सिंधू संस्कृती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९२० च्या सुमारास सिधूनदीच्या खोर्‍यात मोहेंजोदाडो आणि हडप्पा या दोन प्राचीन शहरांचा शोध लागला अशाच प्रकारचे अवशेष नंतर भारतातील कालिबंगन, दायमाबाद, सुरकोटडा, लोथल, धोळावीरा या ठिकाणीही सापडले आहेत. या सर्व ठिकाणी सापडलेल्या अवशेषांमध्ये व हडप्पा येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये कमालीचे साम्य असल्याने या संस्कृतीला हडप्पा संस्कृती म्हटले आहे.

सिंधू संस्कृतीचे प्राचीनत्व[संपादन]

भारतातील सर्वांत प्राचीन नागरीकरण म्हणून ओळखली जाणारी सिंधू संस्कृती ही इ.स.पू. आठ हजार वर्षे इतकी जुनी असल्याचा निष्कर्ष २०१६ साली झालेल्या संशोधनाद्वारे काढण्यात आला आहे. आयआयटी खरगपूर आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) यांनी एकत्रितपणे हे संशोधन केले आहे. या संशोधनामुळे सिंधू संस्कृती ही इजिप्तियन (इ.स.पू. ७००० ते इ.स.पू. ३०००) आणि मेसोपोटेमियन (इ.स.पू. ६५०० ते इ स.पू. ३१००) या संस्कृतींपेक्षाही प्राचीन असल्याचे सिद्ध झाले आहे.[१]

'नेचर' या नियतकालिकामध्ये या विषयीचे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. सिंधू संस्कृती आकाराला येण्यापूर्वी एक हजार वर्षे तेथे मनुष्यवस्ती असल्याचा शोध या संशोधनामध्ये संशोधकांना लागला. त्याचप्रमाणे सुमारे इसवी सनपूर्व तीन हजार वर्षांपूर्वी झालेल्या हवामानातील बदलांमुळे ही संस्कृती नष्ट झाल्याचा निष्कर्षही शास्त्रज्ञांनी काढला आहे.[२]

संदर्भ[संपादन]

  1. "सिंधू संस्कृती आठ हजार वर्षांपूर्वीची", महाराष्ट्र टाईम्स, ३० मे, २०१६. 
  2. Sarkar, A. et al. (May 2016). "Oxygen isotope in archaeological bioapatites from India: Implications to climate change and decline of Bronze Age Harappan civilization." (इंग्रजी मजकूर). Scientific Reports 6 (26555). Nature Publishing Group. दुवा:10.1038/srep26555.