सदस्य:Vikramg7969

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सामाजिक परिवर्तन:-

प्रास्ताविक:- सामाजिक परिवर्तन हे सर्व मानवी समाजांचे एक महत्वाचे लक्षण आहे. अगउी प्रारंभीच्या  साध्या समाजापासून ते प्रगत, औदयोगिक, आधुनिक संकीर्ण समाजापर्यंत सर्वच आकारांच्या आणि प्रकारच्या समाजात सातत्याने परिवर्तने घडून आली आहेत येत आहेत परिवर्तनाची गती व प्रमाण यात भेद असेल पण परिवर्तनच घडून येत नाही असा समाजच सापडणार नाही. आता समाज स्थिर असतो समाजव्यवस्था टिकून राहते हे जरी खरे असले तरी समाज बदलत असतो समाजव्यवस्थेत परिवर्तने घडून येतात हे ही तितकेच खरे आहे स्थैर्य आणि परिवर्तन ही मानवी समाजाची सापेक्ष अषी वैषिष्टये आहेत प्रत्येक समाज सापेक्षतः स्थिर तसाच सापेक्षतः गतिषील वा परिवर्तनषील असतो असा याचा अर्थ होय या प्रकरणात सामाजिक परिवर्तन म्हणजे काय? सामाजिक परिवर्तन असे घडून येते ? कोणती कारणे त्यासाठी जबाबदार असतात? परिवर्तन कसे आणि का घडून येते याविषयीची सैंधातिक स्पष्टीकरणे कोणती? यासारख्या प्रष्नांची उत्तरे मिळवून सामाजिक परिवर्तनासंबंधीच्या विविध पैलूंचे आकलन करून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सा. परिवर्तन हा समाजषास्त्रज्ञांचा चिंतनाचा आणि संषोधनाचा एक प्रमुख विषय आहे. आगस्त काॅंत यांनी समाजात स्थैर्य निर्माण करणा-या घटकांच्या अभ्यासाइतकेच समाजात परिवर्तन घडवून आणणा-या घटकांच्या अभ्यासालाही महत्वाचे मानले होते.

- सामाजिक परिवर्तनाची संकल्पना

व्याख्या

1) हॅरी जाॅन्सन:-

   ‘‘मुलभूत अर्थाने सा. परिवर्तन म्हणजे सामाजिक संरचनेतील बदल होय.’’

2) हाॅर्टन आणि हंट:-

   ‘‘ सामाजिक संरचनेतील आणि सामाजिक संबंधातील बदल म्हणजे सा. परिवर्तन होय.

3) किंग्जले डेव्हिस:-

   ‘‘ केवळ समाजाच्या संघटनात म्हणजेच समाजाच्या संरचनते आणि कार्यात घडून येणा-या बदलांनाच सा. परिवर्तन असे म्हणतात.’’

4) टिषलेर, व्हायटन आणि हंटर:-

   ‘‘ समाजाच्या सामाजिक संघटनात दर्जे संस्था आणि सामाजिक संरचनेत घडून येणा-या बदलांचा सामाजिक परिवर्तनात समावेष होतो.

5) माॅरिस गिन्सबर्ग यांच्या मते ‘‘ अभिवृत्ती आणि श्रध्दा यांच्यात होणा-या बदलांचाही सा. परिवर्तन या संज्ञेत समावेष केला जाणे आवष्यक आहे कारण या घटकांमुळेच सामाजिक संस्था टिकून राहतात आणि त्यांच्याबरोबरच त्या बदलतात.

वरील व्याख्यांचे निरीक्षण केल्यास सा. परिवर्तन या संकल्पनेचा अर्थ सहज ध्यानात येण्यासारखा आहे. सर्व व्याख्यांच्या आषयाचा अभ्यास केल्यास  सा. परिवर्तन म्हणजे

   1) सामाजिक संरचनेतील बदल     2) समाजाच्या संघटनातील बदल    3) सामाजिक दर्जे आणि भूमिकातील बदल 4) सामाजिक संस्थातील बदल  5) संरचना आणि कार्यातील बदल

6) अभिवृत्ती आणि श्रध्दा या घटकांतील बदल असा अर्थ निघतो हे सर्व घटक एकाच वास्तवतेचे भिन्न पैलू आहेत.सामाजिक परिवर्तनाची संकल्पना थोडी अधिक स्पष्ट व्हावी म्हणून वरीलपैकी काही महत्वाच्या मुदयांना आपण थोडक्यात स्पष्टीकरण करू.

1) सामाजिक मुल्यांतील परिवर्तन:-

   सामाजिक मुल्यातील बदल हे कोणत्याही समाजाच्या संरचनेतील बदल ठरतात कारण सभासदांनी आंतरीकृत केलेली सर्वांना समान अषी मुल्येच समाजाच्या ऐक्याचा आधारस्तभ असतात मुल्ये म्हणजे योग्य - अयोग्य बरोबर चूक चांगले वाईट हे ठरविण्याचे समाजातील सदस्यांनी स्वीकृत केलेले सर्वसामान्य स्वरूपाचे मानदंड किंवा आदर्ष होते मुल्ये समाजसंरचनेतील अत्यंत महत्वाचे मुलघटक होते विषिष्ट परिस्थितीत कोणाषी कसे वागावे हे अधिक नेमकेपणे सांगणारी सामाजिक नियमने मुल्यांवरती विविध सामाजिक नियमने मुल्यांवरच आधारलेली असतात. समाजातील संदस्यांना ज्या विविध सामाजिक भूमिका पार पाडाव्या लागतात. त्याकरीताही मुल्यांचे संपादन होणे गरजेचे असते म्हणजेच मुल्य हे समग्र समाजव्यवस्थेच्या संरचना आणि कार्यांच्या दृष्टीने महत्वाचे घटक होत. याच कारणामुळे मुल्यांत होणारे बदल संपुर्ण समाजव्यवस्थेत मुलगामी आणि दुरगामी परिवर्तने घडवून आणतात. म्हणूनच मुल्यातील बदल हे सामाजिक परिवर्तन ठरते. लोकषाही समता, न्याय ही मुल्ये पारंपारिक समाजात  मुलगामी परिवर्तने घडवून आणतात.

2) सामाजिक संस्थामधील परिवर्तन:-

   संस्था हे सामाजिक संरचनेचे अधिक षाष्वत स्वरूपाचे आणि अधिक प्रमाणात संरचित असे घटक होत कुटूंब, षासनव्यवस्था अर्थसंस्था, षिक्षणसंस्था या सामाजिक संस्थाच होत यात परिवर्तन घडून येणे म्हणजे समग्र समाजातच परिवर्तन घडून येणे होय. एकत्र कुटूंब पध्दतीचे विघटन घडून येवून विभक्त कुटूंबे निर्माण होणे हुकूमषाही राजवट जावून लोकषाही षासनव्यवस्था अस्तित्वात येण्ेा मानवी आणि प्राणी यांच्या श्रमावर आधारीत उत्पादनपध्दतीचा -हास होवून विजेवर चालणारी यंत्रे वापरात येवून कारखानापध्दती रूढ होणे ही संस्थात्मक परिवर्तनाची काही उदाहरणे होत. समाजातील संस्थात अनेक दर्जे भूमिकांची संरचना असते आणि त्यांचा आषय नियमनात्मक असतो. समाजातील सर्व संस्था परस्परसंबंधित आणि परस्परावलंबी असल्याने एका संस्थेतील बदल इतर संस्थात आणि प्र्यायाने समग्र समाजव्यवस्थेतच बदल घडून येण्यास कारणीभूत ठरतो म्हणूनच संस्थात्मक बदलाला सा. परिवर्तन असे म्हणतात.

3) सामाजिक संबंधातील बदल:-

मॅकायव्हर आणि पेज यांच्यासारखे काही समाजषास्त्रज्ञ सामाजिक संबंधातील बदल म्हणजेच सा. परिवर्तन असे म्हणतात. समाज म्हणजे सामाजिक परस्परबंधाचे जाळे असल्याने काही मुलभूत सामाजिक संबंधात परिवर्तन घडून आले म्हणजे संपुर्ण समाजातच परिवर्तन घडून येते म्हणूनच सामाजिक संबंधातील बदल हे सा. परिवर्तन ठरते. समाजातील हे संबंध व्यक्ती - व्यक्तीत व्यक्ती व समुहात आणि समुहा - समूहात असतात या विविध प्रकारच्या सामजिक संबंधात हळू हळू का होईना पण सातत्याने परिवर्तने घडून येत असतात. उदा. पुर्वीच्या काळातील गुरू शिष्य या देाहेांमधील संबंध आणि आजचे विदयार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील यांची तुलना केली तर त्या संबंधात कितीतरी बदल झाल्याचे दिसून येईल. पती पत्नी मालक मजूर, जमीनदार - शेतमजूर यांच्या संबंधातील हे बदल समाजातील या संबंधाना आधारभूत असणा-या नियमनात आणि मुल्यात घडून आलेल्या परिवर्तनामुळेच घडून येतात.

4) भूमिधारकांच्या अभिवृत्ती आणि श्रध्दामधील परिवर्तनः-

   सामाजिक भूमिका हे संरचनेचे पैलू होत पण भूमिका व्यक्ती वठवितात. भूमिका वठविणा-या व्यक्तींच्या भूमिकाविषयक अभिवृत्तीत श्रद्यदांत आणि मुल्यात होणारे परिवर्तन हेच काटेकोर अर्थाने संरचनात्मक परिवर्तन नसले तरी त्यामुळे संरचनात्मक परिवर्तन मात्र घडून येत असते. उदा. षिक्षक किंवा प्राध्यापक ही भूमिका वठविणा-या व्यक्तीच्या आपल्या भूमिकेविषयीच्या अभिवृत्ती आणि मुल्यात बदल घडून आला तर तिच्या भूमिकावर्तनावर त्याचा परिणाम होवू शकतो.

केवळ उदरनिर्वाहाचे साधन या दृष्टीने षिक्षक आपल्या भूमिकेकडे पाहू लागला तर तो आपली भूमिका प्रभावीपणे पार पाडू षकणार नाही.

   थोडक्यात, सा. परिवर्तन म्हणजे समाज रचनेतील परिवर्तन होय. दर्जे आणि भूमिका सामाजिक समूह आणि उपसमुह, सामाजिक नियमने आणि सांस्कृतिक मुल्ये हे सामाजिक संरचनेचे मुलघटक असल्याने या घटकात घडून येणारे कोणतेही परिवर्तन म्हणजे सा. परिवर्तन होय. हॅरी जाॅन्सन यांनी वरील घटकांबरोबरच उपसंरचनात्मक बदल (उदा. मालमत्तेचे हक्क आणि पुरस्कारवितरण व्यवस्थेतील परिवर्तन ) भूमिका धारकांतील बदल, भूमिकाधारकांच्या क्षमतांमधील बदल हेही अंतिमतः संरचनात्मक बदल घडवून आणू षकतात असे म्हटले जाते.

5) सामाजिक परिवर्तन आणि सांस्कृतिक परिवर्तन या देान संकल्पनात भेद आहे. मानवनिर्मित अषा सर्व भौतिक आणि अभौतिक गोष्टींचा संस्कृतीत समावेष होतो संस्कृतीच्या कोणत्याही घटकात होणारा बदल म्हणजे संास्कृतिक परिवर्तन होय. उदा. कपडे, दागिने, वेषभूषा फर्निचर यांत होत जाणारे बदल नवा शोध नवे तंत्र, वाहने भाषेत नव्या शब्ंदाची पडणारी भर, नवे संगीत प्रकार, कला प्रकार, नृत्यप्रकार केशभूषा इ. ही सांस्कृतिक परिवर्तनाची उदाहरणे आहेत परंतू सा. परिवर्तन मात्र नव्हे.

   मुल्ये नियमने श्रध्दा लोकरीती लोकनिती ज्ञान हे देखील संस्कृतीचे घटक आहेत. यात बदल झाले तर मात्र सामाजिक परिवर्तन घडून येते सांस्कृतिक परिवर्तन ही सा. परिवर्तन या संकल्पनेहून व्यापक अशी संकल्पना आहे. सर्व प्रकारची सा. परिवर्तने ही सांस्कृतिक परिवर्तने असतात पण सर्व प्रकारची सांस्कृतिक परिवर्तने ही सा. परिवर्तने असतीलच असे नाही कारण सांस्कृतिक परिवर्तन सा. परिवर्तनाला कारणीभूत ठरू शकते उदा. नवा शोध हे सांस्कृतिक परिवर्तनाचे उदा.आहे. पण नवा शोध सा. परिवर्तनाला चालना देवू शकतो उदा. रेडिओचा शोध शिक्षण, राजकारण, करमणूक धर्म, व्यापार, शेती, आर्थिक जीवन इ. जीवनाच्या क्षेत्रात दिडशे प्रकारचे बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरला असे आॅगबर्न यांच्या संशोधनात आढळून आले हे दोन पैलू गंुतलेले असतात.

6) परिवर्तन ही तटस्थ संकंल्पनाः- परिवर्तन चांगले किंवा वाईट असू शकते या दृष्टीने परिवर्तन आणि प्रगती या भिन्न संकल्पना आहेत प्रगती ही मुल्यप्रिय व्यक्त करणारी संकल्पना आहे. प्रगती म्हणजे अपेक्षित किंवा वांच्छनीय दिशेने घडून येणारा बदल होय. कोणाच्या दृष्टीने वांच्छनीय बदल वा प्रगती याबाबत मात्र मतभेद असू शकतात उच इमारती वेगाने धावणारी वाहने मोठी धरणे (अनेकांना विस्थापित करून नैसर्गिक संपत्तीचा विनाश घडून यंेण्यास कारणीभूत ठरणारी) वाढते पगार घटस्फोटांचे वाढते प्रमाण गर्भपाताचे वाढते प्रमाण ही प्रगतीची लक्षणे मानावीत काय? याबाबत मतभेद आहेत.

   उत्क्रांती म्हणजे मंदगतीने निरतंरपण्ेा उन्नत दिशेकडे होत जाणारे परिवर्तन होय. उत्क्रांतीद्वारे गुणात्मक परिवर्तनाचा बोध होतो क्रंाती ही संज्ञादेखील परिवर्तन सुचक आहे. पण उत्क्रांती आणि क्रंाती या देाहोंतील परिवर्तनात भेद आहेत.

क्रंाती म्हणजे समग्र समाजव्यवस्थेत अल्पावधीतच घडून येणारा व्यापक किंवा अमुलाग्र स्वरूपाचा बदल होय. उत्क्रांतींप्रक्रियेतील बदल हळूहळू घडून येतात पण क्रंातीकारक परिवर्तने झपाटयाने अल्पावधीतच घडून येतात उत्क्रंातीत तीच समाजव्यवस्था हळूहळू उन्नत होत जाते. पण क्रंातीत जूनी समाजव्यवस्थाच बदलून त्याएवजी मुलभूत भिन्नता असणारी नवी समाजव्यवस्था निर्माण केली जाते क्रांतीकारक बदल सामान्यतः हिंसक मार्गाने घडून येत असले तरी सापेक्षतः शांततामय मार्गानेही क्रंाती घडून येवू शकते वृध्दी किवंा वाढ ही संकल्पना परिणामात्मक किंवा संख्यात्मक बदल सुचीत करते उदा. शरीराची वाढ होत जाते म्हणजे शरीराचे आकारमान बदलते. लोकसंख्या वाढते म्हणजे दंेशातील व्यक्तंीच्या संख्येत भर पडत जाते.

सामाजिक परिवर्तनाची वैशिष्टये:-

सामाजिक परिवर्तनाची ही कशी प्रक्रिंया आहे ?

1) सार्वत्रिकता:-

   सामाजिक परविर्तन ही सार्वत्रिक प्रक्रिया आहे. कोणताही समाज स्थायी स्वरूपाचा नसतो त्यात सातत्याने परिवर्तन होत असते परिवर्तनाचा वेग आणि दिषा भिन्न प्रकारची असू षकते परंतू परिवर्तन सातत्याने घडत असते उदा. आदिवासी समाजात परिवर्तनाचा वेग मंद स्वरूपाचा असला तर आधुनिक समाजात परिवर्तन जलद गतीने घडत असते. यावरून असे म्हणता येते की परिवर्तन सार्वत्रिक स्वरूपाची आहे.

2) अपरिहार्यता:-

   सामाजिक परिवर्तन एक अपरिहार्य प्रक्रिया आहे.परिवर्तनामुळे समाजातील सातत्य व विकासाचा अनुभव होतो बाहय घटकात बदल होत असतात त्याबरोबर समाजात अनुकुलन साधणे जरूरीचे असते. अनुकुलन झाले नाही तर समाजावर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता असते अन्यथा समाजाचे अस्तित्व धोक्यात येवू शकते असे होवू नये म्हणून सामाजिक परिवर्तनाची घडून येण्ेा जरूरीचे असते म्हणून सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया अपरिहार्य आहे.

3) तुलनात्मकता:-

सामाजिक परिवर्तन तुलनात्मक असते तुलना केल्याशिवाय परिवर्तन दर्शविता येत नाही. तुलना करण्यासाठी दोन समुह समुदाय किंवा समाज असावा लागतो किंवा भूतकाळ आणि वर्तमानकाळ लक्षात घेण्यासाठी परिवर्तनाची तुलना केली जाते अमेरिकेत समाजाच्या तुलनेत भारतीय समाजात परिवर्तनाचा वेग मंद आहे. तुलना करताना एक आरंभ ंिबदू घ्यावा लागतो आरंभ ंिबदूपासून शेवटच्या ंिबदूपर्यंतचा दुस-या घटकाच्या संदर्भात परिवर्तन लक्षात घेतला जातो.

4) अमुर्तता:-

   समाज म्हणजे सामाजिक संबंधाची व्यवस्था सामाजिक संबंध  अमुर्त अदृष्य  व मनोमन आकलन होणारे असतात. या अमुर्त संबंधातील परिवर्तन सुध्दा अमुर्त स्वरूपाचे असते सामाजिक मुल्ये प्रमाणके अमुर्त असतात आणि त्यातील बदल आपण परिवर्तन असे म्हणतो या दृष्टीने परिवर्तन पण अमुर्त स्वरूपाचे असते सामाजिक परिवर्तन जरी अमुर्त असले तरी संषोधन पध्दतीचा अवलंब करून परिवर्तन दर्शविता येते.

5) भविष्यकथन:-

नैसर्गिक शास्त्रात भविष्यकथनतेला वाव असतो त्याप्रमाणात सामाजिकशास्त्रात भविष्यकथन तंतोतंत होवू शकत नाही. समाजजीवनाविषयी वैज्ञानिक पध्दतीचा अवलंब करून संकलित केलेल्या माहितीला आधार मानून सामान्यीकरण पध्दतीने काही अंदाज बांधले जावू शकतात. समाजजीवनात विजातीयता आणि गतिशिलता असल्या कारणाने व दुसरे म्हणजे या गतिशिलतेची दिशा व गतीमध्ये सामान्य तत्व नसल्यामुळे निश्चित स्वरूपाचे अंदाज बांधणे कठीण असते. येत्या निवडणुकीत कोणता पक्ष सत्तेवर येणार यासंबंधी काही अंदाज करावे लागतात ते चुक किंवा अचूक ठरू शकतात. पुढील दशकात लोकसंख्या वाढणार असे भविष्य जन्मदर व मृत्यूदर लक्षात घेवून वर्ताविता येते.   

सारंाश इतके मात्र निश्चित की सामाजिक परिवर्तनाविषयी भविष्यकथन करण्यावर ब-याच मर्यादा असतात.

6) गतिभिन्नता:-

   समाजातील विभिन्न अंगाचा विचार केला तर त्यातील बदलाची गती सारखी नसते (सांस्कृतिक पश्चायन ) किंवा कोणत्याही दोन समाजातील परिवर्तनाची गती एकसारखी नसते. एका भूभागावर वसलेल्या दोन समाजातही बदलातील गतिभिन्नतेचा प्रत्यय येतो कारण कोणतेही देान समाज अगदी सारखे नसतात आणि दुसरे म्हणजे अंतर्गत व बाहयîकारकांच्या प्रभावाची मात्रा सारखी नसते त्यामुळे परिवर्तनाच्या गतीत ंअंतर दिसून येते.

   यारितीने सामाजिक परिवर्तनाची वैशिष्ट्ये मांडली जातात प्रस्तृत वैशिष्ट्यांचा अध्ययनावरून परिवर्तनाचे सम्यक रूप आपल्या लक्षात येते.

सामाजिक परिवर्तनाचे सिध्ंदात:-

समाजशास्त्रज्ञांनी समाजिक परिवर्तनाचे सिंध्दांत अशा तीन प्रतिमानांचा उल्लेख केला आहे ती प्रतिमाने खालीलप्रमाण्ेा

1) एक रेषात्मक प्रतिमान:-

   एकरेषात्मक परिवर्तन म्हणजे निरंतर वरच्या दिशेकडे होणारा आणि सरळ रेषेने दर्षविल्या जाणारा बदल होय. आॅगस्त काॅंतने समाज विकासाच्या धर्मशास्त्रीय -- तत्वशास्त्रीय -- आणि विज्ञानवादी अशा तीन अवस्था मांडल्या आहेत. हया प्रकारच्या परिवर्तनास एकरेषात्मक प्रतिमान म्हणतात. डार्विनचा जैव उत्क्रांतीचा सिंध्दात व त्याच्या प्रभावाने सामाजिक डार्विनवादयांनी मांडलेला सामाजिक उत्क्रंातीचा सिध्दांत एकरेषात्मक परिवर्तन स्पष्ट करणारा आहे. थोडक्यात निरंतर उध्र्वगामी स्वरूपाच्या बदलास एकरेषात्मक परिवर्तन म्हणतात.

ब) चढ उतार परिवर्तन:-

   सामाजिक परिवर्तन निरंतर उन्नत दिशेकडेच होते असे नाही. तर काही काळापर्यंत उन्नत दिशेकडेच बदल होत जावून पुनः अपनत दिशेकडे बदल होताना आढळतो. एकप्रकारे उध्र्वगामी नंतर अधोगामी पुनः उध्र्वगामी असे त्यांचे स्वरूप असते याबाबतीत लोकसंख्येचे उदाहरण देता येईल. लोकसंख्येत वृध्दी व -हास प्रक्रिया चाललेली असते.

क) चक्राकार परिवर्तन:-

   निसर्गात दिवस व रात्र ऋतुंचे चक्र, तारांगणाचे भ्रमण आणि मानवी जीवनात जन्म ते वृध्दावस्थेपर्यंत कालखंड ही सर्व चक्राकार एक आरा एका ंिबदूतून फिरू लागतो. पुनः मुळ बिंदूवर येतो याला चक्राकार बदल असे म्हणतात.

पॅरेतो, स्पेगलर, आणि अर्नालड टाॅयन्बी यांनी मानवी इतिहासाच्या अभ्यासातून चक्राकार बदलाचे उदाहरण दिले आहे. स्पेंगलरच्या मते आव्हान आणि त्याला दिलेल्या प्रतिसादातून मानवी सभ्यतेचा विकास होतो सोरोकिनसारखे अभ्यासक देखील चक्राकार सिध्दांताचे पुरस्कर्ते आहेत. पॅरेतोचा शिष्टजन अभिसरण सिध्दांत चक्राकार परिवर्तनदर्शक आहे.

के. डेव्हिसन म्हटले आहे की परिवर्तनाची दिशा सांगणारे एकरेषीय आणि चक्राकार सिध्दात खरोखरच परिवर्तनाची दिशा सांगू शकतात काय? याचा विचार केला पाहीजे मानवी समाजात नित्य परिवर्तन होत असले तरी त्यात वरील पध्दतीनेच बदल होईल हे म्हणणे धाडसाचे होईल. कारण कोणत्याही समाजात एका वर्षाच्या कालखंडात त्याचे स्वरूप एकसारखे राहील हे म्हणता येत नाही. दुसरी महत्वाची बाब म्हणजे समाजातील सर्व क्षेत्रात कार्यान्वीत असलेल्या बदलांची आपणास सर्वार्थाने जाणिव असते असे सुध्दा ठामपणे आपण निवेदन करू शकत नाही वस्तूरूप संस्कृतीतील बदल दृष्य प्रकारचे असले तरी अमुर्त संबंधातील बदलाविषयी इतके त्वरीत मत देता येत नाही.

तिसरी गोष्ट म्हणजे परिवर्तनाची दिशा स्पष्ट करणारे अभ्यासक इतिहासाबद्दल जेव्हा सिध्दांत मांडतात तेव्हा त्याविषयीची आधारभूत सामग्री किती त्रोटक आहे हे सुध्दा लक्षात घेत नाहीत, कारण इतक्या अपु-या समग्रीच्या आधारावर परिवर्तनाची दिशा ठरविणे योग्य ठरणार नाही. त्यासाठी अभ्यासकांनी अनुभवजन्य तथ्यांचा आधारावर दिर्घकालखंड विचारात घेवून दिशादर्शक प्रतिमानाची मांडणी करणे संयुक्तिक होईल.

ड) नियतीवाद:-

   कित्येक वेळा समाजशास्त्रज्ञ कोणत्या तरी एका विशिष्ट घटकाला महत्व देतात व त्या घटकालाच अगर कारणालाच सामाजिक परिवर्तनाचे कारण मानतात. अशा प्रकारच्या तात्वीक विचारसरणीला अगर सिध्दंाताला नियतीवाद असे म्हणतात.

   नियतीवाद दोन प्रकार मान्य करतो. पहिला प्रकार हा सामाजिक परिवर्तनास अ- सामाजिक घटक कारणीभूत आहे असे मानतेा, तर दुसरा प्रकार सामाजिक घटक हाच सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यास कारणीभूत होतो असे मानतो. सामाजिक परिवर्तनास अ- सामाजिक घटक कारणीभूत होतात हे खोटे आहे असे सिध्द करणे सोपे जाते, उदा. हवामानातील बदलामुळे सामाजिक बदल घडून येत नाहीत हे दाखविले म्हणजे अ - सामाजिक घटकांचा सिध्दंात असिध्द होतो. किंग्जले डेव्हीस यांनी याबाबतीत एक सोपे उदा. दिले आहे. गेल्या पाचशे वर्षात युरोपच्या हवामानात विशेष असा काही बदल झाला नाही. तथापी या पाचशे वर्षात युरोपात सामाजिक बदल मात्र खुपच घडून आले आहेत. औदयोगिक का्रंतीमुळे तर युरोपमध्ये आश्चर्यकारक बदल घडून आले.

   दुसरे असे की समान हवामान व वातावरण असूनही भिन्न संस्कृती उदयास येतात व वाढीस लागतात. याच्या उलट भिन्न प्रकारचे हवामान असूनही एकाच प्रकारची संस्कृती असल्योच जगात आढळून येते. डेव्हीस यांनी यांबाबत असे सुचक व मर्मग्राही विधान केले आहे की, भौगोलीक परिस्थिती ही अंषतः मानवनिर्मित परिस्थीती असते, आणि म्हणून भौगोलिक परिस्थितीवर समाजाचेही अंषतः नियंत्रण चालते. म्हणजे सामाजिक परिवर्तनास अ- सामाजिक घटक कारणीभूत असतात असे प्रतिपादन करणारा नियतिवादाचा जो प्रकार आहे तो असिध्द ठरतो.

   सामाजिक परिवर्तनास सामाजिक स्वरूपाचेच घटक (उदा. आर्थिक, राजकीय ) कारणीभूत होतात असे म्हणणारा नियतीवादाचा आणखी एक प्रकार आहे. त्याचा आता विचार करू.

   मानवाने आजपर्यंत जो इतिहास घडविला आहे. त्याचे कारण आर्थिक घटक होत असे हा सिध्दांत म्हणतो. येथे आर्थिक घटक म्हणजे काय याचा अर्थ स्पष्ट केला जात नाही. हा या सिध्दांताचा देाष आहे. ‘आर्थिक घटक ’ या कल्पनेत कित्येक वेळा तांत्रिक शोधंाचाही समावेश केला जातो, तर कित्येक अन्यवेळा राजनैतिक घटकांचाही समावेश केला जातो. सामाजिक राजकीय व बौध्दीक जीवनाची वैशिष्टये ही उत्पादनावर (आर्थिक उत्पादनावर ) अवलबून असतात असे माक्र्स व एंजेल्स यांचे म्हणणे आहे. ‘आर्थिक घटक ’ या संज्ञेचा सोयीस्करपणे अर्थ फिरविण्यात हे शास्त्रज्ञ पटाईत असल्यामुळे आर्थिक घटकवाद सिध्द करणे त्यांना फार सेापे जाते आणि तो असिध्द करणे मात्र आपल्याला तितकेच जड जाते.

परंतू केवळ आर्थिक कारणे हीच सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यास पुरशी ठरत नाही. या महत्वाच्या मध्याकडे डेव्हीस यांनी आपले लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते, हिंदूस्थानची फाळणी करून आम्हाला स्वतंत्र राष्ट दîा अशी पाकिस्तान निर्मितीची मागणी 1947 मध्ये मुस्लिमांनी जी केली तिच्यामागे काही आर्थिक कारण्ेा होती असे म्हणता येत नाही. वस्तुतः पाकिस्तानकडे गेलेला भाग काही अपवाद वगळल्यास फारसा अर्थाेत्पादक नाही म्हणजे आर्थिकदृष्टया पाहता त्यांची कुंचबणाच होणार होती. तथापि धार्मिक भावनेचे ऐक्य व प्रभाव बलवत्तर असल्यामुळे तिच्या जोरावर त्यांनी आर्थिक झीज सोसूनही पाकिस्तानची निर्मिती केली. म्हणजे राष्टनिर्मितीमागे आर्थिक कारणे नसून धार्मिक कारणे आहेत हे या उदाहरणांच्या संदर्भात आपल्याला मान्य करावे लागते.

- सामाजिक परिवर्तन आणि सांस्कृतिक परिवर्तन:-

   के. डेव्हिसने सामाजिक परिवर्तन आणि सांस्कृतिक परविर्तनातील भेद स्पष्ट केला आहे. त्यांचे मताप्रमाण्ेा सा. परिवर्तन म्हणजे समाज संरचनेत झालेला बदल होय. उपगट, भूमिका मुल्ये आणि प्रमाणकातील बदलातून परिवर्तनाचा प्रत्यय येतो. सांस्कृतिक परिवर्तन म्हणजे कला, साहित्य, विज्ञान व तांत्रिक बाजू आणि मानवनिर्मित सर्व घटकात झालेला बदल होय. वास्तविक पाहता सांस्कृतिक परिवर्तन हे सामाजिक परिवर्तनापेक्षा व्यापक असते. त्यामुळे सामाजिक संरचनेतील मुल्ये, प्रमाणके व अन्य घटकांतील बदलातून सांस्कृतिक परिवर्तन होते हे निश्चितपणे म्हणता येते.

सांस्कृतिक बदलाचा प्रभाव घडून सामाजिक बदल होत असतो. हे विधान सर्वच बाबतीत शास्त्रीय ठरत नाही, कारण कलाक्षेत्रातील किंवा भाषेतील बदलाचा परिणाम होवून सांस्कृतिक परिवर्तन निदर्शनास येईल असे ठामपणे म्हणता येत नाही. फॅशन ही सांस्कृतिक क्षेत्रातील एक घटना आहे. फॅशनमध्ये झालेल्या बदलातून कोणते सामाजिक परिवर्तन घडते ! हा मुलभूत प्रश्न आहे.

- सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक आंतरक्रिया:-

सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक आंतरक्रियेत भेद आहे. आंतरक्रिया ही व्यक्ती - व्यक्ती, व्यक्ती - समुह आणि समुह - समुहात चाललेली असते. आंतरक्रियेमुळे समाजात बदल घडतोच असे ठामपण्ेा म्हणता येत नाही. याबाबतीत आदिवासी समाजाचा उल्लेख करावा लागेल. आदिवासी समाजात असंख्य वर्षापासून आंतरक्रिया विदयमान आहे, तरी त्याच्यात तीव्र गतीने परिवर्तन होताना आढळत नाही. मात्र ब-याचवेळा आंतरक्रियेतून परिवर्तनाला प्रेरणा प्राप्त होते. उदा. जमीनदार व कुळे, भांडवलदार व श्रमिक, गुलाम व मालक यांच्यातील संघर्षात्मक आंतंरक्रियेतून परिवर्तनास चालना मिळालेली आहे. अशा आंतरक्रियेतून अनेक सामाजिक अंदोलने उभी राहीली असून परिवर्तनाला गती प्राप्त झाली आहे. सारंाश सामाजिक परिवर्तन व सामाजिक आंतरक्रियेतील संबंधाचा विचार करणे उपयुक्त ठरते.

सामाजिक परिवर्तनाचा कारणे

   समाजात परिवर्तन का घडते? याला कोणती परिस्थिती जबाबदार असते, परिवर्तनाचा उगम स्पष्ट करणा-या दोन विचारसरणीत प्रचलित झाल्या आहेत. हे मत प्रवाह म्हणजे -

1) अविष्कार

2) प्रसार

   क्लार्क विझलर, बोअस तसेच क्रोबर हे प्रसारवादी मताचे प्रणेते आहेत. त्यंाच्या मते सामाजिक परिवर्तनाचा उगम प्रसार प्रक्रियेत आहे. प्रसार होण्यासाठी दोन समुहात संपर्काची गरज असते. तसचे त्यांच्यात सांकेतिक आदानप्रदान असले पाहीजे. प्रसार म्हणजे संास्कृतिक घटकांचा एका समुहाकडून दुस-या समुहात फेलाव होय.

प्रसारवादी असे म्हणतात की, मानवी समाजात सध्यकाळात विदयमान असलेल्या सांस्कृतिक घटकांपैकी 90 टक्के घटक प्रसरण पध्दतीने त्या समाजाने स्विकारलेले आढळतात.भारतीय समाजाचा विचार करता तर नाणी छपाईची साधने, घडयाळ इंग्रजी भाषेचा शिष्टाचार संकेत आणि विश्वास, साहित्य, वेषभूषा इ. असंख्य बाबी आपण ब्रिटीशांकडून घेतलेल्या आहेत. ही सर्व प्रसरणाची उदाहरणे होत.

आदिवासी समाजातील परिवर्तनासाठी त्या समाजातील शोधापेक्षा प्रसार रीतीने प्राप्त झालेले घटक जास्त प्रभावी ठरल्याची उदाहरण्ेा आहेत. न्युझीलंड देशातील माओरी आदिवासी प्रसार पध्दतीने प्रगत समाजाच्या टप्प्यावर पोहोचलो आहेत.

दुस-या मत प्रवाहाचे  प्रणेते सामाजिक परिवर्तनासाठी अविष्कार घटकाला प्राधान्य देतात. त्याच्यंामते प्रत्येक समाजात अविष्कार क्षमता असेत. समस्यांवर मात करण्ेा व गरजा भागविण्याचे उद्देषाने नवीन नवीन शोध लागतात. अंदमान निकोबार बेटातील आदिवासी शिकार करण्यासाठी होड्या, जाळी, तिर धनुष्याचा वापर करतात. हे सर्व त्यांनी लावलेले शोध आहेत. समाजात शोध लागले म्हणजे बदलास प्रेरणा मिळते. रेडीओ, टेलीव्हीजन, टेलीफोन, रेल्वे, छपाईची यंत्रे, कृषीक्षेत्रातील व अन्य क्षेत्रातील शोधामुळे या समाजाची आधुनिकीकरणाकडे वाटचाल चालली आहे. जे अस्तित्वात नाही अशा घटकांची निर्मिती म्हणजे शोध होय.

यंत्राच्या अविष्काराने भांडवलदार व श्रमिक असे दोन वर्ग प्रचलित झाले. शहरांची संख्या वाढली, विभक्त कुटूंबाचा प्रभाव वाढला, स्तरीकरणाच्या आधारावर बदल झाला एकुण नवीन शोधांमुळे समाज परिवर्तनाची प्रक्रिया प्रत्ययास आली.

काही अभ्यासक परिवर्तनाचे फक्त प्रसार हेच प्रधान कारण मानतात. इतर अभ्यासक परिवर्तनाचे सर्व श्रेय अविष्कारास देतात. खेर म्हणजे सामाजिक परिवर्तनासाठी प्रसार आणि अविष्काराची नितांत गरज आहे.

- सामाजिक परिवर्तनाचे प्रकार

सामाजिक परिवर्तनाचे अध्ययन करीत असताना परिवर्तन ही तटस्थ संज्ञा आहे हे लक्षात घ्यावे लागते. कारण यावरून आपणास परिवर्तनाची दिशा, सातत्य किंवा अन्य परिवर्तन नियमासंबंधी माहिती प्राप्त होत नाही. म्हणून अभ्यासकांनी तीन सामाजिक प्रतिमानांचा उल्लेख केलेला आहे. या प्रतिमानाच्या मदतीने बदलाच्या दिशेने बोध होतो. मात्र, परिवर्तनाची गती आणि सातत्याविषयी निश्चितपणे सांगता येत नाही. येथे मॅकआयव्हर आणि पेज यांनी केलेल्या चर्चेप्रमाण्ेा प्रक्रिया उत्क्रांती प्रगती व अन्य संज्ञाचे विवरण अपेक्षित आहे.

प्रक्रिया:-

   समाजात निरंतर चालणारी क्रिया म्हणजे प्रक्रिया हाये. प्रक्रियेस समाजातील घटकात निरंतर परिवर्तन होत असते. यादृष्टीने सामाजिक परिवर्तनास प्रक्रिया मानले जाते. प्रक्रियेत घटकांचे सातत्य असते.