Jump to content

सम्राट हर्षवर्धन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हर्षवर्धन या पानावरून पुनर्निर्देशित)
सम्राट हर्षवर्धन
सम्राट
हर्षवर्धनांचे पुष्याभूती साम्राज्य (१०,००,००० चौरस कि.मी. क्षेत्रफळ)
अधिकारकाळ इ.स. ६०६ - इ.स. ६४७
राज्याभिषेक इ.स. ६०६
राज्यव्याप्ती भारतातील जालंधर, पंजाब, काश्मीर, नेपाळ आणि वल्लभीपूर , खानदेश पर्यंत
पूर्ण नाव सम्राट हर्षवर्धन शृंग
जन्म इ.स. ५९०
मृत्यू इ.स. ६४७
पूर्वाधिकारी राज्यवर्धन
उत्तराधिकारी यशोवर्मन
वडील प्रभाकरवर्धन
पत्नी पुष्पावती
राजघराणे शृंग साम्राज्य (वर्धन साम्राज्य)
धर्म बौद्ध धर्म

सम्राट हर्षवर्धन किंवा हर्ष (इ.स. ५९०इ.स. ६४७) हे उत्तर भारतातील प्रसिद्ध सम्राट होते. ते पुष्याभूती साम्राज्यातील शेवटचे सम्राट होते. राज्यवर्धननंतर इ.स. ६०६ मध्ये ते थानेश्वरच्या गादीवर बसले. हर्षवर्धन संबंधी बाणभट्टाच्या हर्षचरित मधून व्यापक माहिती मिळते. हर्षवर्धनांनी जवजवळ ४१ वर्षे राज्य केले. या काळामध्ये त्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार जालंधर, पंजाब, काश्मीर, खान्देश, नेपाळ आणि बल्लभीपुरपर्यंत केला होता. हर्षवर्धनांनी आर्यावर्ताला सुद्धा आपल्या अधीन केले. हिंदू धर्मातील सूर्य देवाची आराधना करून त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला.[]

नाटककार आणि कवी

[संपादन]

सम्राट हर्षवर्धन एक प्रस्थापित नाटककार आणि कवी होते. त्यांनी 'नागानंद', 'रत्नावली' आणि 'प्रियदर्शिका' नावांच्या नाटकांची रचना केली. त्यांच्या दरबारात बाणभट्ट, हरिदत्त आणि जयसेन यांसारखे प्रसिद्ध कवी व लेखक दरबाराची शोभा वाढवत होते. सम्राट हर्षवर्धन हे बौद्ध धर्माच्या महायान संप्रदायाचे अनुयायी होते. असे मानले जाते की, हर्षवर्धन दरदिवशी ५०० ब्राह्मणांना आणि १००० बौद्ध भिक्खुंना भोजन दान करीत होते. हर्षवर्धन यांनी इ.स. ६४३ मध्ये कनोज आणि प्रयाग या शहरांमध्ये दोन विशाल धार्मिक सभांचे आयोजन केले होते. हर्षवर्धनाने प्रयागमध्ये आयोजित केलेल्या सभेला मोक्षपरिषद् असे म्हणले जाते.

हर्षवर्धनाची शासन व्यवस्था

[संपादन]
  • हर्षकालीन प्रमुख अधिकारी
  • सरसेनापति - बलाधिकृत सेनापति
  • महासंधी विग्रहाधिकृत : संधी/युद्ध करण्यासंबंधीचा अधिकारी
  • कटुक; हस्ती - सेनाध्यक्ष,
  • वृहदेश्वर - अश्व सेनाध्यक्ष
  • अध्यक्ष - वेगवेगळ्या विभागांचे सर्वोच्च अधिकारी - आयुक्तक
  • साधारण अधिकारी - मीमांसक, न्यायधीश
  • महाप्रतिहार - राजप्रासादचे रक्षक - चाट-भाट - वैतनिक/अवैतनिक सैनिक
  • उपरिक महाराज - प्रांतीय शासक - अक्षपटलिक
  • लेखा जोखा लिपिक — पूर्णिक, साधारण लिपिक

हर्षवर्धन स्वतः प्रशासकीय व्यवस्थेत व्यक्तिगत रूपात रुची ठेवित असे. सम्राटाच्या मदतीसाठी एक मंत्रिपरिषद स्थापण्यात आली होती. बाणभट्टानुसार अवंती हा युद्ध आणि शांतीचा सर्वोच्च मंत्री होता. सिंहनाद हा हर्षवर्धनाचा महासेनापती होता. बाणभट्टाने हर्षचरितात या पदांबद्दल म्हणले आहे :

  • अवंती - युद्ध आणि शांतीचा मंत्री.
  • सिंहनाद - हर्षवर्धनाच्या सेनेचा महासेनापती.
  • कुंतल - अश्वसेनाचा मुख्य अधिकारी.
  • स्कंदगुप्त - हत्तीसेनेचा मुख्य अधिकारी.
  • राज्यातील अन्य प्रमुख अधिकारी - जसे महासामन्त, महाराज, दौस्साधनिक, प्रभातार, राजस्थानीय, कुमारामात्य, उपरिक, विषयपति इत्यादि.
  • कुमारामात्य- उच्च प्रशासनिक सेवेत नियुक्त
  • दीर्घध्वज - राजकीय संदेशवाहक
  • सर्वगत - गुप्तचर विभागाचा सदस्य
  • सामंतवादात वृद्धिक्षी (?)

हर्षवर्धनांच्या काळात अधिकाऱ्यांना नगद वा जहागिरीच्या रूपात वेतन दिले जात असे, पण ह्युएन्संगाच्या म्हणण्यानूसार, मंत्र्यांना व अधिकाऱ्यांना वेतन हे भूमी अनुदानाच्या रूपात दिले जात होते.

राष्ट्रीय आय आणि कर

[संपादन]

हर्षवर्धनांच्या काळात राष्ट्रीय उत्पन्‍नाचा एक चतुर्थांश (२५%) भाग उच्च कोटींच्या राज्य कर्मचाऱ्यांना वेतन किंवा बक्षिसाच्या रूपात, एक चतुर्थांश भाग धार्मिक कार्यांच्या खर्चांसाठी, एक चतुर्थांश भाग शिक्षणासाठीच्या खर्चासाठी आणि बाकी एक चतुर्थांश भाग हे सम्राट स्वतः आपल्या खर्चासाठी उपयोगात आणत होते. राजस्वच्या स्रोताच्या रूपात तीन प्रकारच्या करांचे विवरण मिळते - भाग, हिरण्य, आणि बली. 'भाग' किंवा भूमिकर (सारा) पदार्थाच्या रूपात घेतले जात होते. 'हिरण्य' नगदाच्या रूपात घेतला जाणारा कर होता. या काळात भूमिकर कृषि उत्पादनाच्या १/६ इतका वसूल केला जात असे.

सैन्य रचना

[संपादन]

ह्युएन्संगनुसार हर्षवर्धनांच्या सैन्यात जवळपास ५,००० हत्ती, २,००० घोडेस्वार व ५,००० पायदळ सैनिक होते. कालांतराने ही संख्या वाढून हत्ती ६०,००० व घोडस्वारांची संख्या १,००,००० (एक लाख) पर्यंत पोहोचली. सम्राट हर्षवर्धनांच्या सैन्यातील साधारण सैनिकांना चाट व भाट, अश्वसेनेच्या अधिकाऱ्यांना हदेश्वर, पायदळ सैन्याच्या अधिकाऱ्यांना बलाधिकृत आणि महाबलाधिकृत म्हणले जात होते.

मृत्यु

[संपादन]

सम्राट हर्षवर्धनांचा दिवस तीन भागात विभागला गेला होता. प्रथम भाग सरकारी कार्यांसाठी तथा इतर दोन विभागात धार्मिक कार्य संपन्न केले जात होते. सम्राट हर्षवर्धन यांनी इ.स. ६४१ मध्ये एका व्यक्तीला आपला दूत बनवून चीनला पाठवले. इ.स. ६४३ मध्ये चिनी सम्राटाने 'ल्यांग-होआई-किंग' नावाच्या दूताला हर्षवर्धनांच्या दरबारात पाठवले. सुमारे इ.स. ६४६मध्ये 'लीन्य प्याओं' आणि 'वांग-ह्नन-त्से'च्या नेतृत्वात तिसरे दूत मंडळ हर्षवर्धनांच्या दरबात पोहोचण्यापूर्वीच हर्षवर्धनांचे निधन झाले.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Harsha". Encyclopædia Britannica. 2009. 6 October 2014 रोजी पाहिले.