फरीदा जलाल
Jump to navigation
Jump to search
फरीदा जलाल | |
---|---|
![]() | |
जन्म |
१८ मे, १९४९ नवी दिल्ली |
कारकीर्दीचा काळ | १९६०-वर्तमान |
पती | तब्रेज बर्नावर |
फरीदा जलाल (जन्म: १८ मे १९४९) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९६० सालापासून बॉलिवूडमध्ये कामे करीत असलेली फरीदा १९६९ सालच्या आराधना ह्या सिनेमात राजेश खन्नाच्या नायिकेच्या रूपात चमकली. तेव्हापासून आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये फरीदाने भूमिका केल्या आहेत.
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है, कुछ कुछ होता है, कहो ना... प्यार है, कभी खुशी कभी गम इत्यादी तिचे अलीकडील गाजलेले चित्रपट आहेत.
पुरस्कार[संपादन]
- फिल्मफेअर पुरस्कार
- सर्वोत्तम सहायक अभिनेत्री - पारस (१९७१)
- सर्वोत्तम सहायक अभिनेत्री - हिना (१९९१)
- सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) - मम्मो (१९९४)
- सर्वोत्तम सहायक अभिनेत्री - दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (१९९५)
बाह्य दुवे[संपादन]
- इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील फरीदा जलालचे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत