Jump to content

प्रभाकर रामचंद्र दामले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा. डॉ. प्रभाकर रामचंद्र दामले (२४ फेब्रुवारी १९०५[]- २४ फेब्रुवारी, इ.स. १९८६) मराठी संपादक[ दुजोरा हवा] होते. हे नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. ते महाविद्यालयाची पालक संस्था मॉडर्न सोसायटीचे आजीव सदस्य होते. ते स. प. महाविद्यालय, पुणे येथे तत्त्वज्ञान विभाग प्रमुख श्रीनिवास रघुनाथ कावळे यांचे तत्त्वज्ञानाचे शिक्षक होते. काही काळ प्रा. कावळे हे प्रा. दामले यांचे सहकारीही होते.[]

कौटुंबिक माहिती

[संपादन]

त्यांचा विवाह कमलिनी देसाई यांच्याशी झाला.[]

शिक्षण

[संपादन]
  • १९२४ : तत्त्वज्ञान, बी. ए.
  • १९२७ : तत्त्वज्ञान- एम.ए.

अध्यापन

[संपादन]
  • १९३४ ते १९७० : तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि नंतर विभागप्रमुख, नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे
  • रिसर्च फेलो - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फिलोसॉफी, अमळनेर
  • प्राध्यापक - तत्त्वज्ञान आणि इंग्लिश, कर्नाटक महाविद्यालय, धारवाड

कारकीर्द

[संपादन]
  • १९५४: अध्यक्ष : तर्कशास्त्र व सद्वस्तुमीमांसा विभाग, भारतीय तत्त्वज्ञान परिषद, सिलोन.
  • १९५५: निबंध सादरीकरण - आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान परिषद,ऑक्सफर्ड व लीड्स.
  • १९५८: निबंध सादरीकरण - आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान परिषद, व्हेनिस.
  • १९५९: निबंध सादरीकरण - आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान परिषद,म्हैसूर.

लेखन

[संपादन]

मराठी

[संपादन]
  • बोधवचने
  • विचारवडाच्या पारंब्या
  • चिंतन
  • १९८४ : न्यायरत्न महर्षी विनोद यांच्यावर लेख - महर्षी विनोद जीवन दर्शन

इंग्लिश

[संपादन]

मूळ लेख

[संपादन]

"श्रेष्ठ विचारवंत : प्राचार्य प्र. रा. दामले" - श्रीनिवास रघुनाथ कावळे - मूळ लेख - केसरी ०२ मार्च १९८६[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "महाराष्ट्रातील थोर तत्त्वचिंतक प्राचार्य प्र. रा. दामले यांचे गेल्या सोमवारी २४ फेब्रुवारी १९८६ रोजी दुःखद निधन झाले. त्या दिवशी त्यांना ८१ वे वर्ष लागले, त्या दिवशी ते आपल्यातून निघून गेले." - श्रीनिवास रघुनाथ कावळे, श्रेष्ठ विचारवंत : प्राचार्य प्र. रा. दामले, पहिला विभाग: काही व्यक्ती लेख, पान ५४: डॉ.श्री.र.कावळे: व्यक्ती आणि विचार,संपादक-अनंत लक्ष्मण जोशी, प्रकाशक-रोहित श्रीनिवास कावळे,इ-४,साईसदन सोसायटी, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर,न. २ पुणे ४११००९,प्रथमावृत्ती ३१ जानेवारी २००२
  2. ^ a b श्रीनिवास रघुनाथ कावळे, श्रेष्ठ विचारवंत : प्राचार्य प्र. रा. दामले, पहिला विभाग: काही व्यक्ती लेख, पान ५४ ते ५६  : डॉ.श्री.र.कावळे: व्यक्ती आणि विचार,संपादक-अनंत लक्ष्मण जोशी, प्रकाशक-रोहित श्रीनिवास कावळे,इ-४,साईसदन सोसायटी, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर,न. २ पुणे ४११००९,प्रथमावृत्ती ३१ जानेवारी २००२
  3. ^ श्रीनिवास रघुनाथ कावळे, श्रेष्ठ विचारवंत : प्राचार्य प्र. रा. दामले, पहिला विभाग: काही व्यक्ती लेख, पान ५४ ते ५६:डॉ.श्री.र.कावळे: व्यक्ती आणि विचार,संपादक-अनंत लक्ष्मण जोशी, प्रकाशक-रोहित श्रीनिवास कावळे,इ-४,साईसदन सोसायटी, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर,न. २ पुणे ४११००९,प्रथमावृत्ती ३१ जानेवारी २००२
  4. ^ a b श्रीनिवास रघुनाथ कावळे, श्रेष्ठ विचारवंत : प्राचार्य प्र. रा. दामले, पहिला विभाग: काही व्यक्ती लेख, पान ५४ ते ५६: डॉ.श्री.र.कावळे: व्यक्ती आणि विचार,संपादक-अनंत लक्ष्मण जोशी, प्रकाशक-रोहित श्रीनिवास कावळे,इ-४,साईसदन सोसायटी, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर,न. २ पुणे ४११००९,प्रथमावृत्ती ३१ जानेवारी २००२