अहुपे घाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अहुपे घाट हा महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेमधील एक घाटरस्ता आहे. हा रस्ता पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील अहुपे गावाला ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील खोपिवली गावाशी जोडतो. हा पक्का बांधलेला रस्ता नसून पायरस्ता आहे.खोपिवली गावत तुम्हाला टूरिस्ट गाइड म्हणून फेमस असलेले नकुल शिंदे है मिळतील ते तुम्हाला मार्गदर्शन करतील।

मंचरपासून घोडेगाव-डिंभे रस्त्याने अहुपे ५२ किलोमीटरवर आहे. रस्ता वळणावळणाचा असून चालताना डावीकडे डिंभे जलाशय कायम दिसत असतो. अहुप्याच्या शेजारीच एक मोठा कडा आहे त्याला ढग असे म्हणतात. ऐन पावसाळ्यात या कड्यावरून एक धबधबा खाली कोसळताना दिसतो. स्थानिक लोक याला वाघमाचा धबधबा म्हणतात.

अहुप्याच्या अलीकडे असलेल्या पिपरगणे गावातून दुर्ग आणि धाकोबा ही शिखरे दिसतात. अहुप्याच्या अलीकडे एक छोटी देवराई आहे. तिच्या अलीकडे खाली घोड नदीचे उगमस्थान दिसते. पूर्वी इथे अश्वमुखी असलेल्या दरीतून पाण्याचा प्रवाह वाहत असे. त्यामुळे या प्रवाहाला-नदीला घोड नदी असे नाव पडले. अहुप्यातून कोकणातल्या खोपिवली गावी चालत जाता येते.

भीमाशंकरला जवळच असलेला अहुपे घाट हे अत्यंत रमणीय ठिकाण आहे.