Jump to content

अभियांत्रिकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वैज्ञानिक, आर्थिक, सामाजिक व प्रत्यक्षातील ज्ञान मिळवण्याच्या व वापरण्याच्या कौशल्यांना, व्यवसायांना आणि शास्त्रांना अभियांत्रिकी असे म्हणतात. सामान्यपणे विज्ञानाच्या प्रत्यक्षातल्या उपयोगाला अभियांत्रिकी म्हणले जाते. बांधकामे, यंत्रे, उपकरणे, पदार्थ, प्रणाली व प्रक्रिया यांचे आराखडेनिर्मिती करणे ही अभियांत्रिकीची प्रमुख कार्य आहेत. यासाठी गणिताचा आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांसारख्या विविध विज्ञानांचा उपयोग होतो. यातील पदवीधरांना अभियंता असे म्हणतात.

अभियांत्रिकी शाखा []

[संपादन]

प्रमुख अभियांत्रिकी शाखा पुढील प्रमाणे आहेत:

शाखा कार्यक्षेत्र उत्पादन
अणुकेंद्रीय अभियांत्रिकी अणुकेंद्रीय ऊर्जेचे उत्पादन, किरणोत्सर्गी द्रव्यांचा उपयोग अणुकेंद्रीय विक्रियक, अणुकेंद्रीय विषयातील उपकरणे, ट्रँझिस्टर, लेसर, मेसर इ.
अभियांत्रिकीय भौतिकी भौतिकीमधील नवीन शोधांचा अभियांत्रिकीय समस्या सोडविण्यासाठी उपयोग धरणे, विहिरी, नळकाम
आरोग्य अभियांत्रिकी शुद्ध पाण्याचा पुरवठा, भुयारी गटाराचे अभिकल्प व बांधकाम. अपशिष्ट पदार्थाचा निर्यास. मलमूत्र-संस्करणाची यंत्रसामग्री.
इलेक्ट्रॉनिय अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनीय सामग्रीचे उत्पादन, विकास व उपयोग रेडिओ, रडार, दूरचित्रवाणी, संगणक (गणकयंत्र),इलेक्ट्रॉनीय उपकरणे.
औद्योगिक अभियांत्रिकी औद्योगिक प्रक्रियांचे शास्त्रीय व्यवस्थापन. कारखान्यांचीव्यवस्था माणसे व सामग्री यांचा योग्य समन्वय. मोटारगाड्या, गृहोपयोगी उपकरणे, कापड अशा मोठ्या प्रमाणावर उत्पादित केल्या जाणाऱ्या वस्तू.
कृषी अभियांत्रिकी शेतजमिनीचा विकास, शेतीच्या पद्धतीत सुधारणा,शेतजमिनीचे धूप-नियंत्रण, सिंचाई. शेतीसंबंधीची बांधकामे व यंत्रसामग्री.
खनिज तेल अभियांत्रिकी खनिज तेलाच्या साठ्यांचा शोध, तेलविहिरी खणणे,उत्पादित तेल व नैसर्गिक वायू यांची वाहतूक व साठवण. खनिज तेलापासून मिळणारे विविध रासायनिक पदार्थ,नैसर्गिक इंधन-वायू.
खाणकाम अभियांत्रिकी खनिजांचा शोध करणे ती जमिनीतून बाहेर काढणे त्यांवर प्रक्रिया करणे. लोखंड, तांबे वगैरे धातूंची धातुकेॲस्बेस्टस, ग्रॅफाइटअशी अधातवीय खनिजे दगडी कोळसा.
धातुविज्ञानीय अभियांत्रिकी धातुकांपासून धातूंचे निष्कर्षण, धातूंचा विविध कार्यासाठी विकास करणे व कसोट्या घेणे. सर्व प्रकारच्या शुद्ध धातू आणि मिश्रधातू.
नाविक वास्तुशिल्प व अभियांत्रिकी जहाजांचे अभिकल्प व बांधणी. प्रवासी व मालवाहू जहाजे, पाणबुड्या, युद्धनौका,बॅथिस्कॅफ.
प्रदीपन अभियांत्रिकी प्रकाशयोजना, साधनसामग्री व त्यांचा अभिकल्प. मोठे रस्ते, नाटकगृहे, क्रीडांगणे, कारखाने अशाठिकणाची प्रकाशयोजना.
मृत्तिका अभियांत्रिकी अपघर्षक, विटा पोर्सेलीन अशा अधातवीय पदार्थांचेउत्पादन व विकास. विद्युत् निरोधक, इलेक्ट्रॉनीय साहित्य, जेट व रॉकेटएंजिनातील काही भाग.
यांत्रिक अभियांत्रिकी यांत्रिक शक्तीचे उत्पादन व उपयोग. एंजिनांचा अभिकल्प,बांधणी व चाचणी. सर्वसाधारण यंत्रनिर्मिती. सर्व प्रकारची एंजिने, यंत्रे व उपकरणे.
रासायनिक अभियांत्रिकी रासायनिक प्रक्रियांचा विकास करणे. कच्च्या रासायनिकमालापासून उपयुक्त वस्तूंचे उत्पादन करणे. स्फोटक द्रव्ये, खते, रंग, प्लॅस्टिक, रबर, वैद्यकीयरसायने इ.
वस्त्र अभियांत्रिकी वस्त्र-निर्मितीसाठी यांत्रिक व रासायनिक अभियांत्रिकीतत्त्वांचा उपयोग. नैसर्गिक व कृत्रिम धागे व त्यांपासून बनलेले कापड.
वास्तुशिल्प अभियांत्रिकी निरनिराळ्या इमारतींच्या योजना तयार करणे व त्याबांधणे. नाट्यगृहे, बोलपटगृहे, रुग्णालये, बाजार, बँकांच्याइमारती इ.
वाहतूक अभियांत्रिकी वाहतुकीचे मार्ग आखणे व ते बांधणे व त्यांची देखभाल ठेवणे. हमरस्ते, रूळमार्ग, पूल, विमानतळ व तेथील विशेषइमारती.
विद्युत अभियांत्रिकी विद्युत् शक्तीचे प्रेषण, वितरण. विद्युत् सामग्रीचे उत्पादनव विकास. विजेचा उपयोग विद्युत् जनित्रे, चलित्रे, रोहित्रे, प्रेषण, नियंत्रण-साहित्य इ.
वैमानिकीय व अवकाश अभियांत्रिकी विमाने व अवकाशयानांचे अभिकल्प. वातविवरासारख्याचाचणी-सामग्रीचे अभिकल्प व बांधणी. विमाने, हेलिकॉप्टर, रॉकेट, अवकाशयाने इ.
संदेशवहन अभियांत्रिकी संदेशवहनाच्या विविध पद्धतींचे अभिकल्प व विकास. तारायंत्र, दूरध्वनी, दूरमुद्रक, संदेशवहन उपग्रह इ.
सैनिकी अभियांत्रिकी युद्धोपयोगी साहित्याचे उत्पादन. लष्करी उपयोगाचेपूल, रस्ते वगैरे बांधकामांचा अभिकल्प व विकास. विविध प्रकारची शस्त्रे, स्फोटक पदार्थ, प्रक्षेपणास्त्रे.
स्थापत्य अभियांत्रिकी सर्वसाधारण बांधकामांचे अभिकल्प व प्रत्यक्ष बांधकाम,नगररचना, पाणीपुरवठा. इमारती, पूल, धरणे, कालवे, बोगदे, रूळमार्ग,विमानतळ इ.
स्वयंचल अभियांत्रिकी स्वयंचलित वाहनांचा व त्यांना लागणाऱ्या भागांचाअभिकल्प व उत्पादन. मोटारगाड्या, स्कूटर, ट्रॅक्टर इ. वाहने
यंत्र अभियांत्रिकी
उत्पादन अभियांत्रिकी
अणुविद्युत अभियांत्रिकी
वैद्युत संचरण व दूरसंचार अभियांत्रिकी
उपकरण अभियांत्रिकी
संगणक अभियांत्रिकी
संगणकशास्त्र अभियांत्रिकी
जैव अभियांत्रिकी
पर्यावरण अभियांत्रिकी
रासायनिक प्रक्रिया अभियांत्रिकी
बांधकाम अभियांत्रिकी
भूकंप अभियांत्रिकी

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "अभियांत्रिकी". मराठी विश्वकोश. ४ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.