Jump to content

दालन:इतिहास/नवीन लेख/१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नालंदा विद्यापीठ हे बिहारमधील नालंदा येथे असलेले भारतातील व जगातील सर्वश्रेष्ठ बौद्ध शिक्षणकेंद्र होते.

आज नालंदा हे शहर बिहारमध्ये पाटण्यापासून ४० किलोमीटर अंतरावर असून तेथेच विद्यापीठाची वास्तू होती. सद्द्यस्थितित तिचे भग्नावशेष शिल्लक आहेत. गुप्त सम्राट समुद्रगुप्तपहिला कुमारगुप्त यांच्या पुढाकाराने (इ.स. ३७० ते इ.स. ४५५) या काळादरम्यान विद्यापीठाची स्थापना झाली होती. सम्राट हर्षाच्या काळात हे विद्यापीठ भरभराटीला आलेले होते. प्रारंभी या विद्यापीठाचे नाव नलविहार असे होते. सम्राट हर्षवर्धनाने शंभर खेडी विद्यापीठाच्या खर्चासाठी दान दिलेली होती. या खेड्यातील लोक विद्यापीठाला अन्न, वस्त्र व दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवित.

विद्यापीठाचा परिसर अनेक मैल क्षेत्रफळाचा होता. येथे भव्य अशा इमारती होत्या. तीनशे खोल्यांचे वसतीगृह, ऐंशी सभागृह, शंभर अध्यापन कक्ष आणि ग्रहतार्यांच्या खगोलशास्त्रीय अभ्यासाचे उंच मनोरे होते. विद्यापीठाच्या परिसरात बागा, उपवने, तलाव, रस्ते होते.

नालंदा विद्यापीठात अनेकमजली भव्य धर्ममायायोग नावाचे ग्रंथालय होते. ग्रंथालयाच्या तीन उपविभागांना रत्नोदधी, रत्नसागर, आणि रत्नरंजक अशी नावे होती. त्यात हजारो हस्तलिखिते व ग्रंथ होते.