Jump to content

भदोही जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भदोही जिल्हा
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा
भदोही जिल्हा चे स्थान
भदोही जिल्हा चे स्थान
उत्तर प्रदेश मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
मुख्यालय ज्ञानपूर
क्षेत्रफळ
 - एकूण १,०१३ चौरस किमी (३९१ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १५,७८,२१३ (२०११)
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ भदोही
संकेतस्थळ


भदोही जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक लहान जिल्हा आहे. हा जिल्हा उत्तर प्रदेशच्या आग्नेय भागात स्थित असून ज्ञानपूर हे भदोही जिल्ह्याचे मुख्यालय आहे. १९९४ साली वाराणसी जिल्ह्याचे विभाजन करून हा जिल्हा निर्माण करण्यात आला. मायावतीच्या राजवटीदरम्यान ह्या जिल्ह्याचे नाव बदलून संत रविदास नगर जिल्हा असे ठेवण्यात आले होते.

गंगा नदी भदोही जिल्ह्याच्या नैऋत्येकडून वाहते. २०११ साली भदोही जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १६ लाख होती. हिंदी सोबत भोजपुरीअवधी ह्या भाषा देखील येथे प्रचलित आहेत.