हिपोक्रेटसची शपथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाराव्या शतकातील Byzantine manuscript of the Oath

हिप्पोक्रेटसची शपथ ही हिप्पोक्रेटस - अंदाजे इ.स.पू. ४६० ते ३७०) या प्राचीन ग्रीक वैद्याने दिलेली शपथ आहे. ती त्याच्या नावाने ओळखली जाते. त्याचे कार्य इतके मुलभूत आणि महान आहे की हिप्पोक्रेटसला पाश्चात्य वैद्यकाचा जनक मानले जाते.

ही शपथ बव्हंश वैद्यकीय महाविद्यालयातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते.

शपथ[संपादन]

मी (नव्याने वैद्यक व्यवसायात सेवा करू इच्छिणारा वैद्य ) माझे व्यावसायिक पूर्वसुरी वैद्यराज अपोलो, शल्यचिकित्साततज्ज्ञ अस्क्लीपिअस (Aesculapius), तसेच हायजिया ( Hygeia) आणि पानाकीआ (Panacea) यांची आणि साऱ्या देवी-देवतांची शपथ घेतो; आणि त्यांना साक्षी मानून मी मनःपूर्वक प्रतिज्ञा करतो की मी माझी पात्रता आणि रोगनिदान क्षमता पणास लावून ही शपथ मी पूर्णत्वास नेईन .
ज्या गुरूने मला ही वैद्यक कला शिकविली आहे, त्या गुरुजींचा; मी माझ्या माता-पित्याचा जितका आदरपूर्वक सन्मान करतो तितकाच आदरपूर्वक सन्मान करेन आणि मी आयुष्यभर त्यांची साथ देईन. माझ्या गुरूच्या पुत्रांना मी माझे भाऊबंद समजेन. माझ्या गुरूला आणि माझ्या गुरूबंधुना कधीही कशाचीही गरज पडली तर मी त्यांना अवश्य ती देईन. माझ्या गुरूबंधुना जर इच्छा असेल तर मी कोणतेही शुल्क न घेता अथवा अटी न घालता मी त्यांना माझे ज्ञान देईन. ज्या साऱ्यांनी, माझे गुरुबंधू, माझे पुत्र आणि ज्या कोणी माझ्या विद्यार्थ्यांनी ही प्रस्तुत वैद्यकीची शपथ घेतली असेल आणि ज्यांनी निःस्पृह समाजसेवेच्या या करारावर स्वाक्षरी केली असेल; केवळ त्यांनाच माझे सारे ज्ञान, माझी मिळकत आणि माझे संचित मी प्रदान करेन, इतरांना नाही. मी जे शिकलो आहे ते सारे मी त्यांना हातचे काहीही राखून न ठेवता शिकवेन.
कुणी रोग्याने मागितली तरी मीना त्याला विषारी औषधे देईनना असे औषध घेण्याचा सल्ला देईन. त्याचप्रमाणे मी कोणत्याही स्त्रीला गर्भपाताचे औषध देणार नाही. मी पूर्ण माझ्या क्षमतेनिशी या व्यवसायाची शुद्धता आणि पावित्र्य सांभाळून माझे आयुष्य आणि ही कला या दोहोंचे रक्षण करेन.
रोग्याला बरे करण्यासाठी मी त्याला योग्य असणारा सर्वोत्तम आहाराचा सल्ला देईन आणि त्याला कोणतीही इजा होणार नाही अथवा त्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेईन. मी स्वतःला निरोगी राखेन आणि माझे ज्ञान ईश्वरी प्रसाद म्हणून लोकांसाठी उपयोगात आणेन.
मी कोणावरही शस्त्रक्रिया करणार नाही , ते काम मी तज्ज्ञांसाठी राखून ठेवेन.
कोणत्याही घरात मी प्रवेश केला तर माझी तेथील भेट ही केवळ तेथील रोग्याची सोय आणि त्याचा फायदा याचसाठी असेल; आणि चुकीच्या माहितीला बळी पडून अथवा लंपटपणाच्या आहारी जाऊन रोग्याला इजा होईल किंवा अन्य काही चुकीचे काहीही मी करणार नाही. रोगी, मग ती व्यक्ति कोणत्याही दर्ज्याची असो ती, उच्च उमराव सरदार असो वा नोकर; ती व्यक्ति वेठबिगार असो वा स्वतंत्र नागरिक असो मी त्या व्यक्तिवर उपचार करून तिला बरे करेन.
ज्ञानप्राप्तीसाठी माझ्या जीवन व्यवहारात (मला आमंत्रित करण्यात आले नसले तरी) मी काही ऐकले किंवा पहिले, तर त्याची पुनरावृत्ती करणे योग्य नसेल तर मी त्यासंबंधात ते जे काही ऐकले व पहिले असेल ते सारे, माझ्या हृदयात गुप्त आणि सुरक्षित ठेवेन.
जर मी ही शपथ गांभीर्याने अमलात आणली तर मी माझ्या व्यवसायात आणि नशीबात यशस्वी आणि समृद्ध होईन आणि भावी जीवन मी अधिक उच्च दर्ज्याचे जगेन आणि मी जर ही शपथ मोडली तर माझी अवनती होईल, याची मला जाणीव आहे.