"महाराष्ट्रातील घाट रस्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
removed Category:पुरुष चरित्रलेख - हॉटकॅट वापरले. चुकीचा वर्ग काढला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७५: ओळ ७५:
* रत्‍नागिरी-मलकापूर रस्त्यावर विशाळगड घाट
* रत्‍नागिरी-मलकापूर रस्त्यावर विशाळगड घाट
* विळद घाट हा अहमदनगरच्या उत्तरेस नगरहून राहुरीला जाणार्‍या रस्त्यावर लागतो. या घाटाचे विषेश म्हणजे याला समांतर जाणारी पाईपलाईन ही दिसते
* विळद घाट हा अहमदनगरच्या उत्तरेस नगरहून राहुरीला जाणार्‍या रस्त्यावर लागतो. या घाटाचे विषेश म्हणजे याला समांतर जाणारी पाईपलाईन ही दिसते
* वेताळवाडी घाट. हा घाट औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील [[वेताळगड]] किल्ल्याजवळ आणि वेताळवाडी धरणाजवळ आहे.
* खांडस (कर्जत) ते भीमाशंकर दरम्यान शिडी घाट, गुगळ घाट आणि गणेश घाट हे तीन वेगळे पायरस्ते आहेत.
* खांडस (कर्जत) ते भीमाशंकर दरम्यान शिडी घाट, गुगळ घाट आणि गणेश घाट हे तीन वेगळे पायरस्ते आहेत.
* शेंडूर घाट : गोंदुकुप्पी-शेंडूर दरम्यानचा (बेळगाव जिल्हा)
* शेंडूर घाट : गोंदुकुप्पी-शेंडूर दरम्यानचा (बेळगाव जिल्हा)
ओळ ८५: ओळ ८६:
* सिंहगड घाट रस्ता (खडकवासला ते सिंहगड दरम्यानचा)
* सिंहगड घाट रस्ता (खडकवासला ते सिंहगड दरम्यानचा)
* सुर्ली घाट - हा [[सातारा]] जिल्ह्यात [[कडेगांव]] तालुक्यात आहे. [[कराड]]हून पलूस-विटा कडे जाताना हा घाट लागतो. जवळच [[सदाशिवगड (कराड)]] हा किल्ला आहे.
* सुर्ली घाट - हा [[सातारा]] जिल्ह्यात [[कडेगांव]] तालुक्यात आहे. [[कराड]]हून पलूस-विटा कडे जाताना हा घाट लागतो. जवळच [[सदाशिवगड (कराड)]] हा किल्ला आहे.
* हळदाघाट : हा घाट औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील अंभईजवळ आहे.
* हातलोट घाट : हा [[मधुमकरंदगड|मधुमकरंदगडाला]] जाताना लागतो.
* हातलोट घाट : हा [[मधुमकरंदगड|मधुमकरंदगडाला]] जाताना लागतो.
* हातिवले घाट (ओणी ते हातिवले दरम्यान)
* हातिवले घाट (ओणी ते हातिवले दरम्यान)

१०:५५, २८ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

महाराष्ट्रात सह्यादीच्या अनेक डोंगररांगा असल्याने डोंगर एका बाजूने चढून वाटल्यास दुसर्‍या बाजूने उतरण्यासाठी घाट रस्त्याचा वापर करावा लागतो. काही घाट रस्त्यांनी फक्त पायी जाणे शक्य असते, तर काही घाटांमधून गाडी रस्ते किंवा रेल्वे मार्ग बनवले आहेत. ज्या घाटांनी पायी जाणेच शक्य असते त्यांतले काही सोपे तर काही अतिशय अवघड असतात. ते पार करण्यासाठी थोडेफार गिर्यारोहणही करावे लागते. खाली दिलेल्या तक्त्यामध्ये महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध घाटांची माहिती दिली आहे. ज्या प्रसिद्ध, अप्रसिद्ध आणि अल्पप्रसिद्ध घाटांची तपशीलवार माहिती मिळू शकली नाही ते घाट असे --

  • डहाणू-नासिक रस्त्यावर अव्हाट घाट (हा तक्त्यात अव्हाटा घाट या नावाने आला आहे).
  • आपटी खिंड (पवन मावळ)
  • आंबडस घाट (परशुराम घाट|परशुराम घाटाला]] पर्यायी घाट)
  • खेड ते मेढे, सातारा रस्त्यावर आंबोली घाट (तक्त्यात तीन आंबोली घाट आहेत).
  • आरवली घाट (संगमेश्वर तालुका), मुंबई गोवा मार्ग. आरवली-तुरळ-बावनदी रस्ता.
  • इन्सुली घाट : हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि बांदा यांच्या दरम्यान आहे.
  • उपांड्या घाट : पुणे-खडकवासला-खानापूर-रांजणे-पाबे-वेल्हा-केळद-उपांडाखिंड-कर्णवडी-रानवडी-महाड : अंतर - १०६ किमी ; (केळदनंतर ही पायवाट आहे).
  • पेण-लोणावळे रस्त्यावर उबरखिंड घाट (तक्त्यात असलेला उंबरदरा घाट वेगळा असावा).
  • उर्से खिंड (पवन मावळ)
  • ओणी घाट
  • जुन्नर-पैठण रस्त्यावरील कसारवाडी घाट
  • कर्जत ते आंध्र खोरे व नवलाख उंबरे रस्त्यावर कसूर घाट
  • कळढोण घाट
  • सुरगाणा-कळवण रस्त्यावर कांचनमंचन व मोरकंडा घाट
  • महाड-भोर रस्त्यावर कामठा घाट, भोपे घाट व वरंधा घाट (वरंधा घाट तक्त्यात आहे).
  • कामथे घाट (चिपळूण शहर आणि सावर्डे यांच्या दरम्यान)
  • कुंडल घाट
  • कुंभार्ली घाट (नवजा घाटाला पर्यायी रस्ता)
  • कुंभे घाट : मानगड पायथ्याचे बोरवाडी/चाचेगाव (कोकण)-माजुर्णे गाव- माथ्यावरचे कुंभे गाव. किंवा मानगड-माजुर्णे-कुंभेघाट-कुंभेवाडी.
  • केळघर घाट : हा घाट महाडवरून साताऱ्याकडे जाताना लागतो.
  • केळद घाट (हा वेल्हे तालुक्यात आहे) तो घाटावरचे केळद गाव आणि कोकणातले कर्णवाडी/कर्णवडी गाव यांना जोडतो. या घाटालाच मढे घाट म्मणतात. सिंहगडच्या लढाईत मेलॆल्या मावळ्यांची प्रेते याच घाटातून कॊकणातील उमरठ गावी नेली.
  • खालापूर-नाणे रस्त्यावर कोकण दरवाजा घाट किंवा राजमाची घाट
  • कोंझर (रायगडच्या पायथ्याचे गाव) व पाचाड यांच्या दरम्यानचा घाट
  • भडोच व सुरत ते सटाणा-पाटण-पैठण रस्त्यावरील कोंडाईवारी घाट
  • राजापूर-लांजा-रत्‍नागिरी रस्त्यावर कोंड्ये घाट
  • मुरपाड-पोडे-आंबेगाव रस्त्यावर कोपाली घाट
  • कर्जत ते खेड कडूस रस्त्यांवर कोळंबा घाट व सावळा घाट (तक्त्यात एक सावळ घाट आहे, तो वेगळा घाट असावा)
  • कोल्हापू्र ते कोकण रस्त्यावरील गगनबाबडा घाट आणि भुईबावडा घाट
  • खांडस (कर्जत) ते भीमाशंकर दरम्यान गणेश घाट, गुगळ घाट आणि शिडी घाट हे तीन वेगळे पायरस्ते आहेत..
  • डहाणू, जव्हार ते नाशिक रस्त्यावर गोडा घाट व आंबोली घाट (तक्त्यात आहे)
  • पुणे-नाशिक रस्त्यावर खेड घाट
  • खोनोली-कोचरेवाडी घाट (चाफळ - सातारा जिल्हा)
  • गोप्या घाट
  • चाकण-शिक्रापूर रस्त्यावर साबळेवाडीजवळचा घाट
  • शहापूर-अकोले(नगर जिल्हा) रस्त्यावर चेंढ्या घाट व मेंढ्या घाट
  • टेरव घाट (कामथे घाटाला पर्यायी घाट)
  • तळेगाव खिंड (पवन मावळ)
  • जंजिरा-पौड रस्त्यावर ताम्हण घाट
  • तिलारी घाट (दोडामार्ग तालुका - सिंधुदुर्ग जिल्हा)
  • कल्याण-अकोले रस्त्यावर तोरण घाट
  • दिघी घाट
  • दुधिवरे खिंड (पवन मावळ)
  • दौंडज खिंड- जेजुरी-वाल्हे रस्त्यावरील जयाद्री डोंगरावरची खिंड
  • नडगिवे घाटे : हा खारेपाटण आणि तळेरे यांच्या दरम्यान आहे.
  • नवजा घाट (कुंभार्ली घाटाला पर्यायी रस्ता)
  • नाणदांड घाट (सुधागड परिसरातील घाट)
  • नेरळ रेल्वे स्टेशनपासून ते माथेरानपूर्वी येणार्‍या दस्तुरी नाक्यापर्यंतचा घाट
  • न्हावी घाट
  • पाबे घाट (हा वेल्हे तालुक्यात आहे). पुण्यापासून नसरापूर/ पानशेत/ पाबे घाट - वेल्हे.
  • दमण ते सटाणा रस्त्यांवर पिंडवलवारी घाट
  • पुणे-नाशिक रस्त्यावर पेठ-अवसरी घाट (तालुका आंबेगाव)
  • बऊर खिंड (पवन मावळ)
  • डांग-सटाणा रस्त्यावर बाभुळणा घाट
  • विजयदुर्ग, देवगड ते बावडा रस्त्यावर बावडा घाट
  • जामरूख (कर्जत) ते भीमाशंकर दरम्यान बैला घाट; वाजंत्री घाट.
  • बोपदेव घाट : सासवड आणि पुणे(स्वारगेट) यांच्या दरम्यान-सिंहगड कॉलेजमार्गे.
  • बोचेमाळ घाट : देशावरून कोकणात उतरणारी एक पायवाट; खानू (पुणे जिल्हा)-हेडमाची पठार-वारंगी (रायगड जिल्हा)
  • भट्टी घाट : तोरणा किल्ला आणि केळद यांच्या दरम्यान
  • नेरळ-पनवेल ते घाडे-आंबेगाव रस्त्यावर भीमाशंकर घाट
  • राजापूर-भुईबावडा घाट-पहिलीवाडी. गगनबावडा घाटाला पर्यायी घाट
  • महाड-भोर रस्त्यावर भोपे घाट, वंरधा घाट व कामठा घाट (वरंधा घाट तक्त्यात आहे).
  • मढे घाट : वेल्हे-केळद. केळद गावापासून दीड किलोमीटरवर मढे घाट.
  • शहापूर-अकोले(नगर जिल्हा) रस्त्यावर मेंढ्या घाट व चेंढ्या घाट
  • सुरगाणा-कळवण रस्त्यावर मोरकंडा घाट व कांचनमंचन घाट
  • रघुवीर घाट : हा मोटारेबल घाट महिमंडणगडाजवळ आहे.
  • बलसाड व दमण ते पेठ रस्त्यावर राजबारी घाट
  • खालापूर-नाणे रस्त्यावर राजमाची घाट किंवा कोकण दरवाजा घाट
  • रामपूर घाट (चिपळूण आणि गुहागर तालुक्यांना जोडणारा घाट)
  • रोटी घाट - पाटस ते रोटी या दरम्यान.. पुणे-सोलापूर महामार्ग (वरवंड व उंडवडी गवळ्याची यांच्या दरम्यानचा घाट)
  • कोलाड-भोर रस्त्यावर लिंग घाट, देव घाट व कुंभ घाट (तक्त्यात एक कुंभा घाट आहे)
  • वर्धनगड घाट - सातारा-दहीवडी रस्त्यावर कोरेगावजवळ
  • जामरूख (कर्जत) ते भीमाशंकर दरम्यान वाजंत्री घाट; बैला घाट..
  • रत्‍नागिरी-मलकापूर रस्त्यावर विशाळगड घाट
  • विळद घाट हा अहमदनगरच्या उत्तरेस नगरहून राहुरीला जाणार्‍या रस्त्यावर लागतो. या घाटाचे विषेश म्हणजे याला समांतर जाणारी पाईपलाईन ही दिसते
  • वेताळवाडी घाट. हा घाट औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील वेताळगड किल्ल्याजवळ आणि वेताळवाडी धरणाजवळ आहे.
  • खांडस (कर्जत) ते भीमाशंकर दरम्यान शिडी घाट, गुगळ घाट आणि गणेश घाट हे तीन वेगळे पायरस्ते आहेत.
  • शेंडूर घाट : गोंदुकुप्पी-शेंडूर दरम्यानचा (बेळगाव जिल्हा)
  • शिंदवणे घाट : पंढरपूरहून आळंदीला जाताना (जेजुरी-आळंदी रस्त्यावर) पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन जवळ.
  • वाडे-नाशिक रस्त्यावर शिरघाट (तक्त्यात श्रीघाट या नावाने)
  • दमण, पेठ ते नाशिक रस्त्यावर सत्ती घाट
  • सालपे घाट
  • पेठ-दिंडोरी रस्त्यावर सावळ घाट
  • कर्जत ते खेड कडूस रस्त्यांवर सावळा घाट व कोळंबा घाट (तक्त्यात एक सावळ घाट आहे, तो वेगळा घाट असावा)
  • सिंहगड घाट रस्ता (खडकवासला ते सिंहगड दरम्यानचा)
  • सुर्ली घाट - हा सातारा जिल्ह्यात कडेगांव तालुक्यात आहे. कराडहून पलूस-विटा कडे जाताना हा घाट लागतो. जवळच सदाशिवगड (कराड) हा किल्ला आहे.
  • हळदाघाट : हा घाट औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील अंभईजवळ आहे.
  • हातलोट घाट : हा मधुमकरंदगडाला जाताना लागतो.
  • हातिवले घाट (ओणी ते हातिवले दरम्यान)

तक्ता

क्रमांक घाटमार्ग घाटपायथ्याचे गाव घाटमाथ्याचे गाव घाटवैशिष्ट्य/परिसरातील किल्ले
अणस्कुरा घाट येरडव ता.राजापूर जि.रत्‍नागिरी अणस्कुरा ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर बैलगाडीरस्ता; घाटमाथ्यावर-शिलालेख
अंबाघाट साखरपे ता.संगमेश्वर जि.रत्‍नागिरी अंबा ता. शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर गाडी रस्ता(राज्यमार्ग);किल्ले: विशाळगड
अव्हाटा घाट खोडाळा ता. मोखाडा जि. ठाणे झारवड/अव्हाटा पायरस्ता; किल्ले: भोपटगड
अहुपे घाट देहेरी ता.मुरबाड जि. ठाणे अहुपे ता. जुन्नर जि. पुणे पायरस्ता; किल्ले: सिद्धगड, गोरखगड, मच्छिंद्रगड , भीमाशंकर
आंबेनळी (फिट्झेराल्ड(फिट्‌सेरल्ड)/रडतोंडी) घाट वाडा कुंभरोशी ता.महाबळेश्वर जि. सातारा महाबळेश्वर ता.महाबळेश्वर जि.सातारा महाड-महाबळेश्वर गाडीरस्ता; किल्ले: प्रतापगड, चंद्रगड
आंबोली घाट मोखाडा ता.मोखाडा जि.ठाणे अळवंडी(वैतरणा) ता. इगतपुरी जि. नाशिक पायरस्ता; किल्ले: हरिहर, उतवड, भाजगड
आंबोली(२) घाट पळू ता.मुरबाड जि.ठाणे आंबोली ता.जुन्नर जि.पुणे पायरस्ता; किल्ले: धाकोबा, जीवधन
आंबोली(३) घाट सावंतवाडी ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग आंबोली ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग सावंतवाडी-बेळगाव गाडीरस्ता; आंबोली थंड हवेचे ठिकाण, हिरण्यकेशी(नैसर्गिक गुहा)
आंबोली(४)घाट आंबोली ता.खेड जि.रत्‍नागिरी चक्रदेव ता.जावळी जि.सातारा पायरस्ता; किल्ले: रसाळगड, सुभारगड, महिपतगड
१० उत्तर तिवरे घाट तिवरे ता.चिपळूण/खेड जि.रत्‍नागिरी वासोटा ता.जावळी जि. सातारा पायरस्ता; किल्ले: वासोटा
१०अ उपांड्या घाट वेल्हा, केळद (पुणे जिल्हा) कर्णावाडी (कोंकण) पायरस्ता; मढे घाटशिवथरघळ
११ उंबरदरा घाट चोंढा/साकुर्ली ता.शहापूर जि.ठाणे साम्रद ता.अकोले जि.अहमदनगर पायरस्ता; किल्ले: रतनगड, शिपनेर
१२ एकदरा घाट टाकेद ता.इगतपुरी जि.नाशिक कोकणेवाडी ता.अकोले जि.अहमदनगर पायरस्ता; किल्ले: अवंध, पट्टा
१३ औटराम घाट चाळीसगांव ता.चाळीसगांव जि.जळगाव कन्नड ता.कन्नड जि.औरंगाबाद चाळीसगांव-औरंगाबाद गाडीरस्ता; पितळखोरे लेणी, गौतम गुंफा, गौताळा अभयारण्य
१४ कंचना मंचना घाट चांदवड, ता.चांदवड जि.नाशिक देवळा ता.सटाणा जि.नाशिक सटाणा-नाशिक राज्यमार्ग; किल्ले: कंचन मंचन, राजधेर, इंद्राई
१५ करूळ घाट करूळ ता.वैभववाडी जि.सिंधुदुर्ग गगनबावडा ता.गगनबावडा जि.कोल्हापूर गाडीरस्ता; किल्ले: गगनबावडा
१६ करोली घाट डोळखांब ता.शहापूर जि.ठाणे साम्रद ता.अकोले जि. अहमदनगर पायरस्ता; किल्ले: रतनगड, बाण सुळका
१७ कशेडी घाट खेड ता.खेड जि.रत्‍नागिरी पोलादपूर ता.पोलादपूर जि.रायगड मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग
१८ कसारा घाट (थळघाट) कसारा ता.शहापूर जि.ठाणे इगतपुरी ता.इगतपुरी जि.नाशिक रेल्वेमार्ग, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग; किल्ले: बळवंतगड, त्रिंगलवाडी
१९ कात्रज घाट कात्रज ता.हवेली जि.पुणे खेड शिवापूर ता.हवेली जि.पुणे पुणे-सातारा-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र.४
२० कानंद घाट हरपूड/शिंगणापूर ता.महाड जि.रायगड निवी ता.वेल्हा जि.पुणे पायरस्ता; किल्ले: तोरणा, लिंगाणा, रायगड
२१ कावला-बावला घाट/कावळ्या घाट सांदोशी छत्री निजामपूर ता.महाड जि.रायगड पानशेत ता.मुळशी जि.पुणे पायरस्ता; किल्ले: रायगड, कोकणदिवा
२२ कुंडी घाट कुंडी/देवरूख ता.संगमेश्वर जि.रत्‍नागिरी चांदेल ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर पायरस्ता; किल्ले: महिमनगड
२३ कुंभा घाट कुंभा ता.माणगांव/इंदापूर जि.रायगड दापसर ता.मुळशी जि.पुणे पायरस्ता; किल्ले: कुर्डुगड; मुळशी तलाव/धरण, भिरा विद्युत्‌केंद्र
२४ कुंभार्ली घाट चिपळूण जि.रत्‍नागिरी हेळवाक ता.पाटण जि.सातारा चिपळूण-कर्‍हाड गाडीरस्ता; किल्ले जंगली जयगड; कोयना धरण, शिवसागर तलाव
२५ कुरवंडा घाट उंबरे ता.सुधागड जि.रायगड आय.एन.एस.शिवाजी ता.मावळ,जि.पुणे पायरस्ता; किल्ले: तुंग, तिकोना, नागफणी, उंबरखिंड
२६ कुसूर घाट वैजनाथ भिवपुरी ता.कर्जत जि.रायगड कुसूर ता.मावळ जि.पुणे पायरस्ता; किल्ले: ढाकबहिरी, राजमाची: आंद्रा तलाव, भिवपुरी विद्युत्‌केंद्र
२७ खंडाळ्याचा घाट (बोरघाट) खोपोली ता.खालापूर जि.रायगड खंडाळा ता.मावळ जि.पुणे मुंबई-बंगलोर महामार्ग ४, रेल्वेमार्ग; किल्ले: राजमाची, नागफणी, खंडाळा/लोणावळा थंड हवेची ठिकाणे
२८ खंबाटकी घाट वाई ता.वाई, जि.सातारा खंडाळा ता.खंडाळा जि.सातारा पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग ४; किल्ले: चंदन वंदन
२९ खुटा घाट धसई ता.मुरबाड जि.ठाणे दुर्गवाडी/आंबवली ता.जुन्नर जि.पुणे पायरस्ता; किल्ले: गोरखगड, मच्छिंद्रगड, धाकोबा
२९ अ गगनबावडा (करूळ) घाट करूळ ता.वैभववाडी जि.सिंधुदुर्ग गगनबावडा ता.गगनबावडा जि.कोल्हापूर गाडीरस्ता; किल्ले: गगनबावडा
३० गणेश घाट खांडस/कशेळे ता.कर्जत जि.रायगड भिमाशंकर ता.खेड जि.पुणे पायरस्ता; किल्ले: पदरचा किल्ला, पेठचा किल्ला; भिमाशंकर ज्योतिर्लिंग
३१ गुयरीचा दरा डेहेणे/साकुर्ली ता.शहापूर जि.ठाणे कुमशेत/पाचनई ता.अकोले जि. नगर पायरस्ता; किल्ले: आजापर्वत, कात्राबाई, गनचक्कर
३२ गोंदा घाट मोखाडा ता.मोखाडा जि.ठाणे त्र्यंबक ता.नाशिक जि.नाशिक जव्हार-त्र्यंबक गाडीरस्ता; त्र्य़ंबकेश्वर ज्योतिर्लिंग, किल्ले ब्रह्मगिरी, हरिहरगड
३२अ गोप्या घाट कसबे शिवथर गोप्या पायरस्ता वेल्हा-कुंबळे-गोप्या घाट; वेल्हा-निगडे-गोप्या घाट-(कसबे-कुंभे-अंभे)शिवथर
३२ब घोटगी घाट मालवण आजरे मालवण-आजरे गाडीरस्ता
३३ चंदनापुरीचा घाट चंदनापुरी ता.संगमनेर जि.अहमदनगर डोळासणे ता.संगमनेर जि.अहमदनगर पुणे-नाशिक राज्यमार्ग
३४ चोंढा घाट डोळखांब ता.शहापूर जि.ठाणे घाटघर ता.अकोले जि. अहमदनगर पायरस्ता; किल्ले: अलंग, कुलंग, शिपनेर
३५ ढवळ्या घाट ढवळा/उमरठ ता.पोलादपूर जि.रायगड जोर ता.वाई जि.सातारा पायरस्ता; किल्ले: आर्थरसीट-महाबळेश्वर, चंद्रगड
३५अ ताम्हिणी घाट मुळशी (पुणे जिल्हा) माणगाव (अलिबाग जिल्हा) गाडी रस्ता.मुळशी तलाव
३६ तोलार खिंड पाचनई ता.अकोले जि.अहमदनगर खुबी, खिरेश्वर ता.जुन्नर जि.पुणे पायरस्ता; किल्ले: हरिश्चंद्रगड
१८ थळघाट (कसार्‍याचा घाट) कसारा ता.शहापूर जि.ठाणे इगतपुरी ता.इगतपुरी जि.नाशिक रेल्वेमार्ग, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग; किल्ले: बळवंतगड, त्रिंगलवाडी
३७ दर्‍या घाट धसई ता.मुरबाड जि.ठाणे हातवीज/दुर्गवाडी ता.आंबेगांव जि.पुणे पायरस्ता; किल्ले: दुर्ग, धाकोबा
३८ दक्षिण तिवरे (नायरीचा घाट) नायरी ता.संगमनेर जि.अहमदनगर चांदोली ता.शिराळा जि.सांगली पायरस्ता; किल्ले: प्रचितगड
३९ दिवे घाट हडपसर ता.हवेली जि.पुणे सासवड ता.पुरंदर जि.पुणे पुणे-सासवड रस्ता ; किल्ले: पुरंदर
५७अ देव घाट (लिंग्या घाट)
३९अ नणंद भावजय घाट शहादा धडगांव धुळे जिल्हा
३९ब नरदा घाट मालवण कोल्हापूर मालवण-कोल्हापूर गाडीरस्ता
४० नाणेघाट वैशाखर ता.मुरबाड जि.ठाणे घाटघर ता.जुन्नर जि.पुणे सुप्रसिद्ध पुरातन घाटमार्ग, पायरस्ता; किल्ले: जीवधन, चावंड, हडसर; घाटाच्या माथ्यावर जकात साठवण्यास दगडी रांजण, दगडात कोरलेली रहाण्याजोगी गुहा
३८ नायरीचा घाट (दक्षिण तिवरेघाट) नायरी ता.संगमनेर जि.अहमदनगर चांदोली ता.शिराळा जि.सांगली पायरस्ता; किल्ले: प्रचितगड
३८अ निवळी घाट बावनदी हातखंबा मुंबई-गोवा महामार्ग;निवळी-गणपतीपुळे गाडीरस्ता
३८ब निसणीची वाट पुणे-भोर मार्ग
४१ परशुराम घाट खेड ता.खेड जि.रत्‍नागिरी चिपळूण ता.चिपळूण जि.रत्‍नागिरी मुंबई-गोवा महामार्ग; परशुराम मंदिर, वासिष्ठी खाडी
४२ पसरणीचा घाट वाई ता.वाई जि.सातारा पांचगणी ता.महाबळेश्वर जि.सातारा वाई-महाबळेश्वर गाडीरस्ता; किल्ले: बावधन, पांडवगड, कमलगड; पांचगणी-थंड हवेचे ठिकाण
४३ पार घाट कापडे/किन्हेश्वर ता.पोलादपूर जि.रायगड वाडा कुंभरोशी ता.महाबळेश्वर जि. सातारा पायरस्ता; जावळीचे अरण्य; किल्ले: प्रतापगड
४४ पिंपरी घाट फुगाळा/कसारा ता.शहापूर जि.ठाणे पिंपरी सद्‌रुद्दिन ता.इगतपुरी जि.नाशिक पायरस्ता; किल्ले: अलंग, कुलंग, मदन
फिट्झेराल्ड(फिट्‌सेरल्ड) घाट (आंबेनळी घाट/रडतोंडी घाट) वाडा कुंभरोशी ता.महाबळेश्वर जि. सातारा महाबळेश्वर ता.महाबळेश्वर जि.सातारा महाड-महाबळेश्वर गाडीरस्ता; किल्ले: प्रतापगड, चंद्रगड
४५ फोंडा घाट फोंडा ता.कणकवली जि.सिंधुदुर्ग दाजीपूर ता. राधानगरी जि.कोल्हापूर देवगड-कोल्हापूर गाडीरस्ता; दाजीपूर गवा अभयारण्य; किल्ले: शिवगड , विजयदुर्ग
४६ बाभुळणा घाट चिंचली ता.डांग जि.डांग(गुजरात) मुल्हेर ता.सटाणा जि. नाशिक पायरस्ता; किल्ले: मुल्हेर, सालोटा, साल्हेर
४७ बावडा घाट भुईबावडा ता. वैभववाडी जि.सिंधुदुर्ग गगनबावडा, जि.कोल्हापूर कोल्हापूर-राजापूर गाडीरस्ता; किल्ले:गगनबावडा
४८ बिजासनी घाट शिरपूर ता.दोंडाइचा जि.धुळे सैधवा(मध्य प्रदेश) मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग; बिजासनीदेवीचे मंदिर
४९ बोचे घळ पाणे/वारंगी ता.महाड जि.रायगड वेल्हे जि.पुणे पायरस्ता; किल्ली: तोरणा, शिवथरघळ
५० बोप्या घाट शिवथर ता.महाड जि.रायगड वेल्हे जि.पुणे पायरस्ता; किल्ले:तोरणा, रायगड, लिंगाणा
२७ बोरघाट (खंडाळ्याचा घाट) खोपोली ता.खालापूर जि.रायगड खंडाळा ता.मावळ जि.पुणे मुंबई-बंगलोर महामार्ग ४, रेल्वेमार्ग; किल्ले: राजमाची, नागफणी,खंडाळा/लोणावळा थंड हवेची ठिकाणे
५०अ बोराटा नाळ
५१ बैलघाट महसा/नारीवली ता.मुरबाड जि.ठाणे भिमाशंकर ता.खेड जि.पुणे पायरस्ता; किल्ले:गोरख, मच्छिंद्रगड, सिद्धगड; भिमाशंकर ज्योतिर्लिंग
५१अ भोस्ते घाट कशेडी (रत्‍नागिरी जिल्हा) परशुराम (रत्‍नागिरी जिल्हा) मुंबई-गोवा रस्ता; खेड शहर
५१ब मढे घाट उपांड्या घाट कर्णावाडी पायवाट; शिवथरघळ
५२ मायदरा घाट टाकेद ता.इगतपुरी जि.नाशिक बिताका ता.अकोले जि.अहमदनगर पायरस्ता; किल्ले:अवंध, पट्टा, बितनगड
५३ माळशेज घाट मोरोशी ता.मुरबाड जि.ठाणे माळशेज ता.जुन्नर जि.पुणे कल्याण-मुरबाड-जुन्नर गाडीरस्ता; किल्ले:जिवधन, भैरवगड, हरिश्चंद्रगड; माळशेज थंड हवेचे ठिकाण
५४ माळा घाट निरडी ता.संगमेश्वर जि.रत्‍नागिरी माळा ता.पाटण जि.सातारा पायरस्ता; माळा-पाचगणी-कर्‍हाड रस्ता; किल्ले:गुणवंतगड, भैरवगड
५५ मेंढ्या घाट डोळखांब ता.शहापूर जि.ठाणे घाटघर/भंडारधरा ता.अकोले जि.अहमदनगर पायरस्ता; किल्ले:अलंग, कुलंग, रतनगड, शिपनेर
५६ म्हैसघाट नागद ता.चाळीसगांव जि.जळगांव नागापूर ता.कन्‍नड जि.औरंगाबाद गाडीरस्ता; अंतूरचा किल्ला, गौताळा अभयारण्य
५६अ म्हैसवळण घाट टाकेद ता.अकोले जि.अहमदनगर टाहाकारी ता.अकोले जि.अहमदनगर गाडीरस्ता; टाहाकारीचे जगदंबादेवीचे मंदिर; विश्रामगड
रडतोंडी (आंबेनळी,फिट्झेराल्ड-फिट्‌सेरल्ड) घाट वाडा कुंभरोशी ता.महाबळेश्वर जि. सातारा वाई-वाठार दरम्यान ता.महाबळेश्वर जि.सातारा महाड-महाबळेश्वर गाडीरस्ता; किल्ले: प्रतापगड, चंद्रगड
५६अ रांजणा घाट कुडाळ आजरे कुडाळ-आजरे गाडीरस्ता
५७ रामघाट भेडशी ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग चंदगड जि.कोल्हापूर पायरस्ता; किल्ले:कलानिधिगड, पारगड; तिळारी प्रकल्प
५७अ लिंग्या घाट (देव घाट) उंबर्डी (कोकण) धामणव्हाळ (देश) पायरस्ता
५८ वरंधा घाट बिरवाडी/माझेरी ता.महाड जि.रायगड हिरडोशी ता.भोर जि.पुणे महाड-भोर गाडीरस्ता; कांगोरी, भावळा किल्ला; शिवथरघळ
५९ वाघजाई घाट जिते ता.माणगांव जि.रायगड धामणवहाळ ता.मुळशी जि.पुणे पायरस्ता; किल्ले कुर्डुगड
६० वाघजाई(२) घाट ठाणाळे ता.सुधागड जि.रायगड तैलबैला/माजगांव ता.मुळशी जि.पुणे पायरस्ता; किल्ले:कोरीगड, ठाणाळे गुंफा, तैलबैला, धनगड, सरसगड, सुधागड
६१ वांदरे घाट आंबवली ता.कर्जत जि.रायगड वांदरे ता.खेड जि.पुणे पायरस्ता; किल्ले:पेठचा किल्ला, भोरगिरी; भिमाशंकर
६२ विठा घाट संगमनेर रंधा धबधबा गाडीवाट; रंधा धबधबा
६३ शिंगणापूर नळी शिंगणापूर ता.महाड जि.रत्‍नागिरी घिसाई/निवी ता.वेल्हे जि.पुणे पायरस्ता; किल्ले:तोरणा, रायगड, लिंगाणा
६४ शिर घाट खोडाळा ता.मोखाडा जि.ठाणे शिरघाट/देवगांव ता.इगतपुरी जि.नाशिक वाडा-त्र्यंबक गाडीरस्ता; किल्ले: हरीशगड; फणी ओंगर; अपर वैतरणा(अळवंडी) धरण; वैतरणा जलविद्युत केंद्र
६५ शेवत्या घाट(शेवट्या घाट) शेवता ता.महाड. जि.रायगड गोगुळशी ता.वेल्हे जि.पुणे पायवाट; किल्ले: तोरणा, रायगड
६६ सव घाट जांबुळपाडा घुसळखांब ता.मावळ जि.पुणे पायरस्ता; किल्ले:तिकोना तुंग
६७ सवती घाट हरसूल ता.पेठ जि.नाशिक गंगापूर जि.नाशिक पेठ-नाशिक गाडीरस्ता; वाघेरा किल्ला; गंगापूर धरण
६८ सवाष्णी घाट बैरामपाडा ता.सुधागड जि.रायगड तैलबैला ता.मुळशी जि.पुणे पायरस्ता; किल्ले:कोरीगड, तैलबैला, घनगड, सुधागड
६९ सावळ घाट पेठ जि.नाशिक आंबेगांव ता.दिंडोरी जि.नाशिक पेठ-नाशिक गाडीरस्ता; रामसेज किल्ला; वाघाड धरण
७० सावळे घाट आंबवली कशेळी ता.कर्जत जि.रायगड सावळे ता.मावळ जि.पुणे पायरस्ता; पेठचा किल्ला; आंद्रा जलाशय
७१ हनुमंत घाट/रांगणा घाट कुडाळ ता.कणकवली जि.सिंधुदुर्ग पाटगांव ता.भुदरगड जि.कोल्हापूर पायरस्ता किल्ले:मनोहर गड, रांगणा
७२ हातलोट घाट बिरमणी ता.खेड जि.रत्‍नागिरी घोणसपूर ता.महाबळेश्वर जि.सातारा पायरस्ता किल्ले: मकरंद, महिपतगड, रसाळगड, सुमारगड

पहा

महाराष्ट्रातील किल्ले; महाराष्ट्रातील खिंडी; महाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयव