मनीषा कोइराला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मनीषा कोइराला
मनीषा कोइराला
जन्म १६ ऑगस्ट, इ.स. १९७०
काठमांडू, नेपाळ
इतर नावे मनीषा कोइराला-दहल
राष्ट्रीयत्व नेपाळी
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट)
सामाजिक कार्य
कारकीर्दीचा काळ इ.स. १९८९ - चालू
भाषा नेपाळी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार
पती सम्राट दहल (इ.स. २००० -चालू)
अधिकृत संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

मनीषा कोइराला (१६ ऑगस्ट, इ.स. १९७०; काठमांडू, नेपाळ - हयात) ही नेपाळी-भारतीय चित्रपट-अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्ती आहे. तिने हिंदी, नेपाळी, तमिळ, तेलुगू, मल्याळम चित्रपटांतून अभिनय केला आहे. तसेच ती भरतनाट्यम्मणिपुरी अभिजात नृत्यशैल्यांमध्ये पारंगत आहे.

तिने इ.स. १९८९ साली फेरी भेटौला या नेपाळी चित्रपटातून पदार्पण केले. इ.स. १९९१ सालच्या सुभाष घई-दिग्दर्शित सौदागर या चित्रपटाद्वारे तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. १९४२: अ लव्ह स्टोरी, बाँबे, खामोशी: द म्यूझिकलदिल से हे तिने भूमिका साकारलेले चित्रपट यशस्वी ठरले.

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.