Jump to content

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) या पानावरून पुनर्निर्देशित)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) (संक्षिप्त.राशप) हा भारतातील राजकीय पक्ष आहे, ज्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत. हा पक्ष गांधीवाद, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वांवर आधारित आहे. त्याच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख राज्ये महाराष्ट्र आणि केरळ आहेत. या पक्षाचे चिन्ह "तुतारी फुंकणारा माणूस" आहे.[१]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हे पक्ष फोडून ३ जुलै २०२३ रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले. ते शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपसोबत युती सरकारमध्ये सामील झाले. भारताच्या निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील NCP गटाला नवीन चिन्ह आणि नाव - "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)" मान्य केले. या नवीन पक्षाची स्थापना ८ फेब्रुवारी २०२४ रोजी झाली.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ PTI, Shoumojit Banerjee & (2024-02-24). "Sharad Pawar inaugurates new party symbol at Raigad fort" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
  2. ^ "NCP split: A chance of course correction for ECI? – The Leaflet". theleaflet.in (इंग्रजी भाषेत). 2023-10-29. 2024-03-19 रोजी पाहिले.