विकिपीडिया:प्रचालक/प्रचालन सजगता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.


 • विकिपीडिया हा एक सामुहीक उपक्रम आहे हे लक्षात घ्या.विकिपीडियात, त्याच्या सॉफ्टवेअर सहित असे कोणतेही क्षेत्र नाही, ज्यात तुम्हाला सहभागी होता येत नाही.
 • विकिपीडिया हा एक सामुहीक उपक्रम आहे हे लक्षात घ्या.विकिपीडियात, त्याच्या सॉफ्टवेअर सहित प्रत्येक क्षेत्र असे आहे, ज्यात तुम्हाला सहभागी होता येते.
 • मुखपृष्ठाशी संबधीत किंवा काही तत्सम नियमांतर्गत असलेली, तात्पुरती सुरक्षीत अपरिहार्य स्थिती पाने सोडली असता इथे सर्व पाने सर्वांना तात्काळ संपादनाकरिता मुक्त आहेत.
 • जी पाने, काही कारणांनी सुरक्षीत केली असली तरीही, त्यांच्यातही सुयोग्य बदल करण्याची विनंती/सुचवणी संबधीत पानाच्या चर्चा पानावर करता येते.
 • तुम्ही येथील सॉफ्टवेअर सुचनांमध्ये, भाषिक सुधारणा स्वत: ट्रान्सलेट विकित जाऊन करू शकता.
 • आपण केलेले संपादन इतर कुणीही बदलू शकते.
 • आपल्याला विकिपीडिया कसा दिसून हवा आहे ते विशेष:पसंती येथे सुयोग्य त्वचा निवडून करता येते त्या शिवाय Custom CSS | Custom JS ही पाने स्वतःस ऊपयूक्त असे प्रगत पद्धतीने बनवून घेता येतात.
 • एखादी गोष्ट वाचन/संपादन सुलभ न वाटल्यास सुलभीकरण येथे त्याची नोंद करू शकता.
 • सदस्य खाते उघडणे हा सोई-सुविधांचा भाग आहे. आपण अंकपत्त्यावरून अनामिकपणे संपादने करीत राहू शकता.
 • नवागतांकडून अनावधानाने होणार्‍या चूका टाळण्याकरिता छायाचित्र संचिका चढवणे ,बाह्यदुवे देणे, पानांचे स्थानांतरण यावरील निर्बंधही माफकच असतात.
 • विश्वकोशीय दखलपात्रता/उल्लेखनीयतेबद्दल साशंकता असलेली पाने वगळण्यापुर्वी त्या पानांना वगळण्याबद्दल माफक चर्चा घडविणे अपेक्षीत असते.
 • लेख पानाच्या नावात अशुद्धता असेल तर, ते पान सुयोग्य शीर्षकनावाने कुणालाही स्थानांतरीत करता येते.
 • शीर्षकलेखनात अशुद्धता असेल तर स्थानांतरणानंतरही, अपवादात्मक स्थिती वगळली असता, अशी शीर्षक पाने वगळली जाऊ शकतात.
 • विकिपीडियाचे प्रचालन ही केवळ प्रचालकांची जबाबदारी नाही तर तेही प्रत्येकाने आपापला सहभाग देणे अभिप्रेत आहे.
 • इथे उपलब्ध संपादन मुक्तता, व्यक्तींच्या सदहेतु आणि सदसदविवेकबुद्धीवर विश्वास ठेवते.येथील विश्वकोशीय परिघाच्या मर्यादा आणि संकेत पाळण्यात सहाय्य करा.
 • विकिपीडिया तुमचा आहे, विकिपीडियातील कोणतीही गोष्ट अशी कां ? असा प्रश्न विचारा. तुमचा प्रश्न नवीन चांगल्या दिशेची सुरवात असु शकतो.
 • उत्पात हा परिणाम आहे, कारण नाही. कारणाचे मुळ शोधा आणि त्यावर उपाय करा.
 • नित्य होणार्‍या उत्पात प्रकारांची/पानांची/उत्पातकांची नोंद विकिपीडिया:पहारा आणि गस्त येथे करा.
 • बहुसंख्य उत्पात तात्पुरते किंवा एका वेळेपुरते मर्यादित असतात;विकिपीडियातील लेखनपद्धती,संकेताची,मर्यादांची कल्पना नसल्यामुळे trial & error मुळे होतात.यावर अशा नविन/अनभिज्ञ सदस्यांना सजग करणे हा उपाय आहे. त्यांना संपदनापासून प्रतिबंधन हा उपाय नाही.
 • उत्पातसदृश्य पाने वगळण्याची विनंती करण्यापूर्वी ते पान इतर कोणत्या पानाशी जोडले आहे काय ते शोधा आणि मूळ कारण असलेल्या पानात काही सुधारणा करता येते काय ते पहा.
 • उत्पातसदृश्य पाने वगळण्याची विनंती करण्यापूर्वी ते पान इतर कोणत्या पानावरून जोडले आहे काय ते शोधा.किमान २०% पानांच्या बाबत तरी असे धोरण ठेवा.
 • नवीन सदस्यांना एकदम सुचनांची यादी हातात देणे/भडिमार टाळा. संपादन संखेनुसार आणि त्यांच्या योगदानाचा अभ्यास करून उपयूक्त माहिती द्या.
 • सदस्यांनी, संपूर्ण मानवी जिवनात विकिपीडिया केवळ एक किरकोळ घटक आहे हे लक्षात घ्यावे.त्याच्याशिवाय विश्व कोलमडत नाही,त्याच्या सोबत हे विश्व संपत नाही. त्यामुळे कुठे काही पटले नाही तर फारतर आपले म्हणणे मांडावे, जाणीवपूर्वक उत्पात हा त्यावर पर्याय नाही.
 • जाणीवपूर्वक उत्पात करणार्‍यांनी हे लक्षात घ्यावे की उत्पात करणे म्हणजे त्यांचा स्वत:चा वेळ नाहक खर्ची करणे आहे. विकिपीडियास गृहीत धरता येत नाही,तोडता येत नाही हे लक्षात घ्यावे.
 • विकिपीडिया प्रत्येकास आपले म्हणणे संयतपणे मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देतो.
 • विकिपीडिया सर्वांच्या, सर्व प्रश्नांचे आणि अभिप्रायांचे स्वागत करते.
 • अनेक संपादने उत्पात हटवण्याकरिता श्रम करण्यापेक्षा सयूक्तीक सहाय्य पाने बनवून वेळेवर सहाय्य देऊन खूप कमी श्रमात उत्पात टाळता येऊ शकतो.
 • साचा कामचालू क्मीतकमी वेळा वापरावा. आणि काम झाल्या नंतर स्तवतःचे स्वतःस काढून टाकणे होत असेल तरच वापरावा अन्यथा वापरण टाळावे , अन्यथा हा साचा काढण्याचे अजून एक नवे काम निर्माण होते.
 • विकिपीडिया प्रचालक स्वयंसेवी कार्यकर्ते असतात इतर सदस्यांच्या कृती किंवा मजकुरास जबाबदार नसतात
 • मराठी विकिपीडियातील संकेतानुसार मराठी विकिपीडियाचे प्रचालक महाराष्ट्रातील सामाजीक आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील विषयांच्या लेखात आपला दृष्टीकोण व्यक्त करण्याची घाई करू नये. दोन्ही बाजूंच्या प्रचालकेतर सदस्यांनी आपले म्हणणे मांडल्या नंतर विकिपीडिया परिघाच्या कक्षेत सुयोग्य विश्लेषण मांडावे . शक्य तेवढ्या अधिक सदस्यांना विश्वासात घेणे व सहमती घेऊन तटस्थ निष्पक्ष समतोल भूमिकेची मांडणी करावी . आवश्यक तेथे विकिपीडिया च्या मुक्तता आणि विकिपीडिया लोकशाही नाही आणि इतर आधारस्तंभा बद्दल सदस्यांना सजग करावे.
 • विकिपीडिया प्रचालक हे सुद्धा त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील वेळ काढून स्वयंसेवी पद्धतीने वेळ देत असतात. त्यांच्यावर संवादास उत्तर देण्याचे अथवा विशिष्ट वेळ् बांधून घेण्यास ते बांधील नसतात