मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया, KCIE
ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ
SirMV (1).png
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
जन्म सप्टेंबर १५, १८६०
मुद्देनहळ्ळी, चिकबळ्ळापूर तालुका व जिल्हा, म्हैसूर राज्य (सध्या कर्नाटक)
मृत्यू एप्रील १४, १९६२
बंगलोर
निवासस्थान मुद्देनहळ्ळी, चिकबळ्ळापूर तालुका व जिल्हा, म्हैसूर राज्य (सध्या कर्नाटक)
नागरिकत्व भारतीय
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
वांशिकत्व भारतीय
धर्म हिंदू
कार्यक्षेत्र अभियांत्रिकी
कार्यसंस्था अभियंता, म्हैसूर चे दिवाण
प्रशिक्षण कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग,पुणे
ख्याती आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स या लंडनमधील संस्थेचे सन्माननीय सदस्यत्व ,तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स च्या बंगलोर शाखेची फेलोशिप
पुरस्कार भारतरत्न ,'नाईट कमांडर ऑफ दि ऑर्डर ऑफ दि इंडियन एंपायर'
वडील श्रीनिवास शास्त्री
आई वेंकटलक्षम्मा
Visvesvarayya in Karnataka.com
जीवन[संपादन]

त्यांचा जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील चिक्कबळ्ळापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी या गावी सप्टेंबर १५, इ.स. १८६१ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीनिवास शास्त्री व आईचे नाव वेंकटलक्षम्मा होते. डॉ.विश्वेश्वरय्या १८८१ साली बी.ए. उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुण्याच्या सायन्स कॉलेजमधून १८८३ मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते मुंबईच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता या पदावर रुजू झाले.

१८८३ साली सिंध प्रांतातील सक्कर या शहराला सिंधू नदीपासून पाणी पुरवण्यासाठी त्यांनी प्रसिद्ध 'सक्कर' बंधाऱ्याची योजना केली.१८९९ मध्ये शेतकऱ्यांसाठी ब्लॉक सिस्टिम शोधून काढली तसेच धरणातील वाया जाणारे पाणी थांबवण्यासाठी स्वयंचलित स्लुईस दरवाजाची रचना केली. हैद्राबाद येथील 'मुसा' आणि 'ईसा' या नद्यांवर धरण बांधले. तसेच नदीच्या काठावर बाग बनवून पुरापासून शहराचे संरक्षण केले. म्हैसूरच्या राजांनी त्यांना संस्थानाचे मुख्य अभियंता आणि नंतर दिवाण म्हणून नेमले होते. १८९२ साली डॉ.विश्वेश्वरय्या यांनी कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरणाची योजना आखली.

डॉ.विश्वेश्वरय्या यांनी लोकांचे अज्ञान व दारिद्‌र्य नष्ट ह्वावे यासाठी लढा उभारला आणि यातूनच म्हैसूर विद्यापीठाची निर्मिती झाली. म्हैसूरमधील The Sandal oil Factory , The Metals Factory,The soap Factory,The crome tyning factory,Bhdravati Aryans and Steel Works हे सारे उद्योग त्यांच्या मेहनतीचे फलित आहेत. त्यांच्या या कार्याने प्रेरित होऊनच टाटांनी त्यांची टाटा इस्पातच्या सल्लागारपदी नेमणूक केली होती. या पदावर त्यांनी १९२७ ते १९५५ पर्यंत काम केले. बंगलोरमधील दि हिंदुस्तान एअरक्राफ्ट फॅक्टरी आणि मुंबईची प्रीमियर कंपनी हे त्यांच्या कामाचे मूर्त स्वरूप आहे. देशात अर्थव्यवस्था नियोजन असावे, यावर काम करणारे डॉ.विश्वेश्वरय्या पहिलेच अभियंता होते. त्यांनी या विषयावर 'प्लॅन्ड इकोनॉमी फॉर इंडिया' हे पुस्तक लिहिले आहे. व्यापार आणि उद्योगधंदे यांच्या वाढीसाठी त्यांनी 'बँक ऑफ म्हैसूर' ची स्थापना केली.

डॉ.विश्वेश्वरय्या यांना अनेक विद्यापीठांच्या डी.लिट उपाध्या मिळाल्या होत्या. ब्रिटिश सरकारने त्यांना 'सर' या उपाधीने गौरिवले, तर देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ.राजेन्द्रप्रसाद यांनी १९५५ साली 'भारतरत्न' या उपाधीने सन्मानित केले. त्यांच्या सन्मानार्थ एका टपाल तिकिटाचे प्रकाशनही करण्यात आले आहे. त्यांनी देशात इंजिनिअरिंगच्या तंत्रज्ञानाचा पाया घातल्यामुळेच त्यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिन, 'अभियंता दिन' म्हणून साजरा केला जातो.