चर्चा:शिवराज्य पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ब्रिगेडीअर सुधीर सावंत हे शिवराज्य पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. भारतीय राज्य घटनेचे पूर्णपणे तंतोतंत पालन करण्यासाठी या पक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. अखिल भारतीय फाॅर्वर्ड ब्लॉक, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया व शिवराज्य पक्ष यांच्या परिवर्तन आघाडीचे २०१४च्या लोकसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार. (यांपैकी एकही उमेदवार निवडून आला नाही.) अ. नं. मतदार संघाचे नाव उमेदवार १ रावेर आमले ज्ञानेश्वर विठ्ठल २ अमरावती धनगाव नारायण गबाजी ३ रामटेक भालेकर संदेश भीमराव ४ नागपूर धोटे जांबुवंतराव बापूराव ५ हिंगोली शेख सुलतान शेख ६ यवतमाळ धोटे जांबुवंतराव बापूराव ७ नाशिक आव्हाड महेश झुंजारराव ८ उत्तर मुंबई थोरात सुनील उत्तमराव ९ उत्तर पूर्व मुंबई पठाण साबीर मेहंदी १० उत्तर मध्य मुंबई बिर्जे हेमंत अनंत ११ शिरूर कुसेकर विकास सुदाम १२ अहमदनगर बबन गंगाधर कोळसे-पाटील १३ बीड शिनगारे गोविंद भारत चित्र:Shivrajya Party Logo shivrajya-paksh.jpg चित्र:Shivrajya Party Logo Shivrajya Party Logo महाराष्ट्रात शिवराज्य पक्ष विधानसभा २०१४ च्या सुद्धा निवडणुका लढवीत आहे. यावेळी १३ पक्ष व समविचारी संघटनांच्या आघाडीने बनविलेल्या "संविधान मोर्चा" या नावाने शिवराज्य पक्ष विधानसभा २०१४ च्या निवडणूक मैदानात आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजपा यांना सक्षम पर्याय देण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय महाराष्ट्र डावी लोकशाही समिती आणि संविधान मोर्चा यामध्ये सहभागी असलेल्या पक्षांनी घेतला आहे. महाराष्ट्र डाव्या लोकशाही समितीत शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (से.), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (से.), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.के.), सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी संघटना यांचा तर संविधान मोर्चामध्ये रिपब्लिकन सेना, शिवराज्य पक्ष, लोकशासन पक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ आदी पक्ष संघटनांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेला सक्षम पर्याय देण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय या सर्व पक्ष संघटनांनी घेतला आहे. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्र लोकशाही आघाडीबरोबरची चर्चाही अंतिम टप्प्यात असून त्यांनाही या आघाडीत सामावून घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र समिती व संविधान मोर्चा यांच्यातील जागावाटपही पूर्ण झाले असून राज्यातील सर्व म्हणजे 288 जागा या आघाडीतर्फे लढविण्यात येणार आहेत.


१. http://www.mantralaylive.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%86%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE/(महाआघाडी बनविण्याचा शेकापचा प्रयत्न

२. http://shivrajyaparty.org

३. http://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-maharashtra-election-politics-news-in-divya-marathi-4741062-NOR.html


प्रताधिकार भंग अहवाल[संपादन]

Yes check.svg झाले. - अभय नातू (चर्चा) ०७:४५, २० जुलै २०१८ (IST)