शेफाली शाह
Appearance
| शेफाली शाह | |
|---|---|
|
| |
| जन्म |
शेफाली शेट्टी २२ मे, १९७३ |
| राष्ट्रीयत्व |
भारतीय |
| कार्यक्षेत्र | चित्रपट |
| कारकीर्दीचा काळ | १९९५ - चालू |
| भाषा | हिंदी |
| पती | |
शेफाली शाह उर्फ शेफाली शेट्टी (२२ मे, १९७३ - हयात) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. शेफालीने १९९५ सालच्या रंगीला ह्या चित्रपटामध्ये छोटीशी भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९९८ सालच्या सत्या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) हा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तसेच २००७ साली प्रदर्शित झालेल्या द लास्ट इयर ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी शेफालीला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. मोहब्बतें, मॉन्सून वेडिंग इत्यादी गाजलेल्या चित्रपटांमध्ये शेफालीच्या भूमिका होत्या.
निवडक चित्रपट
[संपादन]शेफाली शाह यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक अष्टपैलू भूमिका साकारल्या आहेत. प्रामुख्याने वास्तववादी अभिनयासाठी त्यांना ओळखले जाते. [१]
पुरस्कार आणि सन्मान
[संपादन]- १९९९ - सत्या चित्रपटासाठी फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) पुरस्कार.
- २००७ - गांधी, माय फादर चित्रपटासाठी तोक्यो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार.
- २००९ - द लास्ट लिअर चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री विजेता. [७]
- २०१९ - दिल्ली क्राईम (वेब मालिका) मधील भूमिकेसाठी एमी पुरस्कार (मालिका स्तरावर सन्मान).
- २०२४ - थ्री ऑफ अस चित्रपटासाठी फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) पुरस्कार विजेता.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "Shefali Shah Filmography". IMDb (इंग्रजी भाषेत). १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Filmfare Awards Winners 1999". Filmfare (इंग्रजी भाषेत). १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "20th Tokyo International Film Festival Winners". TIFF (इंग्रजी भाषेत). १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ↑ "Dil Dhadakne Do Awards". IMDb (इंग्रजी भाषेत). १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Darlings review by NDTV". NDTV (इंग्रजी भाषेत). १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Filmfare Awards 2024 Winners List". Filmfare (इंग्रजी भाषेत). १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "55th National Film Awards". PIB India (इंग्रजी भाषेत). १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील शेफाली शाह चे पान (इंग्लिश मजकूर)

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत