सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे
स्वागत | श्रीनिवास हेमाडे, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | श्रीनिवास हेमाडे, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,६०४ लेख आहे व १५८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
-- साहाय्य चमू (चर्चा) १८:०५, १८ ऑगस्ट २०१५ (IST)
अभय नातूंनी ’बदल’ हा शब्द लिहून संगमनेर महाविद्यालय या लेखात योग्य ते बदल करावे असे सुचवले आहे... मूळ लेखात कोणतेही बदल केलेले नाहीत. माझ्याही मते, लेखात बदल करायला खूप वाव आहे. ... ज (चर्चा) २३:१२, १८ ऑगस्ट २०१५ (IST)
- नमस्कार श्रीनिवास,
- मराठी विकिपीडियावरील लेख/माहिती ही जाहिरातसदृश नसता विश्वकोशीय असावी अशी अपेक्षा आहे म्हणून मी संगमनेर महाविद्यालय येथे योग्य ते बदल करण्याची विनंती लावली. सदस्य mahitgar यांनी काही बदल केले आहेत ते नजरेखालून घालावेत म्हणजे आपल्या लक्षात येईल.
- अधिक प्रश्न असल्यास किंवा मदत लागल्यास कळवालच.
- धन्यवाद
- अभय नातू (चर्चा) ०५:०८, १९ ऑगस्ट २०१५ (IST)
माहितगार आणि अभय, मी आपला आभारी आहे. सध्याची आवृत्ती पाहिली. अगदी योग्य बदल झाले आहेत. ही माहिती मला द्यावयाचीच होती. माहितगारांनी ती समाविष्ट केली. हे बरे झाले. यापुढील माहिती मी शीर्षक देवून त्यानुसार देईन. आपण पाहावेत, ही विनंती. उदाहरणार्थ वरिष्ठ महाविद्यालयात अकादमी पुरस्कार विजेते आणि प्रयोगशील मराठी साहित्यिक रंगनाथ पठारे (निवृत्त) हे भौतिकशास्त्राचे , प्रसिद्ध विचारवंत व राज्यशास्त्राचे अभ्यासक रावसाहेब कसबे (निवृत्त) राज्यशास्त्राचे, संत एकनाथ महाराजांच्या नवव्या पिढीतील वंशज श्रीनिवास गोसावी (दिवंगत) येथे गणिताचे आणि कनिष्ठ महाविद्यालयात संत चोखामेळा महाराजांचे वंशज श्रीरंग तलवारे (निवृत्त) राज्यशास्त्राचे या महाविद्यालयात अध्यापन करीत होते. ही व इतर माहिती मी बरोबर जोडली आहे का ते कृपया पाहावे.
मार्गदर्शन हवे
[संपादन]मी रेगे यांचे छायाचित्र मी विकिपेडीयावर चढविलेले आहे, पण ते समाविष्ट करता आले नाही. कृपया कसे करावे ते सांगावे. श्रीनिवास हेमाडे (चर्चा) १५:५५, २३ ऑगस्ट २०१५ (IST)
- [[चित्र:मे. पुं. रेगे.JPG|इवलेसे|250पक्ष|उजवे|मेघश्याम पुंडलिक रेगे]] असे लिहिले असता बाजूला चित्र दिसते आहे तसे दिसेल. आपण लेखात लावून पहा सोपे आहे. नाही जमले तर आम्ही आहोतच.
- लेखन पद्धती विश्लेषण:
- दुहेरी चौकटी कंस [[ सुरु
- चित्र:
- चित्र संचिकेचे (फाईलचे) नाव उदा: मे. पुं. रेगे.JPG
- | हे चिन्ह
- इवलेसे मोठे चित्र लहान स्वरूपात दाखवायचे आहे हा संदेश
- 250पक्ष चित्र किती लहान अथवा मोठे दिसावे ते निश्चित करते. यासाठी आकडे रोमन न्युमरल हवेत. पिक्सेल चे मराठी शॉर्टफॉर्म पक्ष केले आहे.
- उजवे किंवा डावे असे लेखाच्या कोणत्या बाजूस दाखवायचे ते नमुद करता येते.
- शेवटी चित्राच्या खाली जो मजकुर दिसून हवा आहे तो मजकुर उदा. मेघश्याम पुंडलिक रेगे
- दुहेरी चौकटी कंस ]] बंद
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:१५, २३ ऑगस्ट २०१५ (IST)
धन्यवाद,
तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले पण | हे चिन्ह कुठून आणावयाचे ते कळले नाही.
शिवाय जे काही केले त्यात चित्र मोठे झाले आहे, चित्राखालील नाव गायब झाले आहे.
माझ्याकडून काय राहिले ते सांगावे.
दुसरे माझे नाव तांबड्या रंगात का आहे ? त्याचा काही वेगळा अर्थ ?!
श्रीनिवास हेमाडे (चर्चा) १९:४५, २३ ऑगस्ट २०१५ (IST)
- | हे चिह्न इंग्लिश कळपटावर सहसा \ च्या वर असते. शिफ्ट \ दाबले असता | उमटते. यासाठी इनस्क्रिप्ट किंवा इतर कळपटातून इंग्लिश कळपटात कदाचित जावे लागेल.
- तुमचे नाव लाल अक्षरात असल्याचे कारण तुमचे सदस्य पान अजून तयार झालेले नाही. लाल नावावर टिचकी देता ते पान तयार करण्यासाठी उघडेल. त्यात तुमच्याबद्दलची तुम्हास योग्य वाटेल ती माहिती लिहू शकता.
- अभय नातू (चर्चा) १९:४८, २३ ऑगस्ट २०१५ (IST)
धन्यवाद अभय,
ठीक आहे, हे कळले; आता चित्र मोठेच का राहिले, ते कृपया सांगा.
श्रीनिवास हेमाडे (चर्चा) २०:०८, २३ ऑगस्ट २०१५ (IST)
- त्याचे कारण pxच्या ऐवजी पक्ष लिहिल्याने :-)
- येथे दोन उदाहरणे दिली आहेत.
- अभय नातू (चर्चा) २०:१३, २३ ऑगस्ट २०१५ (IST)
माहितगारांनी पक्ष असे सुचवले त्यामुळे मी तसे लिहिले. मी करून पाहतो, धन्यवाद
आत्ताच मी कोट्टा सच्चिदानंद मूर्ती यांचे छायाचित्र चढविले आहे, ते बरोबर केले का ते पाहावे
श्रीनिवास हेमाडे (चर्चा) २०:३५, २३ ऑगस्ट २०१५ (IST)
धन्यवाद.श्रीनिवास हेमाडे (चर्चा) २०:४५, २३ ऑगस्ट २०१५ (IST)
- @श्रीनिवास हेमाडे आणि अभय नातू:
- अभयने ट्ंकलेला [[चित्र:मे. पुं. रेगे.JPG|इवलेसे|40px|उजवे|मेघश्याम पुंडलिक रेगे - 40px]] हा सिंटॅक्स जसाच्या तसा कॉपीपेस्ट करून वापरला तर त्यात px च्या ठिकाणी पक्ष काम करते. आकडे बदलून चित्र लहान मोठे सुद्धा होते. त्या शिवाय चित्रा खालचा मजकुरही दिसू लागतो. त्यामुळे तुर्तास सिंटॅक्स जसाच्या तसा कॉपीपेस्ट करून वापरावा.
- तुम्ही (श्रीनिवास) [[, |, ]] हि तिन्ही चिन्हे टंकल्यावर इतर वेळी व्यवस्थीत काम करतील केवळ चित्रासाठी तांत्रिक त्रुटीमुळे त्रास देत राहतील तुर्तास इतरांचे कॉपीपेस्ट करून वापरावे लागेल सध्या हि अडचण मलाही भेडसावते आपण दोघेही एकाच नावेत आहोत असे दिसते. :)
- बाकी तांत्रीक अडचण काही जणांनाच येते बाकी सर्वांना का नाही याचा उहापोह मी अभयच्या चर्चा पानावर करतो म्हणजे तुम्हाला तुर्तास कनफ्युजन नको.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:१८, २४ ऑगस्ट २०१५ (IST)
हे सारे ठीकच म्हणावे. पण एक नवीन समस्या माझ्या User talk:श्रीनिवास हेमाडे या पानावर लगेचच एक इशारा आला आहे. कृपया पुढील कारवाई सांगा.
श्रीनिवास हेमाडे (चर्चा) १५:०५, २४ ऑगस्ट २०१५ (IST)
- नमस्कार ,
- चित्रे चढवण्या साठी जेव्हा आपण डाव्या समास पट्टीतील "संचिका चढवा" ह्या दुव्याचा वापर करून चित्रे चढवता तेव्हा आपले चित्र हे विकिपीडिया कॉमन्स ह्या प्रकल्पा मध्ये जाते आणि तेथून ते सरळ मराठी विकिपीडियामध्ये वापरता येत आहे.विकिपीडिया कॉमन्सच्या चित्र चढवण्याच्या विझार्ड मध्ये आपण आपले चित्र हे स्वतःची निर्मिती आहे असे म्हंटल्यास ते चित्र आपण प्रताधिकार मुक्त (Copyright Free) करीत आहात असे जाहीर करीत सामावून घेते, पण जर ते आपली निर्मिती नाही असे आपण निवडल्यास मग ह्या चित्राच्या प्रताधिकार बाबत इतर दस्तावेज द्यावे लागणार आणि ते न दिल्याने हे चित्र वगळले जाण्या बाबत आपणास इशारा देणारे संदेश आपल्या पानावर स्वयंचलित यंत्रणे मार्फत लागले आहेत.
- आता काय करावे ?
- हे चित्र आपले असेल तर पुन्हा चढवावे आणि चढावताना ती स्वतःची निर्मिती आहे असे निवडावे
- जर हे चित्र आपले नसेल तर मग आपण योग्य तो उपलब्ध पर्याय निवडावा, आपण I found it on the Internet -- I'm not sure हा पर्याय निवडल्यास हे चित्र वगळल्या जाण्याची श्याक्याता नाकारता येत नाही.
- आता काय करावे ?
- तूर्त मराठी विकिपिडीयावर चित्रे चढवण्याची सुविधा बंद आहे, मध्यंतरी "फोटोथोन २०१५ " चे दर्म्यान हि सुविधा विनंती वरून काही काळासाठी सुरु करण्यात आली होती. हि सुविधा कायम स्वरूपी सुरु करण्यासाठी विझार्ड निर्मितीचे काम सुरु आहे तसेच त्यासाठी मराठी विकिपीडियाच्या चित्रान बाबतची नीती पण ठरवावी लागणार आहे. आशा आहे कि हे डसेंबर २०१५ च्या आत पूर्ण करून आपण मराठी विकिपिडीयावर चित्रे चढवण्याची सुविधा पुनर्स्थापित करू.
- आपल्या पुढील योगदाना साठी शुभेच्छा , धन्यवाद - राहुल देशमुख १८:३२, २४ ऑगस्ट २०१५ (IST)
- नमस्कार राहुल,
तुम्ही सुचवित आहात, ते मी पाहिले आहे. पहिला पर्याय मी निवडणार होतो. पण अद्यापि विकिपीडिया वरील कायदेशीर बाबी माहित नाहीत. त्यामुळे दुसरा पर्याय निवडला. चित्र नीती ठरेपर्यंत पहिला पर्याय मी निवडला तर चालेल का ? तरच चित्रे मिळतील. फार कुणी आक्षेप घेणार नाही, याची मला खात्री आहे. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात असे आक्षेप घेणे बहुधा होणार नाही. कळवावे. श्रीनिवास हेमाडे १९:२१, २४ ऑगस्ट २०१५ (IST)श्रीनिवास हेमाडे
आपले स्वागत आहे श्री दादा
[संपादन]आपल्या विषयावरील म्हणजे तत्वज्ञानावरील पानांवरलील आपल्या संपादनांकडे(जी आपण लवकरच कराल) मी उत्सूकतेने पहात आहे...
--श्रीमहाशुन्य (चर्चा) १५:१५, २४ ऑगस्ट २०१५ (IST)
धन्यवाद. श्री शून्यातून श्रीगणेशा केला आहे. लक्ष ठेवा. काही चुकत असल्यास दुरुस्ती करा, ही विज्ञापना श्रीनिवास हेमाडे
विकिपीडिया:विकिप्रकल्प तत्त्वज्ञान आणि दालन:तत्त्वज्ञान
[संपादन]तत्त्वज्ञान विषयक लेखांचा सुसूत्रपद्धतीने विकास आणि सामुहीक प्रयत्न करण्यासाठी सोपे जावे म्हणून विकिपीडिया:विकिप्रकल्प तत्त्वज्ञान आणि तत्वज्ञान विषयक उत्तम लेखांच्या सादरीकरणासाठी दालन:तत्त्वज्ञान हि दोन पाने तयार करत आहे. आपल्या सवडी आणि आवडीनुसार त्यात सहभाग घ्यावा/ उपयोग करावा हि विनंती.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:०५, २६ ऑगस्ट २०१५ (IST)
अरेव्वा ! ही तर माझ्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे. मी जरूर सर्व मदत करेन, सहभाग घेईन. सदस्य:श्रीनिवास हेमाडे १३:४३, २६ ऑगस्ट २०१५ (IST)
दुसरे म्हणजे यातील सदस्य:Madshri म्हणजे मीच आहे आणि सदस्य:Niranjan Sadhu ही मीच आहे. Niranjan Sadhu ने हिपोक्रेटसची शपथ हे पान तयार केले आहे.
लघुपथ
[संपादन]विकिपीडिया:विकिप्रकल्प तत्त्वज्ञान ह्या नावाची लांबी अधीक आहे. प्रत्येकवेळी पूर्ण पानाचे नाव प्रत्येक वेळी टाईप करावयास नको म्हणून, विकिपीडिया शोध खिडकीत विपी:तत्, विपी:तत, विपी:तत्व, विपी:तत्त्व या पैकी काहीही टंकले तरीही विकिपीडिया:विकिप्रकल्प तत्त्वज्ञान पानावर पोहोचाल.
आपल्या माहितीस्तव
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:०७, २६ ऑगस्ट २०१५ (IST)
धन्यवाद माहितगार, माझे काम व्यवस्थित चालू आहे का ? कृपया सांगावे. मी अनुभववाद आणि बुद्धिवाद या लेखांचे बऱ्यापैकी विकिकरण केले आहे, ते कृपया पाहावे. सदस्य:श्रीनिवास हेमाडे १५:१३, २६ ऑगस्ट २०१५ (IST)
- मुख्य म्हणजे ओळीत संदर्भ जोडण्याची विकिपद्धती जमल्याचे पाहून आनंद वाटला. तुम्हाला नेहमी जोडाव्या लागणाऱ्या संदर्भाम्ची यादी प्रकल्प पानावर करून ठेवतो म्हणजे ओळीत पुन्हा पुन्हा जोडावयाच्या संदर्भांचे तुमचे काम सोपे होण्यास हातभार लागेल.
- मराठी विकिपीडियातल्या विकिपीडियात लेख दुवा जोडताना [[अनुभववाद]] असे टंकणे पुरेसे आहे. 'अनुभववादाचे' हा शब्द अनुभववाद लेखास [[अनुभववाद|अनुभववादाचे]] असाही जोडता येऊ शकेल तो अनुभववादाचे असा दिसेल.
- पारिभाषिक शब्दांचे विशीष्ट अर्थ संदर्भाप्रमाणेच दर्शवण्याची व्यवस्था करता येऊ शकेल आणि उपयोगी पडेल असे वाटते पण सगळेच एकदम सांगून कन्फ्युज करू इच्छित नाही. बाकी ठिकठाक.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:३५, २६ ऑगस्ट २०१५ (IST)
धन्यवाद माहितगार, तुमचे म्हणजे अभय, संदीप इत्यादी तुम्हा सर्वांचे समाधान हेच माझे समाधान !
सदस्य:श्रीनिवास हेमाडेश्रीनिवास हेमाडे २१:२१, २६ ऑगस्ट २०१५ (IST)
परामर्श पुनर्बांधणी
[संपादन]नमस्कार,
प्रथमतः तुम्ही येथे देत असलेल्या योगदानाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
तुम्ही नुकताच तयार केलेल्या परामर्श या लेखाच्या सुरुवातीची मी पुनर्बांधणी केली आहे. हे करताना अनवधानाने फॅक्युअल चूक तर झाली नाही ना हे एकदा तपासून पहावे ही विनंती.
्क.लो.अ.
अभय नातू (चर्चा) २०:२३, २६ ऑगस्ट २०१५ (IST)
छे ! छे ! धन्यवाद कसले, हे तर माझे कामच आहे. उलट सुरु करण्यास उशीर झाला, त्याची खंत वाटते. असो, म्हणजेच नसो. तुमचे सहकार्य आहेच. परामर्श या लेखाच्या सुरुवातीची पुनर्बांधणी चांगलीच आहे. एकमेका सहाय करू / अवघे धरू सुपंथ. फक्त माझ्या चुका न चुकता लक्षात आणून द्याव्यात, ही विनंती.
श्रीनिवास हेमाडे २१:२६, २६ ऑगस्ट २०१५ (IST)
परामर्श दुवा
[संपादन]@संतोष दहिवळ: संतोष नमस्कार, तुम्ही केलेला बदल पहिला. महाराष्ट्र टाईम्स चा संदर्भ मृत झाल्याचे पाहून चकित झालो. पुन्हा तपासून पहिले. चूक लक्षात आली. ती दुरुस्त केली आहे. दुवा जिवंत आहे. तुम्हाला लिंक देत आहे. एका क्लिकवर घ्या ‘परामर्श’ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/paramarsh/election2014articleshow/31746218.cms
बदलावर लक्ष ठेवत असल्याबद्दल धन्यवाद. आणखी काही बदल गरजेचे असल्यास करावेत किंवा कळवावेत, ही विनंती.
श्रीनिवास हेमाडे ११:१४, ३० ऑगस्ट २०१५ (IST)श्रीनिवास हेमाडे
- धन्यवाद. पाहिले. -संतोष दहिवळ (चर्चा) १९:३८, ३० ऑगस्ट २०१५ (IST)
मार्गदर्शक मित्रहो,
एक मोठी अडचण येत आहे. मी संचिका चढवीत आहे. पण चित्रे वगळण्याच्या सूचना लाभत आहेत. My won work असे देऊनही मुल स्त्रोत हवाच आहे. तो मिळणे कठीण आहे. अन्यथा चित्रे मिळू शकणार नाहीत. कृपया माहिती द्यावी, हि विनंती सदस्य:श्रीनिवास हेमाडे
आजचा सुधारक (मासिक)
[संपादन]- आजचा सुधारक (मासिक) लेखातील वाक्य " .....त्यांच्या अकाली निधनामुळे आज पुन्हा एकदा अनेक प्रकारच्या अंधश्रद्धांचा ऊत आला असून त्यांना आवाहन दिले जात नाही. दलित आणि स्त्रिया यांच्यावरील अत्याचारांनी परिसीमा गाठली आहे. ... " हे वाक्य इतर कुणी अथवा दि. य. देशपांडेंनी म्हटले असल्यास त्याचा उल्लेख करावा. वाक्य तुमच्या स्वत:चे व्यक्तीगत मत असेल तर वगळणे श्रेयस्कर असेल.
- विकिपीडिया ज्ञानकोश मुक्त असल्यामूळे ज्ञानकोशाची विश्वासार्हता जपली जाण्यासाठी एक संकेत म्हणजे इतरत्र प्रकाशित न झालेली (शक्यतो समसमिक्षीत नसलेली) स्वत:ची व्यक्तीगत मते विकिपीडिया संपादकाने सहसा जोडू नयेत. अर्थात लिहिण्याची शैली म्हणून तुर्तास वाक्य राहिले तरी हरकत नाही.
ओळख विकिबुक्सची
[संपादन]तुमची लेखन शैली मुख्यत्वे ज्ञानकोशीय स्वरूपाचीच आहे. तरीपण विकिबुक्स प्रकल्पाचा परिचय सांगतो. विकिपीडियाचा विकिबुक्स नावाचा बंधू प्रकल्प ॲकॅडेमीक बुक्ससाठी मुक्त आहे. (विकिपीडियाशी दुवे देता घेता येतात) त्यात संपादकांना पाठ्यपुस्तकाचा भाग म्हणून व्यक्तीगत मते येऊ देण्याचे अधिक स्वातंत्र्य असते. विकिपीडियात तुमचे वगळलेले अथवा बदललेले काम तुम्हाला विकिपीडियाच्या संपादन इतिहासातून मिळवून विकिबुक्स प्रकल्पात जतन करता येऊ शकते. विकिपीडिया आणि विकिबुक्स मधील फरकाचे उदाहरण म्हणजे मराठी विकिपीडियावरचा निबंध हा लेख ज्ञानकोशीय स्वरूपात विकिपीडियात आहे तर निबंध कसा लिहावा ? नावाचा लेख विकिबुक्सवर आहे. किंवा उदाहरणार्थ विकिबुक्सवर b:प्रबंध लेखन कसे करावे ? b:चिकित्सामक विचार कसा करावा अशा विषयावर अधिक लेखन करून हवे आहे. विकिपीडियातील लेखांची पुर्नरचना शालेय अथवा कॉलेजच्या वर्षवार पद्धतीने सुद्धा करता येऊ शकते. प्रश्नोत्तरे असे स्वरुप सुद्धा ठेवता येऊ शकते.
अजुन एक पडणारा अल्पसा फरक अलरेडीड तुम्हाला जरासा जाणवत असेल तो म्हणजे आपण आपल्याला तुम्ही तुम्हाला हि प्रथम पुरुषी आणि द्वितीय पुरुषी लेखन शैली ज्ञानकोशात कमी आढळते. पाठ्य पुस्तकात अधीक आढळते. प्रथम पुरुषी आणि द्वितीय पुरुषी लेखन शैली अंशत: रोचकता आणि वर्णनात्मकता आणते आणि इतर ज्ञानकोशीय उपसंपादक रोचकता आणि वर्णनात्मक मजकुर कापण्यासाठी झटापट करताना दिसतात. ती झटापट बऱ्यापैकी विकिबुक्सवर टळते. याचा अर्थ मी तुम्हाला विकिबुक्सवर स्थानांतरीत होण्याचे सुचवतोय असे मुळीच नव्हे कारण तुमची लेखन शैली ९९ टक्के ज्ञानकोशीय वाटते. आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा लेखन शैलीवर कुठे कुठे अल्प प्रभाव असणे स्वाभाविक आहे. विकिपीडियावर दैदिप्यमान सुर्यासोबत छोट्या मोठ्या पणत्यापण लुडबूड करतात. विकिबुक्स कमी लुडबूड अधिक लवचिक एवढेच.
अशीच अधून मधून माहिती देत जाईन. आपले लेखन वाचतो आहेच. धन्यवाद आणि शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ००:५१, १ सप्टेंबर २०१५ (IST)
कमलिनी दामले
[संपादन]नमस्कार,
आपण कमलिनी दामले यांच्याबद्दलचा लेख तयार केलेला पाहिला. यांचे वैशिष्ट्य किंवा उल्लेखनीयता कळून येत नाही आहे. श्रीमती दामले या लेखिका होत्या का? त्यांनी इतर काही क्षेत्रात मोलाचे योगदान दिले होते का? आपणास माहिती असल्यास कृपया विषद करावे म्हणजे लेखाचे वर्गीकरण करता येईल तसेच इतरही मजकूर वाढवता येईल.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १९:५५, ९ सप्टेंबर २०१५ (IST)
- श्रीमती अहल्याबाई भांडारकर स्मृती ग्रंथ या ग्रंथाचे संपादन करणाऱ्या व्यक्तीचे नाव कमलिनी दामले दिसते आहे. या ग्रंथाच्या या दोन्ही कमलिनी दामले या एकच व्यक्ती आहेत का ?
- शीर्षक: दुःखितांच्या भावविश्वाशी समरस होणारा महानुभाव: महर्षी विनोद लेखिका: सौ. कमलिनी दामले
वृत्तपत्र: लोकसत्ता २३-०७-१९७५ हा एक संदर्भ आंतरजालावर दिसतो आहे
- या दुव्यावर एका कॉम्रेड कृष्णा देसाईंचा उल्लेख आहे. या पण त्याच का पण त्यांचे मृत्यूवर्ष वेगळे दिसते आहे.
- Three Leaders: Tilak-Gokhale-Gandhi, Pune, 1962 हा ग्रंथ नेमका कुणाचा प्रभाकर रामचंद्र दामलेंचा का कमलिनी दामलेंचा का संयुक्त लेखन ?
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:१६, ९ सप्टेंबर २०१५ (IST)
नमस्कार अभय/ माहितगार
श्रीमती दामले यांनी काही लेखन केले आहे, हे खरे, ते मी शोधात आहे. माहितगारांनी नमूद केले आहे, श्रीमती अहल्याबाई भांडारकर स्मृती ग्रंथ हा ग्रंथ कमलिनीबाईनीच संपादित केला आहे. तसा त्यांनी संपादन केल्याचा निश्चित उल्लेख श्री. कावळे यांच्या लेखात आहे. मी विस्तार करताना ते ससंदर्भ देईनच. त्या मराठा होत्या ही माहिती मी श्री. मा. भावे - विद्यमान संपादक नवभारत (मासिक) यांच्याकडून प्राप्त केली. ही सारी जुनी मंडळी आहेत. त्यांच्याकडे पुरावे मिळणे कठीण आहे. पण त्यांना निश्चित माहिती आहे.
Three Leaders: Tilak-Gokhale-Gandhi या ग्रंथाची माहिती मला नाही, पण मिळविता येईल. थोडी वाट पहावी लागेल.
दुःखितांच्या भावविश्वाशी समरस होणारा महानुभाव: महर्षी विनोद लेखिका: सौ. कमलिनी दामले - हे लिहिणाऱ्या याच कमलिनी आहेत.
आमदार कृष्णा देसाई हा पुरुष होता. त्यांचे निधन १९७५ ला झाले.
तुम्ही शोधलेली माहिती तुम्ही समाविष्ट करावी, ही विनंती.
छायाचित्रांबाबत मराठी विकिला धोरण बदलावे लागेल, असे वाटते. जुन्या लोकांचे छायाचित्र इकडून तिकडून असे निराधार मिळेल. अन्यथा दुसरा मार्ग शोधावा लागले, कृपया सांगा, मी कावळे, रेगे यांच्या संचिका चढविल्या नंतर लगेच वगळण्याची सूचना मिळाली. कावळे यांच्या मुलाकडून -रोहित कावळे यांच्याकडून मला परवानगी मिळाली आहे. त्यांना मी टेम्प्लेट पाठवून विनंती केली आहे.
श्रीनिवास हेमाडे २०:५५, ९ सप्टेंबर २०१५ (IST)श्रीनिवास हेमाडे(चर्चा)
सर्व सहाय्य चमूस
[संपादन]सर्व सहाय्य चमूस मी विनंती करीत आहे की मी विकिपीडिया:विकिप्रकल्प तत्त्वज्ञान या प्रकल्पात एक नवा प्रकल्प जोडू इच्छित आहे: मराठीतील तत्त्वज्ञान विषयक पुस्तके . अशी पुस्तके संख्येने मर्यादित आहेत, जी आहेत ती पुनर्प्रकाशित होण्याच्या शक्यता कमी आहेत. त्यामुळे असलेल्यांची पुरेशी माहिती निर्माण केली तर तो किमान साठा उपलब्ध राहील, असे वाटते. आज वानगीदाखल मे. पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान निर्माण केले आहे. पुढील सूचना अपेक्षित. प्रतीक्षेत
श्रीनिवास हेमाडे १३:५७, १२ सप्टेंबर २०१५ (IST)श्रीनिवास हेमाडे(चर्चा)
- विकिपीडिया:विकिप्रकल्प तत्त्वज्ञान अंतर्गत सध्या मी केवळ संदर्भासाठी विभाग बनवला होता तो तुम्हाला पुस्तके आणि संदर्भ असा करून उपयूक्त ठरत असल्यास पहावा असे वाटते.
- दत्तात्रेय गोविंद केतकर यांची 'पश्चात्य तत्त्वज्ञान' आणि 'पाश्चात्य तत्त्वज्ञान पुष्प २' प्रकाशन वर्ष 1931 पुस्तके काही प्रमाणात उपयूक्त ठरू शकतील का ? दत्तात्रेय गोविंद केतकर यांचे जन्म आणि हयात अथवा मृत्यूवर्षाबद्दल माहिती मिळू शकेल का ?
- लेखन चालू माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:५५, १२ सप्टेंबर २०१५ (IST)
दत्तात्रेय गोविंद केतकर यांची माहिती मला तुमच्याकडूनच प्रथम समजते आहे. मला माहित आहेत ते भा. ग. केतकर.त्यांचे पान लवकरच तयार करेन. पण दगोंची माहिती मिळविता येईल.
श्रीनिवास हेमाडे २२:४५, १२ सप्टेंबर २०१५ (IST)श्रीनिवास हेमाडे(चर्चा)
तत्त्वज्ञानातील माझी वाटचाल लेख
[संपादन]नमस्कार,
[तत्त्वज्ञानातील माझी वाटचाल] या लेखाची स्वतंत्र अशी उलेखनीयता आहे का? हा लेख मे.पुं. रेगे यांचे साहित्य अशा लेखात एक विभाग म्हणून अधिक चपखल बसेल असे माझे मत आहे. आपणास काय वाटते हे कळवावे.
धन्यवाद,
अभय नातू (चर्चा) ०६:१९, १३ सप्टेंबर २०१५ (IST)
नमस्कार, या लेखाची किंवा अशा प्रकारच्या लेखांची स्वतंत्र अशी उलेखनीयता गरजेची आहे, असे मला वाटते. त्याचे कारण आपल्या भारतीय परंपरेत- वैदिक/अवैदिक अथवा इतर तात्त्विक परंपरेत आत्मनिवेदन फारसे कुणी करीत नाही. जसे की कोणताही मंत्र, ऋचा, श्लोक इत्यादीची रचना करणारा ऋषी, मुनी हे केवळ स्वतःचा नामनिर्देश करतात. पण मला हा विचार कसा सुचला, का, कोठे याचा काहीही पत्ता देत नाहीत. त्यामुळे ज्ञानकोशाला जी सविस्तर माहिती हवी आहे, ती उपलब्ध होत नाही. उलट ग्रीक-पाश्चात्य परंपरेत हे काटेकोरपणे तपशीलवार मांडण्याचा प्रघात आहे. म्हणून थेट पायथागोरस, प्लेतोपासून सर्व साहित्य बऱ्यापैकी उपलब्ध होऊ शकते. भारतात आजही असे काही अद्यापि मूळ धरत नाही. हेच पहाना, की प्र. रा. दामले, त्यांच्या पत्नी कमलिनी दामले यांचा जन्म कळत नाही. त्यांच्या मिश्र विवाहामुळे कोणता सामाजिक बदल, खळबळ माजली कशाची पत्ता नाही. किंवा पुलं-सुनीताबाईचा विवाह केवळ पन्नास पैशात झाला, हे उजेडात येत नाही. त्यामुळे जितके तपशील मिळतील, तितके मिळवीत राहणे, भावी काळासाठी, पिढीसाठी अत्यंत अनिवार्य आहे. आता निदान रेगे, बारलिंगे, दि. य. सारखी काही माणसे अतिनम्रतेने का होईना काही सांगण्याची भूमिका घेतात, निवेदन देतात, हे फार महत्वाचे आहे. त्यातून त्यांची जडणघडण कळते, म्हणजे त्यांचा काळ आवाक्यात येतो, एक चित्र उभे राहते. त्यामुळे मला असे वाटते की आपण तत्त्वज्ञान विकीप्रकाल्पात एक वेगळे 'महाराष्ट्रातील तत्त्ववेत्त्यांची आत्मनिवेदने' असे काही दालन खोलावे. बारलिंगे यांनीही बरेच काही सांगितले आहे. श्रीनिवास दीक्षित, वाडेकर, काही बोलत नाहीत. रेगे ज्या प्रोफेसर डान्ड्राड यांचा उल्लेख करतात, त्या प्रोफेसर डान्ड्राड यांनी दामले पतीपत्नी, रेगे, धुंडिराजशास्त्री इत्यादी लोकांची मने, बुद्धी घडविली.रेगे जर विचारवंत मानले जात असतील तर त्यांचे पूर्वसुरी कोण ते समजणे खूपच लाभदायक ठरेल. आता प्रोफेसर डान्ड्राड यांचे पान तयार करावयाचे तर खूपच कठीण काम आहे. कुणीतरी एलफिस्टन कॉलेजात जाणे, सगळे दफ्तर उचकत बसणे, लिहिणे त्याचे पुरावे आणणे हे वेळ आणि पैसा दोन्हीची गरज असणारा प्रकल्प आहे. दुसरे, डॉ. देव यांचे हे पुस्तक अद्यापि २००० सालापासून प्रसिद्ध होऊनही कितीजणांनी विकत घेतले आहे ? त्यामुळे रेगे यांचे कथन मर्यादित झाले ! ते व्यापक प्रमाणात झिरपावे तर किमान त्यांचा सारांश देणे गरजेचे आहे. सगळे निवेदन प्रताधिकार इत्यादी भानगडीमुळे देता येणार नाही. म्हणून हा प्रपंच. आपण निर्णय घ्यावा. म्हणजे मला किंवा इतरांना पुढची दिशा कळेल.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे ०८:३७, १३ सप्टेंबर २०१५ (IST)
- मला वाटत या विषयावर लेखन होऊन जाऊ द्याव, फार फार् तर मराठी विकिपीडियावर का मराठी विकिबुक्स या बंधू प्रकल्पात एवढाच प्रश्न शिल्लक राहतो (आणि ते लेखन झाल्या नंतरच लक्षात येईल) असे काही लेखन मराठी विकिबुक्स मध्ये न्यावयाचे झाल्यास काळाच्या ओघात नेता येईल.
- विकिबुक्स मध्ये न्यावयाच्या लेखनाचे फार फार तर वेगळे वर्गीकरण अथवा सूची बनवून ठेवता येईल असे वाटते.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:५१, १३ सप्टेंबर २०१५ (IST)
- अश्या तर्हेच्या वेगळ्या पानाची निर्मिती मराठी विकिपिडीयावर करणे टाळावे असे माझेपण मत आहे. श्रीनिवास हेमाडे ह्यांचा उद्देश चांगला आहे पण विश्वकोशिय दाखल पात्रतेचा मुद्दा पण महत्वाचा आहे. आज अशी सुरुवात केल्यास भविष्यात लोक मराठी विकिपीडियास आपले आत्मचरित्र लिहिण्याची जागा समजायला लागण्याचा धोका संभवतो आणि मग त्या परिस्थितींना नियंत्रित करणे कठीण होणार. तेव्हा आजच ह्यास थोडे आवरते घेतलेले बरे.
- श्रीनिवास हेमाडे आपण नातू म्हणतात तसे "मे.पुं. रेगे यांचे साहित्य अशा लेखात एक विभाग म्हणून " स्थानांतरीत करावे असे माझे मत आहे. माझेही वय झाल्याने काही चुकू शकते पण कालांतराने ह्या लेखास वगळल्या जाण्यापेक्ष्या आजच योग्य स्थापना करणे ज्यास्त चांगले. शेवटी माहिती लोकांपर्यंत पोहचवणे हाच मुख्य उद्देश आहेन ते कोणत्याहि पानातून असो वाचाक तिथे पोहाचातीलच आणि चुकीचे पायंडे पडणे पण टळेल. -Jayram (चर्चा) ०९:०३, १३ सप्टेंबर २०१५ (IST)
- मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे, त्वरीत मते मांडल्याबद्दल. जयराम, तुम्ही म्हणता तसा धोका येऊ द्यावा ! लिहू दे लोकांना आत्मचरित्रे. म्हणजे खरे काय ते कळेल. भारतीय लोक खोटेही लिहित नाहीत, ही शोकांतिका आहे. त्यांना आधी लिहिते करणे आवश्यक आहे. माहितगार म्हणतात तसे, असे लेखन होऊन जाऊ द्याव, लोकांच्या प्रतिसादाची वाट पाहू. घाई नाही. फार तर माहितगार म्हणतात तसे मराठी विकिपीडियावर का मराठी विकिबुक्स हा पर्याय निवडावा लागेल.
प्रतीक्षेत.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे ०९:२६, १३ सप्टेंबर २०१५ (IST)
- विकिपीडियावर श्रीनिवास हेमाडे, मी, तुम्ही किंवा इतर कुणी स्व:चे आत्मचरित्र स्वत: लिहू नये हे बंधन आहेच. त्याच वेळी इतरत्र प्रकाशित झालेल्या दुसऱ्या व्यक्तींच्या उल्लेखनीय आत्मकथनांची ज्ञानकोशीय दखल घेण्यास विकिपीडियात वस्तुत: आडकाठी नाही. मजकुर दोन परिच्छेदापेक्षा कमी बसत असेल तर इतर लेखात समाविष्ट केलेला चांगला. आत्मकथनाचे नव्याने निव्वळ समिक्षण करावयाचे असेल तर विकिपीडियावर घेण्यापुर्वी मराठी चर्चात्मक संस्थळावर करून त्याच्या आधारावर मराठी विकिपीडियावर लेखन करणे अधिक उचित. पण हेमाडींचा उद्देश समिक्षण असा नव्हे तर अंशत: ज्ञानकोशीय दखल अंशत: पाठ्यपुस्तकीय दखल या प्रकारात मोडतो. हेमाडींनी लेखन करताना पाठ्यपुस्तकीय स्वरुपाच मार्गदर्शन जोडल तर ते विकिबुक्सवर ढकलाव लागेल, हेमाडींनी नुसताच ज्ञानकोशीय आढावा घेतला तर विकिपीडियावर राहील.
- हेमाडी सरांनी विकिपीडिया_चर्चा:उल्लेखनीयता#चर्चा:रूप पाहतां लोचनीं ह्या चर्चेतील बा सी मर्ढेकरांची "पिपात मेले ओल्या उंदीर" च्या अनुषंगाने केलेले विश्लेषण वाचल्यास त्यांना विकिपीडिया आणि बंधू प्रकल्प परिघांचा आवाका अधिक नेमके पणाने लक्षात येईल असे वाटते.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:०९, १३ सप्टेंबर २०१५ (IST)
- "असे लेखन होऊन जाऊ द्याव, लोकांच्या प्रतिसादाची वाट पाहू." - श्रीनिवास आपण येथे नवीन आहात, आणि विकिपीडियावर एकदा वाद सुरुझालेत कि ते थांबता थांबत नाही मग ते व्यक्तिगत स्तराला पण जातात (नातू आणि माहितगार यांना पण लोक टार्गेट करतात हे येथील अनेक चर्च्या पानांवर आपणास वाचावयास मिळेल ) माहितगार यांनी जो साल्ला दिला त्यात अनुमती देण्याचे टाळत तुमचा भ्रमनिरास होवूनाये म्हणून पळवाट दाखवली आहे, आणि लिखाण हलवण्याची वाच्यता पण केली आहे. अट्टहास टाळावा आणि सर्व संभावना लक्ष्यात घेता विषाची परीक्षा घेवू नये हीच एक विनंती बाकी आपण समक्षम आहात.
पुन्हा एकादा - "कालांतराने ह्या लेखास वगळल्या/ स्थानांतरीत केल्या जाण्यापेक्ष्या आजच योग्य स्थापना करणे ज्यास्त चांगले" Jayram (चर्चा) १०:२९, १३ सप्टेंबर २०१५ (IST)
पुन्हा एकदा सर्वांचे आभार.
मला कोणताही वाद सुरु करण्याची इच्छा नाही. उलट ते निर्माणच होऊ नयेत, अशी माझी इच्छा असते. नवीन असल्याने काही बाबी माहित नसतील, तर खरेच. मी जास्तीत जास्त माहिती घेईनच. विषाची परीक्षा घेत नाहीच नाही.
मराठीतून ज्ञाननिर्मिती होण्यासाठी ज्ञाननिर्मिती प्रक्रियेचे एक दालन कसे उघडता येईल, एवढे उपस्थित करण्यास प्रत्यावाय नसावा, अशी माझी धारणा आहे.
वर सुचविण्यात आलेली पाने पाहत आहे.
पुढील मार्गदर्शनाच्या अपेक्षेत.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे ११:४७, १३ सप्टेंबर २०१५ (IST)
Read this विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन - Sunil
सुनील धन्यवाद
[संपादन]- तुम्ही दिलेली लिंक वाचली
- मी वाचलो. हे सारे जुने म्हणजे इतिहास आहे.
- मी त्याच्याशी संबधित नाही.
- पण वादविवाद, वितंडवाद हे शब्दप्रयोग आढळले. त्यामुळे या संकल्पना स्पष्ट करणे आवश्यक आहे. ते मी लवकरच करेन.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १५:४९, १३ सप्टेंबर २०१५ (IST)
प्रकल्पांतर्गत मुल्यांकन
[संपादन]समन्वयासाठी प्रक्ल्प राबवणे ही इंग्रजी विकिपीडियावरील जुनी संकल्पना आहे. मराठी विकिपीडियावर या संकल्पनेला प्रतिसाद बराच कमी पडतो. {{तत्त्वज्ञानप्रकल्प चर्चापान}} हा साचा तत्त्वज्ञान विषयक चर्चा पानांवर लावण्याचा एक महत्वाचा उद्देश एखादा वाचक चर्चा पाना पर्यंत पोहोचला असेल तर (त्याला त्या विषयात अधिक रुची आहे असा अर्थ होतो) त्याला प्रकल्प पानापर्यंत नेऊन त्याचा सहभाग वाढवून घेणे हा आहे.
समन्वय आणि सुधारणा साधण्यासाठी लेख प्रकल्पांतर्गत किती महत्वाचा आहे आणि सुधारणासांठी स्टाइलगाईडनुसार मुल्यांकन करणे. ज्यामुळे अजून काय सुधारणा बाकी आहेत याचा आदमास यावा. हे मुल्यांकन प्रकल्पात सहभागी कोणतीही व्यक्ती प्रकल्पांतर्गत दिलेल्या निकषांनुसार करू शकते. याच उदाहरण तुम्हाला इंग्रजी विकिपीडियाच्या en:Talk:Philosophy या चर्चा पानावर दिसेल. en:Wikipedia:WikiProject Philosophy/Assessment येथील निकषांनुसार त्यांनी en:Talk:Philosophy लेखास इंपॉर्टन्स स्केल टॉप दिला आहे पण त्या लेखाचाही स्केल C च्या पुढे अद्याप गेलेला नाही C च्या पुढे B→ Good Article → A→ त्या पुढे फिचर आर्टीकल म्हणून मुखपृष्ठावर अशी काहीशी संकल्पना आहे.
{{तत्त्वज्ञानप्रकल्प चर्चापान}} साचा इंग्रजी विकिपीडियावरून आणलेला असल्यामुळे मुल्यांकन विषयक वर्गीकरणे आपोआप येत आहेत. अर्थात हा साचा अद्ययावत करण्यासाठी अधिक तांत्रिक पाठबळाची गरज आहे. संकल्पना मराठी विकिपीडियावर अधिक विकसीत करणे, इंग्रजी विकिपीडियवरुन आयात करणे अथवा पुरेसा प्रतिसाद मिळणारच नाही म्हणून खारीज करणे असे पर्याय आहेत. माझा व्यक्तीगत दृष्टीकोण आपल्याला घाई काहीच नाही काळाच्या ओघात मराठी विकिपीडियावर संकल्पनेचा विकास झाला तर झाला नाहीतर नाही असा आहे.
धन्यवाद
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:४२, १३ सप्टेंबर २०१५ (IST)
तुम्ही सुचविलेली पाने वाचत आहे. मला वाटते तुम्ही किंवा अन्य कुणी या पानाची भाषांतरे करावीत. ती मराठीत आणणे आवश्यक राहील. मी मदत करेनच.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे ०९:२९, १३ सप्टेंबर २०१५ (IST)
प्रभाकर आत्माराम पाध्ये या लेखाची पुनर्रचना
[संपादन]प्रभाकर आत्माराम पाध्ये या लेखाची पुनर्रचना करणे आवश्यक आहे, असे मला वाटते. बालपण, शिक्षण, कारकीर्द, पुरस्कार अशी रचना करता येईल. की प्रभाकर पाध्ये (नि:संदिग्धीकरण) पानाची रचना अशीच असते ? माहिती द्यावी, ही विनंती.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे ०९:४६, १३ सप्टेंबर २०१५ (IST)
- प्रभाकर आत्माराम पाध्ये या लेखाची पुनर्रचना करावयाची अजिबात गरज नाही; तो लेख विकीच्या संकेतांनुसारच लिहिला गेला आहे त्या लेखात भर घालता येईल, पण पुनर्लेखन करणे सर्वथा अनुचित ठरेल..... ज (चर्चा) १०:५४, १३ सप्टेंबर २०१५ (IST)
- @ज: तुमचा काही गैरसमज होत असावा असे दिसते आहे. भर घालण्यासाठीच बालपण, शिक्षण, कारकीर्द, पुरस्कार असे विभाग जोडण्या विषयी ते म्हणताहेत आणि बहुतांश ज्ञानकोशीय व्यक्ती विषयक लेखांची रचना अशीच असते. आणि विकिपीडियात संदर्भासहीत केलेल्या कोणत्याही सुधारणांना वस्तुत: अटकाव नाही. इथे एक जाणकारव्यक्ती संदर्भासहीत लेखन करीत असेल तर लेखनापुर्विच शंका घेण्याचे औचित्य दिसत नाही असे वाटते.
- लेख विकीच्या संकेतांनुसारच लिहिला गेला आहे, यात शंका नाही. म्हणूनच मी "पुनर्लेखन" असा शब्द वापरत नाही, "पुनर्रचना" म्हणत आहे. माहितगार म्हणत आहेत तसे विभाग जोडण्याविषयी बोलतो आहे. निश्चित काही ठरले तर माझी भर मी टाकू शकेन.
प्रतीक्षेत
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे ११:५३, १३ सप्टेंबर २०१५ (IST)
मराठी विकिक्वोट परिचय
[संपादन]मराठी विकिक्वोट हा बंधू विकि प्रकल्प अभ्यासावा. उल्लेखनीय व्यक्तींच्या उल्लेखनिय वाक्यांची, सुवचनांची या प्रकल्पातून नोंद घेता येते. तसेच q:तत्त्वज्ञान इत्यादी विषयावरील वचनांची नोंदही घेता येतील.
उदाहरण म्हणून इंग्रजी विकिक्वोटवरील q:en:Philosophy हा लेख अभ्यासता येईल.
तुमच्या काही समस्यांची अप्रत्यक्ष सोडवणूक विकिक्वोट प्रकल्पातून होऊन जाईल. विवीध बंधू प्रकल्पातील पानांचे दुवे विकिपीडिया लेखात कसे नमुद केले जातात याची यथावकाश कल्पना देइनच.
प्.ले.शु.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:४१, १३ सप्टेंबर २०१५ (IST)
धन्यवाद माहितगार,
माझी निर्मिती पाहून कृपया अपेक्षित सुधारणा कळवावे, ही विनंती.
प्रभाकर पाध्ये लेखाचे काय करायचे ते कळले नाही.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १५:५२, १३ सप्टेंबर २०१५ (IST)
- लेखात विभाग जोडले आहेत. पु.ले.शु.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:०६, १३ सप्टेंबर २०१५ (IST)
हा संदेश का ?
[संपादन]माझ्या संपादनात Plagarism चा साचा का येत आहे ! कृपया स्पष्ट करावे.
संबंधित लेखक हयात असून त्यांच्याकडूनच माहिती घेतली आहे.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १७:४८, १५ सप्टेंबर २०१५ (IST)
सॉरी त्याचा तुमचा संबंध नाही साइट नोटीस सजगता संदेशात दुरुस्ती करावयास लागणार आहे. तो नेमका कसा दिसतो आहे ते मला दिसले मला ॲड्ज्स्ट करता येईल त्सदी बद्दल क्षमस्व.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:५४, १५ सप्टेंबर २०१५ (IST)
धन्यवाद श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे २२:०४, १५ सप्टेंबर २०१५ (IST)
श्रीनिवास रघुनाथ कावळे चित्र
[संपादन]सहाय्य चमूस, या पानातील चित्र काढले गेले आहे. कावळे यांच्या ग्रंथाचे प्रकाशक रोहित श्रीनिवास कावळे यांनी चित्रे प्रताधिकार मुक्त केली होती. तसे साचाबध्द संपत्र त्यांनी permissions-commons@wikimedia.org येथे दिले होते तरीही CommonsDelinker मार्फत ते वगळले आहे. पुढील मार्गदर्शन करावे.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे ११:१८, १७ सप्टेंबर २०१५ (IST)
- आपले विकिमिडीया कॉमन्सवरील चर्चा पान पहावे. आपण इमेल पाठवल्यानंतर आपणास एक इमेल त्या इमेल पत्त्यावरून प्राप्त झाले असेल त्यात टिकेट नंबर असेल ( उदाहरणार्थ मला मागच्या वेळी एकदा Ticket#: 2015062110002991 असा मिळाला होता); आपणास इमेलने प्राप्त झालेला टिकेट नंबर आपल्या विकिमिडीया कॉमन्सच्या आपल्या चर्चा पानावरील चर्चेत नमुद करावा ही नम्र विनंती.
- पु.ले.शु.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:३६, १८ सप्टेंबर २०१५ (IST)
संबंधित साच्यानुसार ही इमेल श्री. रोहित कावळे यांनी commons@wikimedia.org ला पाठविली होती. ती मी पाठविणे अपेक्षित आहे का ? तसे असेल तर 'ती मला पाठवा असे मला कावळेना सांगावे लागले. मग मी पाठवेन.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे २२:५०, १८ सप्टेंबर २०१५ (IST)
टिळकांच्या संचिका
[संपादन]मी लोकमान्य टिळक या पानात दोन चित्रे - टिळक पतीपत्नी व कुटुंबीय अशी - चढविली आहेत. तरीही काहीतरी माहिती राहिली आहे, कशी द्यावी ते कळत नाही. ती वगळली जातील, कृपया सांगावे
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]])श्रीनिवास हेमाडे २३:०९, २० सप्टेंबर २०१५ (IST)
परिचय साचांचा
[संपादन]आपण साचांचा वापर चालू केला आहे का नाही याची कल्पना नाही. आता पर्यंतच्या आपल्या संपादनांमध्ये आपण महिरपी कंसांचा {{ }} वापर पाहिला असेल. विकिपीडियात साचा (पाने) विवीध तऱ्हेने वापरली जातात. साचे बनवताना साधे साचे ते क्लिष्ट साचे अशा पातळी असू शकतात. नमुद सुचना व्यवस्थीत पणे वापरल्यास साचे वापरणे मात्र सहसा सुलभच असते. उदाहरण: {{संदर्भ हवा}} असे लिहिल्यास [ संदर्भ हवा ] असे दिसते.
या माहितीचे प्रयोजन आपण श्रीनिवास रघुनाथ कावळे यांची छायाचित्रे विकिमिडीया कॉमन्सवर चढवून त्यानंतर अनुमती पत्र इमेल करण्याची व्यवस्था केली होती. ते इमेल नंतर वाचले गेले तत्पुर्वी असे इमेल आले असल्याची निदर्शनास न आलेल्या व्यक्तीकडून ते छायाचित्र वगळले गेले होते. आपण चढवलेल्या छायाचित्राच्या अनुमतीचे इमेल पाठवले असेल तर कॉमन्सवरील छायाचित्र पानावर {{subst:OP}} हा साचा जतन सेव्ह केल्यास An email containing details of the permission for this file has been sent in accordance with Commons:OTRS. असा संदेश संबंधीत छायाचित्रपानावर दिसतो आणि छायाचित्र वगळण्यापुर्वी पुन्हा एकदा इमेल्स तपासली जाण्याची शक्यता असते.
साचां विषयी इतर अधिक माहिती नंतर प्रसंग परत्वे देईनच.
धन्यवाद आणि पु.ले.शु.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:४०, २२ सप्टेंबर २०१५ (IST)
साचांचा वापर माझ्याकडून कमीच होतो आहे, हे खरे आहे. ते मी वाढवेन. पण फोटोच्या बाबतीत मला नक्की कळत नाही. नेमके काय करावे. छायाचित्रे विकिमिडीया कॉमन्सवर चढवून त्यानंतर ती वापरण्यापूर्वी अनुमतीसाठी प्रयत्न करावेत, की अनुमतीनंतर ती चढवावीत? चढविण्यापूर्वी अनुमती मिळविण्याचा पुन्हा काही वेगळा साचा आहे काय ? शिवाय अनुमती आपण आपणाकडे मागून घ्यायची की ती परस्पर विकिमिडीया कॉमन्सवर अनुमती देणाऱ्याने पाठवावयाची ? तसेच उदाहरणार्थ टिळकांची दोन छायाचित्रे मी चढविली. ती दोन्ही वगळण्याची सूचना मला आली आणि नंतर एक कायम राहिले. वस्तुतः दोन्ही एकाच काळातील, एकाच URL वर आहेत. असे का झाले, हे मला कळले नाही.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १४:००, २४ सप्टेंबर २०१५ (IST)
- नमस्कार,
- मराठी विकिपिडीयावर चित्रान बाबत सध्या थोडी गोधळाचि परिस्थिती आहे हे खरे कारण पूर्वी उपलब्ध असलेली मराठी विकिपिडीयावर चित्रे चढवण्याची परवानगी सध्या बंद आहे. मी पूर्वी नमूद केल्या प्रमाणे ती सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत सध्या दुसर्या एका नीती नियमनात व्यस्त असल्याने हा विषय थोडा मागे राहिला आहे तरी डिसेंबर २०१५ पर्यंत हे कार्य पूर्ण करण्याचे विचाराधीन आहे.
- प्राप्त परिस्थितीत मला तरी असे वाटते कि प्रताधिकार नसलेल्या संचिका कॉमन्स वर चढवू नये कारण त्याने उगाच गुंता वाढणार तसेच माहितगार यांनी सागीतल्या प्रमाणे जर विपत्रा द्वारे परवानगी मिळाली तर त्या नंतरच चित्रे चढवावीत जेणे करून चित्रान संबंधीच्या गोष्टींवर आपला वेळ व्यय होणार नाही. आपणा कडे असलेल्या चित्रांची यादी आणि चित्रे आपण संग्रहित करून ठेवावी हवे तर चर्चा पानावर तशी नोंद पण करून ठेवता येईल आणि मग सर्व चित्रांचे परवनिकर्णाचे काम एकत्रितपणे करून घेता येईल. त्या साठी गरज पडल्यास काही स्वयंसेवक किंवा विकिमिडिया चे कर्मचारी ह्याना हे काम देता येईल असे वाटते.
- आपल्या पुढील साम्पादानांसाठी शुभेच्छा - राहुल देशमुख १५:००, २४ सप्टेंबर २०१५ (IST)
- नमस्कार राहुल,
तुमची सूचना व्यवहार्य आहे.यादी करून ठेवणे आणि मग धोरण निश्चित झाले की ती चित्रे वापरणे हेच चांगले. दरम्यान त्या छायाचित्राचे बाह्य दुवे देता येतील.
धन्यवाद श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १७:२८, २४ सप्टेंबर २०१५ (IST)
आपल्या शंका
[संपादन]- >> की अनुमतीनंतर ती चढवावीत?<<
- अनुमतीचे इमेल पाठवल्या नंतर छायाचित्र चढवणे श्रेयस्कर;
- अनुमतीचे इमेल वाचले आणि पडताळले जाण्याकरता वेळ लागू शकतो त्यासाठी {{subst:OP}} हा साचा चढवलेल्या छायाचित्रावर वापरता येतो म्हणजे छायाचित्र मधल्याकालावधी साठी वगळले जात नाही.
- >> चढविण्यापूर्वी अनुमती मिळविण्याचा पुन्हा काही वेगळा साचा आहे काय ? <<
- तुर्तास श्रीनिवास रघुनाथ कावळे यांची छायाचितत्रांची अनुमती साठी जे टेम्प्लेट वापरलेत तेच वापरावे.
- meta:Help:Form I & Affidavit (Customised for relinquishment of copyright as per 'free cultural work' definition) या दुव्यावर भारतीय कायद्याच्या दृष्टीकोणातून विशेष टेम्प्लेट बनवण्याचा प्रयत्न केला आहे (ज्याचा भविष्यात मराठी अनुवाद सोबतीस ठेवणे प्रस्तावित आहे). हे विशेष टेम्प्लेट भारतीय विधी विषयाच्या अभ्यासकांकडून अभ्यासले जाण्यात आणि गरजेनुसार सुधारुन घेण्यास साहाय्याची नितांत गरज आहे. आपल्या परिचयातून स्व.ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून असे सहकार्य सहज उपलब्ध होऊ शकल्यास आणि या निमीत्ताने तेथील विधी विषयाचे काही तज्ञ मराठी विकिपीडियाशी जोडले जाऊ शकल्यास उत्तमच.
- >>शिवाय अनुमती आपण आपणाकडे मागून घ्यायची की ती परस्पर विकिमिडीया कॉमन्सवर अनुमती देणाऱ्याने पाठवावयाची ? <<
- मूख्य इमेल त्यांच्या इमेल पत्त्यावर पाठवून इमेलची कॉपी आपल्याकडे मागवून घेतल्यास अधिक उत्तम.
धन्यवाद माहितगार,
तुमच्या सूचना अमलात आणतो. सध्या मी definition वरही काम सुरु केले आहे. सारांश अनुवादित केला आहे, तेही पहावे, ही विनंती.
आमच्या विधी महाविद्यालयातून काही होईल का, ते पाहतो. किंवा मग इतर मित्रांचे सहकार्यही पाहूच.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १८:३२, २४ सप्टेंबर २०१५ (IST)
- definition च्या अनुवादासाठी वेळ काढण्यासाठी खूप आभारी आहे. सारांश अनुवाद छान जमला आहे. आपली अनुवादशैली सुद्धा कोशीय लेखनास अनुरुप वाटते आहे. नवीन पिढ्यांच्या मराठी शब्दसंचयाच्या स्थिती बद्दल मी अल्पसा साशंक असतो म्हणून अनुवाद पूर्ण झाल्या नंतर तळाशी शब्दांची शब्दार्थादी अधिक माहिती जोडूयात.
- ९ नव्हेंबर हा राष्ट्रीय विधी सेवा दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो. उद्देश कायद्यांची माहिती आणि सेवा सर्वसामान्य जनते पर्यंअ पोहोचवणे असा असतो. कायद्यांची माहिती सामान्य जनते पर्यंत पोहोचवण्यासाठी विकिप्रकल्पही चांगले माध्य्म होऊ शकतील.
- विद्यार्थ्यांसोबत विकिपीडियाच्या बाबत एकदम मोठे टार्गेट काम करत नाही असे दिसून आले आहे. एखाद कॉमा एखाद पूर्ण विराम जोडणे एखादे वाक्य लिहिणे, एखादा संदर्भ तपासणे, इतपत लहानश्या टार्गेटने सुरवात बरी राहते असे इंग्रजी विकिपीडियावरील अनुभवावरुन दिसते.
- बाकी आपल्या मित्रांचेही काही सहकार्य मिळाल्यास छानच.
- धन्यवाद आणि पु.ले.शु.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:०५, २५ सप्टेंबर २०१५ (IST)
दुनियादारी (मराठी चित्रपट)
[संपादन]मराठी विकिपीडियावर दुनियादारी (मराठी चित्रपट) नावाचे लेखपान दिसते आहे. आपण गोळा केलेली काही माहिती दुनियादारी (मराठी चित्रपट) लेखात कारणी लागू शकेल. चित्रपटाची मायबोली संकेतस्थळावर अल्पशी समिक्षा दिसते त्या समीक्षेचा संदर्भ हि लेखात देता येऊ शकतो. आपण दुनियादारी (मराठी चित्रपट) चित्रपटाची सारांशाने माहिती चित्रपटाचाच संदर्भ देऊन देऊ शकाल. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही या आणि इतर गाण्यांबद्दल स्वत:ची मते न जोडता परिच्छेद लेखन करता येईल आणि अशा परिच्छेद लेखनात त्या लेखनाचा भाग म्हणून रिलीव्हंट ओळी आल्यातर हरकत नाही.. पण बेसिकली विकिपीडिया संपादकाने आपले स्वत:चे ओपीनियन देण्याचे टाळायचे आहे. याची कल्पना देण्याचा उद्देश दुनियादारी (मराठी चित्रपट) या लेखात आपण लेख केलेच पाहीजे असे नाही. विकिपीडिया परिघाचा अंदाजा यावा म्हणून आहे.
सहाय्य:ग्रंथ हे पान विकिपीडियावर वापरावयाच्या संदर्भ ग्रंथांच्या संबंधाने साहाय्यात्मक माहिती देणारे असावयास हवे. त्यासाठी सध्याचा मजकुर वगळून आपल्याला विकिपीडियावर पुरेसा अनुभव आला आहे असे आपले आपल्याला वाटेल आणि आता मराठी विकिपीडियावर येणाऱ्या इतर नवीन लोकांसाठी साहाय्य-माहिती लिहून ठेवायची आहे असे वाटेल तेव्हा करावा.
बाकी अशा छोट्यामोठ्या गोष्टी होऊ द्यात त्यात बाउ करून घेण्यासारखे काही नाही.
एक वेगळी विनंती
[संपादन]विकिपीडिया:आंतरविकि दूतावास#Request for translation of गाहा सत्तसई to English (इंग्लिश विकिपीडियातील लेखात मराठी ते इंग्रजी अनुवाद करून हवा आहे) अशी एक एका बंगाली विकिपीडियनची विनंती आली आहे. मराठी विकिपीडियातील गाहा सत्तसई लेखासाठी आतापावेतो बरीच मेहनत केली आहे हे खरे असले तरी, करण्यासारखे अजून खूप काही बाकी आहे. गाहासत्तसई विषयी मराठी समिक्षात्मक ग्रंथ आम्हा ऑनलाईन मंडळींच्या पोहोचच्या बाहेर असतात. एकतर गाहा सत्तसई पानाच्या चर्चा पानावर लेखात करावयाच्या सुधारणांच्या सुचनांची यादी नोंदवलीत तर मदत होईल. आपण किंवा आपले सहकारी अथवा विद्यार्थ्यांकडून मराठी समिक्षात्मक ग्रंथांच्या संदर्भांच्या अनुषंगाने लेखात अधिक सुधारणा काळाच्या ओघात होत रहावी अशी विनंती आहे.
गाहासत्तसईच्या मूळ मॅन्युस्क्रीप्ट कोणत्या ग्रंथालयात आहेत की जेथून कॉपीराइट फ्री स्वरूपात स्कॅनिंगसाठी मिळवता येतील याचीही काही माहिती मिळाल्यास छान होईल. ह्यातले लगेच काही व्हावे असे नाही केवळ काळाच्या ओघात सवडीनुसार.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ००:२१, २९ सप्टेंबर २०१५ (IST)
दुनियादारी वर मी लिहीन की नाहीं, माहित नाही. पण "ग्रंथ लेखन" ही संकल्पना आणि सहाय्य:ग्रंथ हे पान स्पष्ट करण्यास मात्र आवडेल.
दुसरे म्हणजे आमच्या विधी महाविद्यालयातील काहीजणांशी बोलणे चालू केले आहे. पण ते "बघू" या सदरात मोडणारे आहे.
गाहा सत्तसई बाबतीतही प्रयत्न करतो. एक निवृत्त प्राध्यापक आहेत, ते आता जागेवर सापडले पाहिजेत आणि तयार झाले पाहिजेत.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १३:२५, ३० सप्टेंबर २०१५ (IST)
Definition चे मराठी भाषांतर व मराठीकरण
[संपादन]माहितगार आणि सर्व सहाय्य चमू, स.न.
मी Definition चे मराठी भाषांतर व मराठीकरण पूर्ण केले आहे. कृपया पाहावे, त्रुटी पहाव्यात.
दुसरे म्हणजे मी इंग्लिश विकिपीडियावर Shriniwas Hemade या नावाने खाते उघडले होते. तथापि ते प्रचालक Benjamin Mako Hill यांनी ते वगळले होते. ते त्यांनी चुकून केले, असे त्यांनी मला कळविले. खाते उलटवावे असे मी त्यांना कळविले, तथापि त्यांनी ते अद्यापि केलेले नाही. कृपया पाहावे
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १९:१२, २९ सप्टेंबर २०१५ (IST)
- पहातो
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:२२, २९ सप्टेंबर २०१५ (IST)
एक संदर्भ आणि सही जोडली आहे, ती बरोबर नियमानुसार आहे का, तेही पाहावे.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]])श्रीनिवास हेमाडे १९:३०, २९ सप्टेंबर २०१५ (IST)
- हातात अचानक काही प्राधान्य कामे आली आहेत, तरीही माझ्याकडून झाल्यास बरेच अन्यथा दोन-एक दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. विलंबासाठी दिलगीर आहे.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०२:१५, ३० सप्टेंबर २०१५ (IST)
काही हरकत नाही, तुमच्या सवडीने.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १३:१८, ३० सप्टेंबर २०१५ (IST)
नमस्कार, 'मुक्त सांस्कृतीक काम' अनुवादाची काही वाक्ये तपासली, माझे काम भलतेच सावकाश चालू त्या बद्दल क्षमस्व. आत्ता सदेश देण्याचा उद्देश हा की त्या अनुवाद पानावर आता काही शब्दार्थ टिपा जोडल्या आहेत. क्वचित मराठी विकिपीडियावरील लेखातही आपणास पारिभाषिक शब्दांच्या टिपा जोडण्यास आवडल्यास उपयोगी ठरू शकेल. (शब्दार्थ जोडणे हा अत्यावश्यक भाग नाही त्या साठी खरेतर ऑनलाइन डिक्शनरी असतातच पण केवळ सोय म्हणून) हे शब्दार्थ टिपा जोडण्याचे काम वेळ खाऊ असल्यामुळे मराठी विकिपीडियावरही क्वचीतच केले गेले आहे. विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार लेखात शब्दार्थ जोडल्याचे उदाहरण पाहता येईल.
केवळ माहितीसाठी
धन्यवाद आणि पु.ले.शु.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:२१, ४ नोव्हेंबर २०१५ (IST)
नमस्कार माहितगार, क्षमस्व वगैरे काही नको, संकोच वाटतो.
बर ते जाऊ दे.
तुम्ही शब्दार्थ टिपा जोडल्या त्या पाहिल्या. मला तर असे वाटते की आपण अशा जोडण्या, अधिकची माहिती देणे गरजेचे राहील. विशेषतः भाषांतर करताना आवश्यकच आहे. ऑनलाइन डिक्शनरी उघडून वाचणे हे वेळखाऊ काम आहे, त्यापेक्षा रेडी रेकनर छाप त्वरीत संदर्भ देणे सोयीचे ठरेल. म्हणूनच मी अनुवाद पूर्ण केल्यानंतर जिचा तुम्ही विशेष टीप असा विभाग केला आहे, तो दिला होता.
धोरण म्हणून संदर्भ टीपा देणे योग्य राहील, असे वाटते. विचार व्हावा.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे २२:४७, ४ नोव्हेंबर २०१५ (IST)
- चला आपण पाठीशी असल्यामुळे काल आणि आज मिळून एकदाची माझीही बैठक लागली, आणि पुरेशा शब्दार्थ टिपा एकेक करून जोडत गेलो, काही शब्द-वाक्ये बदललली-जोडली (या दुव्यावर हे बदल आपणास (आपल्या सवडीनुसार) एकत्रित अभ्यासता येतील.
- मुक्त सांस्कृतिक कामाच्या व्याख्या विभागाच्या शेवटी "....किंवा तिचा कायदेशीर अथवा व्यावहातः आपली मूलभूत स्वातंत्र्ये वापरू शकणार नाही,..." असे वाक्य आले आहे. येथे व्यावहातः शब्दातून काही विशीष्ट अर्थ आपणास अभिप्रेत आहे अथवा तो अनवधानाने आलेला आहे याची माहिती हवी आहे.
- derived- 'निष्पादित' हा शब्द नवागतांना कितपत कळेल याची विशेषत्वाने काळजी वाटत होती पण शब्दार्थ टिपेत जोडण्यासाठी पुरेसे समानार्थी शब्द मिळाल्यामुळे बरे वाटले.
- १)It also describes certain permissible restrictions that respect or protect these essential freedoms.(सध्याचा अनुवाद:या अत्यावश्यक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचे अथवा या स्वातंत्र्याप्रति आदराची भावना दाखविण्याची परवानगी असलेल्या बंधनांचे वर्णनही, हा दस्तावेज करतो.) आणि २) The definition distinguishes between free works, and free licenses which can be used to legally protect the status of a free work. (या दुसऱ्या वाक्यात 'which' शब्द नेमका कशाचे वर्णन करतो केवळ free licenses चे की free works, and free licenses चे ? याचे निटसे आकलन मला झाले नाही) विशेषत्वाने हि दोन वाक्ये व्यक्तीश: मला अनुवादासाठी जरा कठीण वाटली आहेत, या दोन वाक्यांच्या अनुवादांच्या सुधारणेस वाव असावा असे वाटले पण कसे काय करावे ते मलाही सुचले नाही.
- पुढच्या टप्प्यात त्यांच्या इंग्रजी दस्तएवजा प्रमाणे ५ दुवे देण्याचे बाकी आहेत ते करेन, दुसरे सध्याचा दस्तएवज बऱ्यापैकी लांबीचा आहे, त्यामुळे तेथील चर्चा पानावर द्रुत वाचनासाठी काही सक्षेप देता येईल का ते पहाण्याचा मानस आहे.
- नविन पिढीतल्या काहीजणांकडून आकलन सुलभतेच्या दृष्टीने फिडबॅक मिळाल्यास बरे पडेल असे वाटते.
- या निमीत्ताने तुमच्या सोबत एक चांगले काम धसास लागले या साठी पुन्हा एकदा धन्यवाद आणि पु.ले.शु.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:५३, ५ नोव्हेंबर २०१५ (IST)
बदल
[संपादन]- It also describes certain permissible restrictions that respect or protect these essential freedoms
- सध्याचा अनुवाद:या अत्यावश्यक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचे अथवा या स्वातंत्र्याप्रति आदराची भावना दाखविण्याची परवानगी असलेल्या बंधनांचे वर्णनही, हा दस्तावेज करतो.
- सुचवलेला बदल: या अत्यावश्यक स्वातंत्र्यांचे संरक्षण करणाऱ्या अथवा या स्वातंत्र्याप्रति आदराची भावना जोपासणाऱ्या, विशीष्ट परवानगी असलेल्या बंधनांचे वर्णनही, हा दस्तावेज करतो.
- पर्यायी अनुवाद: ह्या आवश्यक स्वातंत्र्यांची सुरक्षा आणि आदर जोपासणाऱ्या, विशीष्ट अनुमती देण्याजोग्या निर्बंधांचे वर्णनही हा दस्तएवज करतो.
- The definition distinguishes between free works, and free licenses. free licenses can be used to legally protect the status of a free work.
- (माझ्या स्वत:च्या सोईसाठी which च्या ठिकाणी free licenses शब्द ठेऊन वाक्याची विभागणी केली, बहुधा माझेच कन्फ्युजन होत होते)
- सध्याचा अनुवाद: जो मुक्त कामाच्या प्रतिष्ठेचे कायदेशीर संरक्षण करतो, तो मुक्त उपयोगाचा परवाना आणि मुक्त काम या दोहोत; ही व्याख्या फरक करते.
- सुचवलेला बदल: मुक्त कामाचे कायदेशीर संरक्षण करणारे मुक्त उपयोगाचे परवाने, आणि मुक्त काम या दोहोत; ही व्याख्या फरक करते.
- पर्यायी अनुवाद: मुक्त कामाची कायदेशीर जपणूक करण्याच्या दृष्टीने मुक्त परवाने वापरता येतात, तर असे मुक्त काम आणि (त्याची जपणूक करणाऱ्या) मुक्त परवान्यांमध्ये ही व्याख्या फरक करते.
- अनुवाद करताना status ने येणारा अर्थ अध्याहृत गृहीत धरला आणि स्टेटस शब्दाचा अनुवाद करण्याचे टाळले तरी चालून जावे असे वाटते.
- उपरोक्त अनुवादात काही बदल सुचवतो आहे. आपला अभिप्राय हवा आहे. धन्यवाद
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:२५, ६ नोव्हेंबर २०१५ (IST)
विचारवेध संमेलन
[संपादन]विचारवेध संमेलन (निःसंदिग्धीकरण) ह्या लेखपानावर काही संदर्भ तत्त्वज्ञान क्षेत्रातील लोकांचे दिसतात. तसे असल्यास आपल्या सवडीनुसार संबंधीत लेखपानात कोणत्या सुधारणा करता येऊ शकतील ते सुचवावे ही नम्र विनंती
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:५२, १३ ऑक्टोबर २०१५ (IST)
हे पान वगळू नये, मी ते पूर्ण करेन.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १९:२३, १३ ऑक्टोबर २०१५ (IST)
घड्याळ कसे समायोजित करावे?
[संपादन]सहाय चमू, कृपया मार्गदर्शन करावे.
संपादन अथवा लेखन केल्यानंतर त्या कृतीची दाखविली जाणारी वेळ जुळत नाही. उदाहरणार्थ मी आत्ता मा.रा. लामखडे हे पान तयार केले, ते साधारण आज दि. १३ ओक्टोबर २०१५ रोजी सायंकाळी ७.०० च्या दरम्यान. पण "या पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१५ रोजी १३:३४ वाजता केला गेला." असे आले. तरी कृपया योग्य बदल कुठे, कसा करावा, हे सांगावे.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १९:१७, १३ ऑक्टोबर २०१५ (IST)
- या पानाच्या सगळ्यात वर तुमच्या नावसमोर माझ्या चर्चा आहे त्यापुढे असलेला माझ्या पसंती निवडा त्यामध्ये देखावा हा टॅब निवडा त्यामध्ये वेळ बरोबरी हा विभाग आहे तिथे तुमचे वेळक्षेत्र आशिया/कोलकाता निवडून जतन करा. -- संतोष दहिवळ (चर्चा) २२:४३, १३ ऑक्टोबर २०१५ (IST)
- धन्यवाद, संतोष,
वेळ समायोजित केली.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे ००:३७, १४ ऑक्टोबर २०१५ (IST)
- @श्रीनिवास हेमाडे: कोणत्या वाचकाला वाचनाचे समाधान कशातून आणि केव्हा मिळेल सांगता येत नाही. तुमचे तत्वज्ञानावरचे लेखही आवडीने वाचले आहेत, तरीही प्रांजळपणे स्विकार करावयाचे झाल्यास आपल्या वरच्या प्रतिसादातले 'वेळ समायोजित केली.' तीनच नित्याचे मराठी शब्द वाचताना का कुणास ठाऊक पण मनाला कुठेतरी सुखावून आणि वाचनाची निर्भेळ तृप्तता देऊन गेले. सहसा प्रमाणमराठी कृत्रिमपणे लादण्याच्या प्रयत्नांचा मी आग्रहीपणे पणे विरोध करत असतो, पण आत्ताचे तीन शब्द खूपच सहजतेने आलेले असावेत म्हणून भावले. आजकालची नवी पिढी मनापासून काही आवडले कि, 'किती कूल' किंवा 'किती क्यूट' म्हणते तसेच काहीसे :) आणि म्हणून हि मनमोकळी पोच.
- उद्या पासून वाचन प्रेरणा सप्ताह मराठी विकिपीडियावर साजरा करतो आहोत आपल्या काही कल्पना, कदाचित साइटनोटीसवर लावण्यासाठी काही सुविचार, वचने इत्यादी असल्यास जरुर सुचवावेत.
- धन्यवाद
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:४७, १४ ऑक्टोबर २०१५ (IST)
- @माहितगार: तुम्ही मनापासून घातलेल्या सादाने मला खरेच छान उबदार जाणवले.
अशा वेळी धन्यवाद वगैरे शब्द रिते होऊन जातात, त्यामुळे मी मौन बाळगतो.
"Whereof one cannot speak, thereof one must be silent." - Wittgenstein
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे २२:४६, १४ ऑक्टोबर २०१५ (IST)
जेनोवा वगैरे
[संपादन]>>ज्या अर्थी तुम्ही जेनोवा, जेनोव्हा आणि जिनोव्हा या फरक केला आहे, त्यार्थी त्यात फरक असणार, असे मी समजतो.
जेनोवा, [[जेनोव्हा] आणि जिनोव्हा या उच्चारातही काही फरक आहे असे दिसते.
जिनोव्हा हे अस्तित्वात नाही आणि जिनोआ, जेनोव्हा व जेनोवा हे परस्पर पुनर्निर्देशित आहेत.<< श्रीनिवास हेगडे
रोमन लिपीतल्या V या अक्षरासाठी मराठीत व्ह येतो, बंगालीत भ येतो, तर अन्य भारतीय भाषांत व येतो. Victor मराठीत व्हिक्टर, बंगालीत भिक्टर आणि हिंदी आदी भाषांत विक्टर असे लिहितात. सौरभ (गांगुली)चे बंगाली स्पेलिंग Saurav Ganguly होते. Genova शब्दात V असल्याने मराठी लिखाण व्हा असेच होणार. जिनोआ किंवा जेनोवा होण्याचा प्रश्नच नाही. Genova तल्या Ge चे लेखन जि करायचे की जे की गे याबद्दल मराठीत काहीच संकेत नाहीत. त्यासाठी ऑक्सफर्ड डिक्शनरीवर अवलंबून राहावे लागते.
पहा : Geography, Gender, Get आणि Germany
मराठी विकिपीडिया हे लिखित संकेतस्थळ आहे, येथे कोणत्या देशात, कोणत्या शब्दाचा, कोण कसा उच्चार करतात याच्याशी आपला संबंध नाही. लेखन हे प्रमाण असते, उच्चार नाही ’a fortiori' या शब्दाचे १९६१ साली प्रकाशित झालेल्या Webster's Third New International Dictionary मध्ये १३२ वेगवेगळे उच्चार दिले आहेत. त्यासाठी [१] या पानावरचा Pronuncition या मथळ्याखालचा मजकूर कृपया वाचावा.... ज (चर्चा) १५:५४, २२ ऑक्टोबर २०१५ (IST)
मी श्रीनिवास हेगडे नसून श्रीनिवास हेमाडे आहे (अर्थात हा महत्वाचा मुद्दा असला तरी प्रस्तुत संदर्भात दुय्यम आहे..)
तुमचे वरील सर्व खुलासे मला कबूल आहेतच, त्यात शंका नसावी.
तेंव्हा प्रस्तुत प्रश्न असा की : आता आपण कोणत्या लेखनानुसारचे पान ठेवणार आहोत ?!
जेनोवा की [[जेनोव्हा] की जिनोव्हा ?
तुम्हाला हे लिहित असताना अचानक मला या लेखनाचे मूळ म्हणजे निर्मला श्रीवास्तव हे पान बघण्याचे सुचले, म्हणून तेथे गेलो तर तेथे जेनोवा असे दिसते.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]])
- @ज: >>"मराठी विकिपीडिया हे लिखित संकेतस्थळ आहे,""<< मराठी विकिपीडिया कोणतेही अबकड संकेतस्थळ आहे की एक ज्ञानकोश आहे ? ज्ञानकोशात माहितीच्या वस्तुनिष्ठतेचे मुल्य काय असणे अभिप्रेत आहे ?
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:४४, २२ ऑक्टोबर २०१५ (IST)
- @ज: ज्ञानकोश केवळ लिखीत आहे या सोबत ज्ञानकोशातून वाचका समोर केवळ 'लोकमत' हे चंदन असो वा कोळसा पुरते मर्यादीत तीच माहिती पुन्हा पुन्हा उगाळून ठेवायची, का सोबत त्याला अद्याप माहित नसलेली पण वस्तुनिष्ठ माहितीकडेही सुस्पष्टपणे लक्षवेधाचेही काम करावयास हवे ? शीर्षक लेखनाबद्दल माझे मत मागे पासून वेगळे राहीले आहे ज्ञानकोशाचे वाचन केलेल्या वाचकास जिनेव्हाचे उच्चारण जिनेव्हातला माणूस कसा करतो याची माहिती व्हावयास हवी.
- सगळ्या उर्वरीत जगाने हेगडे म्हटले तरीही हेमाडे हाच उल्लेख वस्तुनिष्ठ असतो. आणि ज्ञानकोशांनी वस्तुनिष्ठता जोपासण्यावर भर द्यावयास हवा. जिनेव्हा शहराचे शिर्षक कसे लिहिले तर हेमाडेंना सरळ खूप फरक पडणार नाही. पण समजा एखाद्या तत्वज्ञान शाखेत 'जिनेव्हा तत्त्वज्ञान' अशी शब्द योजना आली तर हेमाडेंना (किंवा इतर कुणालाही) परिभाषेच्या_निर्मितीसाठी_निदेशक_तत्त्वे#विशेषनामे व त्या नामांवरून घेतलेल्या संज्ञा याचे पालन करत 'जिनेव्हा तत्त्वज्ञान' मूळ भाषेतील त्यांच्या उच्चारानुरूप लिहावे लागेल. आणि इतर ठिकाणी 'जनमत जसे उगाळू इच्छिते' तसे लिहावे लागेल. यात विरोधाभासाची निर्मिती होण्याची शक्यता असू शकेल किंवा कसे.
- आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती भारतीयकरण/देवनागरीकरण उपलब्ध नसल्यामुळेही काही मर्यादा येतात, असो.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:३७, २३ ऑक्टोबर २०१५ (IST)
मूळ भाषेतील त्यांच्या उच्चारानुरूप लिहावे लागेल?
[संपादन]पॅरिसचा उच्चार मूळ भाषेत पारी होतो, आपण पारी लिहू?
जपानला मूळ भाषेत निप्पॉन म्हणतात, आपण तसे लिहू?
टिळकांच्या मराठी नावात ळ आहे, गुजराथी आणि दक्षिणी भारतीय भाषा सोडून अन्य कुठल्याही भाषेच्या लिपीत ळ लिहिता येईल?
आंबेडकर हा शब्द हिंदीत अम्बेडकर असा लिहितात, आपण त्यांचे लिहिणे थांबवू शकू?
चीनला नाव त्यांच्या मूळ भाषेत झोंग्ग्युओ म्हणतात, आपण त्यांचा उच्चार तसा आहे, म्हणून मराठीत तसेच लिहायचे?
शिवाजीचे नाव उच्चारताना अनेक हिंदीभाषक ते आदरार्थी शिवाजी जी असे म्हणतात, शिवाजी उत्तर भारतात जन्माला आला असता तर त्याचे नाव मराठीत लिहिताना दोन जी लिहिलेले चालले असते?
राम हा उत्तर भारतीय देव आहे त्याचे नाव तेथे नेहमीच राम जी असे लिहिले जाते. दक्षिण भारतीयांनीही राम जी लिहायचे?
मूळ उच्चार असे काही नसतेच. उच्चार सतत बदलत असतात, एखाद्या भाषेच्या लिपीतल्या शब्द लेखनाची लिखाणाची पद्धत एकतर बदलतच नाही किंवा ती बदलायला फार काळ जावा लागतो. ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या प्रस्तावनेत हटकून लिहिले असते की, या शब्दकोशात दिलेले उच्चार लंडनच्या दक्षिण भागातील शैक्षणिक परिसरातल्या सुशिक्षित समाजात ऐकू येणारे उच्चार आहेत, (ते उत्तर-पूर्व-पश्चिम लंडन, इंग्लंडचे अन्य भाग, कॅनडा, स्कॉटलंड, ऑस्ट्रेलिया, आदी प्रदेशांत बोलल्या जाणार्या उच्चारांशी जुळतीलच असे नाही!) .
एकूण काय मूळ उच्चार, स्थानिक उच्चार या शब्दांना काही अर्थ नाही. भाषा आणि तिचे उच्चार दर बारा कोसावर बदलतात, लेखन सहसा बदलत नाही.
आंतरराष्ट्रीय फोनेटिक उव्च्चारांचे देवनागरीकरण करणे शक्य नाही, त्यामुळे तसी प्रयत्न करणे फुकाचे आहे. इंग्रजीतल्या टी हे मुळाक्षर असलेल्या इंग्रजी शब्दांचे उच्चार देवनागरी-मराठीत लिहिता येत नाहीत, तर अन्य उच्चारांचे काय? जगातल्या कुठल्याही भाषेचे शब्द मराठीत लिहावयाचे असतील तर त्या शब्दांचे मराठीकरण करणे आवश्यक आहे. टी असेल तेथे ट लिहिणे क्रमप्राप्त आहे.
प्रमाण मराठी जाणणारा माणूस परभाषेतील शब्द जसा लिहीत आला आहे किंवा लिहील तसाच तो लिहावा.
उच्चार प्रमाण नसतात हे ’a fortiori' च्या उदाहरणावरून पटले नाही का? ... ज (चर्चा) १०:५५, २३ ऑक्टोबर २०१५ (IST)
- मी माझ्या दृष्टीकोनाची सविस्तर मांडणी आपल्या चर्चा पानावर मागेच केली आहे आणि त्यापेक्षा माझा दृष्टीकोण बदललेला नाही. विकिपीडियावर उच्चारणांसाठी ऑडीओ फाइल्स जोडण्याची सुविधा आहे. >>आंतरराष्ट्रीय फोनेटिक उव्च्चारांचे देवनागरीकरण करणे शक्य नाही<< संगणक विषयक सुद्धा इतर भाषा आणि लिपीत तो वापरता येणार नाही अशी भ्रांत निर्माण करून पब्लिक कॉन्फीडन्स कायमचा मोडीत काढत असंख्य स्थानिक भाषा मोडीत निघाल्या अथवा त्यांचे पाठबळ घटले. काही ग्रंथांना विशीष्ट भाषा आणि विशीष्ट समुहांसाठी मर्यादीत केले गेले त्यावेळीही अशीच भ्रांतीमुलक मिथके पसरवली गेली. एकदा का भ्रांतीमुलक मिथकावर जनतेचा विश्वास बसला की त्यातून बाहेर येण्यास सहस्त्रके सुद्धा उलटू शकतात. असो.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:२१, २३ ऑक्टोबर २०१५ (IST)
- ज,
- मला आपल्या कामाविषयी आणि स्वतः आपल्याविषयीही कमालीचा आदर आहे परंतु आपले एकूण काय मूळ उच्चार, स्थानिक उच्चार या शब्दांना काही अर्थ नाही. हे कथन वाचून हसावे कि रडावे हे कळेनासे झाले.
- अर्थात, आपल्या या मतामुळे आपल्याविषयीचा आदर किंचितही कमी झालेला नाही.
- असो, या विषयावरुन अनेकदा उलटसुलट चर्चा झालेली आहे. यात आपण आपले मत यत्किंचितही बदलेले नाही हे उघडच आहे.
- गेल्या काही वर्षांत माझे मत सगळी स्थलनामे स्थानिक/मूळ भाषेतच लिहीली गेली पाहिजे यावरून सगळी स्थलनामे यथाशक्य स्थानिक/मूळ भाषेतच लिहीली गेली पाहिजे असे मवाळले आहे.
- यामागची कारणे सविस्तर पूर्वी मांडलेलीच आहेत. त्यांचा त्रोटक गोषवारा --
- पूर्वापार लिहिलेली नावे अचूक लिहिली गेली होती हे छातीठोकपणे कोण सांगेल? एकाने कोणता संदर्भ आणला तर त्याहून वेगळे तीन संदर्भ नक्कीच मिळतील. आमच्या आज्याने अन् त्याच्या आज्याने असे केले म्हणून आम्ही तसेच करणार हे डोळे मिटून म्हणणे आणि आचरणे हे ठीक नाही.
- मोल्सवर्थ म्हणेल ते ब्रह्मवाक्य हा समज फोल आहे. मोल्सवर्थ यांच्या कामाचे मोल (हा!) करणे अशक्य आहे. त्यांनी मराठी भाषेला दिलेली देणगी अत्युच्च कोटीतील आहे यात थोडाही संशय नाही, परंतु --
- त्यांचे मत काही अंशी तरी आंग्लाळलेले असणारच. भारतापलीकडील व इंग्लंड तसेच इंग्लंड-प्रभावित नसलेल्या स्थळांबद्दलचे त्यांचे मत अचूकच असणार?
- त्यांनी केलेले भाषांतर अथवा त्यांची उदाहरणे ९५-९८% बव्हंशी बरोबरच असणार परंतु इतर २%ची ग्वाही कोण व कशाच्या आधारे देणार?
- अनेक स्थलनामे मोल्सवर्थ यांच्या कालखंडात माहितीच नव्हती त्यांबद्दल त्यांचे मत प्रमाण कसे धरावे? अशी नावे मराठीत आणताना मोल्सवर्थ यांच्यासारखा विद्वान उपलब्ध नसल्याने मूळ नाव (आंग्लाळलेले नव्हे) वापरणे हेच श्रेयस्कर.
- आज चार मराठी वर्तमानपत्रे/नियतकालिके चाळली असता बऱ्याचदा विदेशी, विशेषतः इंग्लंड/अमेरिकेपल्याडच्या, नावांची कत्तल उडवलेली दिसते. अशा लिखित उदाहरणांना प्रमाण धरणे हे बरोबर नाही.
- अभय नातू (चर्चा) ०२:४२, २४ ऑक्टोबर २०१५ (IST)
- ता.क. मी वर लिहिलेल्यात जेम्स मोल्सवर्थ यांच्यावर किंवा त्यांच्या कार्यावर शिंतोडे उडविल्या सारखे वाटणे शक्य आहे म्हणून खडाजांगी होण्याआधीच जाहीर करतो ही मला मोल्सवर्थ, त्यांचे सहकारी आणि त्यांचा कोष यांबद्दल नितांत आदर आहे. परंतु याचा अर्थ त्याबद्दल कोणीही कधीच सकारण शंका घेऊ नये असा होत नाही.
दोन व
[संपादन]संस्कृतमध्ये दोन व आहेत एक, यरलव मधला अर्धस्वर (हा दंत्यौष्ट आहे) आणि दुसरा उ+अ मिळून होणारा व (हा ओष्ट्यकंठ्य आहे). मराठीत हा दुसरा ’व’ इंग्रजीतल्या W ऐवजी येतो, तर V ऐवजी व्ह येतो. जे परंपरागत मराठीत आहे ते आहे, बदलायचे कारण नाही .... ज (चर्चा) ११:०५, २३ ऑक्टोबर २०१५ (IST)
- ज,
- हे दोन व संस्कृतमध्ये लिहिताना वेगळी अक्षरे वापरली जातात का? असल्यास उदाहरणे कोठे सापडतील?
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ०३:२७, २४ ऑक्टोबर २०१५ (IST)
मुक्त सांस्कृतिक काम मराठी अनुवाद
[संपादन]मुक्त सांस्कृतिक काम मराठी अनुवाद पडताळणी, तपासणी इत्यादीबाबत साईट नोटीस लागल्याचे पाहून समाधान वाटले. माझा हा अनुवाद योग्य झाला आहे की नाही, हे कधी तपासले जाईल याची मी वाट पाहात होतो. मला वाटते, श्री. ज यांनी हे काम हाती घ्यावे. अर्थात इतरांनी कुणीही जाणकार आणि अनुभवी विकी सहकाऱ्यांनी करण्यास माझी हरकत नाहीच नाही.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे २२:३५, ३ नोव्हेंबर २०१५ (IST)
चंद्रकांत पाटील : दोन पाने
[संपादन]माहितगार आणि इतर सहायक चमूस विनंती मी आज चंद्रकांत पाटील हे पान तयार केले. पण माझ्याकडून आज अनावधानाने एक चूक झाली. 'चंद्रकांत पाटील' ऐवजी मी चंद्रकात पाटील असे लिहिले गेले. त्यामुळे मी पुन्हा नव्याने 'चंद्रकांत पाटील' हे नवे पान तयार केले आहे. तरी कृपया आधीचे चुकीचे नाव असलेले पान वगळावे किंवा मला अधिकार असल्यास कृती सांगावी.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १८:०८, १५ डिसेंबर २०१५ (IST)
वेष्टनचिंत्रांचे प्रताधिकार
[संपादन]वेष्टनचित्रांची प्रताधिकार मुक्तता निश्चित करणे गुंतागुंतीचे आणि असे निश्चिती न करता वापरणे जोखीमीचे असू शकते, कारण ब्र्ंड्स आणि वेष्टनचित्रांना व्यापारी मुल्य असल्यामुळे सहसा आस्थापना या विषयावर संवेदनशील असू शकतात. वेष्टनचित्रांचे छायाचित्र आपण काढले तरीही ते डेरीव्हेटीव्ह वर्क ठरते, आणि मुळ प्रताधिकार वेष्टनचित्रकार अथवा आस्थापनेच्या मालकीचा असतो त्यामुळे त्यांच्या पुर्वपरवानगी-परवान्या शिवाय असा चित्र उपयोग करणे सहसा रास्त ठरत नाही. इन एनी केस सदर छायाचित्रे कॉपीराइटमुक्त असल्याचे सिद्ध करता आल्या शिवाय कॉमन्सवर चढवता येत नाहीत ते तेथील नियमात न बसण्याची शक्यता आहे.
उर्वरीत वेळी मराठी विकिपीडियावर अशी वेष्टन-चित्रे पुर्वपरवानगी-परवान्या शिवाय चालणेही साशंकीत राहीले असते परंतु सोबत व्यंगचित्राचा उल्लेख असल्यामुळे प्रताधिकार कायद्यातील काही तरतुदी लक्षात घेऊन फेअरडील असल्यास जोखीम हलकी होऊ शकेल का ते पहावे लागेल. त्याची अधिक चर्चा करू.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:३६, १२ जानेवारी २०१६ (IST)
चालेल, याबाबत माझे अज्ञान दखल घेण्याजोगे आहेच !
चर्चेची गरज आहे. फारच अडचणीचे होणार असेल तर नियमानुसार आठ दिवसांनी वगळल्यास हरकत नाही.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १५:०५, १२ जानेवारी २०१६ (IST)
वेष्टनचिंत्रांचे प्रताधिकार अधिक चर्चा १
[संपादन]१) वेष्टनचित्रांच्या बाबतीत प्रताधिकार आणि व्यापार-चिन्ह अधिकार (ट्रेडमार्क ॲक्ट) या दोन्ही निरनिराळ्या बाबी स्वतंत्रपणे लागू होत असू शकतात ज्या वेष्टनचित्रांचा पुर्नवापराचे अधिकार नियंत्रीत करतात. विकिपीडियाचे काम व्यापारी नसल्यामुळे ट्रेडमार्क ॲक्टची फारशी काळजी पडत नाही परंतु कॉपीराइट बद्दल काळजी करावीच लागते. २) वेष्टनचित्रांचा कॉपीराइट चित्रकार व्यक्तीच्या नावावर असेल तर अशा व्यक्तीचे आयुष्य + ६० वर्षे एवढाच असतो आणि तो संस्थेच्या नावावर विकला गेला असेल अथवा निनावी असेल तर ६० वर्षे एवढा व्हावा (चुभूदेघे) म्हणजे सदर वेष्टनचित्र आस्थापनेने पैसे खर्च करुन बनवून घेतले असेल तर तर कॉपीराइट आस्थापनेच्या नावावर व्हावयास हवा आणि ६० वर्षांनंतर संपावयास हवा. गायछाप जर्दा सारख्या अतीजुन्या ब्रॅंडच्या वेष्टनचित्रांचे कॉपीराइट ६० वर्षे होऊन गेल्यामुळे संपलेले असू शकतात. अर्थात तुम्हाला उपलब्ध होत असलेल्या चित्राला ६० वर्षे झाली आहेत अथवा नाही याची निश्चित माहिती हवी. म्हणजे तुमच्याकडे असलेले गायछाअ जर्दाचे पाकीटावरील छायाचित्र कॉपी ६० वर्षापुर्वीचे असल्याची सिद्ध करण्याची काही क्लृप्ती -जसे की उत्पादनाची तारीख अथवा खरेदीची तारीख इत्यादी- असती तर सदर छायाचित्र जसेच्या तसे चालून जाण्याची शक्यता वाढली असती.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:२९, १६ जानेवारी २०१६ (IST)
वेष्टनचिंत्रांचे प्रताधिकार अधिक चर्चा २
[संपादन]- अर्थात कॉपीराइट कायद्यात अजून एक सुविधा आहे. आपण एखाद्या कलाकृतीचे समिक्षण अथवा टिकेसाठी उल्लेखीतो ती तेवढ्यापुरती रास्त वापर (फेअरडील) तत्वाखाली वापरता येते. म्हणजे ऐसिअक्षरेवर व्यंगचित्रासोबत झालेला उपयोग म्हणून अथवा इतर वेष्टनचित्रांसोबत केलेली तुलना म्हणून तसा उपयोग बहुधा रास्त-वापर या कक्षेत बसावा.
- ज्या तत्वा खाली ऐसि अक्षरेवरील उपयोग बसला त्या तत्वा खाली मराठी विकिपीडियावरील उपयोग बसू शकेल का ? तर मूळ छायाचित्र आणि त्याचे टिकेत वापरलेले व्यंगचित्र दोन्हींची तुलना विकिपीडिया लेखात केल्यास असा उपयोग रास्त उपयोगाच्या कक्षेत बहुधा यावयास हवा. (अर्थात जरासे काठावरचे असल्यामुळे आणि न्यायालयीन केसस्टडी उपलब्ध नसल्यामुळे ठामपणे सांगणे कठीण जाते) - पण नेमके हे रास्तवापरांचे उपयोग उद्देश काम विकिमिडीया कॉमन्सच्या कक्षेत येत नाही ते मराठी विकिपीडियावर स्थानीक स्तरावर करावयास हवे त्या साठी विशीष्ट डिक्लरेशन असलेली टॅग्सवगैरे छायाचित्रांसोबत जोडणे आवश्यक ठरावे आणि मागील चित्रे चढवणाऱ्यांनी या बाबत पुरेशी दक्षता न घेतल्यामुळे मागील छायाचित्रांचे टॅग्स आणि परवाने जोडण्याचे काम सुरळीत होईपर्यंत मराठी विकिपीडियावरचे छायाचित्र चढवणे संस्थगित झालेले आहे म्हणून तुर्तास तरी हा विषय बाजूला ठेवावा लागेल असे वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:२९, १६ जानेवारी २०१६ (IST)
शरद गाडगीळ आणि जॉन ओस्वाल्ड कोण ?
[संपादन]साईट नोटीसवर पुढील वाक्य नेहमी असते : "हक्क मिळालेले नसताना मजकुर अथवा छायाचित्र वापरणे, म्हणजे हौसेखातर दुसऱ्याच्या बागेतले गवत उपटायला जाणे" ~ शरद गाडगीळ" आता, हे शरद गाडगीळ कोण म्हणून मी साईट नोटीसचे पान विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/14उघडले, तर तिथे मला आणखी एक वाक्य आढळले. ते असे : "सर्जनशीलता हे शेत आहे असा विचार केला तर प्रताधिकार (कॉपीराईट) हे कुंपण आहे" - जॉन ओस्वाल्ड, तर आता, हे कोण जॉन ओस्वाल्ड म्हणून त्यांचा शोध घेतला तर तेही सापडले नाहीत !
या दोघांची मराठी विकीपाने असणे, आवश्यक आहे असे मला वाटते. आपण संदर्भहीन काही देत नसू तर यांचे संदर्भ दिले पाहिजेत. हा जॉन ओस्वाल्ड म्हणजे John Oswald (composer) हाच आहे का?
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडेश्रीनिवास हेमाडे ०९:२८, २५ जानेवारी २०१६ (IST)
- चांगला मुद्दा आहे. मलाही ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेच्या संदर्भाने समकक्ष विषय आपल्याकडे काढावयाचा होता, ती चर्चाही आपल्याशी या निमीत्ताने करून घेता येईल. तात्वीक चर्चा करण्यापुर्वी जॉन ओस्वाल्डांचे वाक्य मी q:en:Copyright येथून आणि त्यांनी या पुस्तकातून उचलले असावे आणि मी या गोष्टीचा उल्लेख संदर्भ नमुद करावयास हवा होता हे आपले म्हणणे बरोबर आहे. माझ्या संगित क्षेत्रातील माहितीस मर्यादा आहेत पण मी संदर्भ दिलेले जॉन ओस्वाल्डही संगित क्षेत्रातून असावेत, आपणास या बाबत अधिक माहिती असल्यास निश्चित सांगावी (किंवा ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असल्यास स्वतंत्र लेखही लिहिता येईल)
- आपण विचारलेल्या एवढ्याशा प्रश्नाची विसृत चर्चा करण्याचे खरे कारण म्हणजे आपण अलिकडे लिहिलेल्या प्रल्हादसा लहानुसा क्षत्रिय यांच्या बद्दल ज्ञानकोशीय दृष्ट्या उल्लेखनीय अजून काही माहिती उपलब्ध आहे का ? तसे नसल्यास 'प्रल्हादसा लहानुसा क्षत्रिय' यांना संगमनेर महाविद्यालयाच्या परिघात/संकेतस्थळावर उल्लेखनीयता उपलब्ध होईल, इतर मराठी वृत्ता अणि संकेतस्थळ माध्यमातून त्यांच्या विषयी दखल घेता येईल पण ज्ञानकोश म्हणून प्रल्हादसा लहानुसा क्षत्रिय यांचे कार्य संगमनेर महाविद्यालयासाठी उल्लेखनीय असले तरीही विश्वकोश म्हणून मराठी विकिपीडियात स्वतंत्र लेख असण्या इतपत उल्लेखनीयता आहे का या बद्दल मला तुर्तास साशंकता वाटते आहे.
- अविनाश भोसले यांच्या बद्दल इतर (वृत्त) माध्यमातून वादांच्या निमीत्ताने दखल घेतलेली असल्यामुळे त्यांची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता स्विकार्य होते पण समजा त्यांची इतर माध्यमांनी दखल घेतलेली नाही तर केवळ अबकड बांधकाम कंपनीचे मालक आहेत. अबकड यांचे व्याही आहेत, अबकड महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी अबकड महाविद्यालयास अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांची देणगी दिली. एवढीच माहिती असती तर त्यांची ज्ञानकोशीय उल्ल्खनीयता सांशकीत राहीली असती असे वाटते.
- चुभूदेघे. काही शंका असल्यास जरूर मांडाव्यात.
- पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा)
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:१८, २५ जानेवारी २०१६ (IST)
एकाच संदर्भाचा पुर्न अथवा अतिरिक्त वापर साठी शॉर्टकट
[संपादन]आपले सोमदेव लेखातील एकच संदर्भ पुन्हा देण्याचा प्रयत्न अभ्यासला. (एखाद्या पुस्तकाच्या एकाच पृष्ठक्रमांकाचा तोच संदर्भ एकाच विकिलेखात पुन्हा-पुन्हा नमुद करण्यासाठी <ref name="भारतीय संस्कृतिकोश, खंड १०"> संदर्भ मजकुर </ref> हि पद्धत चांगली आहे.) आपण आत्ता केले आहे तसे <ref name="भारतीय संस्कृतिकोश, खंड १०">संपूर्ण संदर्भ मजकुर </ref> हे पुन्हा-पुन्हा वापरणे चालू शकेलच.
- <ref name="भारतीय संस्कृतिकोश, खंड १०"> संदर्भ मजकुर </ref> ह्या पद्धतीत एक शॉर्टकट मेथड सुद्धा उपलब्ध आहे ज्यात पहिल्यावेळी <ref name="भारतीय संस्कृतिकोश, खंड १०"> संदर्भ मजकुर </ref> हे पूर्ण वापरावे लागेल, पण दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आणि त्यापेक्षा अधिक वेळा वापरताना <ref name="भारतीय संस्कृतिकोश, खंड १०" /> एवढेच वापरले तर पुरेसे आहे (दुसऱ्यांदा आणि पुढच्यावेळी उर्वरीत संदर्भ मजकुर </ref> हा भाग पुन्हा वापरण्याचे टळते; पहिल्या याच्यात <ref name="भारतीय संस्कृतिकोश, खंड १०"> मध्ये > हे नुसतेच वापरले आहे दुसऱ्या आणि पुढच्या वेळी पण काहीतरी चुकते आहे.असे करुन वापरले आहे. हा बारकावा सहज लक्षात आल्यास पहावे. न जमल्यासही चिंता नसावी तुमची सध्याची पद्धतही चालते आहेच.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:५७, १२ फेब्रुवारी २०१६ (IST)
माझ्या प्रयत्नांची दाखल घेत आहात, याचा मला आनंद आहे. तुम्ही सुचविलेला शॉर्टकट वापरण्याचा प्रयत्न केला पण काहीतरी चुकते आहे. त्यामुळे सध्याची पद्धत वापरली.
मला एक सुचवावेसे वाटते: हा पुनरावृत्तीचा साचा बनवून तो 'नेहमी लागणारे साचे' मध्ये समाविष्ट करता आले तर बरे होईल. म्हणजे तयार आयते साचे जास्त सोपेपणाने वापरले जातील.
तुमच्याशी मागच्या अनेक विषयांवर बोलायचे राहिले आहे.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १२:२५, १३ फेब्रुवारी २०१६ (IST)
- >>पण काहीतरी चुकते आहे.<<
- हम्म तुमची चूक लक्षात आली, म्हणूनच वरील माहिती दिली. पुन्हा एकदा वरील प्रमाणे प्रयत्न केल्यास जमून जाईल असे वाटते. दोन उणीवा राहिल्या होत्या; पहिली स्टेप न वापरता दुसरी स्टेप डायरेक्टली वापरली गेली त्यातही एक बारकी त्रुटी तुम्ही गोंधळून केलीत कारण तुम्ही पहिली स्टेप केलेलीच नव्हती :)
- आता तुमची पहिली स्टेप <ref name="भारतीय संस्कृतिकोश, खंड १०">संपूर्ण संदर्भ मजकुर </ref> बरोबर झाली आहे.
- दुसरी स्टेप शॉर्टकट संदर्भ दुसऱ्यांदा देताना <ref name="भारतीय संस्कृतिकोश, खंड १०" /> एवढेच. बारकावा अथवा फरक / स्लॅश पहिल्या स्टेप मध्ये नाही आणि दुसऱ्या स्टेप मध्ये आहे ती नमेकी कुठे वापरली ते पहावे.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:३०, १३ फेब्रुवारी २०१६ (IST)
हे नेमके कोण आहेत
[संपादन]माहितगार स. न.
- श्री. निरंजन भाटे आणि श्री. अरविंद कोल्हटकर यांचे संदर्भ काय आहेत ? हे नेमके कोण आहेत. मी माझ्या एका लेखात त्यांचा नामोल्लेख व काम यांची माहिती देत आहे. त्यामुळे त्यांचे संदर्भ हवे आहेत.
- लेखाच्या पानाचे शीर्षक कसे बदलतात ? सोमदेव सुरी या लेखाचे शीर्षक सोमदेव सुरि असे करावायचे आहे. कृपया पद्धती सांगावी.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे श्रीनिवास हेमाडे १०:१३, १८ फेब्रुवारी २०१६ (IST)
- श्री. निरंजन भाटे आणि श्री. अरविंद कोल्हटकर यांनी आपल्याला काही अनुवादात साहाय्य करून मुक्तपणे वापरण्यास परवानगी दिली तेवढ्यापुरता संदर्भात उल्लेख करता येईल इतर काही संदर्भ स्रोतात त्यांचा उल्लेख आढळल्यास कळवावे अन्यथा संदर्भापलिकडे उल्लेखनीयता असण्यापलिकडे ज्ञानकोशासाठी काही असेल असे तुर्तास वाटत नाही. - मला वाटते ज्ञानकोशीय उल्लेखनीयता विशयक तत्सम विषयावर मी आपल्याशी आधी एकदा संवाद साधला असावा तसेच काहीसे.
लेख शीर्षकाचे स्थानांतरण
[संपादन]सोमदेव सुरि लेखातील आपले हे संपादन अभ्यासल्या नंतर गल्लत लक्षात आली. लेख शीर्षक म्हणजे लेखाचे नाव आणि लेखशीर्ष (म्हणजे लेखाच्या आतील मुख्य मथळा) या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. तुम्हाला लेखाच्या नाव बदलायचे होते. लेखाची नावे तुम्हालाही सुधारता येतात. लेखाच्या इतिहासाच्या उजवीकडे अधिक नावाचा ड्रॉपडाऊन मेनु उघडल्यास 'स्थानांतर' पर्याय दिसेल तो वापरल्यास लेख नावाचे तुम्हाला अधिक सुयोग्य नावास स्थानांतर करता येते धन्य्वाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:०७, २८ फेब्रुवारी २०१६ (IST)
नमस्कार,
लेख शीर्षक आणि लेखशीर्ष यातील फरक मला माहित नव्हता, म्हणजे ही परिभाषा अपरिचित होती. मला लेख शीर्ष बदलावयाचे होते. आधी मी चुकून "सोमदेव सुरी" असे केले होते, ते शीर्षक सोमदेव सुरि असे हवे होते. तुम्ही केलेला बदल पाहिला. तुम्ही सोमदेव सुरि हे नाव पान निर्माण करून ते पुनर्निर्देशित केले आहे काय ?
मला हवे आहे ते असे की समजा आपण (म्हणजे मीच खरा तर ! ) एखादे पान निर्माण केले आणि त्याचे शीर्ष बदलावयाचे आहे, तर काय करावे ? 'स्थानांतर' पर्याय देवून नाव बदलता येते का ? मी धूळपाटी कशी वापरू ? ते कृपया स्पष्ट करावे.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १८:३९, २९ फेब्रुवारी २०१६ (IST)
- ठिक आहे एक लेख शीर्षक बदलण्याचे काम आले आहे ते तुमच्यावर सोपवतो. COEP Regatta हे लेखनाव मराठीकरण/देवनागरी लेखनात स्थानांतरीत करावयाचे आहे. खालील चित्रात दाखवल्या प्रमाणे करुन पहाणे. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ००:०२, १ मार्च २०१६ (IST)
व्वा ! जमले की !!
पाहा बर, खरचं जमलंय का ?
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १०:२९, १ मार्च २०१६ (IST)
- हो व्यवस्थित जमले आहे, विशेष:नवीन_पाने येथे जाऊन अधून मधून सराव करुन हातसाफ करता येईल. यथादृश्य संपादक वापरताना तुमचा लेख शीर्षक आणि लेखशीर्ष मध्ये जो घोटाळा झाला तसाच गेल्या दोनचार दिवसात एका हिंदी विकिपीडियनचाही झालेला पाहीले आणि त्याचे मूळ कारण दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या कार्यासाठीचे इंग्रजी लेबल Page title हे सारखे आहे. यथादृश्य संपादक नसतना हा घोटाळा होत नव्हता कारण नाव एकसारखे असले तरीही =मथळा= म्हणजे ==विभाग==च्या वरची लेव्हल एकतर विकिपीडियात कमी वापरली जाते शिवाय हे = बरोबरचे चिन्ह आता पर्यंत मॅन्युअली भरावे लागत होते त्यामुळे तुम्ही जसे सारख्या शब्द प्रयोगामुळे गोंधळला तसे गोंधळणे पुर्वी होत नसे. पण यथादृश्य संपादकामुळे हे गोंधळणे होते आहे तेव्हा यथादृश्य संपादकात लेखशीर्ष च्या एवजी मथळाशीर्ष असा शब्द प्रयोग वापरण्या बद्दल आपले मत जाणून घ्यावयाचे आहे किंवा इतर काही शब्द सुचवल्यास चालेल म्हनजे तुमचा जसा गोंधळ झाला तसा इतरांचा होणे टळेल असे वाटते.
- तुमचा झालेला गोंधळ आणि यथादृष्यसंपादकाच्या प्रणाली विकसकांशी मी केलेली चर्चा येथे सहज म्हणून पाहता येईल
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:२०, १ मार्च २०१६ (IST)
हे काय नवीन ? !
[संपादन]माहितगार आणि इतर मदतनीस चमूस
स. न.
गेल्या काही दिवसापासून विकिपीडियाचे कोणतेही पान उघडले की ते विकीवँड कडे पुनर्निर्देशित होत आहे.
विकीपेडियाच विकीवँड मध्ये बदलत आहे की आणखी काय ? आज मी इसाबेला बिटोन हे नवीन पान उघडले; तर ते विकीवँड मध्ये उघडले जात आहे.
कृपया माहिती द्यावी.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे ०९:४१, १२ मार्च २०१६ (IST)
- नाही मला तरी तो नेहमी सारखा उघडत आहे, प्रथम दर्शनी तुमच्याकडे असे काही होण्याचे कारण समजत नाही. en:Wikiwand हा शब्दही मी तुमच्या या आत्ताच्या उल्लेखानंतर शोधला. मला वाटते हे विकिवॅंड इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये चालणार नाही तेव्हा एकदा इंटरनेट एक्सप्लोरर वापरुन विकिपीडिया नेहमी सारखा उघडतो का हे बघता येईल.
- तुम्ही ब्राऊजर कोणता वापरता आहात ? ब्राऊजर मध्ये काही नवे ॲड ऑन वापरले आहेत का ? मराठी विकिपीडिया शिवाय इतर भाषी विकिपीडियात काही विशेष- गॅजेट सलेक्ट केली आहेत का ?
- @अभय नातू: मी हॉटकॅट वापरत नाही मराठी विकिपीडियावर दुसरे कसेले गॅजेट नाही तेव्हा हॉटकॅटमुळे असे काही होत असण्याची शक्यता आहे का ?
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:१४, १२ मार्च २०१६ (IST)
मलाही वेगळे काही जाणवले नाही. हॉटकॅट मीसुद्धा वापरतो पण त्याने ही अडचण येईल असे वाटत नाही. विकिवँड चुकुन इन्स्टॉल तर झालेले नाही ना?
अभय नातू (चर्चा) १०:३०, १२ मार्च २०१६ (IST)
भगतसिंग जसेच्या तसे कॉपी !
[संपादन]माहितगार आणि अन्य प्रचालक,
मी भगतसिंग हे पान आज अपडेट करीत असताना आत्ताच माझ्या लक्षात एक गोष्ट आली. ती अशी की यातील मजकूर जसाच्या तसा एका संकेतस्थळावरून घेतला आहे. मुळात या पानाचे सारे लेखन विश्वकोषीय नाही. तरीही मी फारसा विचार केला नाही, म्हंटले हळूहळू त्यात सुधारणा करता येईल.
तथापि काही मराठी बातम्या जोडता येतील का ? हे पाहात असताना ज्यावरून मजकूर घेतला आहे ते संकेतस्थळ भगतसिंग सापडले. ते 'महाराष्ट्र मराठी' हे संकेतस्थळ आहे. तरी कृपया पुढील कार्यवाही करावी, ही विनंती.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १८:३७, २८ मार्च २०१६ (IST)
- लक्ष्य वेधण्या बद्दल धन्यवाद, ७००० (साधारण ४ परीच्च्छेद) बाईट पेक्षा अधिकचे संपादन कॉपीराईटसाठी क्रॉसचेक करणे चांगलेच. लेखात ऑगस्ट २००९ मध्ये ३२००० बाईटाचे संपादन आणि सप्टेंबर २००९ मध्ये ६००० बाईट एकगठ्ठा कॉपीपेस्ट झालेले असण्याची प्रथमदर्शनी शक्यता वाटते. पण कॉपीपेस्टींगचा स्रोत बहुधा मराठी विश्वकोश आणि काही इतर संकेतस्थळे असावीत, आपण दिलेल्या दुव्यावर लेखाची तारीख २९ एप्रिल २०१५ म्हणजे मागच्या वर्षाभरातील दिसते म्हणजे त्यांनी ते मराठी विकिपीडियावरुन घेतले असे असू शकते.
- इन एनी केस मराठी विकिपीडियावरील लेखात प्रथमदर्शनी मोठ्या कॉपीपेस्टची शक्यता वाटते आहे. आपण स्वत: पूर्ण नव्याने लिहिलेले परिच्छेद सरळ सरळ डिलीट करुन टाकावेत आणि नव्याने पुर्नलेखन करावे म्हणजे कन्फ्युजनचा प्रश्न उरणार नाही असे वाटते. जिथे कॉपीराईट उल्लेंघनाची शक्यता वाटते आणि मजकुर चार परिच्छेदांपेक्षा अधिक असण्याची शक्यता असल्यास आपण परस्पर मजकुर उड्वण्यास हरकत नसावी.
- धन्यवाद आणि शुभेच्छा.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:३१, २८ मार्च २०१६ (IST)
विचारवेध संमेलन
[संपादन]आपण विचारवेध संमेलन हा लेख वगळू नये अशी विनंती ' वर्ग:ऑक्टोबर २०१५ मध्ये वगळावयाचे लेख ' या वर्गपानावर केली होती. सदर लेख हा अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. तो लवकरात लवकर पूर्ण करावा ही विनंती.तसेच त्या वर्गपानावर टाकलेला मजकूरही काढावा अशीही विनंती करण्यात येते.
--वि. नरसीकर (चर्चा) २०:०८, १५ जानेवारी २०१७ (IST)
विनंती
[संपादन]चर्चा:हिंदू तत्त्वज्ञान येथील चर्चेत आपल्या मार्गदर्शनाची विनंती आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:३६, १५ सप्टेंबर २०१७ (IST)
सु.रा. चुनेकर
[संपादन]सु.रा. चुनेकर https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81.%E0%A4%B0%E0%A4%BE._%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0 हे पान का वगळायचं आहे ? मला कळले नाही. कृपया माहिती द्या.
माझे पुनरागमन
[संपादन]मित्रहो, मी पुनरागमन केले आहे. तत्त्वज्ञान हे पान अद्ययावत करत आहे. पण काहीतरी चुकले. ते कृपया दुरुस्त करावे, हि विनंती श्रीनिवास हेमाडे श्रीनिवास हेमाडे १९:४२, ६ जुलै २०१९ (IST)
@श्रीनिवास हेमाडे: स्वागत आहे. आपण महत्वाच्या विषयावर लेखन करता. पुन्हा सक्रीय झाल्याचे पाहून आनंद झाला. मी लेखाची रचना केली आहे. पाहून घ्या.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १९:२४, ७ जुलै २०१९ (IST)
Wikimedia Foundation Community Board seats: Call for feedback meeting
[संपादन]The Wikimedia Foundation Board of Trustees is organizing a call for feedback about community selection processes between February 1 and March 14. While the Wikimedia Foundation and the movement have grown about five times in the past ten years, the Board’s structure and processes have remained basically the same. As the Board is designed today, we have a problem of capacity, performance, and lack of representation of the movement’s diversity. Direct elections tend to favor candidates from the leading language communities, regardless of how relevant their skills and experience might be in serving as a Board member, or contributing to the ability of the Board to perform its specific responsibilities. It is also a fact that the current processes have favored volunteers from North America and Western Europe. As a matter of fact, there had only been one member who served on the Board, from South Asia, in more than fifteen years of history.
In the upcoming months, we need to renew three community seats and appoint three more community members in the new seats. This call for feedback is to see what processes can we all collaboratively design to promote and choose candidates that represent our movement and are prepared with the experience, skills, and insight to perform as trustees? In this regard, it would be good to have a community discussion to discuss the proposed ideas and share our thoughts, give feedback and contribute to the process. To discuss this, you are invited to a community meeting that is being organized on March 12 from 8 pm to 10 pm, and the meeting link to join is https://meet.google.com/umc-attq-kdt. You can add this meeting to your Google Calendar by clicking here. Please ping me if you have any questions. Thank you. --User:KCVelaga (WMF), १६:००, ८ मार्च २०२१ (IST)
[Wikimedia Foundation elections 2021] Candidates meet with South Asia + ESEAP communities
[संपादन]Hello,
As you may already know, the 2021 Wikimedia Foundation Board of Trustees elections are from 4 August 2021 to 17 August 2021. Members of the Wikimedia community have the opportunity to elect four candidates to a three-year term. After a three-week-long Call for Candidates, there are 20 candidates for the 2021 election.
An event for community members to know and interact with the candidates is being organized. During the event, the candidates will briefly introduce themselves and then answer questions from community members. The event details are as follows:
- Date: 31 July 2021 (Saturday)
- Timings: check in your local time
- Bangladesh: 4:30 pm to 7:00 pm
- India & Sri Lanka: 4:00 pm to 6:30 pm
- Nepal: 4:15 pm to 6:45 pm
- Pakistan & Maldives: 3:30 pm to 6:00 pm
- Live interpretation is being provided in Hindi.
- Please register using this form
For more details, please visit the event page at Wikimedia Foundation elections/2021/Meetings/South Asia + ESEAP.
Hope that you are able to join us, KCVelaga (WMF), १२:०४, २३ जुलै २०२१ (IST)
विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करा
[संपादन]नमस्कार श्रीनिवास हेमाडे,
आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.
या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या
समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.
आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.
या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा. धन्यवाद, MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
विकिपीडिया आशियाई महिना २०२३
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.
धन्यवाद.
- आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.