दालन:मंदिर/मंदिर शैली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मंदिर शैली 1

दालन:मंदिर/मंदिर शैली/1 चालुक्य शिल्पस्थापत्य शैली ही इ.स.च्या ६ व्याइ.स.च्या १२ व्या शतकांदरम्यान अस्तित्वात असलेल्या चालुक्य साम्राज्यात प्रचलित असलेली स्थापत्यशैली होती.

चालुक्य शिल्पस्थापत्य शैलीची देवालये उंच जोत्याची असतात. ९ ते १० फूट जोते ठेणयाचा प्रघातही या पध्दतीत होता. ही देवालये सामान्यपणे चौथर्यावर उभारली जातात. देवालयाची स्थापत्य रचना तारकाकृती किंवा अष्टभद्र आराखड्यावर असधारीत असते. देवालयाचा छज्जा सरळ, जाड आणि रुंद ठेवण्याची पध्दती असते. चालुक्य शिल्पस्थापत्य कलापरंपरेत अनेक वैशिष्ट्ये आढळतात. या प्रकारच्या देवालयातील द्वारपट्टीका विशेषरीत्या अलंकारीक असतात. कलशपात्राची शिल्परचना तिथे असते. उंबरठ्यावर किर्तीमुख असते. देवालयातील शिल्परचनेत अष्टदिक्पाल, सप्तमातृका शिल्प आदिंचा समावेश असतो. समचतुष्कोनाकृती भौमितीक आकृत्यादेखील अनेक देवळातून आढळतात.

उत्तर चालुक्य कलेचे टप्पे नांदेड, लातूर, उस्मानाबाद या दक्षिण मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये दिसून येतात. या भागातील मंदिरे स्थापत्यदृष्ट्या उत्तर कर्नाटकातील मंदिरांशी मिळतीजुळती आहेत. त्यातील आकृतीशिल्पे स्तंभांच्या खांबांवर आणि मंडोवरावर असतात. महाकाय प्रतिहारमूर्ती गर्भगृहाच्या द्वाराच्या दुतर्फा आणि मूर्तीशिल्पे मंडपाच्या किंवा गर्भगृहाच्या बाह्यांगावर आढळतात. तुलापट आणि खांब यांना जोडणारी आधारशिल्पेही या मंदिरांमध्ये..

मंदिर शैली 2

दालन:मंदिर/मंदिर शैली/2 हेमाडपंती स्थापत्यशैली: भारतीय स्थापत्यशैलींपैकी एक प्रमुख शैली म्हणून हेमाडपंती शैलीचा उल्लेख केला जातो. देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन १२५९ ते १२७४ याकाळात मुख्य प्रधान राहिलेल्या हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत यांनी या प्रकारच्या इमारतबांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणीपद्धत त्यांच्या नावावरून हेमाडपंती म्हणून ओळखली जाऊ लागली. मंदिरांचे हेमाडपंती पद्धतीने झालेले बांधकाम टिकून राहिले आणि त्यामुळे ते आजही अभ्यासकांना उपलब्ध आहे. सामान्यतः इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा त्याप्रकारचा दर्जा न भरता दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून, त्यांनाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसू शकतील अशी रचना केली जाते. मंदिरांसारख्या वास्तूत पायापासून शिखरापर्यंत ही दगड एकमेकांत गुंफून केलेली रचना एकसंध उभी राहाते आणि टिकाऊही बनते. वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर, औंढा नागनाथ येथील मंदिर ही हेमाडपंती स्थापत्यशैलीची काही उदाहरणे होत.

मंदिर शैली 3

मंदिर शैली 4

मंदिर शैली 5

मंदिर शैली 6

मंदिर शैली 7

मंदिर शैली 8

मंदिर शैली 9

मंदिर शैली 10

मंदिर शैली 11

मंदिर शैली 12

मंदिर शैली 13

मंदिर शैली 14

मंदिर शैली 15

मंदिर शैली 16

मंदिर शैली 17

मंदिर शैली 18

मंदिर शैली 19

मंदिर शैली 20

मंदिर शैली 21

मंदिर शैली 22

मंदिर शैली 23

मंदिर शैली 24

मंदिर शैली 25

मंदिर शैली 26

मंदिर शैली 27

मंदिर शैली 28

मंदिर शैली 29

मंदिर शैली 30

मंदिर शैली 31

मंदिर शैली 32

मंदिर शैली 33

मंदिर शैली 34

मंदिर शैली 35

मंदिर शैली 36

मंदिर शैली 37

मंदिर शैली 38

मंदिर शैली 39

मंदिर शैली 40

मंदिर शैली 41

मंदिर शैली 42

मंदिर शैली 43

मंदिर शैली 44

मंदिर शैली 45

मंदिर शैली 46

मंदिर शैली 47

मंदिर शैली 48

मंदिर शैली 49

मंदिर शैली 50