दालन:इतिहास/नवीन लेख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नवीन लेख १

दालन:इतिहास/नवीन लेख/१

Nalanda1.jpg
नालंदा विद्यापीठ हे बिहारमधील नालंदा येथे असलेले भारतातील व जगातील सर्वश्रेष्ठ बौद्ध शिक्षणकेंद्र होते.

आज नालंदा हे शहर बिहारमध्ये पाटण्यापासून ४० किलोमीटर अंतरावर असून तेथेच विद्यापीठाची वास्तू होती. सद्द्यस्थितित तिचे भग्नावशेष शिल्लक आहेत. गुप्त सम्राट समुद्रगुप्तपहिला कुमारगुप्त यांच्या पुढाकाराने (इ.स. ३७० ते इ.स. ४५५) या काळादरम्यान विद्यापीठाची स्थापना झाली होती. सम्राट हर्षाच्या काळात हे विद्यापीठ भरभराटीला आलेले होते. प्रारंभी या विद्यापीठाचे नाव नलविहार असे होते. सम्राट हर्षवर्धनाने शंभर खेडी विद्यापीठाच्या खर्चासाठी दान दिलेली होती. या खेड्यातील लोक विद्यापीठाला अन्न, वस्त्र व दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवित.

विद्यापीठाचा परिसर अनेक मैल क्षेत्रफळाचा होता. येथे भव्य अशा इमारती होत्या. तीनशे खोल्यांचे वसतीगृह, ऐंशी सभागृह, शंभर अध्यापन कक्ष आणि ग्रहतार्यांच्या खगोलशास्त्रीय अभ्यासाचे उंच मनोरे होते. विद्यापीठाच्या परिसरात बागा, उपवने, तलाव, रस्ते होते.

नालंदा विद्यापीठात अनेकमजली भव्य धर्ममायायोग नावाचे ग्रंथालय होते. ग्रंथालयाच्या तीन उपविभागांना रत्नोदधी, रत्नसागर, आणि रत्नरंजक अशी नावे होती. त्यात हजारो हस्तलिखिते व ग्रंथ होते.

नवीन लेख २

दालन:इतिहास/नवीन लेख/२

The phalanx attacking the centre in the battle of the Hydaspes by Andre Castaigne (1898-1899).jpg
झेलमची लढाई (इंग्लिश: Battle of the Hydaspes, बॅटल ऑफ द हिडास्पेस) ही इ.स.पू. ३२६ साली अलेक्झांडर आणि पोरस यांच्यात झेलम नदीच्या काठी झालेली लढाई होती.

तक्षशीलेचा राजा अंभी आणि झेलम आणि चिनाब नद्यांदरम्यान राज्य करणारा पोरस उर्फ पौरव (पुरू) हे प्रबळ राजे असले तरी त्यांचे आपापसात अजिबात पटत नव्हते. त्यांच्यात सतत संघर्ष होत असत आणि ते एकमेकांना आपल्या राज्यविस्ताराच्या धोरणातील अडथळे मानत असत. अलेक्झांडर सिंधू नदी पार करून आल्यानंतर अंभी राजाने लगेच अलेक्झांडरच्या छावणीत जाऊन त्याची औपचारीक शरणागती पत्करली आणि त्याला चांदीचे २०० टॅलेंट, तीन हजार बैल, दहा हजार मेंढ्या, तीस हत्ती आणि इतर अनेक वस्तूंचा नजराणा दिला. पोरस आपल्या राज्याच्या सीमा पूर्वेकडे वाढवून त्या प्रदेशात आपले वर्चस्व स्थापन करण्याच्या प्रयत्नात असल्याने अंभीने पोरसाचा पराभव करण्यासाठी अलेक्झांडराशी सख्य करून त्याची मदत स्विकारली. नंतर अलेक्झांडराने एका दूताकरवी शरणागती पत्करण्याचा निरोप पोरसाकडे पाठवला पण पोरसाने त्याला दाद दिली नाही उलट राज्याच्या सीमेवर आपण सशस्त्र भेटण्यास तयार असल्याचा निरोप पोरसाने अलेक्झांडराला पाठवला.


पोरसाचा निरोप मिळाल्यानंतर अलेक्झांडराने वायव्य भारताच्या क्षत्रपपदी फिलिप याची नियुक्ती करून त्याचे मुख्यालय पुष्कलावती उर्फ पेशावर येथे केले. अंभीच्या तक्षशीला राज्यात सैन्याची एक तुकडीही तैनात केली आणि नंतर त्याने आपला मोर्चा पोरसाकडे वळवला. अंभीच्या सैन्यासह अलेक्झांडराचे ग्रीक सैन्य झेलम नदीपर्यंत पोहोचले. नदीला तेव्हा पूर आला होता तरीही ठरल्याप्रमाणे पोरस नदीच्या पलीकडील काठावर आपल्या सैन्यासह हजर होता. पोरसाने त्या परिसरातील पूंच आणि नौशेरा भागातील अभिसार जमातीच्या राजांचीही मदत घेण्याचा प्रयत्न केला होता पण त्याने आधीच अलेक्झांडरासमोर शरणागती पत्करली होती. रावी नदीच्या परिसरात राज्य करणाऱ्या पोरसाच्या एका आप्तानेही त्याला मदत करण्याचे नाकारले. अशा रितीने सर्व बाजूंनी कोंडी झाली असली तरी पोरसाने परिणामांची तमा न बाळगता खंबीरपणे अलेक्झांडराच्या सैन्याचा मुकाबला करण्याचा निश्चय केला.

नवीन लेख ३

दालन:इतिहास/नवीन लेख/३

वराह मूर्ती.jpg
भारतीय शिल्पे यांचा विचार करताना त्यामध्ये बौद्धांचे स्तूप, शैलगृहे, पुराणातील हिंदू देवतांची मंदिरे, जैनांची मंदिरे, मूर्ती या सर्वांचा समावेश होतो.

भारतीय शिल्पकलेची माहिती घेताना सिंधू संस्कृतीचा आढावा प्रारंभी घ्यावा लागेल. सिंधू संस्कृतीच्या कलात्मक अवशेषात वास्तुशिल्प आणि मूर्तीकला यांचा समावेश होतो. सिंधू संस्कृतीमध्ये वापरात असलेली मातीची भांडी, मातीच्या मूर्ती, मुद्रिका हा सुद्धा कलेचा नमुना समजला जातो. मुद्रिकावर बैल, गेंडा, हत्ती अशी प्राण्यांची चित्रे दिसून येतात. या काळातील नगराच्या रचनेत उत्तम भाजलेल्या विटांचा वापर दिसून येतो. सांडपाण्याचा निचरा करण्याची उत्तम व्यवस्था हेही या काळाचे एक वैशिष्ट्य होय. स्नानाचे कुंडे, गोदामे, जहाज दुरुस्त करण्याची गोदी अशा वास्तू या सिंधु संस्कृतीच्या वास्तुकलेची माहिती देतात. पशुपती ही सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण मुद्रा म्हणून ओळखली जाते. ही संस्कृती नागर संस्कृती होती, त्यामुळे आर्थिक स्थैर्य आल्यानंतरचे कलेचे आविष्कार हे यामध्ये पहायला मिळतात.

मौर्यकालीन

इ.स. पू. चौथ्या शतकातील मौर्यकालीन कला अवशेष बिहारउत्तर प्रदेश येथे सापडतात. पाटलीपुत्र येथील मौर्य राजधानीचे अवशेष, शैलग्रुहे, यक्ष मूर्ती यांचा यामध्ये समावेश होतो. पाटलीपुत्र येथील राजसभेच्या अवशेषात तळघडे आणि मंचक व त्यावरील फुलांची नक्षी, मण्यांची माळ यांचे वैशिष्ट्य आहे.

नवीन लेख ४

दालन:इतिहास/नवीन लेख/४ दालन:इतिहास/नवीन लेख/४

नवीन लेख ५

दालन:इतिहास/नवीन लेख/५ दालन:इतिहास/नवीन लेख/५

नवीन लेख ६

दालन:इतिहास/नवीन लेख/६ दालन:इतिहास/नवीन लेख/६

नवीन लेख ७

दालन:इतिहास/नवीन लेख/७ दालन:इतिहास/नवीन लेख/७

नवीन लेख ८

दालन:इतिहास/नवीन लेख/८ दालन:इतिहास/नवीन लेख/८

नवीन लेख ९

दालन:इतिहास/नवीन लेख/९ दालन:इतिहास/नवीन लेख/९

नवीन लेख १०

दालन:इतिहास/नवीन लेख/१० दालन:इतिहास/नवीन लेख/१०

नवीन लेख ११

दालन:इतिहास/नवीन लेख/११ दालन:इतिहास/नवीन लेख/११

नवीन लेख १२

दालन:इतिहास/नवीन लेख/१२ दालन:इतिहास/नवीन लेख/१२

नवीन लेख १३

दालन:इतिहास/नवीन लेख/१३ दालन:इतिहास/नवीन लेख/१३

नवीन लेख १४

दालन:इतिहास/नवीन लेख/१४ दालन:इतिहास/नवीन लेख/१४

नवीन लेख १५

दालन:इतिहास/नवीन लेख/१५ दालन:इतिहास/नवीन लेख/१५

नवीन लेख १६

दालन:इतिहास/नवीन लेख/१६ दालन:इतिहास/नवीन लेख/१६

नवीन लेख १७

दालन:इतिहास/नवीन लेख/१७ दालन:इतिहास/नवीन लेख/१७

नवीन लेख १८

दालन:इतिहास/नवीन लेख/१८ दालन:इतिहास/नवीन लेख/१८

नवीन लेख १९

दालन:इतिहास/नवीन लेख/१९ दालन:इतिहास/नवीन लेख/१९

नवीन लेख २०

दालन:इतिहास/नवीन लेख/२० दालन:इतिहास/नवीन लेख/२०

नवीन लेख २१

दालन:इतिहास/नवीन लेख/२१ दालन:इतिहास/नवीन लेख/२१

नवीन लेख २२

दालन:इतिहास/नवीन लेख/२२ दालन:इतिहास/नवीन लेख/२२

नवीन लेख २३

दालन:इतिहास/नवीन लेख/२३ दालन:इतिहास/नवीन लेख/२३

नवीन लेख २४

दालन:इतिहास/नवीन लेख/२४ दालन:इतिहास/नवीन लेख/२४

नवीन लेख २५

दालन:इतिहास/नवीन लेख/२५ दालन:इतिहास/नवीन लेख/२५

नवीन लेख २६

दालन:इतिहास/नवीन लेख/२६ दालन:इतिहास/नवीन लेख/२६

नवीन लेख २७

दालन:इतिहास/नवीन लेख/२७ दालन:इतिहास/नवीन लेख/२७

नवीन लेख २८

दालन:इतिहास/नवीन लेख/२८ दालन:इतिहास/नवीन लेख/२८

नवीन लेख २९

दालन:इतिहास/नवीन लेख/२९ दालन:इतिहास/नवीन लेख/२९

नवीन लेख ३०

दालन:इतिहास/नवीन लेख/३० दालन:इतिहास/नवीन लेख/३०