Jump to content

होन्शू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होन्शू

होन्शू बेटाचे स्थान पूर्व आशिया
क्षेत्रफळ २,२७,९६२.६ वर्ग किमी
लोकसंख्या १०.३ कोटी
देश जपान ध्वज जपान

ja-Honshu.ogg होन्शू (本州 (जपानी उच्चार: होन्‌शूऽ, शब्दशः अर्थ: "मुख्य राज्य"?)) हे जपान देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी सर्वात मोठे बेट आहे. देशाचा बहुतांश भूभाग या बेटाचा बनलेला आहे. होन्शू हे आकाराने जगातील ७वे सर्वात मोठे बेट आहे आणि लोकसंख्येनुसार जागतिक क्रमवारीत इंडोनेशियातील जावा बेटानंतर होन्शू बेटाचा दुसरा क्रमांक लागतो.


जपानमधील बहुतांशी औद्योगिक क्षेत्रे होन्शू बेटावर स्थित आहेत. जपानचे ५ भौगोलिक प्रदेश व ३४ प्रांत होन्शू बेटावर वसलेली आहेत.


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: