मार्सेमिक ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्सेमिक ला लदाख मध्ये अनेक खिंडी आहेत. लडाखी भाषेत खिंडीला 'ला' असे म्हणतात.खारदुंगला,चांगला, तंग्लंगला या लदाख मधल्या अत्युच्च खिंडी आहेत. पण मार्सेमिकला ही खिंड उंचीने सर्वात जास्त आहे.हि खिंड मिलिटरी विभागात आहे त्यामुळे सहसा कोणी जात नाही. विशेष परवाना घेऊन या ठिकाणी जाता येते. वर्षातले जवळ जवळ आठ महिने ही खिंड बर्फाच्छादित असते.मार्सेमिकला येथे जाणारा रस्ता तसा वाहतूक योग्य नाही. मोटरसायकल वरून मार्सेमिकला जाणारे खूप पर्यटक आहेत.