पाल्कची सामुद्रधुनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पाल्कची सामुद्रधुनी

पाल्कची सामुद्रधुनी (इंग्लिश: Palk Strait) अर्थात पाल्क सामुद्रधुनी ही भारताचे तमिळनाडू राज्य व श्रीलंका बेटाचा उत्तर भाग यांदरम्यान असलेली सामुद्रधुनी आहे. तिची रुंदी ५३ कि.मी. ते ८० कि.मी. असून ईशान्येकडील बंगालचा उपसागरनैऋत्येकडील मन्नाराचे आखात यांना जोडते. इ.स. १७५५ ते इ.स. १७६३ सालांदरम्यान मद्रास प्रेसिडेन्सीचा गव्हर्नर असलेल्या रॉबर्ट पाल्क याच्या नावावरून सामुद्रधुनीला नाव देण्यात आले.