तक्षशिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तक्षशीला या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

तक्षशिला (इंग्रजीत Taxila) हे प्राचीन भारतातील एक प्रमुख शहर आणि विद्यापीठ होते.

आत्ताच्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात रावळपिंडी शहरापासून ३५ किमी वायव्येस असलेल्या या शहराचे अवशेष सुमारे ३,००० वर्ष जुने आहेत. प्राचीन भारतामध्ये शिक्षणाची अनेक नावाजलेली केंद्र उदयाला आली होती या केंद्रांपैकी तक्षशिला विद्यापीठ हे महत्त्वाचे शिक्षण केंद्र होते या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी परराज्यांतून तसेच परदेशांतूनही विद्यार्थी येत असत. तक्षशिला हे प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर होते. सध्या ही स्थान पाकिस्तान मध्ये आहे या ठिकाणी सापडलेल्या पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे हे ठिकाण इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये वसवले गेले होते