महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतरत्‍न हा १९५४ मध्ये सुरू झालेला भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, जो साहित्य, कला, समाजसेवा, विज्ञान, शिक्षण, क्रीडा, उद्योग या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. महाराष्ट्रातील अनेक व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. सर्वप्रथम १९५८ मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे या मराठी व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला. ते सर्वात वयोवृद्ध भारतरत्न मिळविणारे व्यक्ती सुद्धा आहेत.

सन्मानित व्यक्तींची यादी[संपादन]

महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेत्या व्यक्तींची यादी खालील प्रमाणे आहे :

अनुक्रम नाव चित्र जन्म-मृत्यू पुरस्कृत वर्ष क्षेत्र
धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२) १९५८ समाजसेवा
पांडुरंग वामन काणे (१८८०-१९७२) १९६३ समाजसेवा
आचार्य विनोबा भावे (१८९५-१९८२) १९८३

(मरणोत्तर)

समाजसेवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६) १९९०

(मरणोत्तर)

समाजसेवा
जे.आर.डी. टाटा (१९०४-१९९३) १९९२ उद्योग
लता मंगेशकर (१९२९-२०२२) २००१ कला
भीमसेन जोशी (१९२२-२०११) २००८ कला
8 सचिन तेंडुलकर (१९७३ - हयात) २०१४ क्रीडा
9 नानाजी देशमुख (१९१६ - २०१०) २०१९

(मरणोत्तर)

समाजसेवा

हे देखील पहा[संपादन]

भारतरत्‍न पुरस्कार

संदर्भ[संपादन]

[[वर्ग :पुरस्कारविजेते]]