"राहुल द्रविड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: pa:ਰਾਹੁਲ ਦ੍ਰਾਵਿੜ
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ne:राहुल द्रविड़
ओळ १५७: ओळ १५७:
[[kn:ರಾಹುಲ್ ದ್ರಾವಿಡ್]]
[[kn:ರಾಹುಲ್ ದ್ರಾವಿಡ್]]
[[ml:രാഹുൽ ദ്രാവിഡ്]]
[[ml:രാഹുൽ ദ്രാവിഡ്]]
[[ne:राहुल द्रविड़]]
[[or:ରାହୁଳ ଦ୍ରାବିଡ଼]]
[[or:ରାହୁଳ ଦ୍ରାବିଡ଼]]
[[pa:ਰਾਹੁਲ ਦ੍ਰਾਵਿੜ]]
[[pa:ਰਾਹੁਲ ਦ੍ਰਾਵਿੜ]]

१८:०१, १२ मार्च २०१२ ची आवृत्ती

राहुल शरद द्रविड (जन्म जानेवारी ११, इ.स. १९७३, इंदूर, मध्य प्रदेश) हा भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला इ.स. १९९६ मध्ये सुरूवात केली. जगातील सर्वोत्तम फलंदाजांत एक गणला जातो.

राहुल द्रविड
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव राहुल शरद द्रविड
जन्म ११ जानेवारी, १९७३ (1973-01-11) (वय: ५१)
इंदूरमध्य प्रदेश),भारत
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफस्पिन
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. १९
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९९० – present कर्नाटक
२००३ Scotland
२००० Kent
कारकिर्दी माहिती
Testsए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने ११२ ३३३ २२८ ४३४
धावा ९४९२ १०५८५ १८२४० १४६७१
फलंदाजीची सरासरी ५६.५० ३९.४९ ५७.०० ४२.२७
शतके/अर्धशतके २४/४८ १२/८१ ४९/९५ २०/१०८
सर्वोच्च धावसंख्या २७० १५३ २७० १५३
चेंडू १२० १८६ ६१७ ४७७
बळी
गोलंदाजीची सरासरी ३९.०० ४२.५० ५४.६० १०५.२५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी १/१८ २/४३ २/१६ २/४३
झेल/यष्टीचीत १५३/– १९३/१४ २६८/१ २२७/१७

३ नोव्हेंबर, इ.स. २००७
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)


व्यक्तिगत

विजेता पेंढारकर या नागपूर स्थित डॉक्टरशी विवाहबद्ध.

चित्र:Rahul dravid.jpg

आंतरराष्ट्रीय कारकिर्द

राहुल द्रविडने आपल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात इ.स. १९९६-९७ च्या मोसमात श्रीलंकेविरुध्दच्या सामन्यात केली. विनोद कांबळीच्या स्थानावर द्रविडचा संघात समावेश केला गेला. सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये केवळ २१ धावांच्या कामगिरीमुळे द्रविडला एकदिवसीय संघातले आपले स्थान गमवावे लागले. संजय मांजरेकरच्या दुखापतीमुळे द्रविडला इंग्लंड दौऱ्याच्या दुसऱ्या कसोटीत संधी मिळाली. त्याने आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात ९५ धावांची सुरेख खेळी केली. मांजरेकरच्या पुनरागमनानंतरही द्रविडने कसोटी संघातले आपले स्थान राखले. १९९६-९७ च्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात जोहान्सबर्गच्या कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळताना द्रविडने आपले पहिले कसोटी शतक झळकावले. या सामन्यात १४७ आणि ८१ धावांच्या बहारदार कामगिरीबद्दल त्याला सामनावीर घोषित केले गेले. याच मोसमात त्याने एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुध्द खेळताना आपले पहिले अर्धशतक फटकावले.

पहिल्या १८ महिन्यांत द्रविडने ५६.७ च्या सरासरीने ९६४ धावा जमवल्या. १९९९च्या सुरुवातीस न्यूझीलंडविरुध्दच्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत शतकी खेळी करून विजय हजारे आणि सुनील गावसकर यांच्यानंतर असा पराक्रम करण्याची कामगिरी केली. या सामन्यात द्रविडने तब्बल ६५३ मिनिटे किल्ला लढवून १९० आणि नाबाद १०३ धावा काढल्या आणि भारताला तो सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळाले. धावफलक

२००१ च्या ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातील दुसऱ्या कसोटीतील १८० धावांची खेळी आणि व्ही.व्ही.एस्. लक्ष्मण बरोबर पाचव्या गड्यासाठीची भागीदारी भारताच्या विजयात अत्यंत मोलाची ठरली. त्या सामन्यात भारताने फॉलो-ऑन मिळाला असतानाही विश्वविजेत्या संघावर विजय मिळवला.

कॅप्टन राहुल द्रविड

राहुल द्रविडची भारतीय टीममध्ये तिसर्‍या क्रमांकावर सर्वाधिक यशस्वी बॅट्समन अशी ओळख आहे. भारतीय टीमचा कॅप्टन म्हणूनही तो यशस्वी ठरला. २००५ मध्ये भारतीय टेस्ट टीमच्या कॅप्टनपदाची धूरा राहुल द्रविड वर सोपवण्यात आली. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय टीनं २५ टेस्ट मॅच खेळली आणि यातल्या ८ मॅचमध्ये भारतीय टीम विजयी ठरली, तर ६ मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला. ११ मॅच ड्रॉ राहिल्या. द्रविड याच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्याची कमाल करुन दाखवली.

काही क्रिकेट तज्ञांच्या मानण्यानुसार याचे पुर्ण कॅरियर तो सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहेवाग या खेळाडुंमुळे थोडासा झाकोळला गेला. ज्या खेळपट्टीवर बाकीचे भारतीय खेळाडु नांगी टाकण्यात धन्यता मानत, अश्या ठिकाणी या त्याने अनेक शतके झळकावली, त्याने अनेक कसोटी सामने एकहाती वाचवले आहेत आणि अनेक कसोटी जिंकवल्या देखिल, भारतीय संघाला जेंव्हा गरज होती तेंव्हा यष्टी रक्षणाचे महत्वाचे काम त्याने केले. तर कधी भारताच्या फलंदाजीची सुरुवात त्याने केली.

२०११ - १२ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात राहुल द्रविडची कामगिरी चांगली झाली नव्हती. ९ मार्च २०१२ रोजी बंगळुरुमध्ये पत्रकार परिषदेत राहुल द्रविडने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. याआधीच त्याने वन डे आणि टी-20 क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती. आय पी एल मध्ये २०१२ मध्ये तो राजस्थान रॉयल्स चा कर्णधार म्हणून तो खेळणार आहे.

मिळालेले पुरस्कार

  1. १९९८ - अर्जुन पुरस्कार
  2. २००० - विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर
  3. २००४ - आयसीसी (ICC) टेस्ट प्लेअर ऑफ द इयर
  4. २००४ - आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर
  5. २००४ - पद्मश्री पुरस्कार
  6. २००६ - कॅप्टन ऑफ द आयसीसी टेस्ट टीम
  7. २०११ - पॉली उम्रीगर पुरस्कार
मागील:
सौरव गांगुली
भारतीय क्रिकेट संघाचे नायक
पुढील:
महेन्द्रसिंग धोणी