विकिपीडिया चर्चा:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
.
प्रो. एन. एस. गोपालकृष्णन यांच्या सोबतच्या ईमेल चर्चेचा मतितार्थ
[संपादन]प्रो. डॉ. एन. एस. गोपालकृष्णन कोचीन विद्यापीठात आंतर विद्यापीठीय बौद्धीक संपदा कायदे विषयक सेंटरचे प्राध्यापक असून प्रा.डॉ. माधवराव गाडगीळांचे मित्र आहेत. प्रा.डॉ. माधवराव गाडगीळांनी इमेल परिचय करुन दिल्यामुळे त्यांनी कॉपीराईट विषयक विचारलेल्या बऱ्याच शंकांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यांनी कदाचित विकिपीडीया व विकिमिडीया कॉमन्स मध्ये संपादने करुन पाहिलेली नसल्यामुळे Resolution:Licensing_policy आणि at http://freedomdefined.org/Definition या दोन्हीच्या परिणामी प्रत्येक भाषी विकिपीडिया आणि विकिमिडीया कॉमन्स, इंग्रजी विकिपीडिया आणि इंग्रजी विकिस्रोत च्या वेगवेगळ्या पॉलीसींची आणि परिणामांचे सर्वच बारकावे नीटसे लक्षात आले नसले हे लक्षात घेऊन त्यांची उत्तरे प्रकल्पानुसारी विचारात घ्यावी लागतील असे वाटते.
१) भारतातून केलेल्या अपलोड्सना भारतीय कायदाच लागू होतो.
२) जे एकदा कायद्याने कॉपीराईट फ्री होऊन गेले आहे त्यावर नव्या बदला खेरीज कॉपीराईट पुन्हा उत्पन्न होत नाही. (अनामिक लेखक उजेडात येणे आणि मृत्य्य् उपरांत प्रकाशन ह्या केसेस वेगळ्या)
३) पण जेव्हा कॉपीराईट संपलेला नाही तेव्हा नवीनतम कायद्याने झालेले बदल अमलात रहातात, जुन्या काळातला कायद्याचा अमल रहात नाही जसे की १८४७ च्या कायद्याने कॉपीराईट कालावधी कमी होता पण तरीही १९५७ चा कायदा आणि अमेंडमेंट्स नंतर वाढीव कॉपीराईट कालावधीच लागू होतात म्हणजे लेखकाचे आयुष्य + ६० वर्षे हाच मुख्य नियम भारतात लागू होतो.
४) अपलोडरची लायाबिलीटी एक्सप्रेस आणि एक्सप्लिसिटली फिक्स करणे श्रेयस्कर असते.
- हि अपेक्षा विकिपीडिया ॲनॉनिमिटी सोबत जराशी क्लॅश होत असावी.
५) कॉपीराईट फ्री न केलेले/ न झालेले; लोगो, सिनेमा पोस्टर्स, सेलिब्रिटी फोटोग्राफचे कटपेस्ट कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन ठरावे.
- काही (मराठी) विकिपीडिया सदस्यांनी विकिपीडिया हा नॉन-कमर्शीअल-एज्यूकेशनल प्रॉजेक्ट अशी व्याख्या करण्याचा प्रयास करुन फेअरडील लावता येईल का हा दृष्टीकोण प्राध्यापक महोदयांच्या समोर ठेऊनही त्यांचे उत्तर असे होते.
६) सबंध कॉपीराईट फ्रि पुस्तकाच्या आत/सोबत असलेले पुस्तक कव्हर, पुसकातील प्रस्तावना, पुस्तकातील लेखकेतर छायाचित्रकारांची छायाचित्रे लेखकाला अनुमती असल्यामुळे संबंध कॉपीराईट फ्रि पुस्तक अपलोड करताना सहसा समस्या येऊ नये परंतु पुस्तकाचे कव्हर, पुस्तकातील प्रस्तावना पुस्तकातील लेखकेतर छायाचित्रकारांची छायाचित्रे स्वतंत्रपणे वापरावयाची झाल्यास कॉपीराईट अस्तीत्व स्वतंत्रपणे विचारात घेतले जावयास हवे.
- म्हणजे विकिस्रोतवर सबंध कॉपीराईट फ्री पुस्तक चढवताना त्याच्या आत/सोबत असलेली पुस्तक कव्हर, प्रस्तावना, आणि लेखकेतर छायाचित्रांनाही फारशी समस्या नसावी परंतु विकिपीडियावर केवळ पुस्तक कव्हर, प्रस्तावना अथवा पुस्तकातील छायाचित्रे वापरताना त्यांचा निर्माता स्वतंत्र नाही ना आणि त्यावर कॉपीराईट अद्याप शिल्लक नाहीना हे लक्षात घ्यावे लागेल.
७) मॉन्यूमेंट्स आणि देवतांच्या सर्वसाधारण छायाचित्रांच्या वापरास फारशी समस्या नसावी.
८) बातमीची बातमी ठिक आहे पण बातम्या अथवा त्यातील कॉपीराईटेड छायाचित्रे कॉपीपेस्ट करणे उल्लंघन ठरणारे असू शकते.
९) इतर पब्लिक ॲडव्हर्टाईजमेंट आणि प्रोमोशनल कंटेटचा फेअर डील प्रेडीक्ट करणे सोपी गोष्ट नाही काही विशीष्ट सर्कंमस्टान्सेस मध्ये परमिसीबल असू शकेल का ते प्रत्येक केसवर स्वतंत्रपणे अवलंबून असेल.
१०) उल्लंघनाच्या दाव्याची नोटीस आल्यास असा मजकुर/छायाचित्रे वगळावीत.
- वर सुरवातीस म्हटल्या प्रमाणे Resolution:Licensing_policy आणि at http://freedomdefined.org/Definition हे दोन मुद्दे कदाचित विकिपीडिया वापरलेला नसल्यामुळे तेवढे निटसे त्यांना लक्षात घेता आले नसावेत.
- उत्तरदायित्वास नकार लागू
- @सुबोध कुलकर्णी: काही शंका असल्यास चर्चा करावी म्हणजे प्रा. सरांकडून आवश्यकते नुसार शंका निरसन करुन घेणे सुकर होईल.