जन गण मन
भारताचे राष्ट्रागीत | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | musical work/composition, राष्ट्रगीत | ||
---|---|---|---|
कार्यक्षेत्र भाग | भारत | ||
मूळ देश | |||
संगीतकार |
| ||
Lyricist | |||
वापरलेली भाषा | |||
वर आधारीत |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे.[१] हे कवी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत भारतो भाग्यो बिधाता या नावाने रचले होते.[२][३] याची शैली साधू बंगाली किंवा तत्सम बंगालीमध्ये असून यावर संस्कृतचा प्रभाव आहे.[२] भारतो भाग्यो बिधाता या रचनेचा पहिला श्लोक भारतीय संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारला.[४][५]
राष्ट्रगीताच्या अधिकृत प्रस्तुतीकरणाला अंदाजे ५२ सेकंदांचा वेळ लागतो.[५] पहिल्या आणि शेवटच्या ओळींचा समावेश असलेली एक लहान आवृत्ती देखील (जिला सुमारे २० सेकंद लागतात) कधीकधी गायली जाते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात सर्वप्रथम हे गीत सार्वजनिकपणे पहिल्यांदा २७ डिसेंबर १९११ रोजी गायले गेले. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये लिहिलेल्या कवितेतील पाच कडव्यांपैकी एका कडव्याचा संस्कृत भाषांतराचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केलेला आहे.[६]
शब्द
[संपादन]जनगणमन अधिनायक जय हे, भारतभाग्यविधाता.
पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग.
विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधी तरंग.
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे.
गाहे तव जयगाथा.
जनगणमंगलदायक जय हे, भारतभाग्यविधाता.
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे.
- ऐका -
प्रवाद
[संपादन]या कवितेच्या भारताचे राष्ट्रगीत होण्याच्या योग्यतेबद्दल वाद आहे. ही कविता प्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १९११ मधील अधिवेशनात म्हटली गेली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी हे भारताच्या भविष्याचे जयगीत म्हणून लिहिले होते. पुढच्याच दिवशी जॉर्ज पाचवा याचे स्वागत करण्यात आले. वर्तमानपत्रात आलेल्या चुकीच्या उल्लेखांमुळे असा समज पसरला की ते राजाला उद्देशून लिहिले आहे. पण टागोरांनी ही स्वतः ही कविता भारताच्या अंगभूत शक्तीला व ऐतिहासिक वैभवाला उद्देशून लिहिली आहे असे म्हणले आहे.[७] बंगालची फाळणी रद्द केल्याबद्दल पंचम जॉर्ज यांचे अभिनंदन करण्यासाठी स्वागतगीत लिहावे, अशी सूचना प्रद्युत कुमार ठाकूर यांनी रवींद्रनाथ टागोर (ठाकूर) यांना केली होती. परंतु त्याची प्रचंड चीड येऊन टागोर यांनी त्यांना नकार दिला. २७ डिसेंबर १९११ रोजी टागोर यांनी स्वतः चाल लावलेले ‘जन गण मन’ काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात गायले.[८]
गीताचा आशय
[संपादन]या गीतात भारत देश सुजलाम् सुफलाम् आहे, भारतभूमी किती संपन्न आहे, त्यात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे औदार्य यासह अनेक गुण व वैभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. सर्व जाती, संप्रदाय व पंथ यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या गीताच्या माध्यमातून त्यांनी सर्व शक्तिमान श्री परमेश्वराला भारताच्या कल्याणासाठी मागणे मागितले आहे.[९]
राष्ट्रगीत म्हणून मान्यता
[संपादन]घटना समितीने २४ जानेवारी १९५० मध्ये देशाचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून ‘जन गन मन’चा स्वीकार केला. या गीताची पाच कडवी असून केवळ पहिलेच कडवे भारतात म्हणले जाते.व त्याच दिवशी म्हणजे २४ जानेवारी १९५० भारताचे राष्ट्रगान ही स्विकृत केले.[१०]
राष्ट्रगीत कधी म्हणावे
[संपादन]- स्वातंत्र्यदिन
- प्रजासत्ताक दिन
- मा. राष्ट्रपती यांच्या उपस्थितीतील कार्यक्रम
- राज्यपाल, उप राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीतील कार्यक्रम
- लष्करी रेजिमेंटला राष्ट्रध्वज प्रदान करताना
- नौदलात राष्ट्रध्वज उभारण्यात येत असताना
- शासकीय कार्यकम प्रसंगी[११]
जन गण मन पूर्ण गीत
[संपादन]जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता
पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जनगणमंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||१||
- अहरह तव आव्हान प्रचारित सुनि, तव उदार वाणी
- हिंदू बौद्ध सिख जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी
- पूरब पश्चिम आसे, तव सिंहासन पासे
- प्रेमहार हय गाथा
- जनगणऐक्यविधायक जय हे, भारत भाग्यविधाता
- जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||२||
पतनअभ्युदयबंधुर पंथा युगयुग धावित यात्री
तुम चिर सारथी, तव रथचक्रे मुखरित पथ दिन रात्री
दारुण विप्लव माजे, तव शंखध्वनि बाजे
संकंट दुखयात्रा
जनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||३||
- घोरतिमिरघननिबिड निशीथे पीडित मूर्छित देशे
- जागृत छिल तव अविचल मंगल नत नयने अनिमेषे
- दुःस्वप्ने आतंके, रक्षा करिले अंके
- स्नेहमयी तुमी माता
- जनगण दुःख त्रायक जय हे, भारत भाग्यविधाता
- जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||४||
रात्र प्रभातिल उदिल रविच्छवि पुर्व उदयगिरि भाले
गाहे विहंगम पुण्य समीरण नवजीवन रस ढाले
तव करुणारुण रागे, निद्रित भारत जागे
तव चरणे नत माथा
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. भारत भाग्यविधाता ||५||
जन गण मन गीताचा अर्थ
[संपादन]राष्ट्रगीताचा मराठीतील अर्थ पाहू या. तो असा....
जन-गण-मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता
तू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस. भारताचा भाग्योदय करणारा आहेस. तुझा जयजयकार असो!
पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग।
पंजाब , सिंध , गुजरात , महाराष्ट्र , द्राविड म्हणजे दक्षिण भाग , उत्कल म्हणजे आताचा ओडिशा , बंगाल या सर्वांना तुझा नामघोष जागृत करतो. जागे करतो.
विंध्य हिमाचल यमुना गंगा , उच्छल जलधितरंग। विंध्याद्री आणि हिमाचल इथपर्यंत तुझे यशोगान ऐकू येतं.
गंगा-यमुनेच्या प्रवाह संगीतात ते निनादित होतं. उसळी मारणाऱ्या समुद्राच्या लाटाही तुझ्या नामाचा गजर करतात.
तव शुभ नामे जागे , तव शुभ आशिष मांगे ; गाहे तव जय गाथा। जन-गण मंगलदायक जय है , भारत-भाग्य-विधाता।
हे सर्व तुझ्यापाशी आशीर्वाद मागतात. तुझी कीर्ती गातात. तू सर्व लोकांचं मंगल करणारा आहेस.
जय हे , जय हे , जय हे , जय जय जय जय है।।
तुझा जयजयकार. त्रिवार जयजयकार.
हे सुद्धा पहा
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]- वंदे मातरम् - भारताचे राष्ट्रीय गीत
- सारे जहाँ से अच्छा
- अमर शोनार बांग्ला - बांगलादेशचे राष्ट्रगीत, हे देखील रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे
- राष्ट्रीय प्रतिज्ञा
बाह्य दुवे
[संपादन]- MIDI मध्ये भारतीय राष्ट्रगीत (इंग्लिश मजकूर) Archived 2004-10-10 at the Wayback Machine.
- भारतीय दूतावास, लिस्बन, पोर्तुगाल Archived 2010-05-12 at the Wayback Machine. येथील एमपी३ मध्ये भारतीय राष्ट्रगीत ऐका Archived 2007-07-01 at the Wayback Machine.
- जन गण मनची उत्पत्ती (इंग्लिश मजकूर) Archived 2007-08-10 at the Wayback Machine.
संदर्भ
[संपादन]- ^ यंगलवार, प्रा विजय (2014-05-16). Bhartachi Rashtriy Pratike / Nachiket Prakashan: भारताची राष्ट्रीय प्रतीके. Nachiket Prakashan.
- ^ a b "National anthem of India: a brief on 'Jana Gana Mana'". News18. 2020-08-19 रोजी पाहिले.
- ^ "National Symbols | National Portal of India". www.india.gov.in. 2020-08-19 रोजी पाहिले.
- ^ Encyclopedia of India: D to H (इंग्रजी भाषेत). Encyclopaedia Britannica (India) Pvt. Limited. 2008. ISBN 978-81-8131-008-8.
- ^ a b DelhiJuly 8, IndiaToday in New; July 13, 2015UPDATED:; Ist, 2015 14:22. "9 interesting facts about our National Anthem". India Today (इंग्रजी भाषेत). 2020-08-19 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ Sarila, Narendra Singh (2008-03-30). Once a Prince of Sarila: Of Palaces and Tiger Hunts, of Nehrus and Mountbattens (इंग्रजी भाषेत). I.B.Tauris. ISBN 9780857715289.
- ^ Mukherjee, Prabhatkumar. Ravindrajivani, Volume II. p. 339.
- ^ "BBC News" (इंग्रजी भाषेत). 2011-12-27.
- ^ "National Symbols of India: What are the symbols and what do they mean?". cnbctv18.com (इंग्रजी भाषेत). 2022-08-03. 2022-08-13 रोजी पाहिले.
- ^ "आजादी का अमृत महोत्सव: गाथा जन-गण-मन की". Jansatta (हिंदी भाषेत). 2022-08-13 रोजी पाहिले.
- ^ यंगलवार, प्रा विजय (2014-05-16). Bhartachi Rashtriy Pratike / Nachiket Prakashan: भारताची राष्ट्रीय प्रतीके. Nachiket Prakashan.