कारगील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कारगील
ആലപ്പുഴ
भारतामधील शहर

Kargil Town Panorama.jpg

कारगील is located in जम्मू आणि काश्मीर
कारगील
कारगील
कारगीलचे जम्मू आणि काश्मीरमधील स्थान
कारगील is located in भारत
कारगील
कारगील
कारगीलचे भारतमधील स्थान

गुणक: 34°33′N 76°8′E / 34.55°N 76.13333°E / 34.55; 76.13333

देश भारत ध्वज भारत
राज्य जम्मू आणि काश्मीर
जिल्हा कारगिल
समुद्रसपाटीपासुन उंची ८,७८० फूट (२,६८० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,४३,३८८
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


कारगील हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्याच्या लडाख भौगोलिक प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर जम्मू आणि काश्मीरच्या उत्तर भागात नियंत्रण रेषेच्या जवळ वसले असून ते श्रीनगरच्या पूर्वेस २०४ किमीवर तर लेहच्या २३४ किमी पश्चिमेस आहे. कारगील हे लडाख प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०११ साली त्याची १.४३ लाख होती. हिमालय पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून २,६७६ मी उंचीवरील कारगील शहर हे सुरू नदीच्या किनाऱ्यावर आहे.

श्रीनगर ते लेह दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग १ डी कारगीलमधून जातो. कारगीलला उर्वरित भारतासोबत जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. कारगील विमानतळ सध्या भारतीय हवाई दलाच्या ताब्यात असून येथे नागरी विमानसेवा चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

१९९९ साली पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी करून कारगील भागावर अतिक्रमण केले होते. ह्यामुळे झालेल्या कारगील युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानला येथून हुसकावून लावले व कारगील पुन्हा भारताच्या नियंत्रणाखाली आणले.

कारगीलविषयक पुस्तके[संपादन]

  • कारगिल (हेमन कर्णिक)
  • कारगिल काय घडले कसे जिंकले (मिलिंद वेर्लेकर)
  • कारगिल विजय (नाटक, रमेश रोहोकले )
  • कारगील : अनपेक्षित धक्का ते विजय (अनुवादित, प्रशांत तळणीकर; मूळ इंग्रजी, Kargil : From Surprise to Victory - by General Ved Prakash Mullic)
  • कारगिल के परमवीर कॅप्टन विक्रम बत्रा (हिंदी, जी.एल. बत्रा)
  • काश्मीर से कारगिल तक (हिंदी, शुभंवदा पाणडेय)
  • डोमेल ते कारगील (शशिकांत पित्रे)
  • द शेरशाह ऑफ़ कारगिल"- कॅप्टन विक्रम बत्रा यांचे चरित्र (हिंदी)

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत