अनुभववाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wikitext.svg
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

अनुभववाद[संपादन]

'अनुभववाद' या नावातील 'अनुभव' या शब्दाचा नेमका अर्थ प्रथम लक्षात घेतला पाहिजे. 'अनुभव' हा शब्द इंग्लिशमधील experience शब्दाचा पर्याय म्हणून वापरला जाणे आवश्यक आहे.त्यामुळे 'अनुभववाद' हे empiricism या शब्दाचे भाषांतर योग्य होईल.डोळा, नाक, कान,त्वचा, आणि रसना या इंद्रियांनी आपल्याला अनुक्रमे रुप (रंग),शब्द (आवाज),वास, स्पर्श आणि चव यांचे ज्ञान होते. यालाच 'अनुभव' म्हणतात. मूलत: ज्ञान हे इन्द्रिय आणि अर्थ किंवा वस्तु यांच्या संनिकर्षांतूनच उगम पावते, केवळ बुद्धीवर विसंबून ज्ञानाचि इमारत उभारता येत नाही. जन्मत:च आपणाजवळ् ज्ञानाचा नैसर्गिक साठा नसतो, हा सिद्धान्त तत्वज्ञानात ’अनुभववाद’ या नावाने ऒळखला जातो. कधी कधी केवळ प्रत्यक्ष-प्रमाणावर उभारलेल्या ज्ञानशास्रीय सिद्धान्त सन्ग्रहालाहि ’अनुभववाद’ म्हंटले जाते.