पवन मावळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पवन मावळ किंवा पौन मावळ हा मध्ययुगीन काळातील प्रशासकीय विभाग होता. सध्याच्या भाषेत सांगायचे तर हा मध्ययुगातील एक तालुका होता. तत्कालिन पौन मावळात ८० गावे होती. पवना ही ह्या भागातील मुख्य नदी. ह्या नदीवरुनच ह्या भागास पवन किंवा पौन मावळ हे नाव पडले आहे. पौन मावळातील गावे ही सध्याच्या मावळ तालुक्यात व काही थोडी गावे पौड तालुक्यात मोडतात. उत्तरेला लोहगड विसापूर ची डोंगर रांग; पश्चिमेला आतवण , मोरवे ही गावे ; पूर्वेला चांदखेड , बेबडवोहोळ तर दक्षिणेला दखणे , सावरगाव ह्या पवन मावळच्या सीमा होत्या. शिंदे देशमुख व भोपतराव घारे देशमुख हे पौनमावळचा कारभार पाहणारे वतनदार होते. तुंग उर्फ कठीणगड व तिकोणा उर्फ वितंडगड हे ह्या मावळातील किल्ले. सतराव्या शतकाचा शेवट ते १९४७ सालापर्यंत पौन मावळातील हे दोन किल्ले व बरीच गावे पंतसचिवांच्या भोर संस्थानात होती.