अविनाश भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अविनाश निवृत्ती भोसले यांचे संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथील दि २६ डिसेंबर २०१५ रोजीचे छायाचित्र

अविनाश भोसले,पूर्ण नाव अविनाश निवृत्ती भोसले ( जन्म : १९६०, संगमनेर, अहमदनगर; मूळ गाव तांबवे ता कराड जिल्हा सातारा ) महाराष्ट्रातील प्रसिद्ध बांधकाम उद्योग व्यावसायिक असून एआयबीएल- अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, या बांधकाम कंपनीचे मालक आहेत. अविनाश भोसले हे काँग्रेसचे, माजी वनमंत्री आणि भारती विद्यापीठाचे कुलपती पंतगराव कदम यांचे व्याही आहेत.

अविनाश भोसले हे संगमनेर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी या महाविद्यालयास अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांची देणगी दिली.[१]

कौटुंबिक माहिती[संपादन]

अविनाश भोसले यांचा जन्म संगमनेर येथे एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील निवृत्ती गणपत भोसले [२] हे संगमनेर येतील सावर्जनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता होते. त्यांना एक भाऊ- अभय आणि दोन बहिणी आहेत. अविनाश भोसले यांचे वडील निवृत्ती गणपत भोसले हे मूळ तांबवेत या गावाचे (कराड,सातारा) येथील रहिवासी आहेत.[३]

अविनाश भोसले हे काँग्रेसचे, माजी वनमंत्री आणि भारती विद्यापीठाचे कुलपती पंतगराव कदम यांचे व्याही आहेत. भोसले यांची मुलगी स्वप्नाली भोसले हिचा विवाह कदम यांचा मुलगा विश्वजित कदम याच्याशी ०७ डिसेंबर २००७ रोजी झाला. विवाह कालखंडात विश्वजित कदम हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. स्वप्नाली भोसले-कदम ही सुद्धा बांधकाम व्यवसायात उद्योजिका आहे.[४] राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्व पक्षातील बडे नेते हजर होते[५]

शिक्षण[संपादन]

 • प्राथमिक शिक्षण : डी. एम. पेटीट हायस्कूल, संगमनेर
 • १२ वी (अनुत्तीर्ण) : संगमनेर महाविद्यालय, संगमनेर १९७२

पुरस्कार[संपादन]

 • ‘उद्धव श्री’ पुरस्कार [६]

हेही वाचा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ संगमनेर महाविद्यालयात माजी विद्यार्थी रमले भूतकाळात , दिव्य मराठी, अहमदनगर आवृत्ती, http://epaperdivyamarathi.bhaskar.com/ahmednagar/256/28122015/0/1/, २९ डिसेंबर २०१५ रोजी पाहिले.
 2. ^ शिवाजीनगरचा फ्लॅट भाड्याचाः अजित पवार, बुधवार, २७ एप्रिल २०११, एबीपी माझा, http://abpmajha.abplive.in/mumbai/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%9F-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-61907[permanent dead link]
 3. ^ "तांबवेत आज उद्योगपती अविनाश भोसले यांचा सत्कार" – दैनिक ऐक्य, ऐक्य समूह, ०४ मे २०१३, http://www.dainikaikya.com/20130504/5622318112303000326.htm २९ डिसेंबर २०१५ रोजी हा दुवा पाहिला.
 4. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2019-04-02. 2015-12-29 रोजी पाहिले.
 5. ^ विश्वजीत-स्वप्नालीच्या लग्नाचा शाही थाट, आयबीएन लोकमत, http://www.ibnlokmat.tv/archives/72713, २९ डिसेंबर २०१५ रोजी दुवा पाहिला
 6. ^ अविनाश भोसले, विजय शिर्के, आनंद शिंदे, पोंक्षे, भार्गवी आदींना ‘उद्धव श्री’ पुरस्कार,लोकसत्ता, पुणे आवृत्ती, दि. ३१/०७/२०१२, http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=241316:2012-07-31-19-04-17&Itemid=1, २९ डिसेंबर २०१५ रोजी दुवा पाहिला.
 7. ^ http://www.dainikaikya.com/20130504/5622318112303000326.htm, अनिल पाटील, तांबवे, दैनिक ऐक्य, ऐक्य समूह, ०४ मे २०१३ रोजीचा अंक : २९ डिसेंबर २०१५ रोजी हा दुवा पाहिला
 8. ^ झी चोवीस तास, शुभांगी पालवे, ०३ ऑक्टोबर २०१२,http://zeenews.india.com/marathi/news/nagpur-vidharbha/dhapewada-irrigation-scam-in-gondia/154298
 9. ^ शिवाजीनगरचा फ्लॅट भाड्याचाः अजित पवार, बुधवार २७ एप्रिल २०११, एबीपी माझा, http://abpmajha.abplive.in/mumbai/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%9F-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-61907[permanent dead link]
 10. ^ तरुण भारत, दिनांक १४ जानेवारी २०१५, http://www.tarunbharat.com/?p=182848२९ डिसेंबर २०१५ रोजी हा दुवा पाहिला Archived 2015-06-17 at the Wayback Machine.