Jump to content

"विठ्ठल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३४: ओळ ३४:


[[चित्र:दशावतार origional photo.jpg |इवलेसे|दशावतार origional photo ]]
[[चित्र:दशावतार origional photo.jpg |इवलेसे|दशावतार origional photo ]]

==आळंदी-पंढरपूरची [[वारी]]==
देहू व आळंदीहून दरवषी लाखो वारकरी पायी [[वारी]]ने पंढरपूरला जातात. ही परंपरा शेकडो वर्षांची असून पत्रकार कवी दशरथ यादव यांनी [[वारी]]च्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर ’दिंडी निघाली पंढरीला’ हा सिनेमाही तयार झाला आहे. यादव यांनी ‘दैनिक सकाळ’साठी वारीचे वार्तांकन केले होते, .त्यावर अभ्यास करून त्यानी पुस्तक लिहिले आहे. [[वारी]]चे खंडकाव्य व अभंग रचनाही त्यांनी केली आहे.

याच [[वारी]] विषयावर चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००२ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दि्ग्‍दर्शनासाठीचा आणि चित्रपट दिग्‍दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले.


==मराठी विठ्ठलगाणी==
==मराठी विठ्ठलगाणी==

१६:०७, २७ मे २०१६ ची आवृत्ती

पंढरपूरचा पांडुरंग
विठ्ठल-रखुमाईच्या सजविलेल्या मूर्ती

विठोबा, विठू, विठ्ठल, पांडुरंग, वा पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्रकर्नाटक ह्या राज्यात वंदिली जाते. विठोबा हा श्रीहरी चा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे. परंतु शास्त्र-पुराणांमध्ये विठठलाला बौध्य वा बोधराज म्हटले आहे. गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौध्य हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटि-कर ठेवून उभा असा आहे. हे वर्णन पूर्णपणे विठ्ठ्लाला लागू पडते.. विठोबाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेऊन, भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवितात. त्याच्या संगे काही वेळा पत्‍नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते.

विठोबा हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. त्याचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रात कर्नाटक सीमेजवळ पंढरपूर येथे आहे. जरी हे मंदिर कधी बांधले गेले हे निश्चित माहित नसले तरी ते तेराव्या शतकापासून उभे आहे ह्याचे पुरावे आढळतात. पंढरपूरमध्ये वर्षातून चार यात्रा भरतात. त्यातील आषाढी एकादशीला भरणार्‍या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात. आलेले भाविक भीमा नदीमध्ये स्नान करतात. या नदीला येथे चंद्रभागा म्हणतात. विठोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत होय.[]

विठोबाशी निगडित कथा

विठोबा हा देव भक्त पुंडलिकाच्या भेटीला आलेला व वारकरी संतांचा कैवारी समजला जातो. त्याचा अवतार हा गयासुर नावाच्या राक्षसाच्या समूळ नाश करण्यासाठी द्वापार युगात झाला होता. त्यावेळी गयासुर अरीने सत्यश्रेष्ठ धर्माचा नाश करण्यासाठी देव गणांना भुलवण्याचे तथा गो-ब्राम्हण हत्येचे अखंड सत्र चालवले होते. यास्तव श्री मन्महा मूळ जगत्पित्याच्या आज्ञेने श्रीहरीने बौध्य नामे अवतार घेऊन गयासुराला अग्निकुंडात जाळून भस्म केले होते . नंतर त्याचा परमभक्त जो पुंडलिक यास भेटून स्वरूप दाखविले होते आणि मातापित्याची सेवा केल्याचे फळ म्हणून मोक्षास पात्र केले होते.

संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ इत्यादी विठोबाचे थोर भक्त १३ ते १७ व्या शतकात होऊन गेले. वारकरी संतांनी विठोबाच्या स्तुतीत अनेक मराठी अभंगांची रचना केली आहे. कन्‍नड कवींनी कानडी श्लोक व आदि शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्र रचिले आहे. विठोबाचे प्रमुख सण शयनी एकादशीप्रबोधिनी एकादशी आहेत.

पंढरपूरच्या विठ्ठलाचा दैनिक पूजाविधी

दररोज पहाटे चार वाजता पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर उघडल्यानंतर देवाला उठवण्यासाठी प्रार्थना म्हटली जाते. प्रार्थनेचे मंत्र काकड्याच्या वैदिक आणि पौराणिक मंत्रांप्रमाणे असतात. सव्वाचार वाजता काकड्याला सुरवात होते. कान्ह्या हरिदास रचित ‘अनुपम्य नगर पंढरपूर’ ही आरती म्हटली जाते. आरतीनंतर देवाला खडीसाखर आणि लोण्याचा प्रसाद दाखवला जातो. नंतर नित्यपूजा सुरू होते. त्यामध्ये प्रथम संकल्प, गणेशपूजा, भूमिपूजा, वरुणपूजा, शंखपूजा, घंटापूजा होते. त्यानंतर पुरुषसूक्ताचे पठण करत पूजा केली जाते. सकाळी ११ वाजता विविध पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो.

धुपारती

दुपारी चार वाजता विठ्ठलमूर्तीचा चेहेरा पुसून देवाला नवीन पोषाख आणि अलंकार घातले जातात. सायंकाळी सात वाजता धुपारती होते. या वेळी प्रथम पाद्यपूजा नंतर गंध लावून हार घालतात. धूप, दीप ओवाळून दहीभाताचा नैवेद्य दाखवतात. त्या वेळी उपस्थित हरिदास आणि भक्त मंडळी
‘जेवी बा सगुणा सख्या हरी, जेवी बा सगुणा,
कालविला दहीभात आले मिरे लवणा,
साय दुधावरी साखर रायपुरी कानवले चिमणा,
उद्धवचिद्‌घन शेष ही इच्छितो गोपाळा रमणा’’
हे पद म्हणतात. शेवटी ‘युगे अठ्ठावीस’ ही आरती म्हटली जाते आणि धुपारती होऊन उपचार संपतो.

शेजारती

नित्योपचारातील शेवटचा उपचार म्हणजे शेजारती. रात्री साडेअकरा ते पावणेबाराच्या सुमारास शेजारती केली जाते. प्रथम विठ्ठलमूर्तीची पाद्यपूजा होते. त्यानंतर देवाला दुपारी घातलेला पोषाख बदलला जातो. धोतर नेसवून अंगावर उपरणे घातले जाते. डोक्‍याला पागोटे बांधले जाते. पोषाख बदलत असताना देवाच्या आसनापासून शेजघरापर्यंत पायघड्या घातल्या जातात. देवाला गंध लावून नंतर हार घालतात. त्या वेळी ‘हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका’ इत्यादी आरत्या म्हटल्या जातात. शेवटी मंत्रपुष्पांजली म्हणून देवाला फुले अर्पण केली जातात आणि शेजारती संपते.

पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरातील वर्षभराचे नित्योपचार

पहाटे ४ - मंदिर भाविकांसाठी खुले
पहाटे ४.१५ ते ६ - काकडआरती आणि नित्यपूजा
सकाळी ११ ते ११.१५ - महानैवेद्य
दुपारी ४.३० ते ५ - पोषाख नेसवणे
सायंकाळी ७ ते ७.३० - धुपारती
रात्री ११.४५ ते १२.४५ - शेजारती.

दशावतार origional photo

आळंदी-पंढरपूरची वारी

देहू व आळंदीहून दरवषी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात. ही परंपरा शेकडो वर्षांची असून पत्रकार कवी दशरथ यादव यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर ’दिंडी निघाली पंढरीला’ हा सिनेमाही तयार झाला आहे. यादव यांनी ‘दैनिक सकाळ’साठी वारीचे वार्तांकन केले होते, .त्यावर अभ्यास करून त्यानी पुस्तक लिहिले आहे. वारीचे खंडकाव्य व अभंग रचनाही त्यांनी केली आहे.

याच वारी विषयावर चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००२ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दि्ग्‍दर्शनासाठीचा आणि चित्रपट दिग्‍दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले.

मराठी विठ्ठलगाणी

विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने विठ्ठलावर मराठी कवींनी अनेक गीते, भक्तिगीते, चित्रपटगीते आणि नाट्यगीते लिहिली आहेत. त्यांतली काही ही -

(अपूर्ण यादी)

संदर्भ

  1. ^ http://wayback.archive.org/web/20080209014300/http://solapur.gov.in/htmldocs/rpandharpur.htm. १९ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००७-०९-३० रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

हे सुद्धा पहा

बाह्या दुवे

http://www.thehindu.com/news/national/other-states/pandharpur-temple-allows-women-men-of-all-castes-as-priests/article6038635.ece दि हिंदू दैनिक - २३ मे २०१४