शिवराज्य पक्ष
शिवराज्य पक्ष हा महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आहे.
ब्रिगेडियर सुधीर सावंत हे शिवराज्य पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. हा पक्ष भारतीय राज्य घटनेचे पूर्णपणे तंतोतंत पालन करण्यासाठी स्थापन झाला आहे, असे सांगितले जाते. अखिल भारतीय फाॅर्वर्ड ब्लॉक, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया व शिवराज्य पक्ष यांच्या परिवर्तन आघाडीचे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार. (यांपैकी एकही उमेदवार निवडून आला नाही.)
अ. नं. | मतदार संघाचे नाव | उमेदवार |
---|---|---|
१ | रावेर | आमले ज्ञानेश्वर विठ्ठल |
२ | अमरावती | धनगाव नारायण गबाजी |
३ | रामटेक | भालेकर संदेश भीमराव |
४ | नागपूर | धोटे जांबुवंतराव बापूराव |
५ | हिंगोली | शेख सुलतान शेख |
६ | यवतमाळ | धोटे जांबुवंतराव बापूराव |
७ | नाशिक | आव्हाड महेश झुंजारराव |
८ | उत्तर मुंबई | थोरात सुनील उत्तमराव |
९ | उत्तर पूर्व मुंबई | पठाण साबीर मेहंदी |
१० | उत्तर मध्य मुंबई | बिर्जे हेमंत अनंत |
११ | शिरूर | कुसेकर विकास सुदाम |
१२ | अहमदनगर | बबन गंगाधर कोळसे-पाटील |
१३ | बीड | शिनगारे गोविंद भारत |
महाराष्ट्रात शिवराज्य पक्ष विधानसभा २०१४ च्या सुद्धा निवडणुका लढवीत आहे. यावेळी १३ पक्ष व समविचारी संघटनांच्या आघाडीने बनविलेल्या "संविधान मोर्चा" या नावाने शिवराज्य पक्ष विधानसभा २०१४ च्या निवडणूक मैदानात आहे.
१. http://www.mantralaylive.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%86%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE/(महाआघाडी बनविण्याचा शेकापचा प्रयत्न
२. http://shivrajyaparty.org Archived 2016-10-06 at the Wayback Machine.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |