सप्तमातृका
Jump to navigation
Jump to search
सप्तमातृका | |
अन्य नावे/ नामांतरे | अष्टमातृका |
नामोल्लेख | देवीमाहात्म्य, देवी भागवत पुराण, देवी पुराण, महाभारत, मत्स्य पुराण, वराह पुराण, विष्णुधर्मोत्तर पुराण |
सप्तमातृका ह्या सात हिंदू देवी सदा एकत्र पूजल्या जातात. ब्राह्मी (ब्रह्मिणी), वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, कौमारी, वाराही व चामुंडा, अशा या सात मातृदेवता आहेत. काही वेळा यांमध्ये नारसिंही देवीचाही समावेश केला जातो; तेव्हा या विस्तृत समूहाला अष्टमातृका असे म्हणतात. शाक्त व तांत्रिक संघांमध्ये सप्तमातृका वंदिल्या जातात.
इतिहास[संपादन]
शिल्प[संपादन]
वेरुळच्या लेण्यामधून या सप्तमातृकांची शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात. नांदेड तालुक्यातील मुखेड गावात महादेव मंदिर आहे. या मंदिरावर आहेत अत्यंत दुर्मीळ अशा नृत्य करणाऱ्या सप्तमातृका कोरलेल्या आढळतात. प्रत्येक मातृकांच्या पायाशी एक कमळाचे फूल असून त्यामध्ये त्यांचे वाहन शिल्पित केलेले आढळते.