लघुपथ: दा:मं

दालन:मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विशेष लेख

केदारेश्वर मंदिर, धर्मापूरी
केदारेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन शिवमंदिर आहे. याचे स्थापत्य चालुक्य शैलीत केले आहे.

मराठवाडा परिसर प्राचीन शिल्प स्थापत्य अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत. सातवाहनांपासून यादव काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या.[ संदर्भ हवा ]
मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले.प्रतिष्ठाननगरी ही त्यांची राजधानी होती. वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष वाकाटकांनी राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे वर्ष म्हणजे इ.स. ५५० ते ७५० अशी टिकली. ह्युएन-त्सांग याच काळात मराठवाड्यात आला होता. त्यानंतर इथे राष्ट्रकुटांची सत्ता निर्माण झाली. राष्ट्रकुटांच्या प्रभावी राजवटीनंतर इथे आले कल्याणीचे चालुक्य कल्याणी. हे सरधारणत: १० वे ११ वे शतक नंतर इथे अल्पकाळ सत्ता टिकली ती कलचुरींची.
सर्व राजवंशात सातवाहनांपासून ते यादवांपर्यंत मराठवाड्यात धार्मिक,सामाजिक,सांस्कृतिक असंख्य घडामोडी घडल्या. प्राचीन कलावैभवाची साक्ष देणारी अनेक देवालये व गुहाशिल्पे निर्माण झाली. या सर्व देवालयात धर्मापुरीचे केदारेश्वर देवालय वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे.काळाच्या ओघात मूळ मंदिराचा जवळजवळ निम्माच भाग आज कसाबसा तग धरुन उभा आहे.
चालुक्य राजवटीतील विक्रमादित्य सहावा याचा पुत्र सोमेश्वर तृतीय याने धर्मापुरी नगरी निर्माण केली. या राजाला साहित्याची आवड होती. त्याने 'अभिलषितार्थ चिंतामणी' (राजमानसोल्लास) या ग्रंथाची निर्मिती केली होती. या धर्मापुरीत सर्व सोयी होत्या. भव्य राजप्रासाद,नृत्यशाळा,तलाव,मनोहारी उद्याने,सुंदर वनराइ,उत्तुंग देवालये आणि भव्य बाजारपेठ यांनी ही नगरी सजलेली व गजबजलेली होती.

धर्मापुरीत आजपावेतो तीन कानडी आणि एक नागरी शिलालेख उपलब्ध आहे. नागरी शिलालेखाचे वाचन पुरातत्व खात्याच्या वतीने डॉ.वि.भी.कोलते यांनी केले.हा शिलालेख संस्कृत भाषेत कोरलेला असून लेखनाचा काळ 'शके संवत १०५६ आनंदसंवत्सांतर्गत आषाढ वदी १५ सोमे' हा दिलेला आहे. इसवीसनाप्रमाणे त्यादिवशी तारीख होती २३ जुलै ११३४ वार सोमवार.

हे मंदीर गावापासून सुमारे १ कि.मी. अंतरावर असून ही पूर्ण वास्तू ५७×४८ फूट लांबी रुंदीची असून महीमंडप अत्यंत विस्तीर्ण आणि भव्य आहे. या मंडपातील १६ खांब अत्यंत कल्पकतेने उभारलेले आहेत. महामंडपातील ९×९×६ च्या चौथर्यावरील एक रंगशिळा मन वेधून घेते. त्याच्या चारही कोपर्यांवर चार प्रचंड शिल्पांकीत खांब आहेत. रंगशिळेच्या छतावरही कीर्तीमुख,सप्तमातृका,वराह इत्यादिंची मोहक शिल्पकारीता आहे. रंगशिळेवरील छताच्या मध्यभागी पूर्ण विकसित कमळ आहे. या छताचा इंचन इंच भाग भौमितिक आकृत्या व लतापल्लवींच्या गुंफणीने शिल्पित केलेला आहे.
मुखमंडप,महामंडप,अंतराळ व गर्भगृह हे या देवालयाचे प्रमुख भाग आहेत. देवालयाच्या अर्धभिंतीवर गजथर व नरथराची रचना आढळते. गर्भगृहाच्या द्वारपट्टीकेवर पाच शिल्पपट्टीका वेगवेगळ्या भौमितिक आकारांनी शिल्पित केलेल्या आहेत. उंबरठ्यावर विशाल किर्तीमुख आहे. गर्भगृह १०×१० चे असून विशिष्ट पध्दतीच्या भौमितीक आकृतीच्या आधारे गर्भगृहाचे सपाट छत उभारलेले आहे.

आपणास हे माहित आहे काय ?

मंदिर शिल्पस्थापत्य शैली

चालुक्य शिल्पस्थापत्य शैली ही इ.स.च्या ६ व्याइ.स.च्या १२ व्या शतकांदरम्यान अस्तित्वात असलेल्या चालुक्य साम्राज्यात प्रचलित असलेली स्थापत्यशैली होती.

चालुक्य शिल्पस्थापत्य शैलीची देवालये उंच जोत्याची असतात. ९ ते १० फूट जोते ठेणयाचा प्रघातही या पध्दतीत होता. ही देवालये सामान्यपणे चौथर्यावर उभारली जातात. देवालयाची स्थापत्य रचना तारकाकृती किंवा अष्टभद्र आराखड्यावर असधारीत असते. देवालयाचा छज्जा सरळ, जाड आणि रुंद ठेवण्याची पध्दती असते. चालुक्य शिल्पस्थापत्य कलापरंपरेत अनेक वैशिष्ट्ये आढळतात. या प्रकारच्या देवालयातील द्वारपट्टीका विशेषरीत्या अलंकारीक असतात. कलशपात्राची शिल्परचना तिथे असते. उंबरठ्यावर किर्तीमुख असते. देवालयातील शिल्परचनेत अष्टदिक्पाल, सप्तमातृका शिल्प आदिंचा समावेश असतो. समचतुष्कोनाकृती भौमितीक आकृत्यादेखील अनेक देवळातून आढळतात.

उत्तर चालुक्य कलेचे टप्पे नांदेड, लातूर, उस्मानाबाद या दक्षिण मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये दिसून येतात. या भागातील मंदिरे स्थापत्यदृष्ट्या उत्तर कर्नाटकातील मंदिरांशी मिळतीजुळती आहेत. त्यातील आकृतीशिल्पे स्तंभांच्या खांबांवर आणि मंडोवरावर असतात. महाकाय प्रतिहारमूर्ती गर्भगृहाच्या द्वाराच्या दुतर्फा आणि मूर्तीशिल्पे मंडपाच्या किंवा गर्भगृहाच्या बाह्यांगावर आढळतात. तुलापट आणि खांब यांना जोडणारी आधारशिल्पेही या मंदिरांमध्ये..

निवडक मंदिरे

Amruteshwar1.jpg

अमृतेश्वर मंदिर रतनवाडी गावात आहे. हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे.

मंदिराच्या गर्भगृहाला मागच्या बाजूला असणारा एक अर्धमंडप, मंडप, अंतराळ, व गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. मंदिराच्या रचनेत खाली थरयुक्त चौरस तळखडा असून वर अलंकृत चौरसाकृती खांब आहेत. या खांबांचा वरचा भाग अष्टकोनी असून त्यावर वर्तुळाकृती आणि वर कीचकहस्त आहेत. मंडपाचे छत घुमटाकार असून त्यावर ठरावीक अंतर सोडून नर्तक व वादकांच्या तिरप्या प्रतिमा आहेत. मंदिराचे शिखर भूमिज प्रकारचे असून शिखरावर चारही बाजूंनी एक एक अशा चार वेली आहेत.

आपण हे करू शकता

भारत देश हा मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तीचित्रे भारतातील मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुने पुरावे आहेत. पुराणतज्ञांनुसार, सत्तर हजार वर्षांपूर्वी आदिमानवाने भारतात प्रवेश केला. साधारणपणे ९००० वर्षांपूर्वी भारतात ग्राम व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व त्याचेच हळूहळू सिंधू संस्कृतीत रुपांतर झाले.[१]. इसवीसन पूर्व ३५०० च्या सुमारास सिंधू संस्कृतीचा काल मानला जातो. या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या वायव्य प्रांतात म्हणजेच आजच्या पाकिस्तानात झाली. मोहेंजोदडो व हरप्पा ही उत्खननात सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच गणली जातात. यानंतरचा काळ (इ.स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व ५००) वैदिक काळ म्हणून गणला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत इतिहासकारांमध्ये असा समज होता की युरोप व मध्य अशियातून आलेल्या आर्य लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून सिंधू संस्कृती नष्ट केली व वैदीक काळ सूरू झाला[२]. परंतु सध्या संशोधकांचे असे मत आहे की वैदीक काळ हा पूर्वीच्या संशोधकांच्या मान्यतेपेक्षा अजून प्राचीन असून वैदीक संस्कृती व हडाप्पा व मोहोंदोजडोची संस्कृती या एकच होत्या. हा वादाचा मुद्दा असला तरी सिंधू संस्कृती व वैदीक काळातील घडामोडी या सिंधू व सरस्वती नद्यांच्या काठी घडल्या होत्या यात दुमत नाही. यातील सरस्वती नदी ही काळाच्या ओघात पृष्ठीय बदलांमुळे लुप्त पावली. प्राचीन सरस्वती नदी ही पंजाब, राजस्थान व कच्छ गुजरात मधून वाहत होती हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे. या वैदीक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली.परंतु भारतीय संस्कृती म्हणून त्यापूर्वीच्या शेकडो वर्षाचे संदर्भ समजून घेणे आवश्यक आहे . इतिहास संशोधन आणि लेखन याचे शास्त्र यावर अधिक संशोधन झाल्यास मागील ९००० हजार वर्षाचा सांस्कृतिक इतिहास मांडणे शक्य होईल मध्य वैदीक काळात सिंधू काठची वैदीक संस्कृती गंगेच्या खोऱ्यात पसरली.


अजिंठा-वेरूळची लेणी येथील भित्तीचित्रे:इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकात अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर बरीच राजकीय स्थित्यंतरे झालीत. भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते. चंद्रगुप्त मौर्याने मगधच्या मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली ज्याचासम्राट अशोकाने कळस गाठला. कलिंगाच्या युद्धात मानवी क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला.[३] भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता. मौर्य साम्राज्याच्या पतना नंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली. काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या गुप्त साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले. हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच जनतेवर दीर्घकाल राहिलेला बौद्ध धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदीक धर्माची वेगळ्या स्वरुपात पुनर्बांधणी झाली. साहित्य, गणित, शास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली."[४][५] भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. दक्षिण भारतात अनेक साम्राज्ये उदयास आली. तमिळनाडूतील चोल साम्राज्य, विजयनगरचे साम्राज्य, महाराष्ट्रातील सातवाहन, या काळातील कला, स्थापत्यशास्त्रातील प्रगती आजही खूणावते. अजिंठा-वेरूळची लेणी, वेरुळ, हंपीचे प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदीरे ही याच काळात बांधली गेली चोल साम्राज्याचा विस्तार आग्नेय आशियातील इंडोनेशिया या देशापर्यंत पोहोचला होता.

वर्ग

पिंगळी


तालुका जिल्हा परभणी

परभणी पासून ११ कि मी अंतरावर पिंगळी हे गाव आहे . गाववाची लोकसंख्या दहा हजार च्या आसपास असून मराठा वाणी बोध मुस्लिम कुंभार मांग सर्व जातीचे लोक येथे राहतात . गावा मध्ये हेमाडपंती शंकराचे खूप देखणे मंदिर आहे व मंदिरा समोर परभणी जिल्यातील सर्वात मोठी बारव आहे . बारच पाणी साखरे प्रमाणे गोड व स्वछ राहते गावा पासून थोड्याच अंतरावर गोकुळ्नाथ महाराज यांचे नावाजलेले निसर्ग रम्य मंदिर आहे . येथे दर सोमवारी भजन कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम राहतो .