट्यगृह बांधण्याचे घाटते आहे--२०१२मधली बातमी).
  • दीनानाथ सभागृह, पणजी (गोव्याच्या कला अकादमीतला एक रंगमंच)
  • देवांग मेहता ऑडिटोरियम, सेनापती बापट रस्ता, पुणे
  • नगरपालिकेचे खुले नाट्यगृह, कोपरगाव (अहमदनगर जिल्हा)
  • नवीनभाई ठक्कर हॉल, विले पार्ले (पूर्व), मुंबई
  • नॅशनल कॉलेजशेजारचे खुले नाट्यगृह, वांद्रे, मुंबई
  • नाट्यपरिषद रंगमंच, माहीम, मुंबई
  • बॅ. नाथ पै रंगमंच (छोटे नाट्यगृह), पुणे (आसनसंख्या १०० खुर्च्या आणि ७५ लोकांसाठी भारतीय बैठक)
  • प्रियदर्शिनी खुले नाट्यगृह, श्रीरामपूर (अहमदनगर जिल्हा)
  • निर्मलकुमार फडकुले नाट्यगृह, सोलापूर
  • नूतन मराठी विद्यालय, पुणे
  • नेहरू मेमोरियल हॉल,पुणे
  • नेहरू सेंटर, हाजी अली, वरळी, मुंबई
  • पंडित विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर (कर्नाटक संघ, झवेरभाई पटेल सभागृह), माहीम, मुंबई;(आसनसंख्या ७७४)
  • पत्रकार भवन, पुणे
  • परशुराम सायखेडकर, नाशिक
  • पलुस्कर सभागृह, पंचवटी(नाशिक)
  • पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह), कोल्हापूर्
  • पाटकर हॉल , सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, मरीन लाइन्स(मुंबई)
  • पाटोळे नाट्यगृह, मलकापूर
  • पाटोळे नाट्यगृह, खामगाव
  • पुरंदरे नाट्यगृह, पंढरपूर
  • पु.ल. देशपांडे सभागृह
  • पृथ्वी थिएटर, जुहू चर्च रोड, मुंबई(आसनसंख्या २२०) (शिवाय एक खुला रंगमंच)
  • पै ट्रियाट्रिस्ट हॉल, मडगाव, गोवा
  • बॅ. नाथ पै नाट्यमंच, पुणे (प्रायोगिक नाटकांसठी छोटे नाट्यगृह) (आसनसंख्या १०० खुर्च्या आणि ७५ लोकांसाठी भारतीय बैठक)
  • प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली(पश्चिम), मुंबई
  • प्रबोधनकार ठाकरे मिनी थिएटर, बोरीवली(प), मुंबई
  • प्रबोधनकार ठाकरे खुला रंगमंच, शिवडी, मुंबई
  • प्रमिलाताई ओक सभागृह(खासगी), अकोला
  • फर्ग्युसन कॉलेजचे अ‍ॅम्फी थिएटर, पुणे
  • फाइन आर्ट्‌स,चेंबूर, मुंबई
  • महात्मा फुले नाट्यगृह, वानवडी (पुणे) (आसनसंख्या ७५० की ८१५?)
  • बाकानेर, नागपूर
  • बागडे नाट्यगृह, अहमदनगर
  • बालगंधर्व खुले नाट्यगृह, जळगाव
  • बालगंधर्व, नगरपालिकेचे खुले नाट्यगृह, धुळे
  • बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज(पुणे) (आसनसंख्या ९९०)
  • बालगंधर्व, मिरज
  • बालप्रसार, नागपूर
  • बालमोहन, शिवाजी पार्क(मुंबई)
  • बाल शिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, पुणे
  • बिर्ला क्रीडा केंद्र, गिरगाव चौपाटी(मुंबई); (आसनसंख्या ६१७)
  • बिर्ला मातुश्री, मरीन लाइन्स(मुंबई); (आसनसंख्या११६२)
  • बी.एन.वैद्य हॉल, हिंदू कॊलनी(मुंबई)
  • बुरीबेन गॊळवाला, घाटकोपर(मुंबई)
  • ब्रह्मानंद, नाशिक
  • भरत नाट्यमंदिर, डोंबिवली
  • भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ(पुणे)
  • भवभूती रंगमंदिर, गोंदिया
  • भाईदास, पार्ले, मुंबई; (आसनसंख्या ११५७)
  • भारत भवन, खुले आणि बं<दिस्त नाट्यगृहे, भोपाळ
  • भारतीय विद्या भवन, गिरगाव चौपाटी, मुंबई; (आसनसंख्या ५००)
  • भालेराव (साहित्य संघ), गिरगाव, मुंबई
  • भावे स्कूल सभागृह, पेरूगेट(पुणे)
  • पं. भीमसेन जोशी कलामंदिर, औंध, पुणे (आसनसंख्या ५००)
  • भोसरी नाट्यगृह , पिंपरी-चिंचवड, पुणे
  • मराठी साहित्य परिषद हॉल(माधवराव पटवर्धन सभागृह), पुणे
  • मरीन प्लाझा, मरीन ड्राइव्ह, मुंबई
  • मॉडर्न हायस्कूलचे सभागृह, पुणे
  • माहीम म्युनिसिपल स्कूल सभागृह, मुम्बई
  • माणिक सभागृह, वांद्रे रिक्लेमेशन,मुंबई; (आसनसंख्या ८००)
  • मिरजी सांस्कृतिक भवन, बेळगाव
  • मीनाताई ठाकरे, भिवंडी
  • मुक्त आकाश रंगमंच, मुंबई विद्यापीठ प्रांगण, कलिना, मुंबई
  • मुक्तांगण हायस्कूल हॉल, शिवदर्शन चौक, पुणे
  • मेकॉनकी नाट्यगृह, सोलापूर
  • मेघदूत खुले नाट्यगृह, दिल्ली
  • म्हैसूर सभागृह, किंग्ज सर्कल, मुंबई
  • यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अहमदनगर
  • यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड(पुणे) (आसनसंख्या ८९३)
  • यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड
  • यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बॉम्बे रेक्लमेशन, मुंबई; हे नाट्यगृह ११८ बाय १६७ फूट या मापाचे असून त्याची उंची ३४ फूट आहे. आत एक ६७ बाय २६ फुटाची बाल्कनी आहे. नाट्यगृहात एकूण ९२८ बैठक व्यवस्था आहेत. नाट्यगृहाच्या पुढील बाजूस ५६ बाय १९ फुटाचे फॉयर असून त्याचप्रमाणे बाल्कनीतही त्या मापाचे फॉयर आहे. नाट्यगृहाचे स्टेज ६७ बाय २६ फुटाचे आहे. नाट्यगृहाच्या मागच्या बाजूस उपहारगृह व ११५ बाय २५ फुटाचे ओपन टेरेस आहे. साऊंड, लाइट आदी सर्वप्रकारच्या आधुनिक सोयी तेथे करण्यात आलेल्या आहेत.
  • यशवंत नाट्यमंदिर, मनमाला टँक रोड, माटुंगा, मुंबई
  • रंगभवन खुले नाट्यगृह, धोबी तलाव, मुंबई (आता हे नाट्यगृह बंदिस्त झाले!)
  • रंगशारदा, वांद्रे रिक्लेमेशन, मुंबई;(आसनसंख्या ८११)
  • रघुवीर, नागपूर
  • रमणबाग, पुणे
  • रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई; (आसनसंख्या ९११)
  • रवींद्र नाट्यमंदिर मिनी थिएटर, प्रभादेवी, मुंबई(आसनसंख्या १९९)
  • रवींद्र भवन, मडगाव, गोवा
  • रशियन सांस्कृतिक केंद्र, पेडर रोड, मुंबई
  • राजीव गांधी कला मंदिर, फोंडा, गोवा
  • रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड (पुणे)
  • राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे
  • रावसाहेब गोगटे रंगमंदिर, बेळगाव
  • लक्ष्मी नारायण बाग हॉल, शिवाजी पार्क, मुंबई १६
  • लक्ष्मीप्रसार, कोल्हापूर
  • लक्ष्मीविलास, जळगाव
  • लेडी रमाबाई हॉल, एस. पी.कॉलेज(पुणे)
  • वरेरकर नाट्य संघाचे महावीर मिरजी सांस्कृतिक भवन, बेळगाव
  • वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर
  • वागळे हॉल, खाडिलकर रोड, गिरगाव, मुंबई
  • विजयानंद, धुळे
  • विजयानंद, नाशिक
  • विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर (कर्नाटक संघ, झवेरभाई पटेल सभागृह), माहीम, मुंबई;(आसनसंख्या ७७४)
  • विष्णुदास भावे, वाशी, नवी मुंबई
  • वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर, अमरावती
  • शांतादुर्गा, कणकवली
  • शाहू नाट्य मंदिर, नंदुरबार
  • शाहू स्मारक मंदिर, कोल्हापूर
  • शिवाजी नाट्यगृह, कोल्हापूर
  • शिवाजी मंदिर, दादर, मुंबई; (आसनसंख्या १०३२)
  • श्रीराम, अकोले(विदर्भ)
  • षण्मुखानंद(तमिळ संघम्), माटुंगा(मुंबई)
  • संगीत नाट्यगृह, सोलापूर
  • सर्वेश, डोंबिवली
  • साठ्ये कॉलेज हॉल, विले पार्ले, मुंबई
  • सायखेडकर, नाशिक
  • सायंटिफिक हॉल, नागपूर
  • सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी
  • सावित्रीबाई फुले, डोंबिवली
  • साक्षी गॅलरी, लोअर परेल, मुंबई
  • साहित्य संघ मंदिर, गिरगांव, मुंबई (आसनसंख्या ८००)
  • सिडको नाट्यगृह, (नवीन नाव : संत तुकाराम नाट्यगृह), औरंगाबाद
  • सुदर्शन रंगमंच, पुणे (प्रायोगिक नाटकासाठी अहिल्यादेवी प्रशालेजवळ छोटे नाट्यगह)
  • सुयोग सोसायटी, मुंबई
  • सेन्ट ॲन्ड्‌ऱ्यूज कॉलेज सभागृह, वांद्रे(प),मुंबई
  • सोफिया भाभा हॉल, ब्रीच कॅन्डी, मुंबई; (आसनसंख्या ८१८)
  • स्नेहसदन, पुणे
  • हनुमान नाट्य मंदिर, दाभोळ
  • हनुमान नाट्यगृह, म्हापसा, गोवा
  • हॅपी कॉलनी हॉल, कोथरूड(पुणे)
  • हॉर्निमन सर्कल गार्डन,मुंबई (खुले नाट्यगृह)
  • हिंदुजा ऑडिटोरियम, गिरगाव, मुंबई;(आसनसंख्या ६४१)
  • हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर
  • होमी भाभा सभागृह, नेव्हीनगर, मुंबई;(आसनसंख्या१०३०)
  • ज्ञानेश्वर सांस्कृतिक नाट्यगृह, मोर्शी रोड, अमरावती

पुण्यातली जुनी बंद झालेली नाट्यगृहे

  • आनंदोद्भव, पुणे
  • आर्यभूषण तमाशा थिएटर, पुणे
  • किर्लोस्कर, पुणे
  • नटराज रंगमंदिर, पुणे
  • पूर्णानंद, पुणे
  • बहुरूपी मंदिर, पुणे
  • बाजीराव, पुणे
  • भानुविलास (आता तेथे भानुविलास चित्रपटगृह), पुणे
  • महाराष्ट्रीय मंडळ, पुणे
  • ललकार, पुणे
  • लक्ष्मीविलास, पुणे
  • किबे नाट्यगृह (नंतरचे लिमये नाट्यचित्रमंदिर, आता विजय टॉकीज), पुणे
  • वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे
  • सरस्वती मंदिर, पुणे

मुंबईतील जुनी बंद झालेली तमाशा थिएटरे व नाट्यगृहे

  • ऑपेरा हाउस (तिथे नंतर न्यू ऑपेरा हाउस चित्रपटगृह), गिरगांव
  • एम्पायर
  • एली कदूरी हायस्कूलसमोरचे थिएटर, माझगांव
  • कॉरोनेशन
  • केळीच्या वखारीशेजारचे थिएटर, भायखळा(पश्चिम)
  • कृष्ण थिएटर
  • गुलशन थिएटर(तिथे आता त्याच नावाचे चित्रपटगृह)
  • गेइटी
  • ग्रॅन्ड
  • डिलाइल रोड थिएटर
  • ताज थिएटर
  • दौलत थिएटर, बटाट्याच्या चाळीसमोर, पिला हाउस
  • नायगाव थिएटर
  • नॉव्हेल्टी (आता तेथे नॉव्हेल्टी चित्रपटगृह), ग्रॅन्ट रोड
  • न्यू एलफिन्स्टन थिएटर, ग्रॅन्ट रोड
  • न्यू हनुमान थिएटर, लालबाग (आता तिथे ‘न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय’)
  • पलटण रोड थिएटर (क्रॉफर्ड मार्क्रेटजवळ)
  • प्रिन्सेस
  • बालीवाला थिएटर (तिथे आता आल्फ्रेड चित्रपटगृह), पिला हाउस
  • बॉम्बे थिएटर, पिला हाउस
  • बीडीडी चाळीजवळचे थिएटर , वरळी
  • भांगवाडी थिएटर, काळबादेवी
  • रंगमंदिर, दादर (या जागेवर नंतर ’शारदा’ चित्रपटगृह झाले.)
  • राणीच्या बागेतले खुले थिएटर
  • रॉयल थिएटर (आता चित्रपटगृह), पिला हाउस
  • रिपन थिएटर (आताचे रोशन चित्रपटगृह),पिला हाउस
  • लोकमान्य थिएटर
  • वडाचा नाका थिएटर (दीपक टॉकीजशेजारी, ग्लोब मिल पॅसेज, वरळी)
  • शिवानंद थिएटर, प्लाझा टॉकीजमागे, दादर
  • सैतान चौकीजवळचे थिएटर
  • व्हिक्टोरिया

विदर्भातली बंद झालेली नाट्यगृहे

  • धनवटे रंग मंदिर, नागपूर

अन्य गावांतील बंद झालेली नाट्यगृहे

  • चिंदोडी लीला रंगमंदिर, बेळगाव
  • दीनानाथ नाट्यगृह, सांगली
  • लक्ष्मीप्रसाद नाट्यगह, को्ल्हापूर
  • मेढे यांचे शनिवार नाट्यगृह, कोल्हापूर
  • शिवाजी नाट्यगृह, कोल्हापूर
  • सदासुख, सांगली (हे नाट्यगृह १८८७मध्ये बांधले होते)
  • हंसप्रभा, सांगली (हे नाट्यगृह १८९७मध्ये बांधले होते) त्या जागी आता (नवे) बालगंधर्व नाट्यगृह आहे.


नाटकाचे आद्य प्रवर्तक

ज्याला अस्सल मराठी नाटक म्हणून संबोधिता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक बळवंत पांडुरंग किर्लोस्कर (१८४३-१८८५) हे होत. किर्लोस्करांनी कविकुलगुरू कालिदासाच्या अजरामर शाकुंतलाचे मराठी रूपांतर १८८० साली केले.[१]

प्रसिद्ध मराठी नाटककार

स्त्री नाटककार

नाटके लिहिणाऱ्या लेखकांमध्ये पुरुष नाटककारांची संख्या तीनशेहून बरीच अधिक आहे. प्रसिद्ध स्त्री नाटककारांची संख्या मात्र तिसाहून अधिक नसावी. नाट्यलेखन करणाऱ्या काही लेखिका :

  • अनसूया वाघ
  • आनंदीबाई किर्लोस्कर
  • इंदिराबाई पेंडसे
  • इंदुमती देशमुख
  • इरावती कर्णिक
  • उमाबाई सहस्रबुद्धे
  • कमलाबाई टिळक
  • कविता नरवणे
  • काशीबाई फडके
  • कुसुम अभ्यंकर
  • कृष्णाबाई मोटे
  • गिरिजाबाई माधव केळकर
  • चंद्राबाई शिंदे
  • ज्योती म्हापसेकर
  • ज्योत्स्ना देवधर
  • ज्योत्स्ना भॊळे
  • द्वारका दत्तात्रेय गुप्ते
  • नलिनी सुखटणकर
  • नीलकांती पाटेकर
  • पद्मा गोळे
  • भागीरथीबाई वैद्य
  • मधुगंधा कुलकर्णी
  • मनस्विनी लता रवींद्र
  • मनोरमाबाई लेले
  • माई वरेरकर
  • माधुरी पुरंदरे
  • माया पंडित
  • मालती तेंडुलकर
  • मालती मराठे
  • मालतीबाई दांडेकर
  • मालतीबाई बेडेकर
  • मुक्ताबाई दीक्षित
  • योगिनी जोगळेकर
  • रचेल गडकर
  • लीला चिटणीस
  • वनिता देसाई
  • वसुंधरा पटवर्धन
  • वसुधा पाटील
  • विभावरी देशपांडे
  • विमल काळे
  • विमल घैसास
  • शकुंतला परांजपे
  • शिरीष पै
  • सई परांजपे
  • सरिता पदकी
  • सुधा साठे
  • सुधा करमरकर
  • सुमतीबाई धनवटे
  • सुषमा देशपांडे
  • हिराबाई पेडणेकर
  • क्षमाबाई राव

यांशिवाय काही नवोदित लेखिकाही आहेत.

प्रसिद्ध नाटके

भाषांतरित-रूपांतरित नाटके

स्वतंत्र पानावर पहावे.

  • नोबेल पुरस्कारप्राप्त लुइजी पिरांदेल्ली (१८६७ ते १९३६) या इटालियन नाटककाराच्या ’सिक्स कॅरॅक्टर्स इन सर्च ऑफ ऑथर’ या नाटकाचे माधव वाटवे यांनी केलेले ’नाटककाराच्या शोधात सहा पात्रे’ हे मराठी रूपांतर. २५ ऑगस्ट १९६७ रोजी मुंबई मराठी साहित्य संघाने या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत सादर केला. ’टीपॉट’ नावाच्या एका नाटक कंपनीनेही हे नाटक २०१४साली रंगमंचावर सादर केले आहे.

हेही पहा

विल्यम शेक्सपियर

आक्षेप घेतलेली नाटके

विविध संघटनांनी नाटकाच्या नावावर, कथानकावर किंवा कथानकाच्या काही भागांवर आक्षेप घेऊन बंद पाडलेली किंवा बंद पाडायचा प्रयत्‍न केलेली काही नाटके :

  • ’आग्‍ऱ्याहून सुटका’ आणि ’बेबंदशाही’ या नाटकांत शिवाजीला टाळ्या मिळत असल्याने नाटकांवर बंदी येण्याची शक्यता निर्माण झाली, म्हणून नाटकाचे लेखक औंधकर यांनी शिवाजीपेक्षा औरंगजेबाचे महत्त्व वाढवून प्रयोग पुढे चालू ठेवले.
  • एक चावट संध्याकाळ (नाटक फक्त प्रौढांसाठी असल्याने स्त्रियांना आयोजकांनी मनाई केली)(बोरीवली नाट्यगृहाची बंदी)(मुंबई महापालिकेचीही बंदी)
  • संगीत कीचकवध (लेखक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर). या नाटकावर ब्रिटिशांनी २७ जानेवारी १९१० रोजी बंदी घातली. (नाटकातील कीचक म्हणजे इंग्रज अधिकारी कर्झन या कल्पनेमुळे)
  • कुलवधू नाटकात ज्योत्स्ना भोळे यांनी या नाटकात पाचवारी साडी नेसली होती म्हणून वाद झाले होते.
  • गणपतीबाप्पा मोरया (लेखक योगेश सोमण). याच नावाचे वेगळ्या लेखकाचे एक बालनाट्यही आहे, त्यावर आक्षेप नव्हता.
  • गांधी विरुद्ध गांधी (लेखक अजित दळवी). गांधीच्या नावाचा तथाकथित दुरूपयोग. आक्षेप टिकला नाही.
  • घाशीराम कोतवाल (लेखक विजय तेंडुलकर). नाटकात नाना फडणिसांचे तथाकथित विकृतीकरण केल्यावरून नाटकावर आक्षेप घेतला गेला होता.
  • पती माझे छत्रपती (संजय पवार). छत्रपती या शब्दाने शिवाजीची बदनामी होते म्हणून आरडाओरडा झाल्यावर, ह्या नाटकाचे आता ’पती माझे छत्रीपती‘ या नावाने प्रयोग होतात.
  • बंधविमोचन (लेखक गोपाळ गोविंद सोमण) (ब्रिटिश सरकारच्या सचिवाच्या आज्ञेवरून मुंबई पोलीस आयुक्तांनी या नाटकावर अनौपचारिक बंदी घातली होती.)
  • ’बेबंदशाही’ आणि ’आग्‍ऱ्याहून सुटका’ या नाटकांत शिवाजीला टाळ्या मिळत असल्याने नाटकांवर बंदी येण्याची शक्यता निर्माण झाली, म्हणून नाटकाचे लेखक औंधकर यांनी शिवाजीपेक्षा औरंगजेबाचे महत्त्व वाढवून प्रयोग पुढे चालू ठेवले.
  • संगीत भातुकलीचा खेळ (लेखक धोंडो रामचंद्र करमरकर ) या बालनाट्यावर तत्कालीन इंग्रज सरकारने बंदी घातली होती.
  • मी नथुराम गोडसे बोलतोय (लेखक प्रदीप दळवी). नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण केल्याचा आरोप.
  • यदाकदाचित (संजय पवार). नाटकात देवदेवतांचे विकृत चित्रण आहे हा आक्षेप होता. कुठल्या तरी गावात हिंदू जागरण मंचाने हे नाटक बंद पाडले होते.
  • योनीमनीच्या गुजगोष्टी (बोरीवलीच्या नाट्यगृहाची बंदी)(ठाणे महापालिकेचीही बंदी). (कारण उघड आहे.)
  • संगीत राष्ट्रोद्धार (प्रयोगावर बंदी आल्यानंतर नाटकाच्या संहितेच्या प्रती गुप्तपणे वाटल्या गेल्या.)
  • वस्त्रहरण (लेखक गंगाराम गवाणकर). महाभारताची तथाकथित चेष्टा करण्यावरून.
  • विजयतोरणा (या नाटकाच्या १५ कलाकारांना ब्रिटिश सरकारने एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती.)
  • शँपेन आणि मारुती (लेखक विवेक बेळे) या नाटकाचे नाव बदलून ’माकडाच्या हाती शँपेन’ असे करावे लागले. (१९ व्या महाराष्ट्र राज्य व्यावसायिक मराठी नाट्यस्पर्धेले सर्वोत्कृष्ट नाटकाचे बक्षीस मिळालेले नाटक).
  • शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला (लेखक संभाजी (की राजकुमार?) तांगडे-भीमनगर शब्दाबद्दल नांदेड पोलिसांचा आक्षेप)- नाटकाचे परीक्षण {http://artnviews.com} वर वाचा. नाटकाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
  • सखाराम बाईंडर (लेखक विजय तेंडुलकर). नाटकात साडी बदलण्याचे एक दृश्य होते. न्यायाधीशांनी ते पाहून नाटकावर बंदी घालण्याची मागणी फेटाळली.
  • स्वदेशी नाटक -१९०६ (लेखक गणेश बल्लाळ फणसाळकर) (सरकारी बंदी) (प्रयोगावर बंदी आल्यानंतर नाटकाच्या प्रती नाममात्र किमतीला विकल्या गेल्या.)

परिनिरीक्षण मंडळ

कोणत्याही नाटकाचा प्रयोग करावयाचा असेल तर त्या नाटकाच्या संहितेच्या दोन प्रती. महाराष्ट्र राज्य परिनिरीक्षण मंडळाला सादर कराव्या लागतात. या सेन्सॉर बोर्डाचे दोन प्रतिनिधी ही संहिता वाचून त्याविषयीचा अभिप्राय बनवतात. मंडळाच्या अध्यक्षांची सही झाल्यावर एक प्रमाणपत्र आणि डीआर‍एम क्रमांक दिला जातो. हे प्रमाणपत्र किंवा हा क्रमांक नसेल तर नाटकाचा प्रयोग रंगभूमीवर करता येत नाही.

मात्र, महाराष्ट्र नाट्य-परिनिरीक्षण मंडळाची स्थापना १९९०मध्ये झाली असल्याने,. जर नाटक इ.स. १९९० पूर्वीचे असेल तर त्याचे परिनिरीक्षण करण्याचा अधिकार सेन्सॉर बोर्डाला नाही. ते नाटक डीआर‍एम क्रमांकाशिवाय सादर करता येते.

मराठीतली काही बोल्ड नाटके

पाचशेहून अधिक प्रयोग झालेली नाटके

नाटकाचे नाव लेखक शेवटच्या ज्ञात प्रयोगाची क्रमसंख्या त्या प्रयोगाची तारीख
अवघा रंग एकचि झाला डॉ. मीना नेरूरकर >३०० २०१३
अश्या बायका तश्या बायका मधुसूदन घाणेकर ५०० मार्च २०१३
आई रिटायर होतेय (प्रमुख भूमिका भक्ती बर्वे) अशोक पाटोळे ७५० ॑॑॑॑॑
आई रिटायर होतेय (प्रमुख भूमिका स्मिता जयकर) अशोक पाटोळे १०० ८-३-२०१४
इथे ओशाळला मृत्यू वसंत कानेटकर ****** ॑॑॑॑॑
एका लग्नाची गोष्ट श्रीरंग गोडबोले १५०६ ३०-१-२००५
संगीत एकच प्याला राम गणेश गडकरी ****** ॑॑॑॑॑
कचऱ्या हिंदुस्थानी (एकपात्री) रमेश थोरात ७६९ १२-१०-२०११
कट्यार काळजात घुसली पुरुषोत्तम दारव्हेकर ****** ॑॑॑॑॑
कथा अकलेच्या कांद्याची शंकर पाटील ****** ॑॑॑॑॑
करायला गेलो एक बाबूराव गोखले ****** ॑॑॑॑॑
कुटुंब रंगलंय काव्यात (एकपात्री नाट्यानुभव) विश्वनाथ श्रीधर तथा विसुभाऊ बापट २२५० १७-७-२०११
कुर्यात्‌ सदा टिंगलम्‌ शिवराज गोर्ले >१२०० ऑक्टोबर २०११
गारंबीचा बापू श्री.ना. पेंडसे ****** ॑॑॑॑॑
गुंतता हृदय हे शं.ना. नवरे ****** ॑॑॑॑॑
गेला माधव कुणीकडे वसंत सबनीस १७५० २३-३-२०१३
गोकुळचा चोर नानासाहेब शिरगोपीकर ****** ॑॑॑॑॑
गोलमाल शिवराज गोर्ले १०० २-३-२०१३
घाशीराम कोतवाल विजय तेंडुलकर १८५० १८-१-२०१२
घोटभर पाणी (एकांकिका) प्रेमानंद गज्वी ३००१ २६-५-२०१२
चार दिवस प्रेमाचे रत्नाकर मतकरी १०२६ ?
जाणता राजा बाबासाहेब पुरंदरे १२५१ २७-२-२०१३
जांभूळ आख्यान विठ्ठल उमप >७०० २६-११-२०१२
ज्याचा त्याचा प्रश्न अभिराम भडकमकर >४५० ?
झोपी गेलेला जागा झाला बबन प्रभू ****** ॑॑॑॑॑
टुरटूर पुरुषोत्तम बेर्डे ५४३ ?
तरुण तुर्क म्हातारे अर्क मधुकर तोरडमल ****** ॑॑॑॑॑
तुझे आहे तुजपाशी पु.ल.देशपांडे ****** ॑॑॑॑॑
तो मी नव्हेच आचार्य प्र.के.अत्रे २८६३ १४-३-२०१२
दिनूच्या सासूबाई राधाबाई बबन प्रभू ****** ॑॑॑॑॑
दिलखुलास (एकपात्री) स्वाती सुरंगळीकर २५० २५-५-२०१३

-

दुरितांचे तिमिर जावो बाळ कोल्हटकर ****** ॑॑॑॑॑
नटसम्राट वि.वा.शिरवाडकर ****** ॑॑॑॑॑
पंडितराज जगन्‍नाथ विद्याधर गोखले ****** ॑॑॑॑॑
प्रेमा तुझा रंग कसा? वसंत कानेटकर ****** ॑॑॑॑॑
ब्रह्मचारी आचार्य अत्रे ५०३ १९८६
संगीत भावबंधन राम गणेश गडकरी ****** ॑॑॑॑॑
मराठी पाऊल पडते पुढे (मराठमोळ्या गीत-नृत्यांचा कार्यक्रम) उदय साटम (दिग्दर्शक) २७०० ९-१०-२०१२
संगीत मानापमान कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ****** ॑॑॑॑॑
मी जोतीराव फुले बोलतोय ... ? ... ६८० (?) २७-६-२०१२
मी नथूराम गोडसे बोलतोय प्रदीप दळवी ६०० ५-२-२०११
मोरूची मावशी आचार्य प्र.के.अत्रे १३३० १९८५
यदा कदाचित संतोष पवार ३६०० इ.स. २०००
रमाई प्रभाकर दुपारे ५०१ २१-४-२०११
रायगडाला जेव्हां जाग येते वसंत कानेटकर २४५६ ३१-८-२०१३
लग्नाची बेडी आचार्य प्र.के.अत्रे ****** ॑॑॑॑॑
लोच्या झाला रे केदार शिंदे >१००० या नाटकावरून चित्रपट बनला.
वऱ्हाड निघालंय लंडनला लक्ष्मण देशपांडे >>२००० ॑॑॑॑॑
वस्त्रहरण गंगाराम गव्हाणकर ५००० २१-११-२००९
वाटेवरती काचा गं (बाहुली नाट्य) मीना नाईक >५०० ॑॑॑॑॑
वाहतो दुर्वांची ही जुडी बाळ कोल्हटकर >१००० ..?..
विच्छा माझी पुरी करा वसंत सबनीस ****** ॑॑॑॑॑
शंभूराजे सुरेश चिखले ३३३ २१-३-२०१३
शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला राजकुमार तांगडे २२४ २७-७-२०१३
श्रीमंत दामोदरपंत केदार शिंदे ३५० ३५० प्रयोगानंतर नाटकाची सीडी बनली आणि नंतर सिनेमा
संगीत शाकुंतल अण्णासाहेब किर्लोस्कर ****** ॑॑॑॑॑
संगीत शारदा गोविंद बल्लाळ देवल ****** ॑॑॑॑॑
सबकुछ मधुसूदन (इ.स. १९६३पासून सुरू असलेला एकपात्री मनोरंजक कार्यक्रम) डॉ.मधुसूदन घाणेकर २०००० मार्च २०१३
संगीत संशयकल्लोळ गोविंद बल्लाळ देवल ****** ॑॑॑॑॑
सही रे सही केदार शिंदे >१००० ॑॑॑॑॑
सासूबाईंचं असंच असतं आचार्य प्र.के.अत्रे ****** ॑॑॑॑॑
संगीत सौभद्र अण्णासाहेब किर्लोस्कर ****** ॑॑॑॑॑
संगीत स्वयंवर कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ****** ॑॑॑॑॑

संदर्भ

  1. ^ नाटक माधव मनोहर - मराठीमाती
  • [१] My Theatre -सुनील चांदूरकर यांचे संकेतस्थळ)
  • [२] (Pune Theatre -पुणे थिएटर गाईड)
  • [३] (Art n views -प्रदीप वैद्य यांचे संकेतस्थळ)

पहा : महाराष्ट्रातील नाट्य संस्था, नाट्यस्पर्धा, एकपात्री नाटक