संकष्ट चतुर्थी

From विकिपीडिया
Jump to navigation Jump to search

हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणार्‍या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात.[१] एका वर्षात १२ आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास १३ संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो.गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्व विशेष आहे.[२] चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्वाचा भाग आहे.[३]

व्रत[edit]

संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे.[४] ते पुरुष व स्त्रिया दोघांनी करायचे असते. हे व्रत दोन प्रकारांनी करतात. १. मिठाची संकष्ट चतुर्थी व २. पंचामृती चतुर्थी. दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा.[५]यासाठी मोदक करण्याची पद्धती आहे.त्यानंतर भोजन करावे.याव्र्ताचा काल आमरण,एकवीस वर्षे किंवा एक वर्ष असा आहे.व्रतराज या ग्रंथात हे व्रत सांगितले आहे.[६]

अंगारकी[edit]

जी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी असे म्हटले जाते.[७] अधिक मासातील अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येते.

३ वर्षात ३७ महिने म्हणून ३७ संकष्ट्या; एकूण सात वार, म्हणून तीन वर्षांत अंगारकी येण्याची शक्यता ३७ भागिले ७ = ५. म्हणून साधारणपणे तीन कालदर्शिका वर्षांत पाचदा अंगारकी येते.

३३ महिन्यांत एक अधिक मास येतो, म्हणजे २१ वर्षात साधारणतः सात अधिक मास येतात; अधिक मासात मंगळवारी संकष्टी येण्याची शक्यता सातात एक, म्हणून साधारणपणे २१ वर्षात एकच अंगारकी अधिक मासात येते.

चित्रदालन[edit]

हे सुद्धा पहा[edit]

संदर्भ[edit]

  1. ^ Purohit, Manohar Narayan (2016-11-03). A Guide to Astronomical Calculations: With Illustrative Solved Examples (en मजकूर). Notion Press. आय.एस.बी.एन. 9781946048240. 
  2. ^ Gadgil, Amarendra Laxman (1981). Śrīgaṇeśa kośa: bhāvika bhakta, upāsaka, āṇi abhyāsaka aśā sarvã̄sāṭhĩ̄ Gaṇeśa daivatavishayaka sarva jñānācā saṅgrāhya sādhana-grantha (mr मजकूर). Śrīrāma Buka Ejansī. 
  3. ^ Hirlekar, Shrirang (2018-04-18). Sulabh Panchang Vachan Aani Kundali Lekhan/Nachiket Prakashan: सुलभ पंचांग वाचन आणि कुंडली लेखन (mr मजकूर). Nachiket Prakashan. 
  4. ^ Ganeśa siddhi: tāntrika, paurānika, va vaidika siddhi dāyaka sādhanāyoṃ kā apūrva saṃgraha (hi मजकूर). Saṃskr̥ti Saṃsthāna. 1975. 
  5. ^ "संकष्ट चतुर्थी माहात्म्य". https://www.transliteral.org. १२.१२.२०१९ रोजी पाहिले. 
  6. ^ भारतीय संस्कृती कोश खंड नववा
  7. ^ (India), Maharashtra (1986). Maharashtra State Gazetteers (en मजकूर). Directorate of Government Print., Stationery and Publications, Maharashtra State.