मोक्षगुंडम विश्वेश्वरया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया,
ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ
Vishveshvarayya in his 30's.jpg
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
जन्म सप्टेंबर १५, १८६१
मुद्देनहळ्ळी, चिकबळ्ळापूर तालुका व जिल्हा, म्हैसूर राज्य (सध्या कर्नाटक)
मृत्यू एप्रिल १४, १९६२
बंगलोर
निवासस्थान मुद्देनहळ्ळी, चिकबळ्ळापूर तालुका व जिल्हा, म्हैसूर राज्य (सध्या कर्नाटक)
नागरिकत्व भारतीय
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
वांशिकत्व भारतीय
धर्म हिंदू
कार्यक्षेत्र अभियांत्रिकी
कार्यसंस्था अभियंता, म्हैसूर चे दिवाण
प्रशिक्षण कॉलेज ऑफ इंजिनीयरींग,पुणे
ख्याती आंतरराष्ट्रीय इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स यालंडन स्थित संस्थेचे सन्माननिय सदस्यत्व ,तर इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स च्या बंगलोर शाखेची फेलोशिप
पुरस्कार भारतरत्न ,'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर'
वडील श्रीनिवास शास्त्री
आई वेंकट लक्षम्मा
Visvesvarayya in Karnataka.com


सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या, 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' ; (कन्नड भाषा|ಶ್ರೀ ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ); सप्टेंबर १५ १८६१ - एप्रिल १४ १९६२). हे एक भारतातील कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी जन्मलेले समर्थ अभियंते व नागरीक होते. सन १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला.ब्रिटीशांनी पण त्यांना,त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे 'नाईट' (knight) या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी, १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो.[१] काही ठिकाणी,विशेषतः, त्यांच्या जन्मराज्य असलेल्या कर्नाटकात,या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.


बालपण[संपादन]

यांचा जन्म भारतातील कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी झाला.ते श्रीनिवास शास्त्री व वेंकटलक्षम्मा यांचे अपत्य होते.त्यांचे जन्मगाव पुर्वी म्हैसूर राज्यात होते.त्यांचे वडिल हे एक संस्कृत विद्वान होते व हिंदू ग्रंथांचे भाष्यकार असून आयुर्वेदिक वैद्य होते.त्यांचे पुर्वज हे मोक्षगुंडम या गिद्दलपूर नजिकच्या, सध्याच्या आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात असलेल्या गावातील होते. त्यांनी म्हैसूर राज्यात सुमारे तीन शतकापुर्वीच स्थलांतर केले.'मोक्षगुंडम ' हे नाव त्यांची आंध्र प्रदेशशी असलेली संलग्नता दाखवते. तरुण विश्वेश्वरैय्या यांच्या वडिलांचे ते १५ वर्षाचे असतांना निधन झाले.त्याने त्यांचे कुटुंब हादरले.त्यानंतर ते परतकुर्नुल येथुन मुद्देनहळ्ळी ला आले.त्यांचे प्राथमिक शिक्षण चिकबळ्ळापूर येथे तर उच्चमाध्यमिक शिक्षण बंगलोर येथे झाले. ते १८८१ साली मद्रास येथुन बी.ए.ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रीकीचे पुढील शिक्षण त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरींग,पुणे मध्ये पुणे येथे घेतले. १८८३ मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.

अभियंता म्हणून वाटचाल[संपादन]

अभियांत्रिकीमध्ये स्नातक झाल्यावर,त्यांनी बॉम्बे (सध्याचे मुंबई) येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली.नंतर त्यांना भारतीय पाटबंधारे महामंडळ येथून निमंत्रण आले.त्यांनी, दख्खन क्षेत्रात पाटबंधाऱ्यांची एक अतीशय क्लिष्ट योजना राबविली. त्यांनी 'सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण द्वार प्रणाली' विकसीत केली व त्याचे पेटेंट घेतले जी सन १९०३ मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील खडकवासला धरणास लावण्यात आली. ही द्वारे,धरणातील साठ्याची पूरपातळी,पूर आल्यावर धरणास कोणताही धोका न होता, उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात आलीत.या द्वारांच्या कामात मिळालेल्या यशामुळे,ती टिग्रा? धरण ग्वाल्हेरकृष्णराज सागर धरण म्हैसूर येथे बसविण्यात आली. विश्वेश्वरैया यांनी हैदराबाद शहराचे पूरापासुन संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्याने त्यांना सत्कार मुर्ती झाले.विशाखापट्टणम बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.

सर मो. विश्वेश्वरैया यांनी,कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरण बांधण्याच्या प्रस्तावापासुन ते उदघाटनापर्यंत सर्व कामांची देखरेख केली.या धरणाचे बांधकामाने,ते बांधल्या गेल्याच्या वेळचे,आशियातील सर्वात मोठे सरोवर निर्माण झाले. त्यांना यामुळे, 'म्हैसूर राज्याचे पिता' म्हणून ओळखले जायचे.त्यांचे म्हैसूर राज्याचे नोकरीदरम्यान,त्यांनी सरकारच्या नियंत्रणा खालील म्हैसूर सोप फॅक्टरी,,किटकनाशक प्रयोगशाळा,भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्,श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट,बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी,स्टेट बँक ऑफ मैसुर,सेंचुरी क्लब,मीसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणीत औद्योगीक प्रकल्प सुरु केले. त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला.ते, प्रामाणीकपणा, वेळेचे नियोजन,व एखाद्या कामात पूर्ण समर्पणासाठी ओळखले जात होते. तिरुमला-तिरुपती दरम्यानच्या रस्तेबांधणीतहेए त्यांनी योगदान केले.

म्हैसूर येथे दिवाण म्हणून[संपादन]

सन १९०८ मध्ये स्वेच्छा-निवृत्तीनंतर,म्हैसूर या भारतातील मोठ्या व महत्त्वाच्या राज्याचे दिवाण म्हणुन त्यांना,नियुक्त केल्या गेले. कृष्णराज वोडेयार चतुर्थ या म्हैसूरच्या महाराजाच्या आधारामुळे,त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी निर्विवाद असे योगदान दिले. इतर अनेक कामांसोबत,सन १९१७ मध्ये बंगलोर येथील शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय याची त्यांनी स्थापना केली.ती भारतातील एक प्रथम अभियांत्रीकी संस्था होती. ती अद्यापही कर्नाटकातील एक गणमान्य संस्था आहे.

पुरस्कार व सन्मान[संपादन]

त्यांना मिळालेले 'भारत रत्न' पदक

ते म्हैसूर येथे दिसतांना त्यांना,जनतेसाठी केलेल्या कामांमुळे, 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' या सन्मानाने गौरविल्या गेले.भाला सत्र् मिळाल्यावर, त्यांना सन १९५५ मध्ये 'भारतरत्न' या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविल्या गेले.

'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' पदक

सर मो.विश्वेश्वरैया यांना आंतरराष्ट्रीय इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स यालंडन स्थित संस्थेने सन्माननिय सदस्यत्व ,तर इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स च्या बंगलोर शाखेने फेलोशिप देउन त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापिठांनी त्यांना 'डॉक्टर' ही अनेक विद्याशाखातली पदवी देउन गौरविले.ते सन १९२३ च्या इंडियन सायन्स काँग्रेस चे अध्यक्ष होते.

मुद्देनहळ्ळी येथील कौटुंबिक मंदिर[संपादन]

त्यांचे आईस शेतात जाताना एका दगडावर कोरलेली एक मुर्ती दिसली.ती कोणाची आहे अशी गावात विचारपुस केल्यावर,कोणीच समोर येइना. म्हणुन तिने ती घरी आणुन त्याची घरी प्रतीस्थापना केली. हेच त्यांचे कौटुंबिक मंदिर होय.हे हनुमानाचे मंदिर अजुनही अस्तित्वात आहे.

मुद्देनहळ्ळी येथिल स्मारक[संपादन]

सर मो.विश्वेश्वरैया यांची मुद्देनहळ्ळी येथिल समाधी

नंदी हिल्सच्या पृष्ठभूमीवर, सर मो.विश्वेश्वरैया यांचे, त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या भूमीवर,एक सुंदर व चित्रमय स्मारक मुद्देनहळ्ळी येथे उभारण्यात आले आहे.

त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ निघालेल्या संस्था[संपादन]

  • Visvesvaraya Iron & Steel Limited, a public sector undertaking, in the founding of which he was instrumental
  • His alma mater, the College of Engineering, Pune (COEP) has erected a statue in his memory and honour on their campus in central Pune, immediately outside the historic COEP administration building.

बाह्य दुवे[संपादन]

वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जानेवारी २८, २००७ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)

वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती नोव्हेंबर २०, २००५ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)


  1. ^ "अभियंता दिन: १५ सप्टेंबर".