द्वितीया
Appearance
द्वितीया ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. अमावास्येनंतर दुसऱ्या दिवशी आली तर तिला शुक्ल द्वितीया आणि पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी आली तर वद्य द्वितीया म्हणतात. अमावास्येनंतर आलेल्या प्रतिपदेला जर चंद्रदर्शन झाले नाही, तर ते द्वितीयेला नक्की होते, आणि नवा मुसलमानी महिना सुरू होतो. काही ठराविक महिन्यातल्या चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ईद असते.
द्वितीया (आणि सप्तमी/द्वादशीला) भद्रा तिथी म्हणतात.
काही महत्त्वाच्या द्वितीया
[संपादन]- चैत्र शुक्ल द्वितीया - सिंधारा दूज/दोज/दौज
- चैत्र वद्य द्वितीया - आसों दोज/आशा दूज
- वैशाख वद्य द्वितीया - नारद जयंती, झुलेलाल जयंती
- आषाढ शुक्ल द्वितीया - जगन्नाथपुरीला रथयात्रेची सुरुवात.
- कार्तिक शुक्ल द्वितीया - यम द्वितीया, भाऊबीज; (हिंदीत भाई दूज)
- पौष शुक्ल द्वितीया - नृसिंह सरस्वती जयंती
- फाल्गुन वद्य द्वितीया - तुकाराम बीज
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |