Jump to content

"मुहूर्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:


* सूर्योदयापासून ३ मुहूर्त - प्रातःकाळ
* सूर्योदयापासून ३ मुहूर्त - प्रातःकाळ
* त्यानंतरचे ३ मुहूर्त - संगवकाळ (गायीच्या बछड्यांना गाईचे दूध पिऊ देण्याचा आणि गाईंना चरायला नेण्याचा काळ). संगव = गाईंना एकत्र आणणे.
* त्यानंतरचे ३ मुहूर्त - छ
* त्यानंतरचे ३ मुहूर्त - मध्यान्हकाळ
* त्यानंतरचे ३ मुहूर्त - मध्यान्हकाळ
* त्यानंतरचे ३ मुहूर्त - अपराण्हकाळ - [[श्राद्ध|श्राद्धासाठी]] महत्त्वाचा काळ.
* त्यानंतरचे ३ मुहूर्त - अपराण्हकाळ - [[श्राद्ध|श्राद्धासाठी]] महत्त्वाचा काळ.

२२:३१, २० मार्च २०१९ ची आवृत्ती

दिनमानाचा पंधराव्या भागास मुहूर्त म्हणतात. रात्रिमानाचेही तेवढेच मुहूर्त असतात. (शुभकर्मास योग्य असलेल्या काळासही मुहूर्त असे म्हणतात. हा मुहूर्त पंधराव्या भागाहून वेगळा आहे.)

  • सूर्योदयापासून ३ मुहूर्त - प्रातःकाळ
  • त्यानंतरचे ३ मुहूर्त - संगवकाळ (गायीच्या बछड्यांना गाईचे दूध पिऊ देण्याचा आणि गाईंना चरायला नेण्याचा काळ). संगव = गाईंना एकत्र आणणे.
  • त्यानंतरचे ३ मुहूर्त - मध्यान्हकाळ
  • त्यानंतरचे ३ मुहूर्त - अपराण्हकाळ - श्राद्धासाठी महत्त्वाचा काळ.
  • त्यानंतरचे ३ मुहूर्त - सायंकाळ -हा कोणत्याही कर्मास प्रशस्त मानला जात नाही.

मुहूर्त हा शब्द ऋग्वेदामधे दोन ठिकाणी आला आहे. दोन्ही ठिकाणी त्याचा अर्थ ’थोडा काळ, थोडे क्षण’, मुहुर्त म्हणजे दिवसाचा पंधरावा भाग असाही अर्थ सांगितला जातो. दिवसाचे पंधरा आणि रात्रीचे पंधरा अशी मुहूर्त सांगितले जातात. दोन घटिकांचा एक मुहुर्त होतो.

’जी कृत्ये काही विशिष्ट नक्षत्रे नक्षत्रांवर करावी असे सांगितले असेल ती कृत्ये त्या नक्षत्राच्या ज्या देवता असतील त्याच देवता असणा-या तिथीवर अथवा करणांवर आणि मुहूर्तांवर करण्यास प्रत्यवाय नसतो: त्यांच्या देवता समान असल्याकारणाने असे केल्याने कार्यसिद्धी होते.

मुहूर्त म्हणजे, एखादे शुभ कृत्य करण्याला विहित असा काल. मुहुर्ताला ग्रह बारा भाव (म्हणजे कुंडलीतील १२ स्थाने) आणि राशी यांची माहिती असणे आवश्यक असते.

मुहूर्तमुक्तावलीत कोणती कृत्य कधी करावीत त्याबद्दलचे नियम सांगितले आहेत. प्राचीनकाळी नक्षत्रांचे पुण्यकारक आणि पापकारक, पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी, उग्र आणि क्रृर असे निरनिराळे विभाग करण्यात आले होते. नक्षत्रांचे ध्रुव आणि स्थिर तीक्ष्ण अथवा दारुण, चर आणि चल इत्यादि आणखीही विभाग केले असून ह्या संज्ञांना अनुसरुन कोणती कृत्य कोणत्या प्रकारच्या नक्षत्रांवर करावी ह्यासंबधीचे नियम सांगितले आहेत.

मुहूर्तचिंतामणी ग्रंथात नक्षत्रांप्रमाणे वारांनाही ध्रुव, चर, ह्यासारख्या संज्ञा दिल्या असून त्या नावाच्या नक्षत्रांना अनुरूप असणारी कृत्ये त्यांच्याच स्वरूपाच्या वारांवर करावी असे सांगितले आहे.

अन्य मुहूर्त

अभिजित मुहूर्त, गोरज मुहूर्त, चौघडिया मुहूर्त, ब्राह्म मुहूर्त, साडेतीन मुहूर्त, वगैरे,

विवाहासाठीचे मुहूर्त

विवाह मुहूर्ताचे पुढील चार प्रकार होत--

१) गोपाल मुहूर्त -- सूर्योदयास असणारा मुहूर्त

२) दिवा मुहूर्त -- सूर्योदयानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत

३) मध्यान्ह अभिजित -- दुपारी १२ वाजल्यानंतर सायंकाळपर्यंत

४) गोरज मुहूर्त -- सूर्यास्ताच्या समयी अथवा त्यानंतर.( संध्यासमयी )