विकिपीडिया:ब्लॉक व अनब्लॉक धोरण
* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.
ब्लॉक/अनब्लॉक
दहिवळांनी इतरत्र सुरू केलेली चर्चा येथेही देत आहे. काही काळाने ती धोरणात्मक चावडीवर हलवावी
ब्लॉक व अनब्लॉक
- आयपी अंकपत्ते, तसेच सदस्यांना संपादन अधिकार नाकारणे
आयपी अंकपत्ते व सदस्यांना ब्लॉक करताना सदस्याने जर विकिपीडियाच्या मुख्य पानांमध्ये उत्पात केला असेल तर त्याला कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय लागलीच ब्लॉक केले जावे पण जर सदस्य चावडीवर वा चर्चा पानावर उत्पात किंवा विकिपीडियाच्या लेखनसंकेताला न धरता लेखन करत असेल तर त्याला आधी तसे न करण्याची किमान एक सूचना देऊन नंतर ब्लॉक केले जावे असे वाटते. -संतोष दहिवळ १९:३५, २० जानेवारी २०१२ (UTC)
- एखादा सदस्य इतर संकेतस्थळावरील वा अन्य स्रोतावरून प्रताधिकारीत मजकूर वारंवार येथे जसाच्या तसा कॉपीपेस्ट करत असल्यास अशा सदस्याला संपादने करण्यापासून ब्लॉक (अवरूद्ध) केले जावे काय?
- आत्तापर्यंत मराठी विकिपीडियावरील ब्लॉक करण्याबद्दलचे धोरण अत्यंत उदार ठेवलेले आहे. उत्पात, गोंधळ करणार्या सदस्यांविरुद्ध त्यास ब्लॉक करणे हा अगदी शेवटचा उपाय आहे आणि तो तसाच असावा. किरकोळ कारणांवरुन ब्लॉक करणे बरोबर नाही. त्यांना (वर म्हणल्याप्रमाणे) सूचना देणे, मार्गदर्शन करणे, त्यांचे प्रश्न, अडचणी समजावून घेण्यासाठी थेट संपर्क साधणे हे उपाय आधी करणे अत्यावश्यक आहे. दोन-तीन (किंवा अधिक) वेळेस हे करुन काही फरक पडत नाही असे वाटल्यास चावडीवर अशा सदस्याला इशारा देणे आणि त्यानंतरही उपद्रव चालू राहिल्यास इतर सदस्यांच्या किंवा प्रचालकांशी मसलत करुन मगच एखाद्या सदस्यास ब्लॉक केले जावे. असे न केल्यास प्रचालक (हेतू चांगला असला तरीही) मनमानी करीत आहेत असे वाटण्यास कारण होते.
- अगदी ब्लॉक करण्यापर्यंत पावले उचलली तरीही अंकपत्ता ब्लॉक करणे हा तर अगदी त्यापलीकडील शिक्षा होते. यात त्या सदस्याची तर नव्हेच तर इतरांचीही गैरसोय होते. अनेकदा कॉर्पोरेट (किंवा इतर ठिकाणी सुद्धा) नेटवर्कवरुन अनेक व्यक्ती अनेक संगणक वापरून एकाच बाह्य अंकपत्ता वापरीत असतात (external IP/gateway address) असा अंकपत्ता अडवल्यास त्या subnetवरील सगळ्याच संगणकांना मराठी विकिपीडिया वापरणे/संपादित करणे अशक्य होते. फक्त निनावी संपादकांवर (इतर उपाय करुन झाल्यावर) ही कारवाई करण्यासाठी अंकपत्ता अडवावा.
- अडवताना काही तास अडवावे, जर पुन्हा उपद्रव झाल्यास एखादा दिवस आणि त्यापलीकडेही त्रास देणे सुरू राहिल्यास अनेक दिवस प्रतिबंधन घालावे.
- मराठी विकिपीडियावर प्रचालकांनी शक्य तितके hands off रहावे व धोरणात्मक, सकारात्मक बाबतींवर चर्चा, मसलत करुन इतर सदस्यांचे मत घेउन व त्यांना विश्वासात घेउन प्रगती चालू ठेवावी ही विनंती.
- मला १००% माहिती आहे की येथील एकही प्रचालक विकिपीडियास आपली खाजगी मालमत्ता समजत नाही आणि जी काही पावले उचलली जातात ती केवळ आपला विकिपीडिया सुरक्षित, अबाधित ठेवण्यासाठीच उचलली जातात याची मला खात्री आहे परंतु असे तडकाफडकी ब्लॉक करण्यासारखी टोकाची प्रतिक्रिया दिल्यास नवीन सदस्यांचा गैरसमज होणे अशक्य नाही आणि जुन्या सदस्यांच्या मनातही प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे.
- हा विकिपीडिया सगळ्यांचा आहे आणि त्यातून लोकांना वगळण्यापेक्षा त्यांना व त्यांच्या Talentsना कसे सामावून घेता येईल याचाच विचार नेहमी करावा. हा प्रकल्प कायमच inclusive रहावा, exclusive नव्हे याबद्दल आपण इतकी वर्षे महाप्रयत्न केलेल आहेत तेच पुढे चालू ठेवूयात.
- माझ्या या मताबद्दल शंका, प्रश्न असल्यास बेधडक विचारावे.
- अभय नातू १५:३८, २१ जानेवारी २०१२ (UTC)
- हे धोरण चावडी ध्येय धोरणे वरून आणले
व्यक्तिगत आरोप वगळावेत
विकिपीडिया संस्कृती परस्परांवर विश्वास ठेवण्याकरता सांगते. विकिपीडिया संस्कृतीत न रूळलेल्या संपादकांकडून मेहनतीने काम करणार्या इतर सदस्यांचे चारीत्र्यहननाच्या प्रयत्नांना आवर घालण्याच्या दृष्टीने कोणत्या विवाद्य मुद्दा सुद्धा व्यक्तिगत टिकेपासून दूरठेवणे गरजेचे आहे.त्याकरिता व्यक्तिगत स्वरूपाच्या आरोप/टिकेचा चारित्र्य हननाचा भाग वगळला जावा.
विकिपीडिया ज्ञानकोश सामूहीक लेखन योगदानाचे स्थान आहे.विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत,भाषिक,प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असा मजकूर आढळल्यास तो काढून टाकण्यात येईल.
असा व्यक्तिगत टिकेचा भाग संबधीत सदस्याच्या चर्चा पानावर सुचित केल्या नंतर सुद्धा पुर्नस्थापित करण्याचे दोन पेक्षा अधिक प्रयत्न झाल्यास अशा सदस्यखात्यामागील इतर सदस्यनामे व अंकपत्ते सदस्यत्व तपासनिसास (check user) शोधण्यास सांगून संबधी सदस्यखाती आणि अंकपत्ते प्रचालक सात दिवस ते एकवर्षेपर्यंत आवश्यकतेनुसार प्रतिबंधित करण्यास सांगितले जाऊ शकेल अथवा अपवादात्मक परिस्थितीत प्रचालक असा निर्णय स्वतः घेऊन संबधीत सदस्याचे खाते प्रतिबंधीत करू शकतील, मराठी विकिपीडिया समुदायाच्या सहमतीने असे प्रतिबंधनाचा कालावधी कमी केला जाऊ शकेल.
|
|
|
|
|
|
|
- विकिपीडिया:कौल येथून माहिती आणली
प्रचालकांवरील हक्कभंग प्रस्ताव धोरण १
चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल
- खालील कौल प्रस्तावात केवळ मतदान करावे मी मांडलेल्या कलमांमध्ये परस्पर बदल करू नयेत हि विन्ंती
सध्या विवाद्द विषय सरसकटपणे चावडी/वाद निवारण पानावर हलवले जात आहेत. या हलवण्याचे स्वरूप आणि उद्देश वादनिवारणापेक्षा प्रचालकांच्या सोईनुसार विषय थंड्या बस्त्यात हलवणे असा आहे काय अशी स्वाभाविक शंका काही बऱ्याच सदस्यांना वाटते आहे.अशा माहितीच्या स्थानांतरणाकरता यात अलिकडे बॉट खात्याचा वापर केला गेल्याचे आढळून आले आणि आपल्या कृतीने संबधीत सदस्य दुखावले गेल्याचे लक्षात येऊन सुद्धा संबंधीत बॉट खात्याने विकिपीडिया समुदायाची संमती न घेता सदस्यांना दुखावणारी कृती पुन्हा आमलात आणल्याचे दिसून आले.
व्यक्तिगत आरोप आणि चारीत्र्यहनन करण्याकरीता विकिपीडिया चर्चा पानांचा उपयोग होऊ नये या बाबत मी स्वत: सजग राहिलो आहे.मराठी विकिपीडियाचे प्रचालक मराठी विकिपीडिया समुदायाने निश्चित केलेल्या विशीष्ट निर्देशांनुसार काम करण्याकरीता समुदायाकडूनच निवडले जातात.त्यांचे मराठी विकिपीडिया समाजास उत्तरदायीत्व आहे.व्यक्तिगत आरोप आणि चारीत्र्यहनन होऊ नये आणि प्रचालकांच्या संवादांचे, कार्यांचे कृतींचे मुल्यांकन ह्या भिन्न बाबी आहेत. दुर्दैवाने कोणतीही व्यक्तिगत टिका नसलेल्या, प्रचालकांच्या संवादांचे, कार्यांचे कृतींचे मुल्यांकनाच्या प्रयत्नांना सुद्धा थंड्या बस्त्यात टाकण्याचे प्रयत्न जाणीव पूर्वक वाटत आहेत.
मराठी विकिपीडियावर आजतागायत झालेल्या दहा लाख संपादनांपैकी सातलाख संपादने हि छोट्या छोट्या संपादकांकडून झालेली आहेत, ह्या सर्व समुदायाच्या अडी अडचणी मध्यवर्ती चावडीवर येत असतात एखाद्दा चुकार अनामिक संपादकामुळे सर्व नवागत आणि अनामिक संपादकांना चावदीवर मत प्रकट करण्या पासून वंचीत करणे अयोग्य आहे.विकिपीडिया मुक्त असणे हा विकिपीडियाचा गाभा आहे.
त्यामुळे प्रचालकांना धोरणात्मक निर्देश देणारा खालील कौल प्रस्ताव मांडत आहे. या कौलाची प्रस्तावना मी चावडीच्या प्रस्तावना पानावर लावत आहे. ती तिथून सात दिवसांचे आत हलविण्याचा प्रयास झाल्यास अशा सदस्याचे/प्रचालकाचे खाते आणि संभाव्य आयपी आणि निस्चित झालेली तोतया खाती याच प्रस्ताव कौलाने सहा महिने पर्यंत मराठी विकिपीडियावरून संपादनांकरीता प्रतिबंधीत होतील.
- प्रचालकांशी अपमानास्पद वर्तन अथवा चारीत्र्य हनन न करता त्यांच्या कार्य कृती आणि संवादाचे समीक्षण मुल्यांकन करणे हा सर्व सदस्यांचा मुलभूत अधिकार आहे. ह्या मूलभूत अधिकार वापरू न देणे सदस्यांचा हक्कभंग समजून सदस्यांना चावडी मुख्य पानावर हक्कभंग ठराव मांडता येईल आणि असा हक्कभंग प्रस्ताव चावडीवर सात दिवस पर्यंत राहील नंतर तो मुख्य कौल पानावर हलविला जाईल.
हक्कभंग प्रस्तावाच्या बाजूने पाच पेक्षा अधिक मते आल्यास अशा सदस्य अथवा प्रचालकाने बिनशर्त माफी मागावी. सात दिवसाचे आत माफी न मागणारा प्रचालकाचे प्रचालक पद रद्द समजण्याचा प्रस्ताव मेटा कडे पाठवावा.हक्कभंग करून सात दिवसाच्या आत माफी नम् मागणाऱ्या सदस्यास सहा महिने पर्यंत संपादना पासून प्रतिबंधीत करावे.
- सदस्य आणि प्रचालकांशी तीन अपमानास्पद वर्तन अथवा चारीत्र्य हननाचे प्रयत्नास करणाऱ्यास पहिल्या दोन प्रयत्नास समज नंतरच्या वेळी सात दिवसांच्या प्रतिबंधनाचे तीन वेळा त्याने नियमाचे उल्लंघन दहा पेक्षा अधिक वेळा केल्यास सहा महिन्यांकरिता प्रतिबंधीत करण्याचे अधिकार प्रचालकांना दिले जात आहेत.
१)चावडी आणि चर्चा पाने अनामीक आणि नवागतांना सुद्धा मुक्त असावीत. २)चावडी आणि चर्चा पानाववरून चारीत्र्यहनन करणारे शब्द/वाक्य आरोप तेवढेच वगळावेत . ३) रागाच्या भरात नावांच्या एकेरी केलेल्या उल्लेखांचे आदरार्थी बहुवचनात रूपांतरण करावे ४)चावडीवरील सर्व लेखन मराठी भाषेत असावे. इंग्रजी अथवा इतर भाषी लेखनास सहसा परवानगी नसावी , इतर भाषिक लेख काही कारणाने घ्यावयाचे झाल्यास त्याला दाखवा लपवा साचात ठेऊन त्याचा मराठी संक्षेप तेवढा खाली द्दावा. ५)मजकुराचे (अगदी मुद्दे विवाद्द असलेतरी) किमान चार दिवस पर्यंत अर्काईव्हींग आणि स्थानांतरण करू नये. ६)चावडी पानांच्या अर्काईव्हींग/स्थानांतरणा करीता बॉट्सना परवानगी नसावी.विवाद शमवण्याचे दृष्टीने अपवादात्मक स्थिती करिता केवळ प्रशासकांना तेही वर्षातून प्रत्येकी अधिकाधीक पाच वेळांपर्यंत आणि सर्व प्रशासंकाचे मिळून अधिकाधीक वीसवेळा वेगळे विशेष बॉट खाते बनवून मजकुर थंड्याबस्त्यात तेही केवळ चार दिवसांनतर हलवण्यास परवानगी असावी.
सध्या यावर कमित कमि उहापोह करून निती स्विकारवी या नितीचे येत्या सहा महिन्यानंतर अवलोकन करून सर्व सहमतीने दिर्घ मुदतीचा कौल घ्यावा -रायबा
- रायबा शतशहा धन्यवाद !
परमहंस , भीमराव पाटील ह्या जेष्ठ लोकांनी केलेल्या उत्तम मध्यस्थीचे आणि सुचानन कडे कानाडोळा करत सरसकट वाटण्याचा अक्षदा लावणे म्हणजे काय म्हणायचे आणि त्यावरही चावडीच कुलूप बंद करणे म्हणजे कहर. त्यामुळे चावडीची प्रकरणे चर्चा पानाकडे वळता आहेत आणि परिस्थिती अधिक अनियंत्रीत होतांना दिसते. मराठी विकिपिडीयावर साद्य परिस्थितीत काही प्रचालकांची भूमिका हि बालिश आणि स्वकेंद्री थोडी आरोग्नट असल्याचा चुकून गैरसमज होवू नये हीच माफक अपेक्षा. माझ्या सारख्या नवख्या आणि वृद्ध सदस्याने काय बोलावे, पण ह्यातून एक वाईट संदेश समाजास जातो हे मात्र खरे. सामान्य सदस्यान प्रमाणेच प्रचालाकांनाही बंधने असावीत हे आपण मांडलेत ते उत्तम. माझा आपणास सामुर्ण पाठींबा. -Osho (चर्चा) १५:५५, २३ मार्च २०१२ (IST)
- "चावडीची प्रकरणे चर्चा पानाकडे वळता आहेत आणि परिस्थिती अधिक अनियंत्रीत होतांना दिसते. मराठी विकिपिडीयावर साद्य परिस्थितीत काही प्रचालकांची भूमिका हि बालिश आणि स्वकेंद्री थोडी आरोग्नट असल्याचा चुकून गैरसमज होवू नये हीच माफक अपेक्षा." सहमत आहे Osho. अनेक प्रचालकांशी अनेक नवीन-जुन्या सदस्यांचे सतत वाद का होत आहेत, हा ही एक प्रश्न मला भेडसावतो. अनेकांसाठी ही आत्मनिरिक्षणाची वेळ असावी. काही कामे आपल्याला सुसंवादाने करणे झेपत नसल्यास सोडून देता येतात. तसेच खास सदस्यांसाठी आणि प्रचालक मनमानीवर प्रचालक काहीही भूमिका घेत नाहीयेत, असा गैरसमज व्हायला वेळ लागणार नाही... ही सगळे प्रकार पाहून मी गेले काही दिवस, मराठी विकीपासून दूर राहणेच बरे की काय अशा विचारा पर्यंत आलो होतो! निनाद ०५:३७, २७ मार्च २०१२ (IST)
- माननीय ओशो, आपण माझ्या प्रस्तावाचा कार्यकारण भाव अगदी बरोबर ओळखलात. आपण मांडलेल्याच भुमीकेतून हा कौल प्रस्ताव मांडला. आपल्या समर्थनार्थ आभारी आहे -रायबा
|
|
|
|
|
|
- विकिपीडिया:कौल येथून माहिती आणली