Jump to content

दालन:इतिहास/नवीन लेख/३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय शिल्पे यांचा विचार करताना त्यामध्ये बौद्धांचे स्तूप, शैलगृहे, पुराणातील हिंदू देवतांची मंदिरे, जैनांची मंदिरे, मूर्ती या सर्वांचा समावेश होतो.

भारतीय शिल्पकलेची माहिती घेताना सिंधू संस्कृतीचा आढावा प्रारंभी घ्यावा लागेल. सिंधू संस्कृतीच्या कलात्मक अवशेषात वास्तुशिल्प आणि मूर्तीकला यांचा समावेश होतो. सिंधू संस्कृतीमध्ये वापरात असलेली मातीची भांडी, मातीच्या मूर्ती, मुद्रिका हा सुद्धा कलेचा नमुना समजला जातो. मुद्रिकावर बैल, गेंडा, हत्ती अशी प्राण्यांची चित्रे दिसून येतात. या काळातील नगराच्या रचनेत उत्तम भाजलेल्या विटांचा वापर दिसून येतो. सांडपाण्याचा निचरा करण्याची उत्तम व्यवस्था हेही या काळाचे एक वैशिष्ट्य होय. स्नानाचे कुंडे, गोदामे, जहाज दुरुस्त करण्याची गोदी अशा वास्तू या सिंधु संस्कृतीच्या वास्तुकलेची माहिती देतात. पशुपती ही सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण मुद्रा म्हणून ओळखली जाते. ही संस्कृती नागर संस्कृती होती, त्यामुळे आर्थिक स्थैर्य आल्यानंतरचे कलेचे आविष्कार हे यामध्ये पहायला मिळतात.

मौर्यकालीन

इ.स. पू. चौथ्या शतकातील मौर्यकालीन कला अवशेष बिहारउत्तर प्रदेश येथे सापडतात. पाटलीपुत्र येथील मौर्य राजधानीचे अवशेष, शैलग्रुहे, यक्ष मूर्ती यांचा यामध्ये समावेश होतो. पाटलीपुत्र येथील राजसभेच्या अवशेषात तळघडे आणि मंचक व त्यावरील फुलांची नक्षी, मण्यांची माळ यांचे वैशिष्ट्य आहे.