Jump to content

सोमदेव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय संस्कृतिकोशात 'सोमदेव' या नावाच्या दोन नोंदी आहेत. दोघेही राजकवी आहेत पण त्यांचे काळ वेगळे आहेत. [१] History of Sanskrit Literature या ग्रंथात संपादक कृष्णमाचारियार यांनी एकूण सहा सोमदेवांचा संदर्भ दिला आहे. "यशस्तिलकचंपू"चा लेखक सोमदेवसूरि हा त्यापैकी एक आहे. आणि कथासरित्सागरचा लेखक अन्य दुसरा आहे.[२]

पहिला सोमदेव

[संपादन]

पहिला सोमदेव 'कथासरित्सागर' या संस्कृत भाषेतील प्राचीन ग्रंथाचा कर्ता आहे. आणि दुसरा सोमदेव 'ललित विग्रहराज' या नाटकाचा कर्ता आहे. पहिला सोमदेव म्हणजे 'कथासरित्सागर' या ग्रंथाचा कर्ता असलेला सोमदेव ११ व्या शतकात होऊन गेला. हा सोमदेव काश्मिरी शैव ब्राह्मण होता. त्याच्या पित्याचे नाव राम असे होते. काश्मीरचा राजा अनंत (इ.स. १०२९ ते १०६४) याच्या दरबारात हा सोमदेव राजकवी होता. त्याने 'क्रियानीतिवाक्यामृत' या नावाचा आणखी एक ग्रंथ रचला आहे, असे या नोंदीत म्हंटले आहे.

'कथासरित्सागर'ची जन्मकथा

[संपादन]

या सोमदेवाने गुणाढ्य या कवीच्या 'बृहत कथा' या एका रचनेवरून 'कथासरित्सागर' हा ग्रंथ रचला, असे कोशात नोंदलेले आहे. कोशात दिलेल्या माहितीनुसार श्री सुनीलचंद्र राय या अभ्यासकाच्या मते राजा कलश यांची आई सूर्यमती हिच्या मनोरंजनासाठी सोमदेवने कथासरित्सागर हा ग्रंथ रचला. इ.स. १०६३ ते १०८९ या काळात हा ग्रंथ रचला गेला असावा. कारण या काळात कलश गादीवर होता आणि सूर्यमती जिवंत होती.

तथापि गुणाढ्याच्या 'बृहत कथा' या रचनेवरून हा ग्रंथ रचला गेला नाही तर 'बृहत कथेच्या एका जुन्या काश्मिरी संस्करणावरून त्याने हा ग्रंथ केला असावा, असे श्री सुनीलचंद्र राय यांचे मत आहे, असे कोश म्हणतो.[१]

कथासरित्सागर हा ग्रंथ प्रौढ संस्कृत भाषेत असून कथा लेखनातील सोमदेवाचे कौशल्य त्यात दिसून येते.

कोशातील नोंदीचे संदर्भ ग्रंथ

[संपादन]
  1. मध्युयुगीन चरित्र कोश : सिद्धेश्वरशास्त्री चित्राव १९३७.
  2. दि पूना ओरिएन्टलिस्ट, २६ जानेवारी १९६१.
  3. A Companion to Sanskrit Literature , Suresh Chandra Banerji, 1971

दुसरा सोमदेव

[संपादन]

दुसरा सोमदेव हा शाकंभरीचा राजा वीसलदेव विग्रहराज याचा दरबारी कवी होता. या सोमदेवाचा काळ १२ वे शतक असावे. त्याने १२ व्या शतकाच्या पहिल्या पन्नास वर्षात केंव्हातरी वीसलदेव विग्रहराज राजाच्या स्तुतिपर ललित विग्रहराज नावाचे नाटक लिहिले, असे कोशात नोंदलेले आहे.[१]

ही नोंद लिहिण्यासाठी कोशात घेतले गेलेला संदर्भ ग्रंथ पुढीलप्रमाणे : मध्ययुगीन चरित्र कोश : सिद्धेश्वरशास्त्री चित्राव १९३७.

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ a b c भारतीय संस्कृतिकोश, खंड १०, पान १४६, "सोमदेव, संपादक : पंडित महादेवशास्त्री जोशी, सहसंपादक : तर्कतीर्थ सौ. पद्मजा होडारकर, श्री. व. ग. सहस्त्रबुद्धे, भारतीय संस्कृतिकोश मंडळ, ४१०, शनिवार पेठ, पुणे ३०, मूल्य रु. ६००/-, आवृत्ती २००९, मुद्रक : ॲलर्ट डी. टी. प्रिंटर्स, ओमकार १०/३, वडगाव (खुर्द), सिंहगड रोड, पुणे ३०; संगमनेर महाविद्यालय संगमनेर, ग्रंथालय क्र. 21251551, k/जोशी/51551 चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "भारतीय संस्कृतिकोश, खंड १०" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  2. ^ History of Sanskrit Literature, M. Krishnamachariar, Assisted by M. Srinivasachariar, page 499,Motilal Banarsidass Publishers, Delhi; ISBN: 81-208-0284-5, Price: Rs. 695/- प्रत : संगमनेर महाविद्यालय संगमनेर, ग्रंथालय क्र. 21254365, 015v/Krishnam/54365