Jump to content

विकिपीडिया:प्रचालक/कामे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

"मीडियाविकि" या प्रणाली मध्ये अनेक तांत्रिक कामे अशी आहेत की सर्वांना करता येत नाहीत. साधारणपणे ही कामे करण्याचे अधिकार प्रचालकांना दिलेले असतात.

हे पान प्रचालकांना करता येण्यासारख्या सर्व कामांची यादी व माहिती देते.

अधिकारांची यादी

[संपादन]

सुरक्षित पाने

[संपादन]
  • मुखपृष्ठ तसेच अन्य सुरक्षित पाने संपादित करणे. इतर सदस्य त्या त्या पृष्ठाच्या चर्चा पानावर बदल करायच्या विनंत्या लिहू शकतात.
  • एखाद्या पानाची सुरक्षा-पातळी बदलणे.

लेख वगळणे व पुनर्स्थापित करणे

[संपादन]
  • एखादा लेख अथवा संचिका वगळणे.
  • वगळलेले लेख तसेच संचिका पाहणे व पुनर्स्थापित करणे.

ब्लॉक व अनब्लॉक

[संपादन]
  • आयपी अंकपत्ते, तसेच सदस्यांना संपादन अधिकार नाकारणे.
  • ब्लॉक केलेले आयपी अंकपत्ते तसेच सदस्यनाव पाहणे व संपादन अधिकार देणे.
  • सध्या अस्तित्वात असणार्‍या ब्लॉकची यादी पाहण्यासाठी इथे जा.

पूर्वपदास नेणे

[संपादन]
  • लवकर पूर्वपदास नेणे - प्रबंधकांना फक्त एका टिचकी मध्ये शेवटचे संपादन पूर्वपदास नेता येते. हे मुख्यत: उत्पात रोखण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण आहे.

उत्पात संपादने अलीकडील बदलांमधून लपविणे

[संपादन]
  • प्रचालक उत्पात संपादने अलीकडील बदलांमधून लपवू शकतात. हे करण्यासाठी लक्ष्य संपादनांच्या URL मध्ये &bot=1 हे वाढवा. याने आधी झालेली संपादने तसेच तुम्ही पूर्वपदास नेलेली संपादने अलीकडील बदलांमधून लपविली जातील.

विकिपीडियामध्ये बदल करणे

[संपादन]
  • प्रबंधक मीडियाविकि नामविश्वातील पाने बदलून विकिपीडिया मध्ये सर्वांना दिसणारे दुवे बदलू शकतात.
  • CSS संचिकेत बदल करून विकिपीडियाचे स्वरूप बदलू शकतात.
  • काही विशिष्ट उपकरणे जावास्क्रीप्टच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध करून देऊ शकतात.

अन्य

[संपादन]

या व्यतिरिक्त प्रबंधक

  • सुरक्षित पानांचे स्थानांतरण करू शकतात.
  • वगळलेल्या पानांचा इतिहास पाहू शकतात.
  • सध्या अस्तित्वात असलेल्या खात्यांशी साधर्म्य असणारी खाती उघडू शकतात.
  • इतर सदस्यांना एका संपादनात पूर्वपदास नेण्याचे अधिकार देऊ शकतात.

हे सुद्धा पहा

[संपादन]