माघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(माघ महिना या पानावरून पुनर्निर्देशित)

माघ हा एक भारतीय राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षातील अकरावा महिना आहे. हा महिना ३० दिवसांचा असतो. तो २१ जानेवारीला सुरू होतो आणि फेब्रुवारी १९ रोजी संपतो.

माघ महिना हा ग्रेगोरियन कॅलेंडरच्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत येतो.

माघ हा हिंदू पंचागानुसारही वर्षातला अकरावा महिना आहे. ’अमावास्यान्त’ पद्धतीनुसार माघ महिना माघ शुक्ल प्रतिपदेला सुरू होतो आणि माघ अमावास्येला संपतो. पौर्णिमान्त पद्धतीनुसार हा महिना १५ दिवस आधी सुरू होतो आणि १५ दिवस आधी म्हणजे पौर्णिमेला संपतो. म्हणजे जेव्हा अमावास्यान्त पद्धतीची कार्तिक वद्य प्रतिपदा असते, तेव्हा पौर्णिमान्त पद्धतीची माघ वद्य प्रतिपदा असते. दोन्ही पद्धतींतला शुक्लपक्ष एकच असतो.

माघ महिन्यातील संण आणि उत्सव[संपादन]

  • माघ शुद्ध प्रतिपदा : कलावतीदेवी पुण्यतिथी (बेळगांव); श्रीचिंतामणी यात्रा (कळंब-यवतमाळ)
  • माघ शुद्ध द्वितीया : धर्मनाथ बीजोत्सव (धामोरी, ब्रह्मगड, सोनेवाडी -कोपरगाव तालुका)
  • माघ शुद्ध तृतीया : जागजई (यवतमाळ) येथील झेबूजीमहाराज पुण्यतिथी यात्रा; मार्कंडेय जयंती.
  • माघ शुद्ध चतुर्थी : तिलकुंद चतुर्थी; वरद चतुर्थी,; गणेश जयंती; राऊळ महाराज पुण्यतिथी पालखी यात्रा (मोरगांव)
  • माघ शुद्ध पंचमी : वसंत पंचमी; शांतादुर्गा रथोत्सव; गणेश महाराज पुण्यतितिथी (पणज); सखाराम महाराज पुण्यतिथी (इलोरा-बुलढाणा); विठ्ठल रखुमाई यात्रा (धोपेवाडा-नागपूर); मन्मथस्वामी जन्मोत्सव (कपिलधार-बीड), [[संत तुकाराम]महाराजांचा जन्मदिवस
  • माघ शुद्ध षष्ठी : मारोतराव मार्लेगावकर पुण्यतिथी (नागापूर- नांदेड)
  • माघ शुद्ध सप्तमी : रथ सप्तमी; नर्मदा जयंती; नानाजी महाराज दहीहंडी यात्रा (कापशी-वर्धा); कश्यपाचार्य जयंती (राजगुरुनगर-पुणे)
  • माघ शुद्ध अष्टमी : भीमाष्टमी; बेंडोजीबाबा यात्रा (घुईखेड-अमरावती); भगवती येवलेकरस्वामी पुण्यतिथी (कोपरगाव)
  • माघ शुद्ध नवमी : मधुसूदन महाराज पुण्यतिथी (सोनगीर-धुळे)
  • माघ शुद्ध दशमी : भक्त पुंडलिक उत्सव (पंढरपूर); संत तुकाराममहाराज अनुग्रह दिन : या दिवसापासून सुरू होणाऱ्या सप्ताहात भंडारा डोंगरावर कीर्तनादी कार्यक्रम होतात.
  • माघ वद्य अष्टमी  : जानकी जयंती; सीता प्रकट-दिन..
  • माघ वद्य नवमी : रामदास जयंती- दास नवमी.
  • माघ वद्य एकादशी : विजया एकादशी
  • माघ वद्य त्रयोदशी : महाशिवरात्र
हिंदू पंचांगानुसार बारा महिने
  माघ महिना  
शुद्ध पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा
कृष्ण पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्या